DIY माइक्रोवेव अवन पॅनेल बटण दुरुस्ती

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
30 Jul 2018 - 5:11 pm

************************

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

************************
DIY - माइक्रोवेव अवन पॅनेल बटण दुरुस्ती

माइक्रोवेव अवन वापरणे आता चैन न राहता गरजेची वस्तू झाली आहे. जेवणाचे पदार्थ अगोदर थोडेफार अथवा पूर्ण नेहमीच्या गॅसवर शिजवून ठेवलेले असतात ते नंतर गरम करण्यासाठी या अवनचा फार उपयोग होतो. पदार्थाची चव न बदलता चटकन गरम करून घेता येतो. गार झालेला चहा गरम करताना तो रापत नाही.
अवनच्या दरवाजाच्या बाजुलाच एक मेन्यु पॅनेल असते त्यात पावर लेवल/ टाइमर/स्टार्ट/स्टॅाप इत्यादि बटन्स असतात. पदार्थ आत ठेवून, दार लावून हवे ते हीटर सेटिंग/टाइमर लावून आपण स्टार्टचे बटण दाबल्यावर अवनच्या आता दिवा पेटून तबकडी फिरते आणि ठराविक दिलेल्या वेळानंतर थांबते. पदार्थ गरम झालेला असतो.
ही ठराविक बटणे वारंवार वापरली जातात आणि दाबल्यावर काम करेनाशी होतात. ती दुरुस्त करण्याचा काही तात्पुरता उपाय आहे का पाहू. कंपनीचा/इतर खासगी मिकॅनिक बोलावल्यास तो ते संपूर्ण पॅनेलच नवीन टाकतो. याचा खर्च पंधराशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हे पॅनेल आपणही स्वत: DIY ( DO IT YOURSELF ) करू शकतो. त्यासाठीचे हिंदी, इंग्रजी व्हिडिओ युट्युबवर आहेत ते पाहून करता येईल.
समजा एखाददुसरे बटण चालत नाही, कितीही वेळा दाबले की चुकून एकदाच लागते ते कसे दुरुस्त करायचे ते पाहू.

१) स्टार्ट बटण काम करत नाही परंतू इतर काही बटणे काम करतात
अवनचा दरवाजा लागल्याशिवाय (उघडा असताना) स्टार्ट बटण दाबून अवन चालू होऊ नये अशी व्यवस्था असते. त्यामुळे दरवाजा व्यवस्थित दाबून पुन्हा चालू करून पाहा.
२) दुसरे कोणतेतरी बटण चालू होत नाही
कृती -
* प्रथम अवनचा मेन्स प्लग काढून घ्या. फक्त मेन्स बटण ओफ करू नका तर प्लगही काढा.

* एक चाकू पॅनेलच्या प्लास्टिक कडेत घालून ती कड थोडीशी उचकटा. खाली मागच्या बाजूस एखादी कनेक्टिंग पट्टी दिसल्यास जरा सावकाश पट्टी न तोडता हळूहळू ओढून घ्या. इथे पॅनेलच्या डाविकडच्या बाजूस पट्टी नसून उजव्या कडेस दिसते आहे. आपल्याला बटणाचे पॅनेल पूर्णतः उचकटून काढायचे नसून फक्त काम न करणाऱ्या बटणापर्यंत जाता येईल इतकेच वर करायचे आहे. ते चिकटवलेले असते, पुन्हा दाबले की आहे त्या जागी घट्ट बसते.

आता आतल्या बटण कनेक्टर्सची रचना दिसू लागेल. अवनसाइडच्या भागात असलेल्या जाळीच्या पट्ट्यांशी पॅनेल-बटणाच्या पट्ट्या टेकल्या की इलेक्ट्रिक संपर्क तयार होतो त्यात काही अडचण निर्माण झाली आहे. तिथे धूळ साठते, चिकट होते इत्यादि. दोन्हीकडचा भाग पुसून घ्या. एक अॅलुमिनिअमच्या फॅाइलचा तुकडा त्यावर बसून थोडा डावी-उजवीकडे उरेल एवढा तिथे ठेवा.

फोटो १

फोटो २

फोटो ३

फोटो ४

बाजुच्या बाहेर आलेल्या भागांवर सेलोटेप चिकटवा. मध्यभागी नाही. अवनसाइडच्या कनेक्टरवर फक्त पट्टी लावली तरी चालतेे. झाले काम.
प्लास्टिक बटण पॅनेल परत चिकटवा, कनेक्टिंग पट्टीला थोडे आत सरकवावे लागेल.

____________________________________

टिव्हि रिमोट वगैरेचे एखादे बटण दुरुस्त करणे

रिमोटची बटणे सतत वापरून चालेनाशी होतात. दोनचार खराब झाली तर त्याच कंपनीचा साधारण अडिचशे तिनशे रुपयांस मिळतो. एखादा दुरुस्तीचा प्रयत्न करावासा वाटल्यास -
१) रिमोटचे दोन भाग एकमेकावर प्रेस करून प्ला्स्टिक लॅाकिंग केलेले असतात. ते लावायला सोपे असले तरी उघडण्यासाठी चाकूने रेघेवर दाबून उचकटावे लागतात.
२) आपल्याकडे वाया गेलेले कॅलक्युलेटर्स किंवा लँडलाइन फोन्स अथवा इतर जुने इलेक्ट्रानिकस वस्तुमधून हे असे फोटोत दिसणारे बटणाचे पॅनेल काढून ठेवावे. ते वापरायचे आहे.

३) रेझर ब्लेड वापरून न चालणाऱ्या बटणाची काळी ग्राफाइटची चकती कापून काढा. स्पेअर पॅनेलमधली अशीच एक चकती काढून इथे चिकटवली ( स्टिकफास्ट चालते, फेविकोल नाही.) की बटण चालू होईल.

