मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड

विकास...'s picture
विकास... in भटकंती
19 Sep 2018 - 4:27 pm

फलटण लोणंद पुणे मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड

तयारी: जुलै २०१८ मध्ये विमानाचे तिकीट मिळाले आणि सुरुवात चांगली झाली

बऱ्याच प्रकारे प्रयत्न करून रुपये ५५०७/- मध्ये ३ तिकिटं मिळाली. मी, सौ. आणि चिंरजीव. मुंबई ते जयपूर रुपये १८३५ प्रत्येकी.
विमान Jet Airways चे Boeing होते. पण ते Mumbai International Airport T२ वरून असल्याने जरा काळजी होती.
प्रवासाची तारीख 02-Sep-18 होती
प्लॅन असा होता (आणि तसाच केला)
02-Sep-18: फलटण मधून सकाळी ११:०० वाजता ST ने निघून लोणंद आणि लोणंद मधून १३:०५ ला कोयना एक्सप्रेस पकडणे (२S चे बुकिंग केले होते) पुणे मधून १ प्रवासी घेणे १६:३०
दादर ला २०:०० ला उतरून नक्षत्र मॉल समोरआदर्श रेस्टॉरंट मध्ये जेवण
२२:०० वाजता अंधेरी साठी Slow Local पकडणे, Andheri to Airport Road By Metro, Airport Road to Terminal २ by Auto (पाच मोठी माणसं १ लहान बाळ आणि पाच बॅग्स ऑटो मध्ये??)
२३:०० ला Terminal २ मध्ये प्रवेश करून सकाळपर्यंत आराम. (विमान सकाळी ५:५५ ला होते, आम्ही रात्री २३:०० ला पोहोचलो होतो!)
03-Sep-18: ५:५५ ते ०७:५५ हवेत आणि ८:०० ला जयपूर विमानतळावर (पण विमान ०७:३० ला मुसळधार पावसात जयपूर ला उतरले!)
८:०० ते ०९:०० Ola Cab ने Hotel Arco Palace Jaipur आणि मुक्काम
04-Sep-18: Jaigarh Fort आणि Amer Fort (Palace). (Stay at Hotel Kalyan)
05-Sep-18: Shopping (Stay at Hotel Kalyan)
06-Sep-18: जयपूर - अजमेर - पुष्कर - उदयपूर प्रवास आणि Hotel Udai Palace ला चेक इन (भारत बंद असूनही सकाळी ०५:०० ते रात्री २२:०० प्रवास नीट्ट झाला)
07-Sep-18: उदयपूर - Jupiter वर भटकंती
08-Sep-18 Chittor Fort (Udipur - Chittorgarh - Udipur by Innova)
09-Sep-18 City Palace, Udaipur
10-Sep-18 Sajjan Garh Fort, Udaipur (होय सज्जनगड उदयपूर मध्ये पण आहे!!), Monsoon Palace Sajjan Garh Fort, Udaipur
10-Sep-18 २१:०० Udaipur City-Mysore Palace Queen Humsafar Express मधून पुणे 11-Sep-18 १७:३० (रुपये १५५० प्रत्येकी)
11-Sep-18 १७:३० पुणे ते फलटण ST ने २१:३० ला सुखरूप.

Hotel Arco Palace
सिंधी कॅम्प बस स्टॅन्ड आणि मेट्रो स्टेशन शेजारी तरी शांत परिसर आहे. जयपूर रेल्वे स्टेशन १ किमी आहे. फॅमिली साठी एकदम चांगली सोय आहे, आम्ही जेवण बाहेरच केले
अधिक माहिती साठी https://www.hotelarcopalace.com

Hotel Kalyan Heritage Site
थोडीसी जुनी इमारत पण सजविलेली आहे, स्वच्छ आणि एकदम शांत परिसर. rooftop restaurant महाग आहे पण टेस्ट आवडली. रूम्स मोठ्या आहे छान रंगसंगीती मध्ये सजविलेल्या होत्या.
आणि अभिमानाने सांगतो Cummins Diesel Generator Set हॉटेल समोर दिमाखात उभा होता.
एकंदर सगळ्या प्रवासात आवडलेली वस्तू होती हॉटेल कल्याण. अधिक माहिती साठी http://www.hotelkalyan.com

