पनीरमटर सासावडी,पराठा पुनवडी! ;)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in पाककृती
8 Aug 2018 - 4:47 pm

अंक पहिला:-

तर काय झालं म्हैत्ये का...काल सक्काळी सक्काळी बायकू म्हनली आज मी आजेबात सैपाक करनार नाय..नाष्टा जोरात करायचा आणि सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आनि सामान णवीण केलेल्या फर्निचर मदी लावायचं!(कुणी???हा प्रश्न टाळून! ;) )मी:- "बरं , तस क्रू!" यातल्या शेवटच्या अक्सरावर बाईल चिडली आनी म्हणाली, "काय ओ ह्ये विचित्र शब्द बोलत असता हल्ली?" मी:- "हा मिसळपाव चा वियोग आहे ग सखे!" ती:- "डायलेग मारू नका.म्हैत्ये तुमचं मुसळपाव" मी:- "अग मुसळ नई ,मिसळ!" ती:- "तुमच्या भाषेत..टायपो हे टायपो,कळलं ना आता?" मी:- "कसला पो?" ती:-"श्शी....!" मी:-मला फेकून मारलेली वाटी चुकवत चुकवत-"स्वारी स्वारी!"ती:-"परत त्येच त्या मिसळपाव वरचच!" अस म्हणून फेकून मारायला कैच ण सा पडल्यानी निस्ताच हात हलवत"मरा त्यातच,आणि करा तुमीच जेवायचं आज!" अशी आव्हान आत्मक धमकी मला द्यीऊन तिच्या कामात बुडाली..मग मी दुपारी 2प्रेन्त तिला काम आणि मला आमच्या वळवळ्या महाउद्योगी बालकाच्या अंघोळी पासून ते खाण्या पर्यन्त च्या जबाबदारीत अडकवून घेतलं..आणि दुपारी 4 वाजता ही आणि आमचे दिव्य बालक निजेला गेल्यावर फेटा बांधून स्वयं-पाक घरात शिरलो. हुरररररररररर...

अंक दुसरा:-

सगळ्यात आधी पनीर पाण्यानी धुऊन घेतलं आणि धोतराच्या तुकड्यावर त्याची सुरींनी यथायोग्य कत्तल करून मंजी टुकड पाडून निथळायला ठिवलं. मंजी कोरडं ठाक हुतया पनीर.(आनि लोनिफ्राय करताना उडत बी नाय चराचरा..दुत्त दुत्त! :-/ )मंग लगीच पातेल्यात पाणी उकळी मारायला ठिउण थेच्यात आदुगरच सोल्लेला आमचा सासवड सैडचा आन त्यो बी सिजनच्या पहिल्या तोडीचा गोड मटार टाकला..आनि 2मिनिटांनी लगीच ग्यास बंद क्येला. (ह्यो मटार मंजी तिकडच्या भासत वाटाना घ्येताना हिच्या कडन फर्माईस झाल्ती "त्ये तुमि ढाबा श्टैल भाजी करा ना एकदा!" म्हणूनच आज लगीच मौका बगून चौका मारायचा ब्येत क्येला! त्यात आमचा सासावडी मटार मंजी लै गोड हो! ;) म कसा नाई करनार लग्गीच!? ;) असो!!! )

ह्योच बरं का आमचा त्यो सासावडी मटार, सॉरी वटाना! https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/38448235_1819174708168807_3371647329923760128_o.jpg?_nc_cat=0&efg=eyJpIjoidCJ9&oh=d85903e820b580f6723a7b51e4da646f&oe=5BCAF6AD

मंग तीनचार कांदे चिरले,लसूण सोलला, आलं बी घ्येतलं आणि तव्याला तेल टाकून थेच्यात आदुगर कांदा चांगला आंग सोडपरेन्त फ्राय क्येला.मंग वरती आलं लसून टाकून खाली बसून कनिक चांगली बैजवार मळून घ्येतली,आणि पराठ्यासाठी चांगली ताणली जायला तिला परातीत थोडी थापून मदी मदी थालपिटाला करत्यात तशी होल क्येली आन मंग थेच्यात चार चार थ्येंब त्याल बी सोडलं,आनि धोतराच्या मऊ तुकड्याखाली मुरायला ठेवली.

