मित्रहो - चर्चा म्हणून हा धागा टाकतोय. तुमचे विचार अवश्य टका.
एक नेहमीचाच प्रश्न घेऊन (जो बऱ्याच जणांना पडतो ! मलापण ) काही दिवसांपूर्वी माझा एक जवळचा वर्ग मित्र हॉटेलात भेटला. जसे बरेच सॉफ्टवेअर इंजि. असतात तसलाच mid career मधला नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतला,आपली नोकरी राहील कि नाही ह्याची चिंता. Industry मधील simplification, saturation आणि नवीन qualified तरुण वर्गाला काहीसा भिलेला.
सध्या नोकरी सुरु आहे पण पुढील काही वर्ष आपल्याला value असेल का ! ह्याचा विचार करणारा एक होतकरू Technical Consultant.
जमेची बाजू अशी की - स्वतःचा फ्लॅट (२ bhk ) बंगलोरला आहे, कुठलेही लोन नाही. तो भाड्याने दिला आहे. सध्या पुण्यात नोकरी, त्याचे वय ४०, सोबत आई,बायको, एक मुलगा, एक मुलगी वय बहुतेक ६ मुलाचं माहिती नाही. बायको housewife. पुण्यात सध्या २bhk भाड्याने घेऊन राहतात.
US ला onsite होता काही वर्ष, एकूण १७-१८ वर्ष अनुभव आहे. एकंदर जमापुंजी साधारण ६५ लाख. योग्य ते term आणि medical insurance घेतलेले आहेत. सध्या महिन्याचे savings ४० ते ४५ हजार
तर प्रश्न असा की : पुण्यात फ्लॅट घ्यावा कि Mutual Fund मध्ये पैसे ठेवावेत ?
Goal म्हणाल तर रिटायरमेंट नन्तर महिन्याचा खर्च निघावा आणि मुलांच शिक्षण आणि लग्न.
रिटायरमेंट वयाच्या ५८-६० पर्यंत धरून चला.
माझा सल्ला :
१) महिन्यातल्या ४०-४५ हजार savings मधून २५-३० हजाराची Largecap Mutual Fund मध्ये SIP करावी
२) ६५ लाखातले
- ३० लाख Liquid + Ultra Short Term+ Medium Term Fund विभागून
- १५ लाख Balanced Fund
- १५ लाख Multicap Fund
- ५ लाख Goldbonds
Retirement वेळेस STP करावे
----------------------------------------
त्याला माझा १) SIP चा सल्ला पूर्णपणे पटला, दुसरा पण चांगला म्हणाला पण दुसऱ्या सल्ल्याबाबत तो confused आहे असं म्हणला
तो म्हणला -
६० लाखात अजून एक घर पुण्यात घ्यावे कारण property market down आहे. बंगलोरच्या घराचं भाडं मिळत राहील.
पुढे Retirement नन्तर मूळ शहरात (वडिलोपार्जित) घरी जाऊन २ (पुणे+बंगलोर) घरांच्या भाड्यावर महिन्याच्या खर्च (जगे पर्यंत)चालवता येणार.
घराचे भाडे काळानुसार वाढेल (कधी कमीपण होईल पण नेहमी नाही) शिवाय घराची किंमत पण वाढेल.
****शिवाय ६० वर्षी Retire होऊन समजा वय वर्षे ८५ पर्यंत जगलो तर MF STP जवळपास २५ वर्षे कामात पडेल का ?***
त्याचा हा option ऐकून मीपण confuse झालो :(
------------------------------------------
तर मित्रांनो होऊद्या चर्चा !!
धन्यवाद !!
प्रतिक्रिया
16 Aug 2018 - 6:35 pm | अमर विश्वास
तुमच्या मित्राला निवृत्ती नंतर कुठे राहायचे आहे ? जस पुण्याला राहायचे असेल तर जरूर घर घ्यावे ...
अन्यथा फक्त नोकरीच्या काळात स्वत:ला राहण्यासाठी घर घेण्यात काही अर्थ नाही
16 Aug 2018 - 7:51 pm | सिरुसेरि
एक शंका - तुमच्या मित्राचे जर बंगलुरुला स्वताचे घर असेल तर , त्याने जर तिकडेच नोकरी केली , तर त्याचा पुण्यातला घर भाड्याचा खर्च वाचेल . व तो वाचलेला पैसा बंगलुरुला अजुन एक घर घेण्यासाठी / किंवा एम.एफ. साठी वापरता येईल .
21 Aug 2018 - 7:30 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद!! पुण्यात घर घेऊन HRA मिळतो आहे. बंगलोरहुन पुण्यात (महाराष्ट्रात ) राहायचे असल्यामुळे आला आहे. बंगलोरला स्वतःचा फ़्लॅटच चांगलं भाडं मिळत आहे.
16 Aug 2018 - 9:00 pm | खटपट्या
दुसरे घर घेण्यास हरकत नाही. हमी नसलेली नोकरी गेली आणि लवकर नाही मिळाली तर नोकरी मिळेपर्यत वडीलोपार्जित घरात राहून दोन घराच्या भाड्यावर घर चालवता येइल.
बंगलोरच्या घराचे भाडे कमीतकमी २५ हजार असेल. पुण्याच्या घरचे कमीतकमी २० हजार मिळेल.
४० ते ५० हजार रुपये मध्यमवर्गीय जीवनपद्धत असणार्या कुटुंबास योग्य असतील.
बाकी मान्यवर सांगतीलच...
21 Aug 2018 - 7:33 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद ! हेच तो पण म्हणतो आहे.
16 Aug 2018 - 9:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
लाँगटर्म स्वतःला राहाण्यासाठी घेणार असाल तरच दुसरे घर घ्यावे. नाहितर आज पैसे आहेत म्ह्रणुन घेतले आणि २ वर्षानी पुन्हा बँगलोरला परत जायची वेळ आली तर
घर रिकामे पडुन राहते. तुम्ही स्थानिक नसाल तर भाडेकरु वगैरे ठेवणे भारी पडते . भाडेकरुने फ्लॅटमध्ये गैर कायदेशीर धंदे केले तर मालक गोत्यात येतो. शिवाय सोसायटीवाले शिव्या देतात ते वेगळेच. फॅमिली ठेवली तर भाडे कमी मिळते, बॅचलर ठेवले तर धांगडधिंगा होउ शकतो. रिकामे पार्किंग असल्यास हडपले जाते.
शिवाय हा एक डेड अॅसेट आहे. जेव्हा जरुरी असते तेव्हा विकले जाईलच आणि पाहिजे तसा फायदा होईलच असे सांगु शकत नाही. १० वर्षापुर्वी नाशिकला स्वस्त मिळते म्हणुन सेकंड होम घेतलेले कितीतरी आता खर्च केले तेव्हढे पैसे परत मिळावेत म्हणुन रडताहेत. उद्या पुण्यातली आय. टी. ची बूम गेली तर बाहेरुन तात्पुरती आलेली अर्धी जनता गायब होईल. मग पुनावळे, रावेत, पिंपळे सौदागर गेलाबाजार फेज-३, मेगापोलिस, ब्लु रिज,तळेगाव चे फ्लॅट कोण घेईल?
