श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर

गणेश विजय काळे's picture
गणेश विजय काळे in भटकंती
17 Aug 2018 - 12:13 am
“हरिश्चंद्र” हे नाव उच्चारले कि एकतर राजा हरिश्चंद्र आणि त्यावर आधारलेला पहिला मूकपट आठवतो नाहीतर डोंगर भटक्यांसाठी आवडते ठिकाण आणि त्यांच्यासाठी असलेले “पंढरपूर” म्हणजे हरिश्चंद्रगड .पण याच नावाने महाराष्ट्रात असलेले श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मात्र सगळ्यांसाठी अल्प परिचित आहे आणि हे मंदिर आपल्याच महाराष्ट्रात जुन्नर या तालुक्यात दडलेले आहे .स्वतःच्या वाहनाने जर कधी भिमाशंकरला जात असाल तर, थोडासा वेळ काढून मुद्दाम हे मंदिर पाहण्यास काहीच हरकत नाही.या मंदिराचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न. पुणे भिमाशंकर महामार्गावर मंचर या गावाच्या पश्चिमेस १२ कि. मी. अंतरावर भिमाशंकरकडे जाताना घोडेगावामध्ये हे मंदिर आहे. घोडेगावंचे ग्रामद्वैत असलेल्या ह्या मंदिराचा इतिहास साधारणपणे इ.स. १२०० सालापासूनचा आहे.महादेवाचे हे दगडी मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अपुर्व नमुना आहे.आतामात्र जीर्ण्योधार झाल्यामुळे पूर्वीची कलाकुसर रहिली नाही तरीसुद्धा ह्या पवित्र ठिकाणाचे अध्यात्मिक महत्व अजूनही तुसभर कमी झालेले नाही. पूर्वापार सांगत आलेला या मंदिराचा थोडक्यात इतिहास हे मंदिर पुरातन शिवकालीन असून ह्या ठिकाणी साबर वनाचे दाट जंगल होते , ह्या परिसरात पूर्वी स्मशानाचे स्वरूप होते. एके दिवशी मुनीवर नावाचा वृद्ध तपस्वी साधू ऋषी भिमाशंकरकडे जात असताना ह्या ठिकाणी विश्रांती करिता गुहेत थांबले .पुढे अनेक वर्षे भगवंताची ध्यानधारणा , तप ,अनुष्ठान , साधना करून भक्तांसाठी प्रत्यक्ष भगवंतच हरिश्चंद्र या नावाने जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे प्रकट होऊन , गिरवली रडारकेंद्रे मार्गे, गोनवडी मार्गे घोडेगाव ह्या ठिकाणी हरिश्चंद्र ह्याच नावाने ओळख देऊन प्रसन्न झाले . पुढे सालगाव मार्गे सिद्धेश्वर ह्या नावाने ,ढाकळे मार्गे शंभू महादेव `ह्या नावाने भक्तांना दर्शन देऊन भिमाशंकर येथे प्रयाण केले. भिमाशंकरला जायच्या मार्गावर घोडेगाव या बसस्थानकच्या थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला हे मंदिर आहे . येथे दगडी पायऱ्या उतरतो तेव्हाच ह्या मंदिराचा नव्यानेच जीर्ण्योधार झालेला कळस दिसायला लागतो नाही तर याचा थांगपत्ता लागत नाही . या पायऱ्या संपण्याच्या आधीच उजव्या हाताला साधूंचे निवासस्थान आहे . खोलीत जाताच श्री गुरुदत्तांची आणि श्री गणेश मूर्ति दिसते आणि इथेच आपणास हरिश्चंद्र देवतेच्या मुखवट्याचे दर्शन घेता येते. ह्या मुखवट्याचे यात्रेच्या दिवशी श्याम गंगाधर होनराव यांच्या घरातून मिरवणूक निघते.  श्रीहरिश्चंद्रेश्वर मुखवटा ती मंदिरात येताच शिवलिंग व मुखवट्यास जलाभिषेक केला जातो.यात्रेच्या दरम्यान भजन स्पर्धा आणि कुस्तींचे सामने भरविले जातात. आता या खोलीतून बाहेर पडल्यानंतर समोरच श्री हरिश्चंद्र देवतेच्या मंदिराचे कळसापासुनचे संपूर्ण दर्शन होते.खाली उतरताच प्रथम पाण्याचे कुंडे दिसते. यात मासे तसेच कासव जे अधूनमधून मान बाहेर काढून दर्शन देते. जलकुंडाच्या लगतच कालिकामातेचे नवीनच उभारलेले मंदिर आहे. त्याच्या लगतच एक समाधी आहे.  श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मंदिरात प्रवेश करताच प्रथम नंदीचे दर्शन होते. मध्यभागी मुळ मंदिराचे दोन भाग आहे. १)डोंगरातील कोरीव काम , २)शिवलिंग आणि जवळील जिवंत पाण्याचे झरे आणि कुंडे . पिंडीचा मूळ भाग पाहायचा असेल तर शिवलिंगावरील पाणी बाजूस करावे लागते . हरिश्चंद्र यांनी या मंदिरात शिवलिंग स्थापन केले म्हणून या मंदिराचे श्रीहरिश्चंद्रेश्वर असे पडले. हे शिवलिंग चार फुट खोल खळग्यात आहे.

