मला दिवाळी नंतर ५/६ दिवसासाठी कुटुंबां सह पुण्यावरून कोंकण मध्ये फिरावयास जायचे आहे ,माझी गाडी आहे,,तरी कसे जावे त्याचे मार्ग ,राहण्याची ठिकाण ,चांगले जेवण कुठे मिळेल याची माहित असेल तर कृपया करून द्यावी ही विनती
असा अर्धवट धागा काढून माहिती कशी मिळणार? एकतर कोकणदौरा म्हणाल तर, थेट अलिबागपासून दक्षिणेला वेंगुर्ला, रेड्डीपर्यंतचा परिसर येतो. तुमचे किती याचीही कल्पना दिलेली नाही. थोडे मि.पा.वरचे धागे शोधलेत तरी माहिती मिळेल. तरी सविस्तर माहिती टाकावी, मदत करता येईल.
कोकण फिरणे, हा भाग माझ्या साठी पूर्ण पणे नवीन आहे,निसर्ग बघणे ,समुद्राचया किनारी फिरने कारण 9 वर्षाचा माझा मुलगा बरोबर आहे,शक्य झाल्यास काही किल्ले बागणे,असा विचार आहे पुण्यावरून परत पुणे असा प्रवास करावयाचा आहे,गाडीने जावयाचे आहे,5।6 वेळ आहे,तरी माहिती द्यावी ही विनंती
वाडीसोबत 'खिद्रापूर' ला निश्चित जा. कणेरी मठ येथील सिद्धगिरी संग्रहालय बघा.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, रंकाळा आणि खादाडी आहेच :)
(वाडीचे पेढे, मिसळ, भेळ, बेसन-भाकरी, मटण, आईस्क्रीम इ. आपल्या आवडीनुसार)
पन्हाळा आणि शक्य असल्यास आंबा घाट पण करू शकता.
सगळ्या गोष्टींसाठी गूगल वर भरपूर माहिती आहे.
आंबा घाट सोडून सर्व गोष्टी कोल्हापूर मध्ये मुक्काम करून करू शकता.
कोल्हापूरात शक्यतो गाडी हॉटेल वर लावून रिक्षाने फिरणे उत्तम. स्टॅन्ड/स्टेशन च्या आसपास बरीच चांगली वेगवेगळ्या बजेट ची हॉटेल आहेत.
दोनतीन ट्रीपमध्ये कोकणभेट करावी.
१) किहिम ते मुरुड भाग यात दोन किल्ले आहेत.
लोणावळा खोपोली पाली रोहा मुरुड रेवदंडा चौल अलिबाग पेण खोपोली लोणावळा पुणे / अथवा उलट क्रम.
२) श्रीवर्धन परिसर
ताम्हणीघाटमार्गे कोलाड माणगाव श्रीवर्धन .रायगड, शिवथर घळ इत्यादी
धार्मिक पर्यटन अधिक समुद्र.
३) रत्नागिरी परिसर यामध्ये दोन किल्ले, एक थिबा पॅलेस, चारपाच धार्मिक ठिकाणे.
कोल्हापुर लांजामार्गे साखरपा हातखम्बा रत्नागिरी मालगुंड / पावस परत.
३) सिंधुदुर्ग, कुडाळ,सावंतवाडी, मालवण देवबाग विजयदुर्ग किल्ला
कोल्हापुर कुडाळ तारकर्ली सावंवाडी बेळगाव मिरज कराड सातारा / अथवा उलट क्रम.
एक पाचवा मार्ग पण होईल--
पुणे हुन ताम्हिणी घाटातून रायगड, मंडणगड मार्गे आंजर्ले, केळशी, दापोली, श्री क्षेत्र परशुराम, डेरवण( शिव सृष्टी), हेदवी, वेळणेश्वर आणि चिपळूण, कोयना नगर मार्गे परत पुणे.
ताम्हिणीतून माणगावला आल्यानंतर गोरेगाव मंडणगडमार्गे आंजर्लेला न जाता माणगाववरुन म्हसळा दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि तिथून पुढे आंजर्ले आणि पुढे केळशी हर्णे करदे दापोली असेही जाता येईल.
वर दिलेल्या लिंकखेरीज नवीन माहिती मजकडे नाही. ती माहिती आता जुनी झाली आहे.
