आज लोकसभेतआणि राज्यसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव मांडला आहे.
लोकसभा निवडणुका एका वर्षानी होणार असताना हा अविश्वास ठराव कशासाठी आणला गेला आहे या बद्दल सर्वसामान्य जनतेला संभ्रम आहे.
या ठरावाचे कारण नक्की काय हे कोणताच पक्ष थेट सांगत नाही.
सत्ताधारी पक्षाला बहुमत असतानाही विरोधी पक्ष कोणत्या बळावर हा ठराव मांडणार आहेत हे समलेले नाही.
शिवसेना काय करणार आहे हे ते तरी सांगू शकतात का हा प्रश्नच आहे
उद्या समजा अविश्वास ठराव पास झाला. ( समजा ....) तर विरोधी पक्ष होणार्या मध्यावधी निवडणूकीत कोणता मुद्दा मांडणार आहेत.
आणि त्या निवडणूकीतही मोदी सरकार पुन्हा निवडले गेले तर त्या मध्यावधी निवडणुकीच्या खर्चाला तसेच मधल्या काळात रेंगळून अधीक खर्चीक बनलेल्या योजनांचा खर्च याला कोण जबाबदार असेल.
विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नसतानाही हा प्रस्ताव आणायचे प्रयोजन समजत नाही.
कदाचित काँग्रेसला राहूल गांधीना प्रोजेक्ट करायचे असेल पण त्यासाठी लोकसभेबाहेरही प्रयत्न करता आले असते.
मिपावरची तज्ञ मंडळी थोडे मार्गदर्शन करतील तर बरे होइल.
प्रतिक्रिया
20 Jul 2018 - 4:44 pm | सिद्धार्थ ४
& कलिंटन भाऊ
22 Jul 2018 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिंटनसेठ, सध्या बीजेपीच्या आणि सरकारने न केलेल्या कामाच्या प्रचारात (फेबूवर) आहेत. (सूत्र) ;)
-दिलीप बिरुटे
24 Jul 2018 - 4:25 am | वीणा३
क्लिंटन भाऊंचा फेसबुक आयडी काय आहे ते सांगाल का प्लिज, मला त्यांची राजकारणावरची आर्टिकल्स आवडायची. खूप माहिती पण असायची. आता अजिबातच लिहीत नाहीत मिपा वर :(
26 Jul 2018 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिंटनभाऊचा फेबू आयडी मला माहिती आहे, पण त्यांना न विचारता त्यांचा आयडी सांगणे योग्य नव्हे, तेव्हा समजून घ्याल अशी अपेक्षा. धन्यवाद.
>>> आता अजिबातच लिहीत नाहीत मिपा वर :(
असं काही नाही, मिपावर प्रेम असणारे मिपावर लिहायला नक्की येतात.
-दिलीप बिरुटे
20 Jul 2018 - 4:54 pm | ट्रम्प
किती वेळा युवराज ला प्रोजेक्ट करणार ? युवराज ला प्रोजेक्ट करणे वैगरे काही नाही , हा ठराव फक्त त्या टी डी पी चा किडा आहे. आंध्रा चे दोन तुकडे झाल्यानंतर तेलंगणा चे मुख्यमंत्री नीं धडाक्यात काम करायला सुरुवात केली आहे आणि उर्वरित आंध्र च्या चंद्राबाबू नायडू ला केंद्रा कडून पॅकेज ,खास राज्य दर्जा पाहिजे होते जे भाजप ने दिले नाही . म्हणून सूड उगवण्यासाठी त्यांनी अविश्वास ठराव आणला आहे पण यात नेहमी प्रमाणे विरोधकांची एकी नाही
20 Jul 2018 - 5:30 pm | विजुभाऊ
हुकमी एक्का वाया गेला.......
20 Jul 2018 - 6:06 pm | ट्रम्प
एक्का ? का छ!!!!!! ?
20 Jul 2018 - 11:20 pm | वामन देशमुख
३२५/१२६
हर हर मोदी फिर से मोदी!
20 Jul 2018 - 11:45 pm | शाम भागवत
अविश्वास ठराव आहे हो.
१२६/३२५
21 Jul 2018 - 12:31 am | मार्मिक गोडसे
राहूल गांधींनी प्रधान मोदींना मिठी मारण्याचे केलेले नाटक आणि त्यावर पंतप्रधानांनी केलेले भाष्य अनावश्यक वाटले. संसदेतील मिळमिळीत सामना बघायला मिळाला.
21 Jul 2018 - 2:19 am | गामा पैलवान
विजुभाऊ,
मलाही हेच कारण वाटतं. पण पप्पूस लोकसभेबाहेर नावाजायचा झाला तर त्यासाठी मेहनत लागते. आतमध्ये आयती संधी मिळून जाते.
आ.न.,
-गा.पै.
21 Jul 2018 - 5:50 am | कंजूस
>>>कंजूस — 19 Jul 2018 - 16:21
विसेक भाजप खासदार नाराज आहेत ते फुली मारतील हा विश्वास आहे.( विरोधकांतले चाळीसेक तिकडे जाणार नाहीत हा पण विश्वास आहे.)>>खफवरून
आम्ही कायकाय केलं हे सर्व योग्य ठिकाणी सांगायची संधी विरोधी पक्श अशा रितीने देणार हे माहिती असतं तर पेपरांत पानभर जाहिराती देण्याचा खर्च वाचला नसता का?