त्यापेक्षा
म्युच्युअल फंड एस आय पी बरोबरच पी.पी.एफ चा पर्याय बघायला हरकत नाही. दरवर्षी १ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्याप्रमाणे १५ वर्षानी २० लाख अंदाजे (२ मुलांचे ४० लाख) जमा होतील. शिक्षण किवा लग्न दोन्हीसाठी कामी येतील.
एल आय सी च्या रिटायरमेंट योजना बघा. महीना २०-२५ हजार त्यात टाकल्यास ५५ वर्षानंतर दर मही ना पैसे मिळतील.
एन. पी. एस काढल्यास ८० सी.सी.डी. खाली अजुन १ लाख टॅक्स वाचेल (५०% कंपनीचे व ५०% तुमचे काँट्रिब्युशन). सध्य १४% वगैरे रीटर्न्स दिसताहेत.
(यात एल.आय.सी. वगैरेचे १.५० लाख धरलेले नाहीत.)
ऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ मधुन मिळालेला फायदा टॅक्स फ्री असतो. नक्की माहिती नाहि.
एखाद्या उद्योगात पैसे गुंतवु शकता, पण डी. ए स.के प्रकरणानंतर लोकांनी याचाही धसका घेतलाय.
सध्या ईतकेच. बाकी जाणकार मिपाकर सांगतीलच.
21 Aug 2018 - 8:20 pm | नजदीककुमार जवळकर
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
त्यापेक्षा
म्युच्युअल फंड एस आय पी बरोबरच पी.पी.एफ चा पर्याय बघायला हरकत नाही. दरवर्षी १ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्याप्रमाणे १५ वर्षानी २० लाख अंदाजे (२ मुलांचे ४० लाख) जमा होतील. शिक्षण किवा लग्न दोन्हीसाठी कामी येतील.
** मीपण MF चा सल्ला दिला. PPF मध्ये १५ वर्षासाठी पैसे lock होतात म्हणजे गरज पडल्यास तुमचे पैसे तुम्हालाच वेळेवर मिळत नाहीत. PPF सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उत्तम कारण ५८/६० वर्षापर्यंत नोकरी राहतेच. जे private सेक्टर मध्ये आहेत त्यांच्या नोकरीची भीती असतेच आणि ७.५०% वा जास्त तुम्हाला debt fund पण देतातच आणि पैसे गरज असल्यास काढता येतात**
एल आय सी च्या रिटायरमेंट योजना बघा. महीना २०-२५ हजार त्यात टाकल्यास ५५ वर्षानंतर दर मही ना पैसे मिळतील.
एन. पी. एस काढल्यास ८० सी.सी.डी. खाली अजुन १ लाख टॅक्स वाचेल (५०% कंपनीचे व ५०% तुमचे काँट्रिब्युशन). सध्य १४% वगैरे रीटर्न्स दिसताहेत.
** NPS माझ्या माहिती प्रमाणे १०० रु तले ४० रु तुम्हाला कधीच मिळत नाहीत . व्याज monthly पेन्शन सारखे दिले जाते
त्यामुळे PPF आणि NPS मध्ये Govt चा फायदा जास्त आणि तुमचे पैसे तुम्हीच वापरू शकत नाही. **
21 Aug 2018 - 8:42 pm | सुबोध खरे
१ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्याप्रमाणे
माझ्या माहिती प्रमाणे सध्या हा दर ७.६ % आहे.
असो
PPF मध्ये आपल्याला यात ३० % पर्यंत कर वजावट मिळते म्हणजेच आपण एक लाख नव्हे तर ७०००० रुपये गुंतवल्यासारखे आहेत.
किंवा दुसऱ्या हिशेबाने हे ३०% -- १५ वर्षावर(लॉक इन पिरियड) विभागून टाकल्यास ७.६ + २ % म्हणजे ९.६% करमुक्त उत्पन्न मिळते.
अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यदाकदाचित आपे सर्व पैसे (धंद्यात/ शेअर बाजारात) बुडाले किंवा आपले नाव गुन्ह्यात अडकले तरीही या पैशाला हात लावता येत नाही. PPF मध्ये भांडवल सुरक्षा हि १०० % आहे कारण याला भारत सरकारची सार्वभौम हमी (SOVERIGN GUARANTEE) आहे.
हे ३० टक्के कोणताही डेट फंड देत नाही. जर आपले ८० C कलमाखाली इतर गुंतवणुकी दीड लाखापेक्षा जास्त असतील तर मात्र PPF च्या या कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. डेट फंडात आपले भांडवल सुरक्षित राहील याची १००% हमी नाही. डेट फंडातील उत्पन्नावर LTCG (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स) हा कर लागतो.ते उत्पन्न करमुक्त नाही.
अशीच स्थिती NPS ची आहे यात गुंतवलेले ५०००० रुपये करमुक्त आहेत आणि हे ८० C च्या दीड लेखाव्यतिरिक्त आहेत. म्हणजेच दर वर्षी आपण १५००० रुपये कर वाचवू शकता.
यामुळे PPF आणि NPS एका विशिष्ट श्रेणीमध्ये इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देतात.
ता क -- मी कर सल्लागार किंवा आर्थिक विषयातील तज्ञ नाही. तेंव्हा मिपा वरील आर्थिक तज्ज्ञ लोकांनी यावर टिप्पणी करावी हि विनंती
16 Aug 2018 - 9:17 pm | शाम भागवत
अस काही नसावं.
21 Aug 2018 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयपीओ (Initial public offering) म्हणजे खुद्द कंपनीने तुम्हाला विकलेले शेअर्स असतात... ते आणि बाजारातून (एनएसए/बीएसए मधून) विकत घेतलेले शेअर्स या दोन्हीपासून मिळालेल्या उत्पन्नात आयकराच्या बाबतीत काहीच फरक नाही.
17 Aug 2018 - 8:07 am | ट्रम्प
आयटी म्हणलं की जमिनीत पैसे गुंतवायला घाबरतात हे 1000000 % खरं आहे , पण जमिनीत गुंतवलेल्या रिटर्न इतके दुसरी कुठल्याही गुंतवणूक मध्ये होणार नाही .
पुण्या पासून 15 / 20 किलोमीटर अंतरावर कुठे ही 60 लाखात एक एकर च्या आसपास जमीन भेटू शकते , चार पाच वर्षात गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी जमीनीत गुंतवणे हाच बेस्ट पर्याय आहे .
17 Aug 2018 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
काय चेष्टा करता का राव? एक शुन्य जास्त पडलाय का?
17 Aug 2018 - 3:14 pm | बबन ताम्बे
जमीनीत पैसे वाढतील , पण विकताना जमीनीला मोठे गिर्हाईक मिळणे अवघड असते. एखाद्या बिल्डरने जमीन विकत घेतली तर ठिक आहे. त्यासाठी जागाही मोक्याची आणि जिथे नजिकच्या काळात विकास होणार आहे अशी असली तरच चांगला भाव मिळेल.