दूरध्वनी किंवा अन्य संपर्कप्रकार आंतरजालावर वापरू इच्छित नसल्याने या धाग्यावरच येणाऱ्या सर्व सदस्यांच्या प्रतिसादांतून लेटेस्ट अद्ययावत माहिती मिळवून तुमचा कोंकण दौरा उत्तम होईलच याची खात्री बाळगा.
शाकाहारींना तर फार काही अडचण नाही. मी शाकाहारी आहे. फक्त 'आम्ही मिश्र हॉटेलात खातच नाही' अशी भूमिका असेल तर कठीण आहे.
कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या
असेही लोक असतात ? :)
याबद्दल खात्रीने सांगत नाही कारण समोर आलेल्या जेवणात खोबरे नारळ किती प्रमाणात होते किंवा नव्हते ते मला आता सांगता येणार नाही. मी कोकणात दापोली, तारकर्ली, गणपतीपुळे, अलिबाग ई ठिकाणी फिरलो. अलिबागला तर काहीच अडचण येणार नाही इतकं मात्र नक्की.. अलिबागमध्ये तर मला सोलकढी मिळाली नाही लवकर आणि म्हणे अलिबाग कोकणात आहे !! ..
बाकी दापोलीला खाल्लेल्या पनीर बटर मसालाच्या रस्श्यात मस्त नारळ वापरला होता.. पण विश्वास ठेवा या पंजाबी पदार्थाची ही कोकणी आवृत्तीही खूप स्वादिष्ट होती.
मिश्र हॉटेलात नो प्रॉब्लेम. सागरकिनारा म्हणला की मासे-नारळ-खेकडे हे मुख्य आकर्षण असणार हे मान्य आहे.
प्रत्येक नव्या ठिकाणी स्थानिक शाकाहारी पदार्थांची चव घेऊन बघायला आवडते. माझा कोकण खाद्यानुभव अत्यंत मर्यादित आहे - गुहागरपुरता (त्यामुळे अपवाद असावा असे समजतो.) तेथे बटाट्याची भाजी + मटकी उसळ हा मेनू दीड दिवसात तीनदा झाल्यामुळे अन्यत्र 'कस्काय अस्तय' ते विचारावं वाटलं :-)
MTDC मध्ये तरी काहीच अडचण येणार नाही कारण तिथे नेहमीचे (म्हणजे आपल्या अतिपरिचयाचे असे) पंजाबी पदार्थ असतात.
प्रत्येक नव्या ठिकाणी स्थानिक शाकाहारी पदार्थांची चव घेऊन बघायला आवडते.
पण कोकणातल्या बहुतांशी स्थानिक पदार्थांत नारळ असेल असे मला वाटते. त्यामुळे जर नारळ टाळायचा असेल तर स्थानिक पदार्थांचा आग्रह ठेवू नका.
आजकाल सगळ्याच पर्यटनस्थळी इतर (म्हणजे स्थानिक नसलेले आणि आपल्याकरिता परिचयाचे) पदार्थ बहूधा मिळतात. खासकरुन गुजराथी लोकांचे उपहारगृह असतात अनेक पर्यटनस्थळी. अलिबाग, गणपतीपुळे अशा गर्दीच्या ठिकाणी अडचण येवू नये,
नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या पर्यटकांचे खाण्यापिण्याचे हाल होतात :)
नाही हो, सरसकट संपूर्ण कोकणात असं नाही होत, परंतु निसर्गाचा प्रचंड वरदहस्त लाभलेल्या आणि पर्यटकांचे खास आकर्षण ठरण्याची क्षमता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र "शाकाहारी असलेल्या आणि कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या पर्यटकांचे खाण्यापिण्याचे हाल होतात" हे दुर्दैवाने अंशत: खरं आहे. अर्थात बाहेर जेवायचं असेल तरच. तुमच्या परीचयाचे कोणी तिथे असतील आणि त्यांच्या घरी तुमच्या खानपानाची सोय असेल तर तिथेहि नाही हाल होणार.
'कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या' ... शाकाहारी असून खोबरे न खाण्याचे कारण वैद्यकीय आहे की केवळ नावड? महाराष्ट्रात खोबर्याला पर्याय शेंगदाण्याचे कूट हा असतो. खोबरे विहीन सांगितल्यास तसे बनवून मिळू शकते.