आता परत वरती ओट्याला आलो आणि फ्राय झाल्यालं कांदा वग्रे जिन्नस मिक्सर ला सिक्सर लागेपरेंत चांगलं बारीक वाटून घ्येतलं. दोन टंबाट्यांची पन त्याच मिक्सर ला त्ये प्युरी का फ्युरी काय म्हनत्यात ती लगोलग काडून घ्येतली..आनी मंग यक खोलगट तवा घिऊन थेच्यात आदी पनीर लोणी फ्राय करून घ्येतलं आनी त्ये ताटाला काडून लगीच त्यात अजून लोणी टाकून त्ये टमाटो फ्युरी थेच्यात सोडली.तिनी पानी सोडाया सुरवात क्येल्या क्येल्या लग्गीचं वाटण घातल वरून मंग त्येला त्याल सोडाया वर सोडून परत खाली भुईला आलो आन परात हाताला घिऊन त्या कनकीचे परत थोडी एकजीव मळून सा गोळे पाडून घ्येतले. त्याच्या लांब पट्ट्या करून त्याला वरन तूप लावलं आणि कडबोळ्यावानी गुंडळून वरून चपट चपट करत परत पट्टी क्येली . मंग पुन्ना कडबुळ पुन्ना पट्टी अशे एकंदर तीन एपिसोड झाल्याव त्ये सा कडबुळी तशीच सोडून फटकन वरती ओट्याला आलो. तोपरेनत बारीक ग्यासवर ह्या मसाल्यानी टमाटो प्युरीशी नीट झिम्मा ख्येळलावता! हुरररररररर!!!
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/38700141_1822334487852829_5202800232777121792_o.jpg?_nc_cat=0&efg=eyJpIjoidCJ9&oh=7de99522c00e170479a9ee1d3d1d1aa3&oe=5BFFC70B

मंग अजेब्बात टाइम न लावता त्यात आमचा मंगला टॉकीजच्या मागं मिळणारा कडक नागदेव मसालेवाल्या कडचा मसाला मारला ,थोडं तिखाट मीट टाकलं,धान्याची पावडर मारली आनी गिरेव्ही ज्यादा दाट रहाणार नाही येवड पानी बी मारलं..दोन मिंट जाऊ दिली आनी लग्गीचं गरम पाण्यातुन मऊ पाडलेला मटार टाकून लगोलग फ्राय क्यालेलं पनीर बी टाकलं. थोड्या टायमात लगी ग्यास बंद क्येला आनी मग लागलो पराठ्याच्या मागं..
पोळपाट लाटन घेतलं आणि पोळपाटाला वाईच त्याल लावून त्या येकेक कडबुळ्याला घिऊन रेटून पराठे लाटले आनी लोनी सोडत सोडत खरपूस भाजून काढले...
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/38614546_1822408794512065_7286456273007017984_n.jpg?_nc_cat=0&efg=eyJpIjoidCJ9&oh=c038afc25a952356dc837a12cb87be96&oe=5C10CD24 https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/38641234_1822420787844199_4170644773218025472_n.jpg?_nc_cat=0&efg=eyJpIjoidCJ9&oh=d08d7e01ce970b341259db719b388f5b&oe=5C0FF800
त्ये डब्याला लावे प्रेन्त आमचं दिव्य वळवळ बालक उठलं... आणि लगोलग आमचं स्वयं पाक घरही सुटलं..मंग बायडी पन उठली ..आंग मोडत छा करायला सुटली.. मी बी पोराचं आवरून त्येला परत खायला बियला घातलं आनी होता होता सातच्या टायमाला माझी बाईल द्येवाला दिवा बत्ती करून मला एक लाडाची हाक देऊन "पाट पाणी घ्या ना आज प्लिईईज!!!" ह्ये इतक्या लाडानी म्हणाली की मी पोराला तिच्याकडं सोडून कवा उठलो आणि स्वयंपाक घराकडं कवा सुटलो त्ये माझं मला कळलं बी न्हाई.. नन्तर जेव्हा तिनि पराठ्याचा पहिला घास भाजीब्रोबर घ्येतला ..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..नन्तर मी बी ज्येवलो रोजच्या सारका, पन आज पोट आदीच भरलेलं होतं!
======≠==============

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

8 Aug 2018 - 4:55 pm | जेम्स वांड

डॉल्बी ऍटमोस गुर्जी बल्लवाचार्य! जमून आल्ये रेशिपी!

अभ्या..'s picture

8 Aug 2018 - 5:20 pm | अभ्या..

अगा बाब्बौ......
क्येवढा ह्यो घाट घातलाय गुर्जी..
जरा उगी सिंपल म्याग्या बिग्या बनवायच्या सोडून..
(बादवे सैपाक्घरात जायला फेटा कशाला बांधला?)