21 Aug 2018 - 8:22 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद ! जमिनीत नाही तयार फ्लॅट चा विचार करतो आहे
17 Aug 2018 - 4:19 pm | ट्रम्प
आता पर्यंत च्या सगळ्या राजकारण्यांनी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था बिकट करून टाकली , पण आता इथून पुढे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे . वाघोली मधून कात्रज , हिंजवडी ला बसने येण्यास सध्या 2 तास लागतात त्यामुळे नोकरदार वाघोली किंवा उरुळी कांचन या भागात राहण्यास धजावत नव्हता . आता रामवाडी पर्यंत चे मेट्रो वाघोली पर्यंत नेण्याचा विचार चालू आहे , अजून पाच दहा वर्षांनी वर्षानीं वाघोली तील मेट्रो भीमकोरेगाव पर्यंत जाईल , कारण ज्या दिशेला वाव आहे तिकडे गृहनिर्माण प्रकल्प वेगाने बांधले जातात , आणि इतर विकसित भागा पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध असल्या मूळे विकले जातात . तसेच इथून पुढे पुणे शहराचे भविष्यातील मेट्रो चे जाळे , लोकल ट्रेन ( झाली तर ) हे सोलापूर रोड , अहमद नगर रोड ला ( जागा उपलब्ध असल्या मुळे ) वेगाने पसरण्याची शक्यता आहे .
आणि 60 लाखात एक एकर हा अंदाज सांगितला हो !! जमिनीचा भाव जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर अवलंबून असणार त्यामुळे एक शून्य कमी किंवा जास्त ही होऊ शकतो .
21 Aug 2018 - 8:25 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद ! वर सांगितल्या प्रमाणे ... जमिनीत नाही तर तयार फ्लॅट चा विचार करतो आहे
17 Aug 2018 - 5:29 pm | sagarpdy
{consperacy mode on}
नुकताच पुण्याला मिळालेला "राहण्यास सर्वोत्तम शहर" हा पुरस्कार शहरातील व आजूबाजूच्या जागांचे भाव वाढावे म्हणूनच दिला गेला आहे. नोटबंदी करून आधी जागांचे भाव पाडले, आता काही वर्षात दाम दुप्पट छापतील.
{consperacy mode off}
17 Aug 2018 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणतीही गुंतवणूक करताना, तिचा परतावा अचानक गरज असेल तेव्हा पैशांच्या स्वरूपात हाती येईल की नाही, हा मुद्दा पण महत्वाचा असतो... या गोष्टीचाही विचार गुंतवणूकीपूर्वी करणे जरूरीचे असते.
शेअर / (लॉक-इन वाले वगळून इतर) मुचुअल फंड यांच्यातील गुंतवणूक, १-२ कामाच्या दिवसांत, पैशांच्या स्वरूपात हाती येऊ शकते.
त्याविरुद्ध, स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, जमीन, इ) केलेली गुंतवणूक पैशांमध्ये परावर्तीत करण्यासाठी बराच मोठा कालावधी व श्रम करावे लागतात. तसेच, तिचे पैसे हवे त्यावेळेस व अपेक्षित प्रमाणात हातात येतील याची खात्री नसते.
17 Aug 2018 - 7:47 pm | सुबोध खरे
स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, जमीन, इ) केलेली गुंतवणूक पैशांमध्ये परावर्तीत करण्यासाठी बराच मोठा कालावधी व श्रम करावे लागतात. तसेच, तिचे पैसे हवे त्यावेळेस व अपेक्षित प्रमाणात हातात येतील याची खात्री नसते.
बाडीस
माझे घोडबंदर रोड वरील घर विकण्यासाठी २ वर्षे घाम गाळावा लागला आणि १५ % कमी भावात विकावे लागले. अर्थात ते ९ वर्षांपूर्वी घेतले असल्यामुळे तिप्पट किंमत मिळाली( चौपट मिळायला हवी होती).परंतु येत्या काळात स्थावर मालमत्तेला एवढी किंमत मिळेल कि नाही याची शंका वाटते. कारण बेनामी मालमत्ता कायदा आधार कार्डशी संलग्नता आणि रेरा यामुळे राजकारण्यांचे/ चोरांचे/ बिल्डर आणि खाबू सरकारी अधिकाऱ्यांचे बरेच पैसे मालमत्तांमध्ये अडकून पडलेले आहेत जे त्यांना बाहेर काढणे फार कठीण झालेले आहे. यामुळे स्थावर मालमत्ता विभागात उलाढाल फार कमी झाली आहे. जर स्मार्ट सिटी प्रकल्प खरेच मार्गी लागले तर मुंबई पुण्यात येणारे उद्योगधंदे कमी होऊन इतर शहरात जाऊ लागले तर येथील स्थावर मालमत्ता तितका परतावा देणार नाही.
हि स्थिती एकीकडे
आणि
घरासाठी कर्ज स्वस्तात मिळते शिवाय त्यावर कर वजावट मिळाल्यामुळे ३०% कर भरणार्यांना ६ ते ६.५% ( ९% वजा २.७ % कर बचत) दराने कर्ज उपलब्ध होते त्याचा दूरत्वाने मिळणार फायदा
याचे नफा तोट्याचे गणित बसवणे आवश्यकआहे.
17 Aug 2018 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
१९९० चे आणि २००० ची दशके सोडली तर भारतात स्थावर मालमत्तेवर भरघोस परतावा सुमारे २०+ वर्षांच्या मुदतीने गुंतवणूक केल्यावरच झालेला आहे.
म्हणून माझ्या मते, स्थावर मालमत्तेत पैशाची गुंतवणूक अशी करावी की जिच्या विक्रिची वेळ तिचा परतावा, "आपल्या मुलांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत किंवा नातवडांना मिळेल" अशी असावी. थोडक्यात, स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, स्वतःकरता नव्हे तर आपल्या मुलांच्या उत्तर आयुष्याकरिता किंवा नातवंडासाठी केली आणि त्यांनी ती योग्य (गरजेची वेळ नव्हे) वेळ पाहून विकली तरच भरघोस परतावा मिळेल... पक्षी : आपल्याला विकायची गरज नाही पण खरेदीदाराला विकत घ्यायची गरज आहे, अशी वेळ विक्रिला सर्वोत्तम असते !
हल्लीची परिस्थिती पाहता, सद्या गुंतवणूक करून स्वतःच्या आयुष्यात भरघोस परतावा मिळाला तर तो फारच नशीबवान गुंतवणूकदार असेल. यापुढची वाढ मोठ्या (ए स्तर) शहरांच्या बाहेरच्या बाजूंना आणि मध्यम (बि व सी स्तर) आकारांच्या शहरात होईल असे दिसते. ती नक्की कुठे जास्त व कुठे कमी होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे आणि हीच मुख्य गोची आहे !