फोटो ५

फोटो ६

फोटो ७

४) याच पद्धतीने सिंथेसाइजरचे न वाजणारे स्वर दुरुस्त होतात. ( त्यालाच नवीन स्वर टाकला म्हणतात!)
************************

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

************************

प्रतिक्रिया

हा लेख आवडल्यास श्रीगणेश लेखमाला यासाठी दुसरा वेगळा लेख पाठवेन. अपेक्षित DIY - नवनिर्मिती नाही, फक्त टाकाऊ वस्तुंचा वापर, दुरुस्ती आणि थोडा विरंगुळा आहे.

पैलवान's picture

31 Jul 2018 - 11:49 pm | पैलवान

आपल्या DIY संकल्पनेला परफेक्ट शोभेल असा लेख.

मार्मिक गोडसे's picture

30 Jul 2018 - 7:27 pm | मार्मिक गोडसे

रिमोटचे खराब ग्राफाइट खाचेत असल्याने ब्लेडने कापताना मागून दाबल्यास ते खाचेतून बाहेर येते व संपूर्णपणे काढता येते, त्यामुळे दुसरे ग्राफाइट त्यावर लावल्यास त्याची जाडी पूर्वीइतकीच राहते. जाडी जास्त झाल्यास रिमोटचे बटन कायम चिकटून राहिल्यास तेच फंक्शन चालू राहते. जाडी कमी झाली तर चालू शकते. माझ्याकडून अशी चूक झाली होती.

पूर्वी दोन्ही टिकल्यांवर पेन्सिल घासल्यासही बटण थोडे दिवस चालते. किंवा ग्राफाइट ग्रीसही चालते. कापून टिकली चिकटवणेच जरा बरे.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2018 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे

मी कार्बन पेपर ने काळ्या गुन्ड्या पुसल्या.

कपिलमुनी's picture

30 Jul 2018 - 7:32 pm | कपिलमुनी

नित्योपयोगी वस्तूच्या रीपेयरीचा चांगला धागा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2018 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! गृहोपयोगी डीवायआय दुरुस्ती तंत्रज्ञानाचा धागा ! मस्तं.

स्नेहांकिता's picture

31 Jul 2018 - 2:54 pm | स्नेहांकिता

या पद्धतीने इंडक्शन शेगडीची बटणे दुरुस्त होतील का ?
त्याचे पॅनल कसे उघडायउघद?

स्नेहांकिता's picture

31 Jul 2018 - 2:55 pm | स्नेहांकिता

त्याचे पॅनल कसे उघडायचे ?

कंजूस's picture

31 Jul 2018 - 3:20 pm | कंजूस

इंडक्शन शेगडीला असेच प्रेसटाइप बटण असतील तर ती एकाच ठिकाणी असल्यास तो प्लास्टिक पेपर काढता येणारा असणारच. जरा निरखून पाहा कुठे बारीक कड आहे का.

स्नेहांकिता's picture

31 Jul 2018 - 3:59 pm | स्नेहांकिता

ओके आणि धन्स कंकाका :)

प्रचेतस's picture

31 Jul 2018 - 6:42 pm | प्रचेतस

उत्तम लिहिताय.
छोटेखानी पण उपयुक्त.

स्वधर्म's picture

1 Aug 2018 - 1:46 pm | स्वधर्म

असेच अजून लिहा.

कंजूस भाऊ , टाकाऊ तुन स्वर्ग निर्मिती याला म्हणतात , जबरदस्त आयडिया आहेत .
पण त्यामुळे कम्पन्या चा सेल कमी झाल्यामुळे gdp घसरले ना ?

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2018 - 11:27 am | प्रकाश घाटपांडे

आत्ताच प्रेरणा घेउन टी व्ही चा रिमोट दुरुस्त केला.

रंगीला रतन's picture

3 Aug 2018 - 11:47 am | रंगीला रतन

भारी आयडिया!

झेन's picture

5 Aug 2018 - 1:16 pm | झेन

मस्त धागा आयडीयेची कल्पना भारीय. रीमोट वगैरे ठीक आहे, पण इलेक्ट्रॉनिक्सच्या अगाध अज्ञानामुळे इंडक्शन, मावेच्या वाटेला जायला लै भ्या वाटंत.

>>इंडक्शन, मावेच्या वाटेला जायला लै भ्या वाटंत.>>

काही धोका नाही पुढचे पॅनेल काढण्यात ही पहिली गोष्ट. आपण मागचे कवर काढून काही कत नाही आहोत. पॅनेलवरची बटणं चालत नाहीत तर ते पूर्ण नवीन टाकून घेण्याची तयारी असतेच. या दुरुस्तीने काही धोकादायक होणार नाही, तिथे हाइ व्होल्टेज सर्किट नसतेच. बिनधास्त उघडा. फक्त त्यास जोडलेली रिबन कनेक्टर पट्टी कापू नका नाहीतर सर्वच बटणे बंद होतील. थोडेसे कामापुरतेच प्लास्टिक पॅनेल वर धरायचे.

झेन's picture

5 Aug 2018 - 10:01 pm | झेन

सध्या दोघेही बरे आहेत, पूर्वी एक मावे कॉईल गेल्यामुळे गळपाटला. दुरुस्तीचा खर्च जास्त आणि कसलीही गॅरेन्टी नाही त्यामुळे दुरुस्तीला केली नाही. ईलेक्ट्रोनिक वस्तू खराब झाल्यावर पैशाचे नुकसान असतेच पण ईकचरा केल्याचा गिल्टपण वाटतो म्हणून शक्यतो जेवढे जमेल तेवढे DIY आवडते, नेहमी जमतेच असे नाही.