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 5:32 pm | प्रचेतस

ते शेफ लोक घालतेत ना उंच टोप्या. बुवाकडं तशी नसंल म्हणून त्ये त्याच्याऐवजी फेटा लावून घुसलं असंल.

ह्या प्रश्नाचे खरे उत्तर 'डोक्याला' असे असावे अशी आशा आहे. ;)

संजय पाटिल's picture

9 Aug 2018 - 10:25 am | संजय पाटिल

ह्या प्रश्नाचे खरे उत्तर 'डोक्याला' असे असावे अशी आशा आहे. ;)

=))))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2018 - 11:47 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/shotgun-emoticon-452.html

यशोधरा's picture

8 Aug 2018 - 5:29 pm | यशोधरा

भारी!!!

तुषार काळभोर's picture

8 Aug 2018 - 5:36 pm | तुषार काळभोर

आमचा जिव्हाळ्याचा विषय.
इकडून दिवे घाट चढल्यावर झेंडेवाडी, काळेवाडी, जाधववाडी, पवारवाडी, सासवड, पलीकडं भिवडी, अलीकडं कोडीत, हिवरे (हे आजोळ) मग चांबळी, बोपगाव मार्गे बापदेव घाट उतरस्तोवर सगळीकडं पाव्हनंरावळं..
वाटाणा, अंजीर, सीताफळ, भुईमूग.... नुसती मज्जा!!!

सिरुसेरि's picture

8 Aug 2018 - 6:24 pm | सिरुसेरि

मस्त डिश . तुम्ही म्हणजे मिपावरचे मास्तर शेफ .

आज बाळाची द्रिष्ट काहाडढाना मोहऱ्या थोड्या जास्त टाका बुवा.

नाखु's picture

8 Aug 2018 - 6:47 pm | नाखु

पुरुषांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, ईथे "गुरू ची विद्या गुरूला तत्त्वावर यशस्वीपणे पार पडली आहे.

दै मिपा त्रिकाळ

बँचलर असताना शिकलेले वाया जात नाही, लग्नाळू लोकांना मार्गदर्शन
दै मिपासत्ता

मटार सासवड चा असल्यानं गोड का ? याची बांद्यापासून चांद्यापर्यंत चौकशी झाली पाहिजे.

दै मिपासा मना

संकलक नाखु
ताक : बाळराजे पाककलेसही वेळ देतात म्हणजे समजूतदार आहेत (त्यांच्या मातोश्री वर गेले असावेत)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2018 - 7:45 pm | अत्रुप्त आत्मा

प्र कटन सुरू:-
दिव्य बालक(आणि त्यांच्या मातोश्रीही! ;) )निद्राधीन असले कारणाने सदर खेळ बर्यापैकी करावयास जमलेले आहे.
:- प्र कटन समाप्त! ;)

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 7:53 pm | प्रचेतस

मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत?

अभ्या..'s picture

8 Aug 2018 - 8:03 pm | अभ्या..

तू गप रे अगोब्या,
नुसते ओंडके टाकायचे धंदे बंद करा आता.
दुत्त दुत्त दुत्त ल्ल्लूल्ल्लूउलूऊऊउ

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 8:13 pm | प्रचेतस

=))

नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय प्रगती झाली ते कळू द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2018 - 2:20 pm | अत्रुप्त आत्मा

@बुलेट घेऊन http://www.sherv.net/point.laugh-emoticon-752.html काय प्रगती झाली ते कळू द्या. - http://www.sherv.net/rolling.floor.laughing-emoticon-3073.html

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2018 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/double.shotgun-emoticon-465.html

यशोधरा's picture

9 Aug 2018 - 2:29 pm | यशोधरा

बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत नाहीयेत!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2018 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

आय्यो! मला वाटलं की मलाच दिस ना गेले! :-|
बगा हो मालक बगा बगा जरा!

नाखु's picture

9 Aug 2018 - 7:58 pm | नाखु

पापी असल्यानं दिसत नसतील म्हणून गप्प बसलो होतो.

पापभिरू नाखु

सतिश गावडे's picture

9 Aug 2018 - 8:58 pm | सतिश गावडे

मला वाटलं की मलाच दिस ना गेले! :-|
म्हणजे नेमकं काय?