गणपतीपुळे किंवा तारकर्लीचा विचार करा
दोन्हीकडे MTDC चे रिसॉर्ट आहेत. ते चांगले आहेत. इतरही अनेक हॉटेल्स आहेत ते पण स्वस्त आणि मस्त आहेत.
गणपतीपुळे -
इथला MTDC रिसॉर्ट तर खासच आहे त्यात 'कोकण हट' (की असेच काहीसे नाव) हा प्रकार अगदी छान , अगदी बीचवरच आहे. जेवण वगैरे सगळं चांगलं (मी सुमारे सात वर्षांपुर्वी गेलो होतो पण आताही तीच गुणवत्ता असेल अशी आशा करतो)
इथे जवळच प्राचीन कोकण नावाचे प्रदर्शन आहे. ते सुंदर आहे.
जवळ एका गावात कवी केशवसूतांचे स्मारक आहे ते बघण्यासारखे आहे
जयगड फोर्ट हा किल्ला आहे तिथे जाता येईल , त्यापासून जवळच एक बोट जेट्टी /पोर्ट आहे तिथून तवसाळ किनार्याकडे जाणार्या मोटरबोट निघतात. त्या बोटवर आपली कार लादून जाता येते. पलीकडे गेल्यावर कार काढून फिरायचे. तुमच्या मुलाला हा प्रवास आवडेल.
मार्ग: सातारा, उंबर, कुंभार्ली घाट , चिपळूण ई.. कुंभार्ली घाटात अगदी माथ्यावर एक छोटे हॉटेल आहे. जाताना येथे रहाण्याचा आनंद घेवू शकता. संध्याकाळी घाटातून दरीचे दृष्य बघणे आनंददायी आहे. (टीपः इथे खाली रेस्टॉरंटमध्ये रात्री ट्रकचालक (काही वेळा मद्यपी) येतात पण वर रुमवर त्यांचा काही त्रास नाही. )
येता/जाताना संगमेश्वरचे जुने दगडी (हेमाडपंथी ?) मंदिर पाहू शकता
तारकर्ली :
मालवणहून बोटीने सिंधुदुर्ग किल्ला बघायला जाता येईल.
स्कुबा डायव्हिंगसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. पण ते नेमके कुठे आहे ते मला सांगता येणार नाही.
सावंतवाडीहून जाता/येताना लाकडी खेळणी विकत घेवू शकता. सावंतवाडीची जितकी झलक मी पाहिली त्यावरुन मला ते एक स्वच्छ सुंदर असे छोटेसे शहर वाटले (तिथे आणखी फिरायला हवे होते असे आता वाटते)
प्रवासः अंबोली मार्गे - अंबोलीला एक रात्र मुक्काम करु शकता, तिथे अनेक हॉटेल्स आहेत. धबधब्याला बर्यापैकी पाणी असेल अशी अपेक्षा आहे.
एकूणात तुम्हाला कोकणचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर रत्नागिरी वा सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फिरायला हवे असे मला वाटते. अलिबाग छान आहे पण कोकणचा 'फील' तितकासा येत नाही.
गेल्या वर्षीच तार्कर्ली ते गणपती-पुळे याची ६ दिवस ट्रिप केलेली. तारकरली एम्टिडिसी हॉटेल भारी आहे पण बीचवर गर्दी असते. आणि थोडा कचरा. त्या तुलनेत पुळ्याच्या जवळचा बीच( नाव विसरलो) फार निवांत होता. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग बघण्यासारखे आहेत. रत्नागिरीचा किल्लापण छान आहे. जयगड बोर आहे. नुसताच रखरखाट. मालवणजवळ निवती नामक एका जागी गेलेलो. ती देखील मस्तं होती.
हॅाटेलवाले रुम भाड्याने देतात तसे दिल्यास पाच सहा दिवसांत स्वत:च्या कारने बरीच ठिकाणे करता येतील. सकाळी लवकर रुम सोडून दोनचार ठिकाणे करत चार-पाच वाजेपर्यंत दुसरीकडे मुक्काम करायचा. वाटेत नाश्ता जेवण.
