मिपावर बर्याच साधक बाधक चर्चा होत असतात.
हल्ली काही सनातन विचारांचे लोक कोणत्याही प्रश्नाचा संबन्ध हिन्दु असण्याशी जोडतात.
महाराष्ट्रासारख्या विवीधतेने नटलेल्या प्रदेशात असंख्य प्रकारचे लोक रहातात.
बहुतेक सगळे जण मूलतः कधीतरी हिन्दु च होते.
राजकीय/ आर्थीक/ झुंडशाही/ दडपशाही मुळे काहींच्या पूर्वजानी अन्य धर्म स्वीकारले. त्यांच्या चाली रीति बदलल्या.आजच्या घडीला
सनातन विचारप्रणाली प्रमाणे हिन्दु धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे
खरेतर आजच्या घडीला सर्वच धर्म कालबाह्य झाले आहेत. ते ज्याकाळे निर्माण झाले ती राजकीय भौगोलीक परिस्थिती आता राहिली नाही. त्यातले काही तत्वज्ञानही कालबाह्य झाले आहे
तरीही एका सेकंदासाठी सनातन मत खरे आहे असे मानले तर मला काही प्रश्न पडतात.
कृपया जर जमत असेल तर माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनन्ती
( मला कोणावरही टीका करावयाची नाही.तसेच कोनाचीही खिल्ली उडवायची नाही)
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
६) जन्म ही एकमेव गोष्ट सोडली तर आणखी कोणती गोष्ट मला हिन्दु ठरवु शकते.
७)मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे? मी जर हिन्दु असेन तर माझा धर्म इतर सर्व धर्मीयाना समावुन घेण्यासाठी काय करतो?
यावर मोकळेपणी चर्चा व्हावी .
प्रतिक्रिया
29 Oct 2008 - 1:52 pm | सनातन
'Hin' means to remove and 'du' means darkness. In other words, any one who takes efforts to remove the darkness of spiritual ignorance, that is, a seeker, is a 'Hindu'.
29 Oct 2008 - 2:10 pm | अभिरत भिरभि-या
प्रश्न अतिशय चांगले आहेत.
आपले धर्मावरिल वेगवेगळे लेख पाहता आपण यांची सविस्तर व मराठीतून उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा आहे.
शिवाय हिंदु म्हणुन आपण जे स्पष्टिकरण दिले आहे ते कोणत्या वैदिक धर्मग्रंथात येते तो संदर्भ जाणुन घ्यायला आवडेल. माझ्या (अल्प) ज्ञानानुसार हिंदु हा शब्द कोणत्याही वैदिक धर्मग्रंथात वापरल गेला नाही
(प्र २, ३ , ५, ६ साठी नवनीत मार्गदर्शक शोधणारा ) अभिरत
29 Oct 2008 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदु म्हणुन आपण जे स्पष्टिकरण दिले आहे ते कोणत्या वैदिक धर्मग्रंथात येते तो संदर्भ जाणुन घ्यायला आवडेल.
असेच म्हणतो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
29 Oct 2008 - 4:01 pm | विकास
माझ्या माहीतीप्रमाणे, हिंदू हा शब्द आपल्यावर इतरांनी लादला (बळजबरीने नाही) आहे. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे हिंदू.
वेद आचरणारा वैदीक धर्म होता. आणि धर्म म्हणजे आचरण इतकाच त्याचा मर्यादीत अर्थ होता/आहे. हिंदू धर्म हा काही "रिलीजन" नाही त्यामुळे तो कोणी स्थापलेला नाही. त्याला मूळ मानवी पुरूष / स्त्री नाही -फक्त परब्रम्ह. त्यातील अनेक पंथ मात्र अनेकांनी स्थापलेत.
आपण म्हणता तसे "हिन" आणि "दू" ही मूळे असलेला हा शब्द असेल तर कृपया "हिन" आणि "दू" ह्यांचा इतर कुठे झालेला उपयोग दाखवावा ही विनंती.
बाकी विजूभाऊंच्या प्रश्नांसंदर्भात मला आपल्याकडून उत्तरे ऐकायला मिळतील.
मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे? याचे मात्र उत्तर द्यायला आवडेल पण ते १-२ ओळीत होणार नाही. वेळे अभावी आत्ता प्रतिसाद कमी देत आहे. कदाचीत अजून ८-१० तासांनी जास्त लिहू शकेन.
29 Oct 2008 - 4:15 pm | विजुभाऊ
हीन हा नसणे या अर्थाने वापरात असलेला प्रत्यय आहे
उदा: अपत्यहीन /नेत्रहीन/ वस्त्रहीन
दु = अंधार या अर्थाने "दुरीतांचे तिमीर जावो" पसायदानात अशी एक ओळ आहे.
