नम्र विनंती : या लेखातील व्याकरणाच्या चुका मोठ्या मनाने दुर्लक्ष करुन त्यातील content ,भावना व समर्पीत वृत्ती याकडे लक्ष द्यावे.
सह्याद्रीचे जीगरबाज...
काल महाबळेश्वर, पोलादपूर रस्त्यावर, वाडा कुंभरोशी जवळ, तीन कीलोमीटर वर असलेल्या दाभीळ टोकावर, दोपोलीच्या कृशी विद्यापीठाच्या तीस कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात झाला. त्यात तीस जनाना आपले प्राण गमवावे लागले. अपघात भिषण होताच पण आठशे फुट खोल दरीतून आणि तेही भरपूर पाऊस दाट दुखे, अंगाला झोंबनारा वारा, थंडी, असल्या वातावरनात तीस मृतदेह काढण्याचे काम त्याही पेक्षा अवघड होते. हे काम म्हणजे साक्षात मृत्युच्या जबढ्यात हात घालन्या सारखे होते .आणि हे काम लिलया पार पाडले. ते महाबळेश्वर च्या सह्याद्री आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या व महाड ,खेड, पोलादपूर येथील जांबाज ट्रेकर्स व पोलिस आणि NDRFच्या जवानानी. त्यानी राबवलेले पंचवीस तासाचे हे मिशन किती जीवघेने होते. त्याचा हा व्रत्तांत...
सकाळचे आकरा वाजले होते. संजय पारटे सकाळची कामे आटपून आपल्या झेराँक्स मशीन च्या दुकानात नुकतेच पोहचले होते .एवढ्यात फोन वाजला. जरा मणात चर्र झाले .पोलीस स्टेशन मधून फोन होता. स्वतः पी. एस.आय .नाळेसाहेब बोलत होते.दाभिळ टोकावर बस दरीत गेलेय. प्रवासी किती आहेत माहित नाही .आपल्याला यावे लागेल. क्षणाचाही विलंब न लावता पारटे लगेच हो म्हणाले. फोन ठेवला व लगेच आपले सहकारी संजय भोसले व इत्तराना फोन लावला. भोसले दुकान ऊघडत होते एवढ्यात फोन वाजला परीस्थिती समजून घेतली. दुकानात आलेल्या ग्राहकालाच दुकान बंद करायला सांगितले व पळतच गाडीकडे सुटले तोपर्यंत पारटे अँब्युलंन्स घेऊन सायरन वाजवत निघाले. कारण एवढेच, ज्या ट्रेकर्संना फोन केला होता, त्याना कळावे. तोपर्यंत विजय केळगने, अमित कोळी असे चार जन पुढे निघाले.
अक्षय शेलार अजून बिछान्यातच होता रात्री उशीरा झोपला होता डोळे चोळत ,फोन घेतला. संजय भोसलेंचा फोन होता. धोंडीराम शेलार अक्षयचे वडील जे आजारी असतात. ते ही ट्रेकर आहेत. बापलेक बाईकवरून निघाले एका हातात गाडीचा हँडल दुसऱ्या हाताने फोन करत बापलेक सुसाट निघाले. बाकीचे सुनील जाधव, दिपक जाधव, अक्षय जाधव, किरन चव्हाण, अक्षय कांबळे,वैभव जानकर ,चंदु आणि राकेश चव्हाण प्रकाश ढेबे,विजय ढेबे,गणपत ढेबे चंद्रकांत गायकवाड मला न्यात असलेली ही नवे यात अजून खूप सारी ही मंडळी जसे फोन येतील तसे ज्या कामात होते ते काम टाकून ,आपल्या बाईक घेऊन दाट धुक्यात वाट काढत जिवाची पर्वा न करता साठ सत्तरच्या स्पिडने उताराने गाडी चालवत घाटातून निघाले .वाटेत आकाश शेलार भाडे घेऊन निघाला होता. तोही परत फिरला आणि तोही निघाला.