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

17 Aug 2018 - 11:14 am | दुर्गविहारी

एका अनवट ठिकाणाची चांगली ओळख करुन दिलीत त्याबध्दल आभारी आहे, पण फोटो टाकले असते तर बरे झाले असते. पु.ले.शु.

गणेश विजय काळे's picture

17 Aug 2018 - 11:59 am | गणेश विजय काळे

नक्की उपलोड करतो

गणेश विजय काळे's picture

17 Aug 2018 - 10:59 pm | गणेश विजय काळे

1

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2018 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान माहिती. फोटो टाकले असतेत तर मंदिराच्या कलाकुसरीची चांगलि कल्पना आली असती.

फोटो लेखात टाकणे शक्य नसल्यास, इथेच एका प्रतिसादात फोटो किंवा त्यांचे दुवे टाकावे.

गणेश विजय काळे's picture

17 Aug 2018 - 10:59 pm | गणेश विजय काळे

2

गणेश विजय काळे's picture

17 Aug 2018 - 11:02 pm | गणेश विजय काळे

3

छान माहिती दिलीत, पण मंदिर हे आंबेगाव तालुक्यात आहे, आंबेगाव सध्या अस्तित्वात नाही, डिंभे धरणात गेले, तालुक्याची सर्व कार्यालये घोडेगाव येथे आहेत.

गणेश विजय काळे's picture

17 Aug 2018 - 11:01 pm | गणेश विजय काळे

होय आत्ता घोडेगावात आहे.असे म्हणतात पूर्वी घोड्यांच्या पागा होत्या म्हणून घोडेगाव नाव पडले.......

टर्मीनेटर's picture

18 Aug 2018 - 11:25 am | टर्मीनेटर

महादेवाच्या ह्या पुरातन मंदिराला नक्कीच भेट देण्यात येईल. त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
एक विनंती, तुम्ही प्रतिसादात टाकलेले फोटो लेख संपादित करून त्यातच समाविष्ट करा ना त्याने लेखाची शोभा वाढेल.

गणेश विजय काळे's picture

18 Aug 2018 - 11:45 am | गणेश विजय काळे

धन्यवाद ... मी प्रयत्न करतो

घोडेगावला खूपदा जाणं झालंय. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर पूर्वी पूर्णपणे दगडी बांधणीचं होतं, आता मात्र रंगामुळे, चकचकीत टाइल्समुळे मंदिराचा जुनेपणा हरवून गेलाय. मंदिराच्या शेजारचा खळाळत वाहणारा ओढ्यामुळे तो परिसर अतिशय निसर्गरम्य होता.

घोडेगावच्या बर्‍याच आठवणी आहेत. धोंडमाळच्या टेकडीवरील मंदिर, डिंभे कालवा, त्याच्या बोगद्यावरील आग्यामोहोळं, सालोबाचं मंदिर, मंदिराच्या आवारातले वीरगळ, सालोबाच्या डोंगरमाथ्यावर गेल्याच्या आठवणी. लै भारी आहे ते.

भीडस्त's picture

20 Aug 2018 - 11:55 pm | भीडस्त

उजूक कव्हा येश्यांन तंव्हा नक्की भ्येटश्यान
__/\__

मनिमौ's picture

29 Aug 2018 - 8:31 pm | मनिमौ

कळस पाहून एकदम बनेश्वर ची आठवण झाली.मंदिर रचना आणी बाहेरची पुष्करिणी अगदी एक सारख्या आहेत