जॉर्डन पीटरसन हे नाव कधी जास्त ऐकलेलं नव्हतं. कुठुन तरी युट्युबबाबाने सजेस्ट केलं आणि त्याचे काही विडिओ पाहण्यात आले. या बाबाचे काही मुद्दे मस्त पटले तर काही अजिबात नाही. खरंतर काही ठिकाणी तो अगदी इथल्या अजोसारखा पण वाटला. माणूस अगदी शांतपणे मुद्द्याला धरुन जे शब्दच्छल अथवा गोळीबंद रचना करतो ती खरंच इंप्रेसिव वाटली.
आता या इथे शेअर केलेल्या वरच्या लिंकमध्ये कॅथीबाईंनी यांची मस्त तासू अशा ठरावाने घेतलेली मुलाखत पहा. काका काही म्हणाले की 'म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का...' अशा सुरुवातीने बाई त्यांची अतर्क्य अशी कंन्क्लुजन फेकतात. कधी कधी तर पुस्तक अथवा आधी कुठे म्हटलेली वाक्ये देखील या अशा भडिमारासाठी त्या वापरतात. काका मात्र शांतपणे मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करतात (बाईंनी बोलू दिले तर अर्थात.)
मुलाखतीतला मुख्य मुद्दा पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा आहे आणि काका त्या फेवरमध्ये नाहीत हा बाईंचा निष्कर्ष आहे (काकांचा मुद्दा त्याच अर्थाचा पण जास्त सविस्तर आहे). कॅथीबाईंनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी काका जमले तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत हे चित्र चाललेय आणि ट्रांस लोकांसाठी वेगळ्या संबोधनाची चर्चा सुरु होते तेव्हा काकांना एक भन्नाट फुलटॉस मिळतो, त्यावर काकांनी जे फुल टॉस लावलाय तो वाद विवादासाठी अगदी उत्तम नमुना ठरावा (ही चर्चा या इथे सुरु होते.).
एकंदरीत पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलतरी काकांची मतं ६०-७०% सेन्सिबल वाटली. काही बाबतीत ते उगीच ओढून ताणून उत्तरे जुळवत आहेत अथवा तकलादू प्रतिवाद करत आहेत असं वाटलं पण त्याला त्या कॅथीबाईंचा स्वत:चे मत रेटण्याचा अग्रेसिवपणा झाकून टाकत होता.
एकंदरीत डावे उजवे यात काहीच पटत नसले तरी हे असले फड रंगलेले पहायला मजा येते हे नक्की. :)
[संपूर्ण मुलाखत या इथे ]
प्रतिक्रिया
4 Oct 2018 - 8:20 pm | अस्वस्थामा
काकांच्या या चर्चेतल्या काही ढोबळ गोष्टी :
१. गौरवर्णीयांनी ऑप्रेस केलेल्या फक्त स्त्रीया नव्हत्या तर इतर घटक पण होते.
२. पगारातल्या तफावतीसाठी लिंगभेद हा एकच एक घटक मानणे भाबडेपणा आहे. लिंगभेद हा घटक नाही असे नाही पण तोच एकमेव आहे असे मानुन सरसकटीकरण करणे वेडेपणा ठरेल. जॉर्डनकाका हे देखील ठामपणे म्हणतात की स्त्रीया बौद्धिकदृष्ट्या कुठेही कमी नाहीत पण स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांमध्ये काही (शारिरिक/मानसिक) फरक आहेत ते नाकारता येणार नाहीत आणि ते नाकारून कृत्रिम समानतेचे आग्रह धरणे स्त्रीयांसाठी देखील लॉन्ग टर्ममध्ये तितकेसे फायदेशीर असणार नाही.
३. 'सक्सेस ऑफ आउटकम' : कोणी ठरवून यशस्वी स्त्रीला उच्चपदावर पोहचण्यापासून (फक्त स्त्री आहे म्हणून ) डावलतोय असं नाही (याचं विवेचन आत्ता नीट आठवत नाहीय).
४. संधींची समान उपलब्धता आणि निर्णयाचं स्वातंत्र्य या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. स्त्रीया त्यांना हवे ते प्रोफेशन निवडतील. उदा. (काकांचे मत, माझ्याकडे विदा नाही) सध्या जास्तीत जास्त स्त्रीया मेडिकल प्रोफेशन मध्ये आहेत. पुरुषांपेक्षा जास्त संख्येने आहेत आणि चांगले कामही करत आहेत.