त्याचबरोबर, जागांच्या मालकीबद्दलच्या गोंधळांत (अनेक खरे-खोटे वारसदार, एकच जागा अनेकांना विकणे, एकाच जागेची अनेक साठे/खरेदीखते, इ इ इ) भल्या भल्या वकिलांनी ३० वर्षांचा इतिहास काढून दिलेल्या अहवालानंतरही जाने-माने बिल्डर्स उलटसुलट खटल्यांत अडकल्याचे माध्यमांत येताना दिसतेच आहे... तर सामान्य एकांड्या खरेदीदाराची अवस्था काय म्हणावी ?! त्यामानाने, तयार (किंवा जवळ जवळ तयार) सदनिका/बंगलो सोसायटीत गुंतवणूक त्यामाने कमी (शून्य नव्हे) धोक्याची असावी.
मात्र, कोणतीही स्थावर मालमत्ता विकताना वर लिहिलेले सर्व त्रास तसेच असतात.
18 Aug 2018 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
असाही एक मध्यममार्ग काढता येईल...
आपल्याला हवा तेव्हा परतावा पैशांच्या स्वरूपात मिळायला हवा असेल तितकी रक्कम, म्युच्युअल फंड किंवा तत्सम त्वरीत रकमेत बदलता येईल अश्या गुंतवणूकीत, गुंतवावी.
स्वतःच्या आयुष्यात गुंतवणूकीच्या परताव्याची गरज पडणार नाही याची वाजवी खात्री असेल तितकी रक्कम जमीन, फ्लॅट, स्वतंत्र घर, इत्यादी स्थावर मिळकतीत गुंतवावी. म्हणजे, या दुसर्या गुंतवणूकीने स्वतःच्या आयुष्यात हवा असेल तितका उत्तम परतावा दिला तर सोन्याहून पिवळे, आणि नाही दिला तरीही, मूळ हेतूला धक्का न लागल्यामुळे, काहीच बिघडले नाही ! :)
19 Aug 2018 - 10:26 am | प्रमोद देर्देकर
डॉ. म्हात्रे काका तुमचे पाय कुठे आहेत .
19 Aug 2018 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझ्या शरीरालाच जोडलेले आहेत. सद्या त्यांचा उपयोग मला इकडे तिकडे चालत जाण्यासाठी होतो आहे. ;) =))
19 Aug 2018 - 11:36 pm | शाम भागवत
:))))
21 Aug 2018 - 8:40 pm | नजदीककुमार जवळकर
असाही एक मध्यममार्ग काढता येईल...
आपल्याला हवा तेव्हा परतावा पैशांच्या स्वरूपात मिळायला हवा असेल तितकी रक्कम, म्युच्युअल फंड किंवा तत्सम त्वरीत रकमेत बदलता येईल अश्या गुंतवणूकीत, गुंतवावी.
स्वतःच्या आयुष्यात गुंतवणूकीच्या परताव्याची गरज पडणार नाही याची वाजवी खात्री असेल तितकी रक्कम जमीन, फ्लॅट, स्वतंत्र घर, इत्यादी स्थावर मिळकतीत गुंतवावी. म्हणजे, या दुसर्या गुंतवणूकीने स्वतःच्या आयुष्यात हवा असेल तितका उत्तम परतावा दिला तर सोन्याहून पिवळे, आणि नाही दिला तरीही, मूळ हेतूला धक्का न लागल्यामुळे, काहीच बिघडले नाही ! :)
***सर ! धन्यवाद !! ६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते ***
21 Aug 2018 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते
गुंतवणूक एकाच वेळेला एका झटक्यात करायची असते किंवा केली जाते... असे म्हणायचे असले तर परत विचार करा. हे वाक्य तुम्ही आपले म्हणणे ठासून सांगायच्या भरात केले आहे असे वाटते. म्हणूनच केवळ, खालचा लेखनप्रपंच करत आहे.
========================
गुंतवणूकीच्या बाबतीतली खालील काही महत्वाची सत्ये स्विकारून केलेली गुंतवणुकच गुंतवणूकदाराच्या शारिरीक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी चांगली ठरते...
१. गुंतवणूकीसाठी, रु६५ लाख काय पण, सर्वसाधारणपणे, रु१ लाख किंवा ५०,००० सुद्धा, फार कमी जणांच्या व तेसुद्धा फार कमी वेळेस एकहाती उपलब्ध असतात. बहुतेक वेळेस, गुंतवणूक करण्यासाठी एकवेळेस काही शे ते काही हजार रुपयेच उपलब्ध असतात.
२. धोका आणि परतावा हे हातात हात घालून एकमेकाबरोबर समप्रमाणात वरखाली जातात. कमी (किंवा शून्य) धोका असूनही प्रचंड परतावा मिळणारी गुंतवणूक नजरेत आली तर, सर्वप्रथम, स्वतःला चिमटा काढून झोपेतून जागे व्हावे ! :)
आणि सर्वात महत्वाचे...
३. (अ) जे आपल्याला नीट किंवा अजिबात समजलेले नाही, (आ) ज्याच्या धोका व परताव्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, (इ) ज्याचा धोका आणि/अथवा परतावा आपल्याला परवडणार नाही अशा गुंतवणूक साधनाच्या वाटेलाही जाऊ नये. पूर्णविराम.
व्यवहारात एका झटक्यात सर्व गुंतवणूक शक्य नसल्यामुळे, गुंतवणूकीच्या साधनांचा, आपल्या खिश्याला आणि (शारिरीक व मानसिक) प्रकृतीला परवडेल असा, प्राधान्यक्रम लावणे योग्य ठरते.
तो प्राधान्यक्रम साधारणपणे असा असावा...
१. (अ) भांडवलाला शक्य तेवढा कमीत कमी धोका (कमीत कमी, कारण हा धोका ०% कधीच नसतो) स्विकारून, (आ) शक्य तितका जास्तीत जास्त परतावा देणारे आणि (इ) हवे तेव्हा पैसे त्वरीत हातात येऊ शकतील अशी गुंतवणूक साधने : हे व्यवहारात कसे साधायचे ते, मराठीतला एक वाक्प्रचार वापरून असे समजावून देता येईल : "जे पैसे बुडाले तर खाण्यापिण्याचे हाल होतील, ते पैसे केवळ आणि केवळ अश्याच साधनांत गुंतवावे."
ही पहिली पायरी प्रामाणिकपणे, पूर्णपणे शुद्धीत असताना व कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली नसताना पुरी झाली असे ठरविल्यावरच पुढच्या पायरीवर पाय ठेवावा. याचा अर्थ असा नाही की, यापेक्षा खूपच धोका पत्करून कोणालाच यश मिळणार नाही... तर, तो अर्थ असा आहे की, तसे यश मिळण्याची शक्यता इतकी कमी आहे की सर्वसामान्यपणे शहाण्याने तो धोका पत्करू नये. या पहिल्या पाहिरीवर धोकादायक गुंतवणूक केलीच तर ती, गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण रकमेच्या १०% पेक्षा जास्त असणे, धोक्याचे प्रमाण अस्विकार्य (unacceptable) बनवते.