तोपर्यंत पारटे, भोसले, घटनास्थळी पोहचले होते. अपघात एस.टी. चा नाही खाजगी बसचा होता. दापोली कृशी विद्यापिठाचे एकतीस कर्मचारी महाबळेश्वर फिरायला आले होते .रस्त्यावरून बस दिसत नव्हती. चार टप्पे पार करून आठशे फुट खोल दरीत दाभीळ टोकावरून पडली होती.
अपघात मोठा होता संकट मोठे होते.भिषणता जाणवत होती.उतरायला वाट नाही करवंदी, शेंबारटीच्या जाळ्या कोल्ह्या लांडग्याचे राज्य साप विंचू खेकडा यांचे साम्राज्य त्यात भरपूर पाऊस ,दाट दूखे अशी अवस्था.स्थानिक गुराख्यानी जागा दाखवली. मणुष्यबळ लागणार होते. आणि म्हणून पारट्यानी महाबळेश्वर ट्रेकर्संना फोन केला .आणि कोण जिंवत आहे का ?त्याला बाहेर काढण्यासाठी पारटे भोसले विजय , अमित खाली उतरले तो पर्यंत बाकीचे सारे सह्याद्रीपुत्र व इत्तर टेकर्स महाड, खेड, महाबळेश्वर यथिल जवळपास साठ टेकर्स जमा झाले .तिघेजन जिवंत असावेत असे तेथील गुराखी म्हणाले. एकजन हात हालवतोय, असे सांगितले .पारटे आणि सहकारी त्याला शोधत होते.पण फक्त एकजन जीवंत होता. नाडीचे ठोके चालू होते .देह छिन्न विछिन्न झाला होता पण तरी सुध्दा नाडीचे ठोके चालू होते .त्याला वाचवायची पारटेनी तयारी केली. दहा मिनिटात वरती काढायचा ठरवले .पण अपयश आले. सातव्या मिनटाला त्याचे ठोके थांबले दुर्देवाने... आता प्रेते वरती काढायची होती .सकाळी साडेबारा सेटअप बांधायला सुरुवात झाली. दूपारी दोन वाजता सेटअप तयार झाला. प्रत्येकाला कामे वाटुन दिली. भोसले रोपवर ,पहिल्या टप्यावर, दुसऱ्या टप्यावर ,असे दहा फुटावर एक ट्रेकर असे ऊभे राहिले होते.तोपर्यंत खाली ऊतरलेल्या विरानी.तीस प्रेताचे लोकेशन शोधले. कोण गाडीच्या चेसी खाली .कोण टपाखाली. कोण मोठ मोठ्या दगडाखाली छिन्न विछिन्न अवस्थेत पडले होते . काम करणारांचे रक्त मात्र घोटत होते. सरळ प्रेत काढता येणार नव्हती .पोत्याच्या सहाय्याने ती वर काढायची ठरली .तो पर्यंत वरती असलेल्या ट्रेेकर्सनी आठशे फुटापर्यंत झाडे तोडून ,जाळ्या तोडून वाट तयार केली .इकडे सातारा ते रायगड रत्नागिरी पासुन चाळीस, पन्नास अँब्युलन्स व शंभर पोलीस गाड्या ,शिवाय मंत्री सदाभाऊ खोत.आणि आमदार मकरंद आबा ,नगरसेवक कुमार शिंदे व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि हजोरो नागरीक व नातेवाईक शेकडो गाड्या जमल्या होत्या. याना थोपवन्यापासून ट्राफिक खूली करन्यापासून आणि काम करणाऱ्या या टेकर्सना चहापाणी देण्याचं कामही हेच सारे ट्रेकर्स करत होते. दुपारी दोन ते सहा वाजे पर्यंत चौदा प्रेते बाहेर काढली.