दु हा कठीण /वाईट अशा अर्थानेही वापरला जातो
पण तो नुसता दु असा नसून दु: असा विसर्ग असलेला आहे
उदा : दु:दैव = दुर्दैव
दु:लभ = दुर्लभ
दु:शासन
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 2:10 pm | विजुभाऊ
खालसा याचा मूळ फारसी शब्द "खालीस" = शुद्ध
मग खालसा धर्म हा सर्वात शुद्ध होतो.
पाकिस्तान या शब्दाचा अर्थ पवित्र भूमी असा होतो.
सनातन तै माझ्या कोणत्याच प्रश्नांचे तुम्ही उत्तर दिले नाही
( माझे प्रश्न हे तुम्ही "साधकांच्या साधनेत पिशाच्चांनी आणलेले व्यत्यय" असे तर घेत नाही ना?)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 2:11 pm | llपुण्याचे पेशवेll
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
>> होय
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
>> आधी असे हिंदूधर्मात येणारे लोक दाखवावेत मग ठरवता येईल की त्याना कुठल्या जातीत घ्यायचे ते.. सध्यातरी जे वनवासी लोक परधर्मात जातात त्यानी हिंदू धर्मात परत प्रवेश केलाच तर त्याना त्यांच्या आधीच्याच जातीत परत घेतले जाते.
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
>> शक्यतो वडीलांचा. पितृशासक संस्कृतीप्रमाणे वडीलांची धर्म, जात, गोत्र इ. सर्व काही अपत्याला मिळते. मोठा झाल्यावर अपत्याने ठरवावे की त्याला कोणता धर्म पाळायचा आहे ते.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
>> हिंदू धर्म मी स्थापन केला ('अहम् ब्रह्मास्मि') ;)
त्यातले सर्वमान्य धर्मग्रंथ अनेक आहेत. वानगीदाखल काही: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, श्रीमद् भगवद्गीता.
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
>> हे रुढीच्या नियमात बसवले गेले. 'शास्त्रात रुढीर्बलियसि' प्रमाणे. (अर्थात ते योग्य होते असे नाही.)
६) जन्म ही एकमेव गोष्ट सोडली तर आणखी कोणती गोष्ट मला हिन्दु ठरवु शकते.
>> हिंदूधर्माविषयी प्रेम आणि सहिष्णुता. आणि अजून एक राष्ट्राच्या भल्यासाठी स्वतःच्या जो कुठला धर्म असेल त्याच्याही विरुध्द वेळ पडली तर उभे रहायची तयारी.
७)मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे? मी जर हिन्दु असेन तर माझा धर्म इतर सर्व धर्मीयाना समावुन घेण्यासाठी काय करतो?
>>काही फरक पडणार नाही तुम्ही असाल नसाल जग चालूच राहील ज्याच्यात दम असेल तो येईल आणि वर्चस्व गाजविल. आणि जर का मी हिंदू नसेन तर माझा धर्म इतर धर्माना सामावून घेण्यासाठी काय करतो असा ही प्रश्न मला पडतो जरी लोकाना पडत नसला तरी.
पुण्याचे पेशवे
29 Oct 2008 - 2:48 pm | वेताळ
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
>> होय
----चुक..जन्माने हिंदु असा किंवा मुसलमान..कर्माने तुम्ही पुण्यवान किंवा पापी ठरता.
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
>> शक्यतो वडीलांचा. पितृशासक संस्कृतीप्रमाणे वडीलांची धर्म, जात, गोत्र इ. सर्व काही अपत्याला मिळते. मोठा झाल्यावर अपत्याने ठरवावे की त्याला कोणता धर्म पाळायचा आहे ते.
----माझ्या वाचनात आले होते वैदिककाळात भारतात मातृसत्ताक पध्दती होती.
ह्या बद्दल मलाही खुप कमी माहिती आहे.पण पुर्वोत्तर राज्ये व दाक्षिण्यात राज्यात अजुनही मातृसत्ताक पध्दती आहे.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
>> हिंदू धर्म मी स्थापन केला ('अहम् ब्रह्मास्मि')
---मुळात हिंदु धर्म असे काही नाही आहे. वैदिककाळात भारतातील जीवनपध्दतीला हे नाव दिले गेले आहे.काही अभ्यासिकाच्या मते सिंधु हे अपभ्रंश हिंदु असे झाले आहे.
वेताळ
29 Oct 2008 - 3:08 pm | llपुण्याचे पेशवेll
----चुक..जन्माने हिंदु असा किंवा मुसलमान..कर्माने तुम्ही पुण्यवान किंवा पापी ठरता.
>> मग तुमचा जन्म कुठे होणार कोण ठरवते? पूर्वसुकृत..पूर्व जन्मी केलेले पाप वा पुण्य..