जोपर्यंत, वरच्या साधनांत पुरेसे (हे पुरेसेपण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे असते, पण ते कल्पनाविलासाने ठवू नये हे नक्की) पैसे गुंतवल्यानंतरच, पुढच्या पायरीवर जावे. इथून पुढे, गुंतवणूकीची साधने, प्रत्येकाचे (अ) वय, (आ) धोका स्विकारण्याची मनःस्थिती आणि (इ) उपलब्ध गंगाजळी, इत्यादींवर अवलंबून असतील. तेव्हा, त्या परिस्थितीच्या स्वरूपावर गुंतवणूकीचे प्रकार बदलतील.
पण, सर्वसाधारण रणनीतिमध्ये, पुढची गुंतवणुक करताना खालील क्रम वापरावा असे साधारणपणे म्हणता येईल...
२. (अ) तुलनेने मध्यम धोका, (आ) तुलनेने मध्यम परतावा आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत करता येणारे (लॉक-इन पिरियड नसलेले) गुंतवणूक साधन : वर लिहिल्याप्रमाणे धोकादायक साधनांत १०% गुंतवणूक केली असल्यास, हा प्रकार अपरिहार्य समजावा. कारण, ही रक्कम, (क) क्रमांक एकची रक्कम अनपेक्षितपणे पुढे आलेल्या जरूरीला कमी पडली किंवा (ख) वर सांगितलेली १०% वाली गुंतवणूक समस्येत सापडली तर, सहज उपलब्ध असावी अशी "आघातप्रतिबंधक (बफर) रक्कम" असते.
हे झाल्यावर मग...
३. (अ) तुलनेने जास्त पण स्विकार्य धोका, (आ) तुलनेने जास्त परतावा देणारे आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत न करता येणारे (लॉक-इन पिरियड असलेले किंवा स्थावर संपत्तीचे) गुंतवणूक साधन : या साधनांचे असंख्य प्रकार आहेत. त्यापैकी, ज्यांच्यातील अटी व धोके आपल्याला सहन करता येण्याजोगे असतील, ते स्विकारावे.
================
माझा अगोदरचा प्रतिसाद या विश्लेषणाचे सार होते. :)
23 Aug 2018 - 7:42 pm | नजदीककुमार जवळकर
डॉ. सुहास म्हात्रे !! तुमची मतं पटण्यासारखी आहेतच!! धन्यवाद !!
६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते
**खरं सांगतो सर माझं स्वप्नच आहे की MF + Property असं करू शकेन इतका पैसे हाती असावा .. म्हणून हे वाक्य ओघात लिहिले .. संदर्भ चुकला माफ करा !!**
गुंतवणूक एकाच वेळेला एका झटक्यात करायची असते किंवा केली जाते... असे म्हणायचे असले तर परत विचार करा. हे वाक्य तुम्ही आपले म्हणणे ठासून सांगायच्या भरात केले आहे असे वाटते.
**ठासून तर मुळीच नाही ..वर लिहिल्याप्रमाणे मलाही माझ्या मित्राचा प्लॅन चांगला वाटतो ..म्हणूनच ते ऐकून मीच confuse झालो असे मी लिहिले आहे
**एका झटक्यात गुंतवणुकीच्या मार्गी मीपण नाहीच पण तो म्हणला की थोडी risk घ्यायला तो तयार आहे. आणि बाजाराची त्यालापण बऱ्यापैकी माहिती आहे.
**शिवाय बाजार पडत असल्यास पैसे instant काढून घेता येतील कारण सगळ्या investment तो track करतोच अगदी रोज ..शिवाय individual stock सारखे एकदमच MF पडणार नाही असे वाटते
23 Aug 2018 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
अश्या चर्चेत माफीबिफी कशाला साहेब ?
फार धोका न घेता पण तरीही चांगला आणि तुलनेने स्थिर परतावा मिळण्यासाठीची, एक मी रणनीति लिहिली आहे. त्यापेक्षा जास्त परतावा मिळविण्याच्या प्रकार असतीलच, पण जेवढा जास्त परतावा तेवढाच (किंवा त्यापेक्षा जास्त) धोका पत्करायची तयारी हवी.
21 Aug 2018 - 8:42 pm | नजदीककुमार जवळकर
डॉ. खरे !! सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
21 Aug 2018 - 8:28 pm | नजदीककुमार जवळकर
सर ! धन्यवाद !! हा विचार करूनच मी MF (Debt +Equity) चा सल्ला दिला
17 Aug 2018 - 8:41 pm | मराठी कथालेखक
तुम्ही मांडलेल्या प्रश्नासंबंधी काही मुद्दे विविध प्रतिसादात मांडले आहेत. रिटर्न , लिक्विडिटी हे सगळे मुद्दे तुम्ही/तुमचे मित्र विचारात घेतीलच.
मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतोय.
पुणे , मुंबई , बंगलोर ई मोठी औगद्योगिक शहरे आहेत. त्यामुळे अशा शहरांतील लोकसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढतेच आहे (यात काही शंका नाहीच पण तरी हे संकेतस्थळ बघू शकता , यात अनेक शहरांची १९९१ , २००१ , २०११ ची लोकसंख्या दिलेली आहे..इतरही महत्वपुर्ण आणि रंजक माहिती आहे.)
उदा: पुणे शहराची लोकसंख्या 1991 -> 1,566,651 2001 ->2,538,473 2011-> 3,124,458 अशी वाढलेली दिसते. म्हणजे १९९१ च्या तुलनेत २००१ ची लोकसंख्या ६२% जास्त आहे तर २००१ च्या तुलनेत २०११ ची लोकसंख्या २३% जास्त आहे. ही लोकसंख्या वाढ जास्तकरुन स्थलांतरित लोकांमुळे आहे असे मानण्यास हरकत नसावी. जरी शहराच्या हद्दीत वाढ झाली असली तरी अनेक मुख्य भागांत लोकसंख्येची घनता वाढलेली दिसेलच.
वाढत्या विस्तार आणि लोकसंख्येच्या घनतेमुळे घरांच्या किमती मोठ्या वेगाने वाढत राहतात, दैनंदिन वाहतुकीचे प्रश्न बिकट होतात. एकंदरीतच विविध व्यवस्थेवरचा ताण वाढत राहतो. राहणीमानाचा खर्च वाढतो आणि नवीन येणार्या लोकांना घरे घेणे अधिकच बिकट होत जाते.
कल्पना करा की एखाद्या विविध गुणदर्शन सारख्या कार्यक्रमाकरिता एक व्यासपीठ आहे, ज्यांना आपली कला सादर करायची आहे, भाषण द्यायचे आहे त्यांना विंगेतून अथवा प्रेक्षकांतून उठून व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. पण त्यांचे सादरीकरण झाल्यावरही ते व्यासपीठावरच थांबले तर ? तर अडचण होईलच ना ...