एव्हाना सहा वाजले होते NDRFची आठ जनांची टिम दाखल झाली साऱ्याना हायसे वाटले कामात मदत होईल असे वाटले. त्यानी टेकर्सचे काम थांबवले दरीत पारटे व सहकाऱ्याना आदेश दिला. काम थांबवून वर या निरोप मिळताच आपल्या विरानी सर्व प्रेते गाडीच्या टपाखाली सुरक्षित ठेवली लोकेशन नजरेत ठेवले .ते ही दमले होते. वरती आल्याबरोबर कोळी मावशीने सर्वाना चहा करून दिला जरा ताजेतवाने वाटले NDRFचे नियोजन सुरू झाले .सात वाजले, आठ वाजले ,आकरा वाजले नियोजन प्लँनिग संपत नव्हते.ज्यादा कुमक मागवली आहे .म्हणून वाट पहात होते .शेवटी नातेवाईक व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा तोल सुठला. त्यानी टिमला विचारले कसले नियोजन करताय चार तासात काही साहित्य नसताना आमच्या मित्रानी चौदा प्रैते वर काढली. आणि तुमच्या कडे सारे आधुनिक साहित्य असताना अजून तूमचे नियोजनच चालू आहे . तो पर्यंत ज्यादा कुमक आली होती. टेकर्सनी बांधलेल्या सेटअप वरच काम सूरू केले .रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत कशीतरी तीन प्रेते बाहेर काढली .पाऊस, दुखे यामुळे रात्री तीन वाजता काम थांबवले. सकाळी बारा वाजता काहीही न खाता कामाला सुरूवात केली होती .आता पंधरा तास झाले होते. सारा वेळ निपचीत गार पडलेल्या त्या बांधवाच्या सिनिध्यात त्यांचा शोध घेण्यात कसा गेला कळालेच नव्हते .परत वरती आल्यावर कोळी मावशीने बणवलेला डाळ भात खाल्ला .घास घशाखाली उतरत नव्हता .ताटात ते निश्पाप निपचीत पडलेले चेहरे दिसत होते.समोर रडुन रडून थकलेले अभागी जीव दिसत होते.तो आक्रोश कानातून जात नव्हता.कोळी मावशी वाढत होती .घास गिळत नव्हता कसेतरी चार घास ढकलले.सर्व सहकारी येरझऱ्या घालत होते.
पहाटेचे पाच सव्वापाच वाजले थोडे दिसू लागले संजय पारटे ,कुमार शिंदे सहकारी व जवानानी निर्णय घेतला .परत कामाला सुरुवात झाली सकाळी आकरा वाजेपर्यंत राहिलेली तेरा प्रेते वर काढली. सर्वाना हायसे वाटले .पण का कोणास ठाऊक पारटे आणि सहकाऱ्यांचं मण अजून खालीच गूठमळत होते. शेवटची मोहीम हाती घेतली .जेथून गाडी खाली गेली होती .त्या मार्गावर या लोकांच्या शेवटच्या आठवणी मोबाईल ,कपडे ,पिशव्या, चपला, पाकिटे पडली होती.ते सारं सारं गोळा केले. आणि शेवटंचं पोतं साश्रुपर्ण नयनानी वर पाठवले .सर्वानी एकमेकांना थँक्स म्हटलं आणि आधार देत वर आले.आता गर्दी कमी झाली होती .सारी प्रेते पोलादपूरच्या दिशेने रवाना झाली होती.वहातूक सुरळीत झाली पंचवीस तास अविश्रांत न थकता ऐंशी ट्रेकर्स ,छपन्न जवान, व एकशे आकरा पोलिस व अधिकारी यानी हे काम चोख बजावले . शिवाय हजारो ज्ञात ,अज्ञात चेहरे नातेवाईक यानी सोबत दिली .पण शेवटचे काम बाकी होते. दोन दिवसात रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे कागद, यांचा खच पडला होता. हे सारे कागद बाटल्या गोळाकरून नगरपालीकेच्या कचरावाहू गाडीत भरुन पाठवले व सर्वजन आपापल्या घरी निघून आले.