(भगवद्गीतेवर विश्वास असणारा)
पुण्याचे पेशवे
----माझ्या वाचनात आले होते वैदिककाळात भारतात मातृसत्ताक पध्दती होती.
राजवाड्यांच्या 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या पुस्तकात माझ्याही वाचनात तसे आले होते. पण आता कोणती पद्धती आहे ? त्याप्रमाणे पितृसत्ताकच जास्त योग्य वाटते.सगळ्या गोष्टी वैदिक काळाशी जोडण्यात काय अर्थ आहे?
---मुळात हिंदु धर्म असे काही नाही आहे. वैदिककाळात भारतातील जीवनपध्दतीला हे नाव दिले गेले आहे.काही अभ्यासिकाच्या मते सिंधु हे अपभ्रंश हिंदु असे झाले आहे.
ते तुमचे वैयक्तिक मत असेल. सध्याच्या घडीला हींदूधर्म नावाचा एक धर्म भारतात आणि संविधानात अस्तित्वात आहे. काही अभ्यासिक (का अभ्यासक) म्हटले म्हणून आजच्या घडीला हिंदू हा एक धर्म आहे हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.
पुण्याचे पेशवे
29 Oct 2008 - 2:50 pm | विजुभाऊ
हिंदूधर्माविषयी प्रेम आणि सहिष्णुता. आणि अजून एक राष्ट्राच्या भल्यासाठी स्वतःच्या जो कुठला धर्म असेल त्याच्याही विरुध्द वेळ पडली तर उभे रहायची तयारी.
हे वाक्य नीटसे कळाले नाही.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 3:00 pm | अवलिया
मी माझ्या अल्पमतीनुसार प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
तत्पुर्वी, विजुभाउ मला असे वाटते तुम्ही मेकौले व चार्वाकाच्या प्रचंड प्रभावाखाली सापडलेले आहात. त्यामुळे तुमची अवस्था तुझे आहे तुजपाशी अशी झाली असुन तुम्ही सुर्य उगवला की नाही याची भ्रांती होवुन मशालीच्या उजेडात सुर्याचे अस्तित्व शोध घेण्याचा प्रयत्न करत आहात. कदाचित बळजबरिने कराव्या लागणा-या कर्मकांडामुळे डोळ्यात गेलेला धुर तुमची अवस्था सैरभैर करत असुन कर्मकांडाच्या मागील झाकोळले गेलेले तत्व तुम्हाला बेचैन करत आहे. असो.
कर्मकांड व तत्वज्ञान हे दोन्ही धर्माचे अंग असुन सामान्य जनांना धर्मात बांधुन ठेवण्यासाठी कर्मकांड आवश्यक असते. जगात अनेक प्रकारचे लोक असतात. सगळ्यांनाचा तत्वज्ञानाची बैठक नसते. त्यांना त्यापेक्षा कर्मकांड अधिक सोपे व जवळचे असते. धर्माला अशा लोकांकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. कारण मग समाजाचा गाडा चालणार नाही. धर्माला अशा लोकांसाठी कर्मकांडाधारित व्यवस्था द्यावीच लागते. कारण अशांची संख्या ९९ टक्के असते. उर्वरित १ टक्यांत काही जण तुमच्यामाझ्यासारखे असतात ज्यांना कर्मकांडापेक्षा त्यातील तत्वज्ञान आकृष्ट करते किंवा ते आकळुन घेण्याची इच्छा असते. धर्म त्यांची ही गरज पुर्ण करतो. मग कोणी अद्वैतवादी असो की द्वैतवादी की विशिष्टद्वैतवादी. अजुन काही असतात ज्यांना याची गरजच नसते. धर्म अशांकडे सुद्धा ममतेने पाहायला शिकवतो. असो.
आता नमनाला घडाभर तेल ओतुन आपल्या प्रश्नांकडे वळतो. मी आपल्या प्रश्नांचा क्रम थोडा बदलला आहे त्याबद्दल क्षमस्व.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
हिन्दु धर्म नावाचा कोणताच धर्म नाही. सिंधु नदीच्या अलिकडले लोक हिंदु असे म्हणून पुर्वापार ओळखले जातात. यांची संस्कृती ती हिंदु संस्कृती. यात अनेक पंथ, उपपंथ तसेच विचारधारा आहेत. विशिष्ट देवाला मानणारे, भजणारे, अनेक देवांना मानणारे, कोणत्याही देवाला न मानणारे, कर्म कांडातच देव मानणारे, ज्ञानसाधनाच श्रेष्ठ मानणारे, योगावरच मोक्ष मिळतो मानणारे, असे अनेक बहुविध लोकांचा समुह म्हणजेच हिंदु समाज. हा धर्म नसल्याने सर्वमान्य ग्रंथ असण्याची गरज नाही. कारण कोणा ग्रंथाच्या अस्तित्वाशी याचे अस्तित्व निगडीत नाही. तरीही गीता हा बहुसंख्य लोकांनी मानलेला ग्रंथ आहे. यातही कोणा संशोधकाने पुराव्यानीशी सिद्ध केले की गीता श्रीकृष्णाने सांगितलीच नाही तरी हिंदुंच्या अस्तित्वाला काही होणार नाही.