Day 1 Harne Beach, Aare Ware Beach, Harne Bandar. You can get accommodation in family house in Rs. 1500. Day2 Ganpatipule, Ratntadurga, Vijaydurga, Deogad, Kunkeshwar. You can get accommodation in trust or shivsagar tourist 094202 59900.
Special: Vimleshwar temple Deogad and Rameshwar temple girye, Vijaydurga.
प्रतिक्रिया
15 Sep 2018 - 1:15 pm | दुर्गविहारी
असा अर्धवट धागा काढून माहिती कशी मिळणार? एकतर कोकणदौरा म्हणाल तर, थेट अलिबागपासून दक्षिणेला वेंगुर्ला, रेड्डीपर्यंतचा परिसर येतो. तुमचे किती याचीही कल्पना दिलेली नाही. थोडे मि.पा.वरचे धागे शोधलेत तरी माहिती मिळेल. तरी सविस्तर माहिती टाकावी, मदत करता येईल.
16 Sep 2018 - 10:27 am | संजय
कोकण फिरणे, हा भाग माझ्या साठी पूर्ण पणे नवीन आहे,निसर्ग बघणे ,समुद्राचया किनारी फिरने कारण 9 वर्षाचा माझा मुलगा बरोबर आहे,शक्य झाल्यास काही किल्ले बागणे,असा विचार आहे पुण्यावरून परत पुणे असा प्रवास करावयाचा आहे,गाडीने जावयाचे आहे,5।6 वेळ आहे,तरी माहिती द्यावी ही विनंती
15 Sep 2018 - 10:48 pm | कऊ
रेड्डी नाही ओ रेडी..
16 Sep 2018 - 5:46 am | सुमो
गवि यांचा हा प्रतिसाद वाचण्यासारखा आहे.
16 Sep 2018 - 3:27 pm | दिपुडी
असाच एखादा धागा कोल्हापूर दर्शन साठी आहे का?
पुढच्या आठवड्यात वाडीला जायचे ठरले आहे,,तिकडे जवळपास काय बघता येईल याबाबत कुठे माहिती मिळू शकेल?
18 Sep 2018 - 4:41 pm | लई भारी
वाडीसोबत 'खिद्रापूर' ला निश्चित जा. कणेरी मठ येथील सिद्धगिरी संग्रहालय बघा.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, रंकाळा आणि खादाडी आहेच :)
(वाडीचे पेढे, मिसळ, भेळ, बेसन-भाकरी, मटण, आईस्क्रीम इ. आपल्या आवडीनुसार)
पन्हाळा आणि शक्य असल्यास आंबा घाट पण करू शकता.
सगळ्या गोष्टींसाठी गूगल वर भरपूर माहिती आहे.
आंबा घाट सोडून सर्व गोष्टी कोल्हापूर मध्ये मुक्काम करून करू शकता.
कोल्हापूरात शक्यतो गाडी हॉटेल वर लावून रिक्षाने फिरणे उत्तम. स्टॅन्ड/स्टेशन च्या आसपास बरीच चांगली वेगवेगळ्या बजेट ची हॉटेल आहेत.
16 Sep 2018 - 8:29 pm | कंजूस
दोनतीन ट्रीपमध्ये कोकणभेट करावी.
१) किहिम ते मुरुड भाग यात दोन किल्ले आहेत.
लोणावळा खोपोली पाली रोहा मुरुड रेवदंडा चौल अलिबाग पेण खोपोली लोणावळा पुणे / अथवा उलट क्रम.
२) श्रीवर्धन परिसर
ताम्हणीघाटमार्गे कोलाड माणगाव श्रीवर्धन .रायगड, शिवथर घळ इत्यादी
धार्मिक पर्यटन अधिक समुद्र.
३) रत्नागिरी परिसर यामध्ये दोन किल्ले, एक थिबा पॅलेस, चारपाच धार्मिक ठिकाणे.
कोल्हापुर लांजामार्गे साखरपा हातखम्बा रत्नागिरी मालगुंड / पावस परत.
३) सिंधुदुर्ग, कुडाळ,सावंतवाडी, मालवण देवबाग विजयदुर्ग किल्ला
कोल्हापुर कुडाळ तारकर्ली सावंवाडी बेळगाव मिरज कराड सातारा / अथवा उलट क्रम.
पाचसहा दिवसात एकेक भाग होतो.