पण मणाला एक प्रश्न पडतो पोलीस ,जवान ,नातेवाईक ,यांचं एक नातं होतं, कर्तव्य होतं ,पण या ट्रेेकर्सचं काय ?
फक्त सेवा आणि सेवाच...
संजय पारटे यांचे झेराँक्स दुकान, संजय भोसले यांची मोबाईल रीचार्ज टपरी ...अक्षय, आकाश हे सामान्य नोकरीवर... वडील धोंडीराम हे आजारी असतात.एक गोळी नसेल तर काय ?अमितची आई कोळी मावशी रस्त्यावर ड्रायफ्रुट विकते .केळगने, चव्हाण .जाधव सारी सारी मुलं यांचं हातावरचं पोट पण मन मात्र सह्याद्री एवढं ,काळीज वाघाचं, मागचा पुढचा विचार न करता ह्या ऐंशी विरानी स्वतः ला झोकून दिल. फक्त दुसऱ्याचं दुखः हालकं करन्यासाठी ज्यावेळी नातेवाईक रस्त्यावर होते त्यावळी हे वीर खोल दरीत म्रुत्युच्या जबड्यात काम करत होते बघनारांच्या पाया खालचा एक दगड जरी घसरला तर खाली सगळेच संपले.अशा स्थितीत काम करत होते. यामध्ये माणुसकिचा झरा असलेले नगरसेवक कुमार शिंदे हे ही ट्रेकर्स आहेत . खाली उतरून पंचवीस तास सेवा करत होते.तसेच नगराध्यक्ष वैभव खेडकर आपलं दुखः विसरून वर येणारी प्रेते गाडीत भरत होते.किती ही सेवा कितीही माणुसकी..... शासन या घटनेने बऱ्याच सुधारणा करेल. पण ज्यानी सेवाभावाने हे काम केले ज्यानी धोका पत्करला त्या वीरांच्या पाठीवर एक मायेची थाप तरी टाकेल का?????
बळवंत पाडळे...
प्रतिक्रिया
3 Aug 2018 - 2:24 pm | अनन्त्_यात्री
माणुसकीचे ह्रदयंगम दर्शन! __/\__
3 Aug 2018 - 2:56 pm | सोमनाथ खांदवे
ट्रेकर्सनी अपघाता वेळी मदत केल्याचा घटना वर्तमान पत्रात वाचल्या होत्या , परंतु तुम्ही लोकांनी निस्वार्थी मनाने स्वतः चा जीव धोक्यात घालून त्यावेळी धाव घेऊन मदतीचा हात पुढे केला त्याला तोड नाही . तुमच्या या लेखा मूळे स्वकेंद्रित लोकांचे डोळे उघडून रस्त्यावरील अपघातात चटकन मदत केली तरी पुरे झाले .
आर्थिक परिस्थिती बेताची असताना आपत्कालीन परिस्थितीत धावून जाणे हे मोठ्या मनाची लक्षणे आहेत . हे स्वार्थी जग तुम्ही विनामोबदला केलेले समाजसेवेचे कार्य दोन दिवसांत विसरून जाईल . त्या वेळी उपस्थित असलेले नेते , अधिकारी ,पोलीस निर्लज्ज पणे छपाईच्या कामाला लागले असतील पण दुर्दैवी 31 लोकांचे कुटुंबीय कायम तुमचे ऋणी राहील कारण तुमच्या मूळे अंत्यसंस्कार चे सोपस्कार त्यांना पार पाडता येतील . तुम्ही देवदूता सारखे धावून जाऊन दरी खोऱ्यात अडकलेल्यानां निर्व्याज मनाने मदत करता म्हणून तुम्हाला समाधानाने झोप लागते , नाहीतर आमच्या सारखे या गळेकापू स्पर्धेत किड्या मुंग्या समान आहोत .