Hotel Udai Palace
उदयपूर सिटी रेल्वे स्टेशन अगदी ५०० मीटर वर आहे. शेजारीच पोलीस स्टेशन आहे. हॉटेल समोर मेडिकल होते. आणि बाजूलाच २ व्हिलर भाड्याने मिळते. समोर उदयपूर बस स्टॅन्ड आहे.
मध्यम प्रकारचे पण सर्व सुविधा असलेले हॉटेल होते. रूम्स जरा लहान आहेत आणि दर पण कमीच होता.
दोनदा जेवण रूम मध्ये मागविले. डाळ खिजडी आवडली, त्यांनी बाळासाठी गरम दूध पण दिले होते. पाच दिवस आणि चार रात्री आमचा मुक्काम इथे होता.
http://www.hoteludaipalace.com/index.html

फोटो आणि अधिक माहिती ... पुढील भागात

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

19 Sep 2018 - 5:39 pm | राघवेंद्र

पुढील भाग लवकर टाका.
मस्त झाली ट्रिप

विकास...'s picture

20 Sep 2018 - 6:11 pm | विकास...

धन्यवाद .. लिखाण सुरु आहे

हॅाटेल्सच्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
थोडीफार या ठिकाणांची बजेट ट्रीप चार वर्षांपूर्वी केली होती सप्टेंबर महिन्यातच.
तो साजनगड, आणि एक बाग साजनबाग आहे.

नवीन सुरू झालेल्या हमसफर गाड्यांचे वैशिष्ट्य काय आहे?

विकास...'s picture

20 Sep 2018 - 6:33 pm | विकास...

सज्जन सिंग राजे होऊन गेले त्यांच्या नावावरून सज्जनगड असे नाव दिले आहे. Please visit http://sajjangarh.com
हमसफर एक्सप्रेस थोडीसी महाग गाडी आहे. प्रत्येक डब्यामध्ये दोन अटेंडंट आहेत. निम्मी गाडी रिकामी होती. एकदम चकाचक गाडी आहे.
उदयपूर ते पुणे रुपये १५३५/-.
उदयपूर ते मेसूर रुपये २३२५/-

चौकटराजा's picture

20 Sep 2018 - 6:43 pm | चौकटराजा

अंतरे , वेळा, हॉटेले ई माहिती इतरांना मार्गदर्शक ठरत असते. मी ही " कल्याण " मध्ये च उतरलो होतो .

03-Sep-18 ला आम्ही याच विमानाने गेलो होतो - The 9W 697 flight – a Boeing 737 aircraft

Zee News
19-Sep-18:जेट एअरवेज विमानाचं एमर्जन्सी लॅन्डींग, प्रवाशांच्या कान-नाकातून रक्त, सिल्वासापर्यंत गेलेलं विमान या प्रकारामुळे पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं
http://zeenews.india.com/marathi/india/jet-airways-mumbai-jaipur-flight-...

The Indian Express
19-Sep-18:Jet Airways Mumbai-Jaipur crew ‘forget to maintain cabin pressure’, passengers suffer ear, nose bleeding - The 9W 697 flight – a Boeing 737 aircraft
https://indianexpress.com/article/india/jet-airways-mumbai-jaipur-crew-f...

चौकटराजा's picture

23 Sep 2018 - 10:02 am | चौकटराजा

सांप्रत जेट एअर वेज ची साडेसाती चालू आहे !
@ नाखु , आता इथे विचारा साडेसाती या असल्या भंपक कल्पनांवर आमचा विश्वास आहे का ? '; ))

धन्य आहात , एवढ्या लहान बाळाला घेउन कसे काय जमवला एवढा प्रवास?

प्रमोद देर्देकर's picture

1 Oct 2018 - 11:59 am | प्रमोद देर्देकर

पुढील भाग जास्त माहितीपूर्ण द्या मी कदाचित दिवाळीच्या सुट्टीत जाणार आहे.