17 Sep 2018 - 11:37 am | संजय
धन्यवाद सर
17 Sep 2018 - 6:46 pm | सुबोध खरे
एक पाचवा मार्ग पण होईल--
पुणे हुन ताम्हिणी घाटातून रायगड, मंडणगड मार्गे आंजर्ले, केळशी, दापोली, श्री क्षेत्र परशुराम, डेरवण( शिव सृष्टी), हेदवी, वेळणेश्वर आणि चिपळूण, कोयना नगर मार्गे परत पुणे.
18 Sep 2018 - 8:57 am | संजय
धन्यवाद सर
18 Sep 2018 - 9:52 pm | सतिश गावडे
ताम्हिणीतून माणगावला आल्यानंतर गोरेगाव मंडणगडमार्गे आंजर्लेला न जाता माणगाववरुन म्हसळा दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि तिथून पुढे आंजर्ले आणि पुढे केळशी हर्णे करदे दापोली असेही जाता येईल.
17 Sep 2018 - 8:29 pm | टवाळ कार्टा
गाडी म्हणजे चारचाकी की....? नै पुण्याहून जाणार म्हणताय म्हणून विचारले :D
18 Sep 2018 - 9:38 am | संजय
मला श्री गवी चा मोबाईल न मिळेल का
18 Sep 2018 - 11:31 am | गवि
वर दिलेल्या लिंकखेरीज नवीन माहिती मजकडे नाही. ती माहिती आता जुनी झाली आहे.
दूरध्वनी किंवा अन्य संपर्कप्रकार आंतरजालावर वापरू इच्छित नसल्याने या धाग्यावरच येणाऱ्या सर्व सदस्यांच्या प्रतिसादांतून लेटेस्ट अद्ययावत माहिती मिळवून तुमचा कोंकण दौरा उत्तम होईलच याची खात्री बाळगा.
सुखद ट्रिपसाठी शुभेच्छा.
22 Sep 2018 - 10:25 am | संजय
धन्यवाद
18 Sep 2018 - 10:33 am | कंजूस
कोकणातल्या धार्मिक स्थानांचे आकर्षण नसेल तर समुद्रासाठी कोकणच हवे असे नाही. गोवा कर्नाटक किनारे आहेत.
18 Sep 2018 - 11:56 am | दुर्गविहारी
तुमच्या कोकण दौर्याला उपयोगी पडतील अशा काही लिंक देतो.
पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल.
Weekend trip to Diveagar
Karde-Murud-Harne-Anjarle-Dabhol Trip
Scuba Dive trip to Malvan
Weekend trip to Kondye, Rajapur in Konkan
Trip to Kelshi, Velas and Dapoli
Kokan paradise: Guhagar and surrounding area
Trip to Beauty of Konkan Ratnagiri, Ganeshgule and Jaigad
Quick trip to Kelshi beach in Konkan
Trip to Phansad Wildlife SanctTrip to Phansad Wildlife Sanctuary and Revdandauary and Revdanda
Konkan region: Contact details
Trip to Guhagar-Hedvi-Velaneshwar-Bhudal & Kolthare
भ्रमर भ्रमंती रत्नागिरीची
भ्रमर भ्रमंती रत्नागिरीची २
भ्रमर भ्रमंती रत्नागिरीची ३
22 Sep 2018 - 10:26 am | संजय
धन्यवाद
18 Sep 2018 - 12:32 pm | अनिंद्य
मला अनेक दिवसांपासून विचारायचा एक प्रश्न आहे, इथेच विचारतो :-
कोकणात शाकाहारी असलेल्या आणि कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या पर्यटकांचे खाण्यापिण्याचे हाल होतात हे खरे आहे का ?
तिकडे जाऊन आलेले लोक काही सरळ सांगत नाही आहेत, कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.
18 Sep 2018 - 12:48 pm | मराठी कथालेखक
शाकाहारींना तर फार काही अडचण नाही. मी शाकाहारी आहे. फक्त 'आम्ही मिश्र हॉटेलात खातच नाही' अशी भूमिका असेल तर कठीण आहे.