3 Aug 2018 - 2:56 pm | तात्या विन्चू
'धन्यवाद' हा शब्द थिटा पडेल.....सलामी त्या ट्रेकर्स ना !
3 Aug 2018 - 5:12 pm | कानडाऊ योगेशु
+१०००००००००००००००००००००००००
एक कडक सॅल्युट सर्व ट्रेकर्स साठी व ह्या ऑपरेशन मध्ये मदत केलेल्या सर्वांसाठी!
3 Aug 2018 - 3:02 pm | खिलजि
अपघात वाईटच . पण एकदा घडल्यावर अंत्यविधीसाठी देह असणे किती आवश्यक असते हे मी स्वतः सावित्री नदी दुर्घटनेत अनुभवलेले आहे .. हा लेख वाचून त्या हृदयद्रावक भावना जाग्या झाल्या . त्या शूरवीर लोकांचे योगदान हे सैनिकाएवढेच महत्वपूर्ण आहे ..
3 Aug 2018 - 4:10 pm | स्वलेकर
__/\__
3 Aug 2018 - 5:39 pm | सिरुसेरि
माणुसकीची जाणीव करुन देणा-या त्या शुरवीरांना सलाम .
3 Aug 2018 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
या दु:खद अभियानात काम केलेल्या सर्व "माणूसकीच्या खर्या दावेदारांचे" काम अत्यंत स्पृहणिय आणि अनुकरणिय आहे !!! त्यांना कडक सलाम !
पण शेवटचे काम बाकी होते. दोन दिवसात रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे कागद, यांचा खच पडला होता. हे सारे कागद बाटल्या गोळाकरून नगरपालीकेच्या कचरावाहू गाडीत भरुन पाठवले व सर्वजन आपापल्या घरी निघून आले.
अवधान राखून केलेले हे कामसुद्धा स्पृहणिय आहे.
ही माहिती इथे दिल्याबद्दल बाजीगर यांना अनेक धन्यवाद !
3 Aug 2018 - 7:14 pm | शलभ
__/\__
3 Aug 2018 - 7:42 pm | धर्मराजमुटके
या नातेवाईकांवर रागवावे की यांच्या बुद्धीची कीव करावी काही कळत नाही. ही बातमी
3 Aug 2018 - 9:05 pm | सोमनाथ खांदवे
त्या वेळेची सर्व परिस्थिती लक्षात घेता नातेवाईकांना दोष देण्यात अर्थ नाही , सर्व शक्यता पडताळून पहिल्या गेल्या पाहिजेत .
आणि हा मात्र नवीन टर्निंग पॉईंट झाला आहे , खरं म्हणजे त्या दिवसा पासून बऱ्याच लोकांच्या डोक्यात सावंत बद्दल संशय आला नसेल पण हा एकटाच वाचला कसा हा विचार मात्र येऊन गेला असेल . अवघड दिसतंय सगळं .
4 Aug 2018 - 12:02 pm | नरेंद्र गोळे
मन सह्याद्रीएवढे, काळीज वाघाचे
परपीडा दूर करण्यासाठी प्राण पणाला लावण्याची जिगर
ह्याचे बळावरच आपला समाज बलशाली आहे. संपन्न आहे. त्या सर्व वीरांना सादर प्रणाम!
4 Aug 2018 - 6:53 pm | नाखु
सहकारी यांना अनेक धन्यवाद.
5 Aug 2018 - 11:51 am | चांदणे संदीप
या वृतांतावरून असे लक्षात आले की NDRF टीमपेक्षा किंवा इतर कोणत्याही शासकिय मदत यंत्रणेपेक्षा ही ट्रेकर्स मंडळी आधिक तत्पर आहेत.
अशा दुर्घटनांसाठी प्रशासनाने एक डेडिकेटेड हेलिकॉप्टर ठेवावे असे वाटते.