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
ते पुर्वी ज्या जातीत असतील त्यात मिळतो. किंबहुना ते लोक सहसा तीच जात स्वतःची असे नंतर कागदपत्रात नमुद करतात.
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
हा श्रद्धेचा भाग आहे. आपण जर तटस्थ वृत्तीने इतर धर्मीयांचे धर्मग्रंथ व त्यांची आचरण पद्धती व हिंदुंची आचरण पद्धती यांचा तौलनिक अभ्यास कराल, तर मला वाटते आपण पण स्वतःला पुण्यवान समजाल. (याइथे आपण हिंदु आहात असे मी गृहीत धरले आहे कारण आजकाल नावावरुन धर्म कळत नाही)
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
माझ्यामते तरी याचा निर्णय त्यालाच करु द्यावा. कारण प्रत्येक जण स्वतःला काय आवडते काय नाही याचा निर्णय घेण्यास समर्थ असतो. तेव्हा तोच ठरवेल त्याला कोणता धर्म निवडायचा किंवा आचरणपद्धती आचरायची.
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
आर्थिकदृष्ट्या खालच्याच का वरच्या थरातील लोकांना पण या अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि हे केवळ हिंदु धर्मातच होते असे नाही इतर धर्मीयांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास कराल तर त्यात धर्मविरोधी कार्य व त्यांचे परिणाम हे कोणत्याही सहृदय माणसाच्या अंगावर काटा आणेल. याचा अर्थ मी पावाच्या नियमाचे समर्थन करतो असा नसुन तो नियम चुकीचा होताच. आणि आज केवळ १०० वर्षांत आपण किती बदललो आहोत हे जर तुम्ही नीट पाहीले तर तुमच्या लक्षात येईल की इतरांना १००० पेक्षा जास्त वर्षे लागली ते आपण केवळ ५०-६० वर्षात केले आहे. आज आपले सामाजिक जीवन मागील शतकाच्या तुलनेत सुधारले आहे. अजुनही बरेच करणे बाकी आहे. पण अगदी हताश होवुन बसण्यासारखी तर स्थिती नक्कीच नाही.
६) जन्म ही एकमेव गोष्ट सोडली तर आणखी कोणती गोष्ट मला हिन्दु ठरवु शकते.
मी हिंदुसंस्कृतीचा एक भाग आहे असे आपल्या मनाने तुम्ही ठरवले की झाले तुम्ही हिंदु...
७)मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे?
मी स्वतःला हिंदु म्हणवुन घेण्याने काहीच फरक पडणार नाही. मी आधीच सांगितले की हिंदु असा कोणताही धर्म नाही. पण काय करणार जग तुम्हाला हिंदु म्हणुनच ओळखते. त्यामुळे तुम्ही सांगा अगर नका सांगु... जग तुम्हाला हिंदुच म्हणणार.
मी जर हिन्दु असेन तर माझा धर्म इतर सर्व धर्मीयाना समावुन घेण्यासाठी काय करतो?
मी उलट विचारतो. आता मी सांगितले तसे की हिंदु हा धर्म नाही त्यामुळे अनेक परस्परविरोधी विचारधारांचा एकत्रित समुह म्हणजे हिंदु. याचा अर्थ मुसलमान किंवा ख्रिश्चन विचारधारा सुद्धा हिंदुसंस्कृतीचा भाग बनु शकते. ज्याप्रमाणे जैन किंवा बौद्ध पंथ हिंदुचेच अंग मानले जातात तद्वतच इतर धर्म पण मानले जावु शकतात. आता माझा प्रश्न हा की, जर असे असेल तर ते धर्म हिंदु संस्कृतीचा भाग बनण्यास तयार आहेत का? जेव्हा अगदी परस्परांशी साम्य नसलेले पंथ गुण्यागोविंदाने हिंदुत्वाच्या पताक्याखाली नांदु शकतात तर विशिष्टाद्धैताचेच अंग असलेले इतर एकदैवत धर्म का बनु शकत नाहीत? की त्यांचीच इच्छा नाही? याप्रश्नाचे खरे उत्तर त्यांच्या धर्मग्रंथाचे अध्ययन केले तर मिळेल. पण उत्तर फारसे आशादायक नसेल हे पण मी सुचित करतो.
माझ्या मते मी मला जमेल तसे उत्तर दिले आहे. जर आपले समाधान झाले असेल तर आनंद आहे अन्यथा मी आपले समाधान करु शकलो नाही याबद्दल क्षमस्व.