असेही लोक असतात ? :)
याबद्दल खात्रीने सांगत नाही कारण समोर आलेल्या जेवणात खोबरे नारळ किती प्रमाणात होते किंवा नव्हते ते मला आता सांगता येणार नाही. मी कोकणात दापोली, तारकर्ली, गणपतीपुळे, अलिबाग ई ठिकाणी फिरलो. अलिबागला तर काहीच अडचण येणार नाही इतकं मात्र नक्की.. अलिबागमध्ये तर मला सोलकढी मिळाली नाही लवकर आणि म्हणे अलिबाग कोकणात आहे !! ..
बाकी दापोलीला खाल्लेल्या पनीर बटर मसालाच्या रस्श्यात मस्त नारळ वापरला होता.. पण विश्वास ठेवा या पंजाबी पदार्थाची ही कोकणी आवृत्तीही खूप स्वादिष्ट होती.
18 Sep 2018 - 1:18 pm | अनिंद्य
....... असेही लोक असतात ? :)
होय, असतात हो :-)
मिश्र हॉटेलात नो प्रॉब्लेम. सागरकिनारा म्हणला की मासे-नारळ-खेकडे हे मुख्य आकर्षण असणार हे मान्य आहे.
प्रत्येक नव्या ठिकाणी स्थानिक शाकाहारी पदार्थांची चव घेऊन बघायला आवडते. माझा कोकण खाद्यानुभव अत्यंत मर्यादित आहे - गुहागरपुरता (त्यामुळे अपवाद असावा असे समजतो.) तेथे बटाट्याची भाजी + मटकी उसळ हा मेनू दीड दिवसात तीनदा झाल्यामुळे अन्यत्र 'कस्काय अस्तय' ते विचारावं वाटलं :-)
18 Sep 2018 - 2:08 pm | मराठी कथालेखक
MTDC मध्ये तरी काहीच अडचण येणार नाही कारण तिथे नेहमीचे (म्हणजे आपल्या अतिपरिचयाचे असे) पंजाबी पदार्थ असतात.
पण कोकणातल्या बहुतांशी स्थानिक पदार्थांत नारळ असेल असे मला वाटते. त्यामुळे जर नारळ टाळायचा असेल तर स्थानिक पदार्थांचा आग्रह ठेवू नका.
आजकाल सगळ्याच पर्यटनस्थळी इतर (म्हणजे स्थानिक नसलेले आणि आपल्याकरिता परिचयाचे) पदार्थ बहूधा मिळतात. खासकरुन गुजराथी लोकांचे उपहारगृह असतात अनेक पर्यटनस्थळी. अलिबाग, गणपतीपुळे अशा गर्दीच्या ठिकाणी अडचण येवू नये,
18 Sep 2018 - 3:10 pm | अनिंद्य
विस्तृत माहितीबद्दल आभार !
18 Sep 2018 - 3:03 pm | टर्मीनेटर
नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या पर्यटकांचे खाण्यापिण्याचे हाल होतात :)
नाही हो, सरसकट संपूर्ण कोकणात असं नाही होत, परंतु निसर्गाचा प्रचंड वरदहस्त लाभलेल्या आणि पर्यटकांचे खास आकर्षण ठरण्याची क्षमता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र "शाकाहारी असलेल्या आणि कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या पर्यटकांचे खाण्यापिण्याचे हाल होतात" हे दुर्दैवाने अंशत: खरं आहे. अर्थात बाहेर जेवायचं असेल तरच. तुमच्या परीचयाचे कोणी तिथे असतील आणि त्यांच्या घरी तुमच्या खानपानाची सोय असेल तर तिथेहि नाही हाल होणार.
18 Sep 2018 - 3:08 pm | अनिंद्य
आलं लक्षात.
आता तिकडे परिचय वाढवतो :-)
14 Oct 2018 - 9:12 pm | Nitin Palkar
'कोठल्याही स्वरूपात 'नारळ/खोबरे' न खाऊ शकणाऱ्या' ... शाकाहारी असून खोबरे न खाण्याचे कारण वैद्यकीय आहे की केवळ नावड? महाराष्ट्रात खोबर्याला पर्याय शेंगदाण्याचे कूट हा असतो. खोबरे विहीन सांगितल्यास तसे बनवून मिळू शकते.