५. अग्रेसिवपणा आणि समजूतदारपणा - या दोन गोष्टी तुमच्या निगोशियेशन मध्ये परिणाम करतात हे नक्की. तुम्ही जितके समजूतदार तितके तुम्हाला नाडले जाण्याची शक्यता अधिक (यातले बरचसं पटलं नाही आणि ताणून विवेचन वाटलं तरी पण अत्ता सगळे मुद्दे आठवत नाहियेत )
माझा आवडता,
४. हा ट्रांन्सजेंडर लोकांच्या एका मागणीबद्दल होता, युनिवर्सिटी मध्ये प्रोफेसरांनी ट्रान्स-विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित संबोधनाने बोलवावे (म्हणजे ही शी ऐवजी झी, हर ऐवजी झर अशी लिस्ट) आणि ही मागणी एक नियमावलीच्या कायद्याच्या स्वरुपात रोल आउट झालीय (अधिक सविस्तर ते उसगावतले लोक्स जाणोत).
काका म्हणे की कोणाला काय म्हणू नये (हेट स्पीच) हे समजू शकतो पण कोणाला कसे संबोधावे हे भाषिकबाबतीत नैसर्गिकरित्या व्हायला हवे आणि असे कायदे करुन नव्हे. ती हुकुमशाहीच्या रस्त्याने जाणारी गोष्ट होते (आणि यावर ते आयडेटिटी पॉलिटिक्स वगैरे आहे) तर कॅथीबाई म्हणे म्हणजे त्यांना हवे ते संबोधन न वापरून तुम्ही त्यांना ऑफेन्ड करायला तयार आहात तर ? त्यावर काकांच उत्तर असं की ' विचार करायला अथवा विचार प्रवृत्त करायला एखाद्याला ऑफेन्ड करायचा थोडा धोका पत्करायला हवा. जसा की तू आत्ता पत्करते आहेस. तू खऱ्याच्या शोधाखातरच मला ऑफेन्ड करण्याचा धोका पत्करते आहेस. ते अस्वस्थ करणारं आहे पण ते तसं असणं हे विचार करणं सुरु राहण्यासाठी गरजेचंच आहे. आणि तू तुझं काम चागलंच करतीयेस की.' कॅथीबाई त्यांच्या पद्धतीने याला ट्विस्ट करू पहात होत्या पण ते स्पीचलेस की काय म्हणतात ते झाल्या क्षणभर.
असो, ऐसी वर हे आधी लिहिलेलं पण मुद्दे पोचावेत म्हणून इथे परत लिहितोय.
5 Oct 2018 - 10:33 am | sagarpdy
पीटरसन यांचे म्हणणे मुद्देसूद वाटले (जर त्यांनी सांगितलेले संदर्भ खरे असतील तर त्यांचे म्हणणे पटले असे म्हणायलाही हरकत नाही)
तुम्हाला जे मुद्दे पटले नाहीत त्यावर काही लिहिलत तरी चालेल - या व्हिडीओ सोबत यांचे काही अन्य व्हिडीओ पहिले, त्यात तार्किक दृष्ट्या फार काही खटकत नाही, पण शक्यतो मीडिया मध्ये असे मुद्दे अशा प्रकारे मांडले जाण्याची सवय नसल्याने ते पटत नाहीत.
पीटरसन बऱ्यापैकी आक्रमक आहेत, त्यामुळे त्यांचे म्हणणे पटवून घ्यायला कठीण होते (पॉलिटिकल करेक्टनेस ऐकायची सवय)
5 Oct 2018 - 2:31 pm | अस्वस्थामा
मला तरी आक्रमक वाटलं नाही कुठे. मला वाटतं खूप कमी लोक्स इतक्या शांतपणे मुद्देसूद वाद घालू शकतात त्यामुळे समोरचा भावनिक रोलर-कोस्टर वरून जाताना पण हा माणूस ठामपणे त्याचा मुद्दा मांडत होता ते भारीच वाटलं.
5 Oct 2018 - 5:26 pm | sagarpdy
आक्रमक म्हणजे आक्रस्ताळे नाही, पण डायरेक्ट, शार्प, पोलिटिकल कॅरेक्टनेस ची तमा न बाळगणार असे. कदाचित शब्द निवड चुकली.
मुद्दा मांडायची पद्धत आवडली त्यांची.