मुंबई-पुण्यासारखी शहरे ही अशा व्यासपीठासारखी आहेत. येथे उद्योगधंद्यांकरिता लोक येतात. पण निवृत्त झाल्यावरही इथेच थांबणे गरजेचे आहे का हा प्रश्न विचारायला हवा. त्याऐवजी जर निवृत्त झाल्यावर इथेले घर विकून दुसर्या एखाद्या शहरात वास्तव्याकरिता लोक गेलेत तर ? तर इथले घर विकून आलेल्या पैशातले काही पैसे वाचवून कमी पैशात दुसर्या ठिकाणी घर घेता येईल. उरलेल्या पैशात राहणीमान जपता येईल. किंवा जर आपली गंगाजळीही चांगली असेल तर घर विकून आलेल्या रकमेत छोट्या शहरात अजून मोठे घर घेता येईल (ज्याला अशी मोठ्या घराची हौस आहे तो ती पुर्ण करु शकतो).
अगदी खेडेगावात जाऊन रहावे असे मी म्हणत नाही कारण शहरी जीवन आणि खेड्यातील जीवन यातली मोठी तफावत सहसा मानवणार नाहीच, पण ज्या शहराची वाढ मुख्यतः नैसर्गिक प्रकारे होते आहे (ऑरगॅनिक ग्रोथ) असे एखादे आपल्याला आवडेल असे शहर निवडता येईल. निवृत्तीची वेळ जवळ आल्यावर आपल्याला आवडेल अशा शहराचा शोध घ्यायला सुरु करावे. दोन तीन ठिकाणे निवडावी. आणि निवृत्तीनंतर हवेतर काही महीने अशा ठिकाणी भाड्याने राहून आपली अंतिम निवड करावी (हवामान , घरांच्या किमती, स्वच्छता, रुग्णालयाच्या सोयी ई ई मुद्दे विचारात घेता येतील)
यामुळे मोठ्या शहरांतील घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल जे नवीन युवकांच्या फायद्याचे असेल. तर निवृत्त व्यक्तीलाही एखाद्या शांत ठिकाणी जीवन जगता येईल. पुर्वी पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे ..मला वाटते निवृत्त मुंबईकर त्यावेळी पुण्यात येत असावेत, मुंबईत शक्य नसलेले 'स्वतःचे घर' पुण्यात घेत असावेत.
अर्थात ज्यांना मुलांसोबत एकाच घरात रहायचे आहे (आणि मुलांनाही एकत्र रहायचे आहे !!) ते कदाचित असा विचार करणार नाही. पण ज्यांची मुले इतर शहरांत किंवा परराज्यांत /परराज्यात गेली आहेत किंवा ज्यांना एकत्र रहायचे नाही त्यांनी याचा विचार करायला काही हरकत नाही.
आपल्या निर्णयाने मोठ्या शहरात आयुष्य सुरु करु पाहणार्या नवयुवकांसाठी जगणे काहीसे सोपे होईल हे सामाजिक भानही आहे..तेव्हा व्यासपीठावर जागा अडवून ठेवण्याऐवजी व्यासपीठावरुन पायउतार होण्याचा विचार करावा.
21 Aug 2018 - 8:49 pm | नजदीककुमार जवळकर
@मराठी कथालेखक - सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! त्याचे (मित्राचे) तेच म्हणणे आहे. सध्याच्या monthly savings ची SIP आणि पुणे -बंगलोरला फ्लॅट्स ..त्यावरचे भाडे .. आणि जन्मस्थानी वडिलोपार्जित घरात वास्तव्य
17 Aug 2018 - 10:36 pm | राघव
घर घेण्यासंदर्भात काही मुद्दे मांडावेसे वाटतातः-
उदा. घेऊ -
- साईझ? १००० स्क्वे.फू.
- लोकेशन? चांगली.
- किंमत? ५० लाख
- प्रथम प्रॉपर्टी? होय
- राहण्यासाठी की गुंतवणूक म्हणून? गुंतवणूक
- कर्ज किती? २० वर्षे. ३५ लाख. महिना हफ्ता साधारण ३५ हजार.
- सुरुवातीची रक्कम - १० लाख.
हफ्त्याची रक्कम -
- १ वर्ष - ४.२० लाख
- ५ वर्ष - २१ लाख
- १० वर्ष - ४२ लाख
माझ्या मते वरील स्थितीत, ३-४ वर्षांच्या आत जर घर "सहजगत्या" ७० लाखाला विकले तरी, कर्जफेड आणि २०% कॅपिटल गेन टेक्स हे सर्व काढून हातात पडणारी रक्कम बघता हातात विशेष काहीच पडत नाही. टॅक्स वाचवला तरी ५ वर्षे साधारण रक्कम वापरता येणार नाही. त्यामुळे अडचणीत हवा तेव्हा पैसा वापरता येईलच याची शाश्वती नाही.
जर कर्ज नसले तरीही कॅपिटल गेन काढल्यावर, हाता पडणारी रक्कम तेवढा परतावा देत नाही. त्यासाठी खूप कमी किंमतीत विकत घेतलेली प्रॉपर्टी खूप जास्त किंमतीत विकली तरच फायदा होतो, पण त्याला भरपूर वेळ देणे गरजेचे पडते. माझ्या मते तुमच्या मित्राला तुम्ही सांगितलेला पर्याय चांगलाय. मार्केट रिस्क चा अभ्यास करून घेतलेला निर्णय जास्त परतावा देईल असे वाटते.
21 Aug 2018 - 8:51 pm | नजदीककुमार जवळकर
सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!
18 Aug 2018 - 6:59 pm | सिन्नरकर
मला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण. ह्या मध्ये सर्व मुद्दे गृहीत धरले आहेत.
https://www.stableinvestor.com/2015/06/mutual-funds-vs-real-estate-inves...
21 Aug 2018 - 8:53 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद सर ! हे आधी वाचण्यात आले आहे म्हणून MF चा सल्ला दिला
21 Aug 2018 - 10:24 pm | सुबोध खरे
या लेखात बरेचसे मुद्दे एकांगी वाटले. उदा.म्युच्युअल फंड 25% परतावा देतात. किंवा घराचे येणारे भाडे त्यात गृहीत धरले नाही
23 Aug 2018 - 6:09 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद! डॉ. खरे वरील चर्चेत २५% परताव्याचा मी कुठेही उल्लेख केला नाही.
साधारण Equity Funds १० वर्षात १२-१५% (ave.) देऊ शकतात आणि Debt Funds ७ ते ९%.
तुम्ही वर बघाल तर मी असेच लिहले आहे की माझ्या मित्राच्या प्लॅन ऐकून मी स्वतः confuse झालो कारण मला पण त्याचा प्लॅन चांगला वाटायला लागला :)
22 Aug 2018 - 5:25 am | टवाळ कार्टा
मिपाकरांनी राजकीय धागे सोडून असे आर्थिकधाग्यांवर जास्त लक्ष दिले तर मिपा लय भारी कॅटेगरी मध्ये जाईल
22 Aug 2018 - 11:31 am | टर्मीनेटर
सहमत. अशा चर्चांमधून बरीच उपयुक्त माहिती मिळते.
