प्रथमच पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका नंतर पाकिस्तान मधे एक नवे सरकार येत आहे.
इम्रान खान या सरकारचे प्रमुख असणार आहेत.
लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारचे भारत स्वागतच करेल. पण हे सरकार खरोखर लोकशाही मार्गाने आले आहे की लश्करशाही मार्गाने हे काळच ठरवेल.
पण इम्रानखान यांच्या धरसोड विचारांचे सरकार ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.
एकीकडे मुल्ला मौलवींना पाठिंबा , अतीरेकी गटांची उघडौघड पाठराखण त्याचवेळेस लष्कराचे वर्चस्व यातून इम्रानखान यांना जनतेचे प्रश्न सोडवायला कधी वेळ मिळणार आहे ते तेच जाणोत.
, परकीय कर्जे ,बेकारी , धार्मीक गटांचे वाढते प्राबल्य, आर्थीक तंगी, वाढती महागाई , उद्योग धंद्याना अयोग्य वातावरण, घटती निर्यात , अनुत्पादक शेती, वाढता चलन फुगवटा, संपत चाललेले परकीय चलन . शिक्षणात पीछेहाट पाकिस्तान एका नव्हे तर अनेक ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. कधी कोणता फुटेल हे सांगता येत नाही.
बलोचिस्तान, सिंध थेट वेगळे व्हावे म्हणून अधीर आहेत.
ओ आर ओ बी अंतर्गत जनतेचा विरोध धुडकावत चीनशी चुंबाचुंबी चाललेली आहे. अमेरीकेशी लपाछपीचे संबंध.
भारताबरोबरच इराण आणि अफगाणीस्थान सोबत बिघडलेले संबंध, या सगळ्यावर नुसती मात करुन नाही तर या सगळ्याला पुरून उरेल अचे नेतृत्व इम्रानखन यांना दाखवावे लागेल. तरच पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून उभे राहील. अन्यथा पकिस्तानचा " रीपब्लीक ऑफ सेम्ट्रल आफ्रीका " व्हायला वेळ लागणार नाही.
जनतेचा पाठिंबा नसलेले कणाहीन सरकार या अवस्थेतून पाकिस्तान कधी सावरणार हा मोठा प्रश्न आहे.
अंतर्गत अस्थिरतेवर पाकिस्तान ने आजवर भारताचा बागुलबुवा दाखवून युध्द जन्य परिस्थिती दाखवून जनतेचे लक्ष्य दुसरीकडे वेधणे इतकेच उपाय प्रत्येक पाकिस्तानी सरकार ने केले आहेत. त्याचा त्रास भारतालाच झालेला आहे.
स्थिर पाकिस्तान ही पाकिस्तानपेक्षाही भारताची गरज आहे.
पाहुया इम्रानखान सरकार काही वेगळे करुन दाखवताहेत का?
नवे पाकिस्तान सरकार
गाभा:
प्रतिक्रिया
27 Jul 2018 - 11:24 am | माहितगार
कला क्रिडा क्षेत्रातील लोक काही प्रमाणात लोकशाही राजकारणात आलेच पाहीजेत. सांमतशाही आणि घराणेशाहीला मात देणे त्यांना जरासे सोपे असते. पण त्यांच्यातून समस्यांच्या मूळाशी जाऊन समस्या सोडवू शकेल असे व्हिजन असलेले वैचारीक नेतृत्व पुढे येण्याच्या शक्यता म्हणाव्या तेवढ्या दिसत नाहीत. आणि तीच अडचण इम्रानखानचीही आहे. लिडरशीप क्वालिटी बद्दल शंका नसते स्टेटमनशीप बद्दलची प्रश्नचिन्हे शिल्लक असतात.
28 Jul 2018 - 8:25 pm | ट्रम्प
पण एव्हढं मात्र नक्की पाकिस्तान मध्ये करण जोहर पंथी लोकांना चांगले दिवस येणार , कारण " इम्रान व वसीम दोघेही 3पंथी लोकांचा लाभ घ्यायचे " अस इम्रान च्या ऐका माजी बायकोचे स्टेटमेन्ट आहे . पाकिस्तानी जनतेचे काही खरं नाही बुवा , इम्रान ने गावोगावी 3पंथी धर्मशाळा उघडल्या नाही म्हणजी मिळवली . इम्रान ने बाजी मारली म्हणून थरूर ला आनंद का झाला होता ते आता समजलं .