मराठी शब्दकोष

रम्या's picture
रम्या in काथ्याकूट
30 Oct 2008 - 2:20 pm
गाभा: 

इंग्लिश-इंग्लिश, इंग्लिश-मराठी, शब्दकोशाप्रमाणे मराठी-मराठी शब्दकोष बाजारात उपलब्ध आहेत का? असल्यास उत्तम शब्दकोश कोणता? जाणकारांनी माहीती द्यावी.

धन्यवाद

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

30 Oct 2008 - 2:40 pm | प्रमोद देव

ह्या दुव्यावर काही माहीती मिळेल.

विकि's picture

30 Oct 2008 - 3:46 pm | विकि

मराठी-मराठी शब्दकोश बाजारात उपलब्ध आहेत . शोध घेतल्यास जरुर मिळेल.
काही शब्दकोश-१)महाराष्ट्र शब्दकोश/दाते-कर्वे.
२)मराठी शब्दरत्नाकर/आपटे.
३) सरस्वती शब्दकोश/विद्याधर वामन भिडे.
४)मराठी व्यूत्पत्ती कोश/कृ.पा.कुलकर्णी

त्याचप्रमाणे नवनीत प्रकाशनाचा मराठी-इंग्लीश-मराठी/सुधाकर प्रभुदेसाई हा शब्दकोश ही आहे.
आपला
कॉ.विकि

निनाद's picture

30 Oct 2008 - 5:11 pm | निनाद

मोल्सवर्थ चा शब्दकोश सर्वात मोठा व जूना आहे. (हा सगळ्या कोशांचा दादा आहे)
तो वरदा प्रकाशनाने प्रकाशितही केला आहे किंमत रू.१२००

याची संक्षिप्त आवृत्ती म्हणजे बाबा मद्मन्जी यांनी संपादित केलेला मोल्सवर्थ चा शब्दकोश हा पण वरदा प्रकाशना कडून प्रकाशित झाला आहे.

पत्ता: वरदा बुक्स
३९७/१ सेनापती बापट मार्ग , वेताळबाबा चौक पुणे ४११०१६ दुरध्वनी ०२०-२५६५५६५४ (यांना डिमांड ड्राफ्ट पाठवल्यास हे पोस्टाने परदेशातही पुस्तके पाठवण्याची सोय करतात. पुस्तक मागणी लेखी करणे आवश्यक)

अआहे.प्रकाशन माहिती येथे येथेही आहे.
-निनाद

निनाद's picture

30 Oct 2008 - 5:12 pm | निनाद

पुर्ण वाचले नाही,

हा कोश मराठी-इंग्रजी आहे
-निनाद