22 Aug 2018 - 12:10 pm | चिनार
हेच म्हन्तो..
23 Aug 2018 - 6:12 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद टका !! चर्चेतून माहिती मिळावी ह्या साठीच हा प्रपन्च ! माझा हा व्यवसाय नाही पण हा विषय आवडतो एवढेच.
22 Aug 2018 - 9:53 am | सुबोध खरे
सद्य स्थितीत एक फार महत्त्वाचं मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे तो म्हणजे बाजार (अवास्तव अशा) फारच उच्च स्थितीत आहे.
याचे कारण निश्चलनीकरणामुळे काळ्या पैशाचा स्रोत आटला आहे.
त्यातून रेरा आल्यामुळे बांधकाम क्षेत्राला मरगळ आलेली आहे. (काळा पैसा हा सर्वत जास्त बांधकाम क्षेत्रात फिरत असतो.)
सोन्याची किंमत गेल्या ५ वर्षात अजिबात वाढलेली नाही आणि आता हि किंमत आंतरराष्ट्रीय किमतीही संलग्न केल्यामुळे त्यात भरीव अशी वाढ होणं कठीण आहे. तीन चार वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सोन्यात गुंतवण्यापेक्षा गोल्ड फंडात गुंतवा म्हणून उच्चरवाने सांगणारे सर्व गुंतवणूक सल्लागार स्वतःच गार झालेले आहेत.
यामुळे येणारा सर्व नवा पैसा प्रत्येक जण बाजारात गुंतवत आहे. अशा स्थितीत आपण आपले सर्व पैसे बाजारात गुंतवले आणि बाजाराने आपटी खाल्ली तर मुद्दल सुद्धा परत मिळणे कठीण होईल आणि बाजार जोवर मूळ वास्तव मूल्यापर्यंत येईल तोवर तीन ते चार वर्षे जाऊ शकतात.
(जर पुढच्या वर्षी निवडणुकीत श्री मोदी निवडून आले नाहीत तर बाजार कमीत कमी ३०% ने पडेल अस अंदाज आहे.)
यामुळे बाजारात किंवा म्युच्युअल फंडात चार ते पाच वर्षे काहीही परतावा मिळत नाही. हि स्थिती २००८ पासून ते साधारण २०१२ पर्यंत होती जर आपल्याला असे चार वर्षाने पैशाची गरज पडली तर पैसे जेमतेम बिनव्याजी परत मिळाल्यासारखे असतात.
२००८ च्या मंदीत माझे बाजारात २००६ साली गुंतवलेले पैसे ३० % मूल्य स्थितीत आले होते. अर्थात मला त्या पैशाची गरज नव्हती म्हणून नडले नाही.
सर्वच्या सर्व आर्थिक सल्लागार/ त्यांच्या वेबसाईट आज आपल्याला समभाग किंवा म्युच्युअल फंडाची गेल्या ५ वर्षातील घोडदौड दाखवत आहेत. गेल्या १५ वर्षातील बाजाराची स्थिती पाहिली तर वस्तुस्थिती पार वेगळी आहे असे दिसेल.
साध्या टी सी एसीच्या समभागांचे उदाहरण घ्या. हा अत्यंत उत्तम आणि सुदृढ कंपनीचा समभाग २००८ च्या मंदीत ५० % पडला होता आणि त्याची किंमत २१८ वरून (आजच्या तुलनेत) रुपये १०४ होती. पुढच्या चार वर्षात हि किंमत ४५० झाली. आणि यानंतर हा समभाग वाढत वाढत २००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे म्हणजे आपण २००८ च्या मध्यापर्यंत हा समभाग घेतला असता तर आपली किंमत वसूल होण्यासाठी किमान ३ वर्षे थांबावे लागले असते. हि स्थिती TCS सारख्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या समभागाची आहे.२००८ मध्ये अनेक समभाग झोपले ते काही परत वर उठले नाहीत. मग अशा अनेक समभागांच्या मिळून झालेला म्युच्युअल फंड आपल्याला किती परतावा देऊ शकेल याचा विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या एक वर्षात मोठे समभाग १५ टक्क्याने वधारले आहेत आणि लहान आणि माध्यम समभाग १५ आणि १२ टक्क्याने कोसळले आहेत. याला केवळ गुंतवणूकदारांची मानसिकता सोडले ता कोणतेही तर्कशास्त्र लावता येत नाही. तेंव्हा बाजार कोसळला तर मोठे समभाग जोरदार पडतील असा अंदाज आहे.
जेंव्हा बाजार उच्चीत असतो तेंव्हा लुंग्या सुंग्या सुद्धा आपल्याला आतल्या बातम्या आणि सल्ले देत असतात. १९९७ च्या सुमारास एका मोठ्या ब्रोकरने आपले समभाग संपूर्ण विक्रीस काढल्याने बाजार आपटला होता तेंव्हा त्याला विचारले कि आपण समभाग का विकले तर तो म्हणाला कि मला पान वाल्याने समभागाबद्दल टिप्स दिल्या हे पाहून बाजाराचा डोलारा किती पोकळ आहे हे समजले आणि मी समभाग विक्रीस काढले आणि खरोखरच बाजार कोसळला.
आपला पैसा सुरक्षित ठेवा आणि एकाच तर्हेच्या गुंतवणुकीत ठेवू नका
23 Aug 2018 - 6:19 pm | नजदीककुमार जवळकर
सर ! हे अगदी बरोबर बोललात ! अगदी तंतोतंत (डॉ.)खरे !! बाजारात अश्या cycels येणारच.
तुम्ही उदाहरणं दिलीच आहेत. १० वर्षाचा waiting असेल तर MF परतावा देतो असे दिसते.
22 Aug 2018 - 10:04 am | सुबोध खरे
https://economictimes.indiatimes.com/wealth/invest/equity-mfs-are-flush-...
हे हि वाचून पहा
Dr.Narend Subramanian, Ph.D Finance, Indian Institute of Technology, Madras
Updated May 21
Excellent question. Overall, mutual funds have been known to give better returns as compared to other investments. However, let us consider who the beneficiaries are. First and foremost are the mutual fund managers and asset management companies (AMCs). At present, the asset under management(AUM) of mutual funds is more than Rs.20 lakh crores and most mutual funds charge around 1.5 to 2% fees. Mutual funds are also aggressively marketed through SIPs, ULIPS, ELSS, etc. In fact, every month crores of rupees flow into the kitty of AMCs. Top fund managers are paid heavily and several top fund managers earn crores of rupees annually. Where does the money come from? Lakhs of individual common investors are pouring money through ULIPs, ELSS, SIPs and what not. Financial advisors and intermediaries would advise you to buy even in a falling market, even though they know that it might fall further. The often used cliche is “ you can't always buy at the bottom”. Have you ever noticed ETFs being marketed aggressively? No, because there is very little commission earned as compared to mutual funds.