रच्याकने, तुम्ही मराठीच्या कोणत्या बोली भाषेत लिहीलं आहे? :)

यशोधरा's picture

9 Aug 2018 - 9:05 pm | यशोधरा

ह ह पु वा!!
मराठी भाषा भारी लवचिक हो!

नाखु's picture

9 Aug 2018 - 9:59 pm | नाखु

पनीर चे गोड गोड परिणाम दुसरं काय !!!!

सतिश गावडे's picture

12 Aug 2018 - 11:21 am | सतिश गावडे

आंबा गोड असतो त्यामुळे समजण्यासारखे आहे. पण पनीर??

रमेश आठवले's picture

8 Aug 2018 - 7:13 pm | रमेश आठवले

पाकशैलींहुन अधिक रुचकर आहे वर्णनशैली .

बाइज्जत बामूलाहीजा शेफ ए खिदमत ,
लज्जतदार पराठादार पनीरदार मटारदार
गुर्जी ए महाराष्ट्र
पनीर ए मटर बुर्जी घेऊन
पधार रहे हय

रानभाजी महोत्सव ऐकून होतो , गुरुजींचा बुर्जी महोत्त्सव भरविण्यास आता हरकत नाही .. जाणकारांनी नोंद घ्यावी ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2018 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त आये =))

या पाकृंच्या डब्ब्यांसह एक मिपाकट्टा जरूर बनता हय ! ;)

सस्नेह's picture

8 Aug 2018 - 9:23 pm | सस्नेह

येहीच बोलताय

नूतन सावंत's picture

10 Aug 2018 - 11:37 pm | नूतन सावंत

सहमत,सहमत

shital's picture

9 Aug 2018 - 9:00 am | shital

मस्त ...

भारी हो गुरुजी. शेवट तर झकासच.

अता पुढचा मेनू कोणता?

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 12:16 pm | रंगीला रतन

फक्कड जमलया!

बाबो बुवा आत्मुस दुत्त दुत्त !!!!! खन्ग्री एक्दम :)

प्रमोद देर्देकर's picture

9 Aug 2018 - 10:00 pm | प्रमोद देर्देकर

बाबौ आवो गुर्जी धोतूर पण ....
तरीच आमचं शि ss ष्य बंधू (वलीखलं का कोन त्यों )विचारत व्हतं की हे धोतुर्याला कसलं पिवळं दाग पडलंया गुर्जी च्या ... अता काय सांगावं ...

बाकी
आमचं गुर्जी हायेतच सगळ्या गोष्टी त वाक ब गा र !

कोमल's picture

10 Aug 2018 - 6:05 pm | कोमल
कोमल's picture

10 Aug 2018 - 6:07 pm | कोमल
नूतन सावंत's picture

10 Aug 2018 - 11:38 pm | नूतन सावंत

झक्कास

चित्रगुप्त's picture

12 Aug 2018 - 2:49 am | चित्रगुप्त

धागा जरा मोठा दिसला तर आम्ही आधी शेवटाकडून वाचतो, त्याप्रमाणे तिकडून वाचायला सुरुवात करतो तरः

..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..

हे वाचून उडालोच, फोटो बघितले तर ते पराठा वगैरेंचे. काय बी कळंना झालं.

प्रचेतस's picture

12 Aug 2018 - 6:44 am | प्रचेतस

=))

नाखु's picture

12 Aug 2018 - 9:45 am | नाखु

"गुप्त"असलेलं चित्र कसं दिसतं!!

दिव्यदृष्टी ने नवल झालेला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2018 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

गुप्त चित्राचं काय घेऊन बसलात, ते हाडाचे चित्रकार असल्याने, माणसाकडे नुसते बघितले की त्यांच्या एक्स-रे व्हिजनला त्याची हाडेपण दिसत असणार ! =))

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2018 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

@

काय बी कळंना
12 Aug 2018 - 3:19 am | चित्रगुप्त
धागा जरा मोठा दिसला तर आम्ही आधी शेवटाकडून वाचतो, त्याप्रमाणे तिकडून वाचायला सुरुवात करतो तरः

..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..
हे वाचून उडालोच, फोटो बघितले तर ते पराठा वगैरेंचे. काय बी कळंना झालं.

~~~ नावाला जागलात हो काका..! चित्राचं गुप्तांग काय-धरलत पण! ग्रेट ग्रेट!!! अशी सवय मुरली पाहिजे अंगात,मंजे आपणही येतो (कधीही केव्हाही कुठेही)रंगात! क्या बात! क्या बात! क्या बात! __/\__