आपलाच,
नाना
29 Oct 2008 - 3:20 pm | अभिरत भिरभि-या
ते पुर्वी ज्या जातीत असतील त्यात मिळतो. किंबहुना ते लोक सहसा तीच जात स्वतःची असे नंतर कागदपत्रात नमुद करतात.
जे मुळात हिंदु नाहीत पण ज्यांनी वैदिक तत्वे स्वीकारली आहेत. ( उदा: The Mother अरविंदाच्या सहकारी वा हरे-कृष्ण पंथातले बहुसंख्य लोक) त्यांना हिंदु मानणार का ?
जर ते हिंदु असेल तर त्यांची जात कोणती ?
जर बिनाजातीचे हिंदु असतील तर कोणी जात ही नसताना हिंदु कसे होऊ शकेल ?
29 Oct 2008 - 3:26 pm | अवलिया
जे मुळात हिंदु नाहीत पण ज्यांनी वैदिक तत्वे स्वीकारली आहेत. ( उदा: The Mother अरविंदाच्या सहकारी वा हरे-कृष्ण पंथातले बहुसंख्य लोक) त्यांना हिंदु मानणार का ?
अर्थात, का नाही?
जर ते हिंदु असेल तर त्यांची जात कोणती ?
हिंदु असला म्हणजे जात असलीच पाहीजे असे काही नाही. पण जात लावायचीच असेल तर त्यांनी ठरवावी कुठली लावायची ते. आपण कोण अडवणारे..
जर बिनाजातीचे हिंदु असतील तर कोणी जात ही नसताना हिंदु कसे होऊ शकेल ?
हिंदुंमधे जात नंतर आली मुळ हिंदुंचे वैशिष्ट्य म्हणजे चातुर्वर्ण्य
वर्ण व जात वेगळे आहेत हे विसरु नका.
29 Oct 2008 - 3:37 pm | अभिरत भिरभि-या
हिंदुंमधे जात नंतर आली मुळ हिंदुंचे वैशिष्ट्य म्हणजे चातुर्वर्ण्य
कधी जात नाही ती जात. ही न जाणारी जात्-व्यवस्था खरेच हिंदु धर्मातून जावी. :)
बाकी आपली उत्तरे बिनतोड आहेत
29 Oct 2008 - 3:16 pm | विजुभाऊ
नाना तुमचे म्हणणे समर्पक आहे.
इथे काही सनतनी मंडळी प्रत्येक गोष्टीचा हिन्दु धर्माशी सम्बन्ध जोडु पहातात.
कर्म कान्ड हा प्रत्येक धर्माचा अविभाज्य भाग आहे.पण कर्मकान्ड म्हणजे धर्म नव्हे.
जो तुमचे म्हणणे मान्य करत नाही तो दुर्जन आणि जे मान्य मरतो तो साधक ही सरसकट विभागणी कशासाठी करायची?
धार्मीक /स्पिरिच्युअल माणसाकडे फार मोठ्या प्रमाणात सर्व समावेशकता असते. ( Acceptability in larger scale) दुर्दैवाने या सनातन म्हणवणार्या लोकाना याची जाणच नसते. आणि ते कर्मकान्ड म्हणजे धर्म असे मानुन इतर धर्माना हिणवत असतात.
सुदैवाने मिपावर त्यांच्या री ला री ओढणारे लोक अत्यल्प आहेत्.त्यामुळे साधक बाधक चर्चा होतात.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 3:18 pm | अनिल हटेला
नाना !!
धन्य झालो मी !!
सुरेख स्पष्टीकरण!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Oct 2008 - 3:56 pm | विजुभाऊ
जातीला असणारी सामाजीक परिमाणे आता राजकीय झाली आहेत.
शासकीय फॉर्म मध्ये असलेला जातीचा कॉलम जेंव्हा छापणॅ बंद होईल तेंव्हाच जातीप्रथा नष्ट होइल.
पण हिन्दु धर्माचा नावाखाली जी अडवणूक होते ती अक्षम्याच आहे. उदा : छोटा उदेपूर चे आदिवासी जेंव्हा स्वतःला हिन्दु म्हणवुन घेत नाहीत त्यांची धर्माची कल्पना भारतीयच आहे. तरिही धर्ममार्तन्ड त्याना हिन्दु धर्मात कोंबतात
सनातन्याना हिन्दु याचा अर्थच कळाला नाही. ते उगाच दुर्जनांच्या नाशाच्या वल्गना करत असतात.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 4:30 pm | चारुदत्त
मी माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
>>> जन्माने हिंदु म्हणजे पुण्यवान असला काही प्रकार नाही, जो कर्माने, आचरणाने हिन्दु असतो तो जास्त पुण्यवान. उदा: हिंदु या शब्दापुर्वी आपल्यालकडे सज्जन, परोपकारी व सदवर्तन आचरणार्या व्यक्तिला "आर्य" म्हणत. आर्य हा शब्द एखादा विषिष्ट समाज, जाती वाचक नसुन तो व्यक्ति गुण वाचक होता. आता हिंदु हा शब्दही त्याच पर्यायाने वापरला जातो तरी त्याला भौगोलिक संदर्भ आहे.