Sandy
5 Aug 2018 - 1:12 pm | प्रमोद देर्देकर
सलाम सर्व ट्रेकर लोकांना.
5 Aug 2018 - 3:09 pm | डँबिस००७
एक कडक सॅल्युट सर्व ट्रेकर्स साठी व ह्या ऑपरेशन मध्ये मदत केलेल्या सर्वांसाठी!
6 Aug 2018 - 9:27 pm | एक सामान्य मानव
ट्रेकर्सचे कौतुक व अभिमान वाटला. पण एक बाब खटकली. हे लोक उत्साहाच्या भरात स्वतःचे प्राण धोक्यात घालत आहेत. काही अनावश्यक धोके टाळले तर खरच खूप बरे होइल. उदा बाइक वरुन घाटात वेगाने जाणे, रात्री उशिरा दरीत उतरणे हे अनावश्यक वाटले. जाणारे गेलेच होते. त्यान्चे देह ५-६ तास उशिरा वर आणले तरी चालले असते पण ते करताना काही अपघात होऊ नये म्हणुन कदाचित जवानानी रात्री काम रोखले असावे. NDRFचे जवान बहुदा खुपच नियोजन करुन काम करतात व काम सुरु होण्यास वेळ लागु शकतो. लोकल पुढारी व जनता ज्याना स्वतःला काही करयचे नसते ते उगीच अशा वेळी जास्त शहाणपण दाखवतात.
7 Aug 2018 - 8:31 pm | ट्रम्प
' स्वतःचा जीव धोक्यात घालतात ' फक्त या वाक्याला समर्थन !!! बाकीचं ' मला काय करायचं त्याच ? ' हा दृष्टिकोन वाटला .
खरं म्हणजे त्या ट्रेकर्सनी बस कडे हाका मारून बघायचं " कोणी जिवंत आहे का ? कोणी प्रत्युत्तर नाही देत नसेल तर ( दोन चार बेशुद्ध असले तरी ) सगळे मेले आहेत असे गृहीत धरून शांत बसायच होत का ? लोकल पुढारी आणि फुकट गर्दी करणारी जनता मात्र चप्पल ने हाणली पाहिजे .
थायलंड मध्ये एक नेव्ही जवान मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी शोधमोहीम चालू ठेवून त्या मुलांना वाऱ्यावर न सोडता सुखरूप बाहेर आणलं .
प्रसंगावधान राखून निस्वार्थी पणे मदत करण्याची माणुसकी थोड्या तरी लोकां मध्ये आहे म्हणून सकाळी घरातून बाहेर पडलेली वृद्ध , शाळेतील मुलं , नोकरदार मंडळी संध्याकाळी सुखरूप घरी येतात , आणि रस्त्यावर स्रियांना सुरक्षितपणे हिंडता येतंय .
7 Aug 2018 - 5:23 am | नावातकायआहे
__/\__
8 Aug 2018 - 10:58 am | एक सामान्य मानव
हे माझ्या प्रतिसादावर लिहले आहे का? कदाचित मी माझे म्हणणे नीट मान्डु शकलो नाही. माझा मुद्दा अनावश्यक धोका पत्करण्याबद्द्ल होता. म्हणजे बचाव कार्य हे सन्ध्याकाळी थांबवणे हे जास्त योग्य ठरले असते. कारण तेम्व्हा कोणीही जिवन्त नाही हे कळाले होते. जर लेख वाचला तर लक्षात येईल कि घाटाकडे जाताना मोबाइलवर बोलत एका हाताने गाडि चालवणे वगैरे खूप धोक्याचे होते. माझा रोख ह्यावर होता.
30 Nov 2019 - 8:59 pm | मुक्त विहारि
हे असे काही वाचले की परत एकदा माणुसकी वर विश्वास ठेवावा लागतो.
1 Dec 2019 - 12:10 am | जॉनविक्क
_/\_