18 Sep 2018 - 12:41 pm | मराठी कथालेखक
गणपतीपुळे किंवा तारकर्लीचा विचार करा
दोन्हीकडे MTDC चे रिसॉर्ट आहेत. ते चांगले आहेत. इतरही अनेक हॉटेल्स आहेत ते पण स्वस्त आणि मस्त आहेत.
गणपतीपुळे -
इथला MTDC रिसॉर्ट तर खासच आहे त्यात 'कोकण हट' (की असेच काहीसे नाव) हा प्रकार अगदी छान , अगदी बीचवरच आहे. जेवण वगैरे सगळं चांगलं (मी सुमारे सात वर्षांपुर्वी गेलो होतो पण आताही तीच गुणवत्ता असेल अशी आशा करतो)
इथे जवळच प्राचीन कोकण नावाचे प्रदर्शन आहे. ते सुंदर आहे.
जवळ एका गावात कवी केशवसूतांचे स्मारक आहे ते बघण्यासारखे आहे
जयगड फोर्ट हा किल्ला आहे तिथे जाता येईल , त्यापासून जवळच एक बोट जेट्टी /पोर्ट आहे तिथून तवसाळ किनार्याकडे जाणार्या मोटरबोट निघतात. त्या बोटवर आपली कार लादून जाता येते. पलीकडे गेल्यावर कार काढून फिरायचे. तुमच्या मुलाला हा प्रवास आवडेल.
मार्ग: सातारा, उंबर, कुंभार्ली घाट , चिपळूण ई.. कुंभार्ली घाटात अगदी माथ्यावर एक छोटे हॉटेल आहे. जाताना येथे रहाण्याचा आनंद घेवू शकता. संध्याकाळी घाटातून दरीचे दृष्य बघणे आनंददायी आहे. (टीपः इथे खाली रेस्टॉरंटमध्ये रात्री ट्रकचालक (काही वेळा मद्यपी) येतात पण वर रुमवर त्यांचा काही त्रास नाही. )
येता/जाताना संगमेश्वरचे जुने दगडी (हेमाडपंथी ?) मंदिर पाहू शकता
तारकर्ली :
मालवणहून बोटीने सिंधुदुर्ग किल्ला बघायला जाता येईल.
स्कुबा डायव्हिंगसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. पण ते नेमके कुठे आहे ते मला सांगता येणार नाही.
सावंतवाडीहून जाता/येताना लाकडी खेळणी विकत घेवू शकता. सावंतवाडीची जितकी झलक मी पाहिली त्यावरुन मला ते एक स्वच्छ सुंदर असे छोटेसे शहर वाटले (तिथे आणखी फिरायला हवे होते असे आता वाटते)
प्रवासः अंबोली मार्गे - अंबोलीला एक रात्र मुक्काम करु शकता, तिथे अनेक हॉटेल्स आहेत. धबधब्याला बर्यापैकी पाणी असेल अशी अपेक्षा आहे.
एकूणात तुम्हाला कोकणचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर रत्नागिरी वा सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फिरायला हवे असे मला वाटते. अलिबाग छान आहे पण कोकणचा 'फील' तितकासा येत नाही.
19 Sep 2018 - 9:43 am | अनुप ढेरे
गेल्या वर्षीच तार्कर्ली ते गणपती-पुळे याची ६ दिवस ट्रिप केलेली. तारकरली एम्टिडिसी हॉटेल भारी आहे पण बीचवर गर्दी असते. आणि थोडा कचरा. त्या तुलनेत पुळ्याच्या जवळचा बीच( नाव विसरलो) फार निवांत होता. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग बघण्यासारखे आहेत. रत्नागिरीचा किल्लापण छान आहे. जयगड बोर आहे. नुसताच रखरखाट. मालवणजवळ निवती नामक एका जागी गेलेलो. ती देखील मस्तं होती.
19 Sep 2018 - 12:51 pm | कंजूस
हॅाटेलवाले रुम भाड्याने देतात तसे दिल्यास पाच सहा दिवसांत स्वत:च्या कारने बरीच ठिकाणे करता येतील. सकाळी लवकर रुम सोडून दोनचार ठिकाणे करत चार-पाच वाजेपर्यंत दुसरीकडे मुक्काम करायचा. वाटेत नाश्ता जेवण.
प्रतिव्यक्ती ६००/९०० /~~ मध्ये नुकसान होते.
19 Sep 2018 - 1:01 pm | विकास...