हिंदु या शब्दाच्या उत्पतीबद्दल थोडे
मुळात हिंदु हा धर्मच नाही या शब्दाचा उल्लेख पुराणात, वेदात वा कुठेही नाही. वास्तविक पहाता. सिंधु संस्कृतीत प्रचलित "स" ला "ह" म्हणण्याचा प्रघात होता. त्यामुळे मध्यपुर्वेकडील देशातील लोक सिंधु नदीच्या किनार्यावर राहणार्या लोकाना हिंदु म्हणत व पर्यायाने भारतवर्शाची ओळख नव्याने हिंदु म्हणुन झाली.
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
>>> वास्तविक जाती ह्या कर्मानुसार निर्धारीत होतात जन्मानुसार नव्हे. त्यामुळे हिंदु असलाच तर त्याला जात असावीच हे आवश्यक नाही. उदा: आपल्याकडे रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी (ही एक मोठी समाजमान्य पदवीच) हे जन्माने व कर्मानेही चक्क मारेकरी, डाकु होते. परंतु सत्संगामुळे त्यान्नी त्यांचे कर्म बदलले व महर्षी या पदाला पोहोचलेत. ईकडे अमेरिकेत माझ्या अनुभवानुसार असंख्य लोक मुळ धर्म सोडुन हिंदु झालेत पण त्याना कोणी जात विचारत नाही किंवा तशी आवश्यकताही नसते. भारतात जाती ह्या समाज व्यवस्थेतुन आल्या होत्या, त्याला धार्मिक आशय नाही जो काही आहे तो स्पष्ट पणे कर्माधारीत आहे. केवळ याचसाठी महर्षी वाल्मिकींचे उदाहरण दिले. जे ब्राह्मणानाही वंदनीय आहेत. एवढेच नव्हे तर राम, कृष्ण हे पण कर्माने क्षत्रिय होते तरी सारा समाज त्याची देव म्हणुन वंदन करतो, जर अमुक जातच श्रेष्ठ असती तर हे कसे शक्य आहे.?
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
>>> तुम्हाला धर्म म्हणायचे आहे की उपासना पद्धती? हिंदु तुम्हाला कोणतीही उपासना पद्धती स्विकारण्याचे स्वातंत्र्य देतो. जसे मी घरात मुर्तिपुजा करत नाही, पण वडील करतात तर भाउ यातील काहीच करत नाही तरी यामुळे कोणी धर्माबाहेर, बहिष्कृत होत नाही. कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. एक चांगला ख्रिश्चन ही हा चांगला हिंदुच असतो कारण त्याचे आचरण हे महत्वाचे.
ईथला ख्रिश्चन भारताबाहेर हिंदु ख्रिश्चन म्हणुन ओळखला जातो, तर आजही अरबस्तानात मक्के मदिनेत भारतिय मुसल्मानाना हिंदु मुसल्मान म्हणुनच ओळ्खल्या जाते. कारण हिंदु आहे तो राष्ट्रामुळे, संस्कृतीमुळे तर मुस्लिम आहे तो धर्मामुळे. पण ईथे असे होते की एक हिंदु म्हणुन मला येशु, ख्रिश्चन धर्मियाबद्दल आदर, सन्मान आहे. परंतु असे ख्रिश्चन वा मुस्लिमांकडुन होत नाही. व ते त्यांचाच धर्म श्रेष्ठ म्हणतात व ईतरानाही आपल्यातच सामावुन घेण्यासाठी दहशतवाद, सेवा, आमिष याद्वारे तसेच दुसर्या धर्माची निंदा नालस्ती, अपमान करतात व दुसर्या धर्माचे सहास्तित्व अमान्य करतात. त्यामुळे सगळा वांधा होतो.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
>>> आधीच सांगितल्याप्रमाणे हिंदु हा धर्म नव्हे तर जीवनपद्धती आहे, हे न्यायालयानेही स्पष्ट केले आहे त्याला असा ईतर धर्मियाप्रमाणे प्रेषित, पुस्तक वैगेरे काही नाही. विविध व महान मनुष्यान्नी, ऋशी मुन्नीनी तपाद्वारे, अनुभुती, अनुभवाद्वारे जी काही सत्य वेळोवेळी प्रगट केली तीच आपण वेदांमधे संकलीत केली. तुम्ही बघाल प्रत्येक ऋचाना एक ऋषी असतो म्हणजे ज्या ऋचाचा शोध ज्या ऋशीन्नी लावला त्याला त्याचे नाव दिले असते. जसे: अनुष्टुप छंदः विश्वामित्र ऋषी: असे तुम्हाला आढळुन येइल.
रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, भगवत गीता याना कुणी धर्मग्रंथ म्हणण्याची गल्लत होउ शकते पण ते केवळ मार्गदर्शक ग्रंथ आहेत. धर्मग्रंथ नव्हेत. त्यातल्या त्यात भगवत गिता हा सर्वमान्य धर्मग्रंथ म्हणुन समजायला हरकत नाही. कारण यातच सगळ्याचे सार आहे.
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
>>>> हा सरळ सरळ मुर्खपणा होता, व याने या समाजाची प्रचंड हानी केली. जेंव्हा सर्व सत्ता, अधिकार एखाद्या विषिष्ट वर्गापुरता त्यांच्या हातात येतात तेंव्हा असला माजोरेपणा कोणत्याही समाजात विकृतीरुपाने येतोच. तोच प्रकार हिंदु समाजात झाला. हिंदु धर्मातुन बाहेर जाण्यास बरेच मार्ग मोकळे होते पण परत यायला मात्र सारे मार्ग बंद. ह्या प्रकाराने या समाजाचे प्रचंड नुकसान झाले. तरी कालांतराने त्याना ही चुक समजली व त्यावर उपाय केले गेलेत.
६) जन्म ही एकमेव गोष्ट सोडली तर आणखी कोणती गोष्ट मला हिन्दु ठरवु शकते.
>>> या प्रश्नाचे उत्तर आधीच्या उत्तरात आलीच आहेत.
७)मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे? मी जर हिन्दु असेन तर माझा धर्म इतर सर्व धर्मीयाना समावुन घेण्यासाठी काय करतो?
>>> आज तुम्ही जगात बघाल तर धर्माच्या नावावरच सतत युद्धे होत आलीत व झालीत, आज तर दहशतवादाच्या रुपाने त्याने सगळेच जग व्यापले आहे. अख्खे जग हे एकतर मुस्लिम आहे किंवा ख्रिश्चन आहे. त्यासाठी जेहाद व क्रुसेड द्वारे प्रचंड रक्तपात झालेला आपण पहातो. दुसरीकडे रक्तरंजीत कम्युनिज्म, वसाहतवाद. निसर्गाचे व मानवजातीचे प्रचंड शोषण करणारी भांडवलशाही याद्वारे सारे जग त्रस्त आहे, केवळ अंधारच. जगाला योग्य प्रकाश दाखवण्याचे सामर्थ्य हिंदु मधे आहे. याला कारण याची सर्वव्यापकता, सर्वांगिण विचार, केवळ मनुश्यच नव्हे तर प्राणि मात्र, निसर्ग यांच्यातही उच्चतम तत्वे पहाणारा. 'आम्ही दगडाला देव मानत नाही, तर दगडातही देव पहातो'. हिंदु अर्थकारण हे शोषण नव्हे तर भरण, पोषण वर आधारीत आहे त्यात वृ़क्षवल्ली आम्हा सोयरी होते त्यामुळे निसर्गाचा विंध्वंस अभिप्रेत नाही. असे एक ना हजार कारणे आहेत. एवढस मिपा पुरणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुम्बकम असा संदेश फक्त हिंदु देतो. ऋग्वेदातल्या ऋचेनुसार सार्या जगातील ज्ञान, व चांगल्या विचारांचे खुलेपणे स्वागत करतो.
अजुन एक उदाहरण देता येइल जसे योग, आयुर्वेद हे सर्व मानवजातीसाठी म्हणुनच निर्मिले आहेत एखाद्या विषिष्ट समाजासाठी नाहीच तसला संकुचित पणा कुठेही नाही. यावरुनही हिंदुची विशालता, महानता लक्षात घेता येइल. मुद्दे बरेच आहेत. चर्चेमधे येतीलच. सध्या विस्तार भयास्तव ईतकेच.
असे उच्च विचार घेउन जीवन जगणे यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती? बघा तुम्ही विचार करुन जर या सगळ्यांमुळे मी हिंदु धर्माचा एक दुत म्हणुन मी जगात काय काय करु शकतो? असा हिंदु हा मानवजातीसाठी एक आशा आहे, प्रकाश आहे.
समाजरीती, चाली ज्या काळानुसार आल्या आणि गेल्या पण हिंदु कात टाकुन नित्यनुतन राहिला. यालाच म्हणतात सनातन धर्म. (आपल आणि त्या सनातन संस्थेच जमत नाय ब्वा, त्याच्याशी याचा काही संबध नाही.) आता तुम्हीच विचार करुन बघा या जगात असा हिंदु विचार नसेल तर काय फरक पडतो यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आले असे मी समजतो.