If you see the FIIs data for the past several months it is very clear that they have been big sellers in the stock market. Previously, whenever FIIs are net sellers, markets crash but in the last few years mutual funds in India have grown so much that all the selling is absorbed - courtesy , money from the retail investors. It is no open secret that the big boys of Indian stock market, LIC and UTI also rush in to buy heavily during severe market crashes.
National Pension Scheme is another scheme through which investors can invest to reduce the tax amount. At present there are about 21.6 million SIP accounts throughwhich investors invest in mutual funds. FY 2017–18 witnessed inflows to the tune of Rs.67190 crores through SIP alone. Further, there is a 2bps (of AUMs) that can be spent to create investor awareness. That alone translates to more than 300 crores. Now, you can understand why the blitzkrieg in mutual fund advertisements.
Hence, money flows through various means and to keep the inflows strong, mutual funds also advertise aggressively. After all, AMCs have nothing to lose as they have one more trite statement up their sleeves “ Mutual fund investments are subject to market risks…..” :)
https://www.quora.com/Why-suddenly-is-there-so-much-marketing-about-mutu...
23 Aug 2018 - 8:20 pm | नजदीककुमार जवळकर
उत्तम माहिती डॉ. खरे! हि सत्य परिस्थिती आहे FII पैसा एवढा टाकत नाही आहेत.
DII पैसा ओततो आहे. अशा वेळेस जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे.
(most mutual funds charge around 1.5 to 2% fees) ह्या वरून अजून एक MF बद्दल लिहावेसे वाटते (तुम्हाला माहिती असेलच/बहुदा आहेच) - Direct MF मध्ये Expense Ratio कमी असतो.
उदा.
Axis Focused 25 Fund (Retail) - 2.47%
Axis Focused 25 Fund - (Direct Plan) - 1.33%
patience + risk appetite + individual/family future monetary needs etc. पाहून diversified instruments मध्ये पैसा गुंतवले तर MF परतावा देते पण त्याकडे लक्ष द्यावे लागते.
22 Aug 2018 - 2:15 pm | कंजूस
अगदी नेमके.
22 Aug 2018 - 3:00 pm | आदिजोशी
तुमच्या मित्राच्या जागी असतो तर मी काय केले असते:
हातात असलेल्या पैशातून थोडे टाकून + बँगलोरच्या मिळणार्या रेंट इतका हफ्ता ठेऊन पुण्यात घर घेऊन टाकले असते.
उरलेले पैसे १००% सेफ असलेल्या पर्यायांमधे गुंतवले असते रिटायरमेंट साठी.
४० हजाराच्या बचतीतून १०,००० ची SIP केली असती.
वय ४० असल्याने नोकरीची शाश्वती नसली तरी लगेच उद्या नोकरी जाणार नाहीये अथवा रिटायर होणार नाहीये. त्यामुळे फार टेंशन न घेता आयुष्य एंजॉय केले असते.
इन्फ्लेशन रेट मुळे एफडी केलेल्या पैशाची किंमत कमीच होत असते वगैरे बरेच राग म्युचुअल फंडवाले देत असतात. पण फंड प्रकार पूर्णपणे मार्केटवर अवलंबून आहे. तुमच्या गरजेच्या वेळी मार्केट पडलेले असेल तर बांबू बसू शकतो. त्यापेक्षा एफडी बरी. टाकलेले पैसे + व्याज नक्कीच मिळतं.
हातातले सगळे पैसे कधीही मार्केटमधे गुंतवू नका अथवा तसा सल्लाही कुणाला देऊ नका. जे पैसे बुडले तर चालतील तेच इथे गुंतवा. लोकांना क्षणात नागडे करण्याची शक्ती मार्केटमधे आहे.
23 Aug 2018 - 7:14 pm | नजदीककुमार जवळकर
धन्यवाद आदिजोशी !!
हातात असलेल्या पैशातून थोडे टाकून + बँगलोरच्या मिळणार्या रेंट इतका हफ्ता ठेऊन पुण्यात घर घेऊन टाकले असते. *** सहमत **!!
४० हजाराच्या बचतीतून १०,००० ची SIP केली असती.
वय ४० असल्याने नोकरीची शाश्वती नसली तरी लगेच उद्या नोकरी जाणार नाहीये अथवा रिटायर होणार नाहीये. त्यामुळे फार टेंशन न घेता आयुष्य एंजॉय केले असते. *** सहमत **!!
इन्फ्लेशन रेट मुळे एफडी केलेल्या पैशाची किंमत कमीच होत असते वगैरे बरेच राग म्युचुअल फंडवाले देत असतात.
*** १०,०००/- च्या वर FD वर व्याज मिळाले तर त्यावर TDS द्यावा लागतो शिवाय Taxslab नुसार income tax द्यावा लागतो. FD चे Post Tax Returns FD करण्यापूर्वी करून पाहावेत.
शिवाय मुदतीपूर्वी FD (गरज असल्यास )तोडल्यास पेनल्टी लागेल***
पण फंड प्रकार पूर्णपणे मार्केटवर अवलंबून आहे. तुमच्या गरजेच्या वेळी मार्केट पडलेले असेल तर बांबू बसू शकतो. त्यापेक्षा एफडी बरी. टाकलेले पैसे + व्याज नक्कीच मिळतं.
*** शक्य आहे ! अशावेळेस Liquid Funds कामात पडतात ज्यांच्यावर मार्केटचा प्रभाव अतिशय कमी असतो. तुम्हाला हे माहिती असेल आणि आंतरजालावर तुम्हाला याची माहिती मिळेल.
Liquid Funds वर long term tax gain लागतो पण Indexation Benefit मिळून हे FD पेक्षा efficient instrument बनू शकते ..सर्व माहिती आंतरजालावर आहे .. आणि तुम्हाला माहीतही असेल ..
मार्केट पडल्यावर Liquid Funds चे काय होते ते तुम्ही बघु शकता (२००८ - २०१२)
हातातले सगळे पैसे कधीही मार्केटमधे गुंतवू नका अथवा तसा सल्लाही कुणाला देऊ नका. जे पैसे बुडले तर चालतील तेच इथे गुंतवा.
**सहमत **
लोकांना क्षणात नागडे करण्याची शक्ती मार्केटमधे आहे.
** तसे stocks मध्ये होऊ शकेल. MF मध्ये diversification करतात आणि त्यामुळे Risk कमी होते त्यामुळे MF एकदम घसरत नाहीत.
शिवाय latest Mobile App / Internet ह्यावर तुम्ही SMS alert लावू शकता त्यामुळे MF Investments track करू शकता.
आणि MF Redumption केव्हाही करू शकता फक्त मार्केट वर रोज ५-१० मी. नजर ठेवावी
पुन्हा एकदा तुमचे आभार !!