मी जर हिंदु असेल तर दुसर्या धर्मियाना सामाउन घेण्यासाठी काय करतो? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? हिंदु धर्म (जीवन पद्धती) हा सगळ्याना खुला आहे. काय करतो असे कदाचित एक व्यक्ति, समाज म्हणुन काय करतो असे म्हणायचे आहे का? ईथे हिंदुन्नी ईतर धर्मियाना सामाउन घेण्याचा प्रश्न नाही त्याचे स्वागतच आहे. सहस्तित्वाबद्दल म्हणत असाल तर त्यान्नी स्वता:ची उपासना पद्धती जरुर चालवावी पण जसा मी तुमचा आदर करतो तसा ईतरान्नीही माझा आदर करावा ही माफक अपेक्षा, उगीच निंदा नालस्ती कराल ते खपवुन घेतले जाणार नाही. उदा: न्यु लाईफ चर्चचे ओरिसातील प्रताप.
टीपः मी नाना चेंगट यांची पोस्ट ही पोस्ट लिहुन झाल्यानंतर वाचली, त्यांच्याही मताशी मी सहमत आहे.
29 Oct 2008 - 5:27 pm | वेताळ
तुम्ही दोघानी अतिशय सुंदर,नीटनेटक्या पध्दतीने विजुभाउच्या प्रश्नाना उत्तरे दिल्या बद्दल धन्यवाद.
हिंदुत्व ह्या शब्दाचा चुकीचा व संकुचित अर्थ घेउन लोकाची मने भडकिवणे सोपे आहे. काही व्यक्ती व संघटना ह्या आजकाल चातुर्वणाचे व कर्मकांडाचे परत स्तोम माजवु लागले आहेत्.चातुर्वणामुळे हिंदु धर्माचे अतोनात नुकसान झाले आहे. ह्याच गोष्टीमुळे हिंदु धर्म भारताबाहेर पसरु शकला नाही.चातुर्वण व कर्मकांडाला कंटाळुनच गौतमाने बौध्द धर्माची स्थापना केली.परत हेच सनातनी लोक कर्मकांडाला महत्व देत आहेत व आपले दुकान चालवत आहेत.
वेताळ
29 Oct 2008 - 8:34 pm | भास्कर केन्डे
आदरणीय नाना व चारुदत्त,
आपल्या दोघांचेही साध्या व सरळ भाषेतील प्रतिसाद अत्यंत समर्पक व मुद्देसुद आहेत. यापेक्षा सुंदर काय लिहिणार?
नाना, कर्मकांडी लोकांना सुद्धा समाजाने/धर्माने ममतेने सोबत ठेवण्याचा मुद्दा पटला. आपल्याला नाही बुवा असे संयमी राहता येत. दिवाळी व गुढीपाडवा सोडले तर माझा व पुजा-अर्चा यांचा संबंध येत नाही. मला आवडते ते आपल्या धर्मातले तत्वज्ञान, योग, आयुर्वेद. काही लोक दररोज बराच वेळ निश्कारण कर्मकांडात खर्च करतात ते आवडत नाही. परंतू त्यांना सुद्धा सामावून घेण्याबद्दलचे आपले मुद्दे भावले.
आपला,
(नतमस्तक) भास्कर
जाता जाता -
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
--माझ्या पाहण्यातले गोरे हिंदू स्वतःला कोणतीही जात चिटकवून घेत नाहीत.
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
--आम्ही अशा बाश्कळ व मुर्खपणाचे नियम सांगणार्यांना फाट्यावर मारतो.
30 Oct 2008 - 9:56 am | विजुभाऊ
ही सगळी उत्तरे वाचल्या नन्तर सनातन धर्माचे ढोल बडवणारे किती बाष्कळ बडबड करतात ते लक्षात येतेच.
प्रत्येक धर्मात मूलतत्वे सांगितली जातातच. ती चांगलीच असतात. हिन्दु /पारशी/जैन्/मुस्लीम तुम्ही कोणिही असा. कर्मकान्डामुळे धर्मातील मुल तत्वांचा र्हास होतो आणि पोकळ डोलारा उभा होत रहतो हे च लक्षात येते.
माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
मी हिन्दु असलो किंवा नसलो तरी फारसा फरक पडत नाही. जोवर मी धर्माचा खरा अर्थ समजून घेत नाही तोवर मी अधर्मीच असतो.
मूळ तत्वांची कर्मकान्डांशी फारकत जोवर होत नाही तोवर धार्मीक /स्पिरिच्युअल होणॅ अवघडच आहे.
कर्मकान्ड हे साध्य साधण्यासाठीचे साधन आहे. आपण साधनालाच चिकटून बसतो तोवर साध्य हे अप्राप्यच रहाते
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
30 Oct 2008 - 10:03 am | अभिजीत
सहमत.
- अभिजीत