21 Jul 2018 - 9:53 am | मार्मिक गोडसे
गृहमंत्री जेव्हा लोकशाहीचे इतिहासातील दाखले देत होते तेव्हा त्याला समर्थन देताना लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा tv च्या ' सुराज्य संहिता ' ह्या कार्यक्रमाची जाहिरात केली. लोकसभेत अशी जाहिरात करता येते का? ह्या कार्यक्रमाची संकल्पना सुमित्रा महाजन ह्यांची आहे.
21 Jul 2018 - 10:24 am | प्रसाद_१९८२
काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मिठी मारुन परत आपल्या जागेवर जाऊन डोळ्यांची जी उघडझाप केली त्यावरुन राहुल गांधी यांचे राजकारण किती पोरकट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
राहुल गांधी यांनी केलेल्या कालच्या भाषणात त्यांनी स्वत:चा उल्लेख "पप्पू" असा केला हे एक बरे झाले. किमान आता तरी राहुल गांधी यांना इतरांनी "पप्पू" असे म्हटल्यावर कॉंग्रेसी भाटांना निदान राग तरी यायचा नाही.
21 Jul 2018 - 6:37 pm | झेन
फ्रान्सच्या सरकारला सुध्दा उतरावे लागले. हे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांना सुद्धा डोळा मारल्यासारखे वाटले. आपल्या देशात काहीही शक्य आहे उद्या असे पंतप्रधान देशाला लाभलेतर ....
21 Jul 2018 - 9:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
सगळ्या नाटकात का तमाशात फ्रान्सच्या सरकारला सुध्दा उतरावे लागले.
फ्रान्सच्या अध्यक्ष्यांच्या नावे खोट्या विधानांचा दावा भर संसदेत केला गेल्यावर (संसदेत केलेल्या वक्तव्यांची तथ्य म्हणून कायम नोंद राहते) फ्रान्सची अशी प्रतिक्रिया अपेक्षितच होती.
स्वतः खोटे दावे तर करायचेच आणि त्याहीपुढे जावून एका महत्वाच्या मित्रराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याच्या नावाने खोटे दावे करणे... तेही संसदिय कामकाजात !!! आता यापुढे अजून किती खालच्या पायरीवर राजकारण जाणार आहे, त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. :(
लोकसभेबाहेर केलेल्या दाव्यांमुळे राहूल गांधींवर आधीच न्यायालयात खटले चालू आहेतच. पण, लोकसभेतील खोट्या दाव्यांसाठी न्यायालयात खटला दाखल करता येत नाही, याचा फायदा घेऊन, भारतभर प्रक्षेपण होणार्या लोकसभा अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस काही खोटेनाटे आरोप करून राजकिय खळबळ निर्माण करून काही फायदा होतो का ते पाहू, असा विचार कॉग्रेसच्या विचार गटाने (think tank) केलेला दिसतो. मात्र, ते करताना, सगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून, राहूल गांधींनी, संसदेचा हक्कभंग केल्याचा ठराव स्वतःवर ओढवून घेतला आहे.
एकंदरीत आता रागांचे 'खोटे आरोप करणे' आणि तसे केल्यामुळे 'लोकसभेची दिशाभूल केल्याबद्दल मागावी लागणारी माफी', या दोन्हीही गोष्टी त्यांच्यावरील चर्चेसकट संसदेच्या कामकाजाच्या नोंदीत कायमस्वरूपी साठवल्या जाणार आहेत, हे नक्की. खुद्द स्वतः काँग्रेसने पुरवलेल्या या "सिद्ध झालेल्या संसदेतल्या मोठ्या खोटेपणाच्या" दारूगोळ्याचा भाजपला (व इतर काँग्रेसविरोधकांनाही) केवळ २०१९च्या निवडणूकीतच नव्हे तर नंतरची अनेक वर्षे इतर गोष्टीतही उपयोग झाला तर आश्चर्य नाही !
21 Jul 2018 - 8:00 pm | प्रसाद_१९८२
टिव्हीवर कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना व पुरोगाम्यांना कालच्या राहुल गांधींच्या भाषणाला अभ्यासू वगैरे म्हणताना पाहून त्यांची खरोखर किव येत होती. चाटायची ! पण किती त्याला काहि प्रमाण! त्यांच्या भाषणातला एकही मुद्दा तथ्याला धरुन नव्हता. नंतर रक्षा मंत्री व स्वत: पंतप्रधान यांनी राहुलच्या भाषणाची पिसे काढली त्यावेळी दोन्ही मायलेकांचा चेहरा पाहाण्यासारखा झालेला.
21 Jul 2018 - 8:38 pm | ट्रेड मार्क
राहुल गांधींच्या भाषणात एकही मुद्दा ठोस नव्हता एवढेच नव्हे तर कुठल्याही मुद्द्याचा पुरावा सुद्धा सादर केला नाही. राफेल विमानांबद्दल जो आरोप केला त्याचा फ्रान्सच्या अध्यक्षांनी परस्पर निकाल लावला. एवढेच नव्हे तर गुप्ततेची अट २००८ साली, म्हणजेच काँग्रेसच्या काळात, घालण्यात आली असल्याचं सांगितलं.
राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की मोदी, शहा, भाजपवाले आणि आरएसएस वाले राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा दुस्वास करतात पण राहुल आणि काँग्रेस मात्र मोदी, शहा आणि आरएसएसचा दुस्वास करत नाहीत असं म्हणून मोदींना मिठी मारून आले. पण नुसतं बोलून काय होणार? गेल्या १६ वर्षांतील कृती काय आहे ते तर बघा. मोदींना व्हिसा देऊ नका म्हणून इतर देशांना पत्र पाठवणे हे प्रेम आहे का एक दशक खोट्या आरोपांखाली छळणे हे प्रेम आहे का अगदी पंतप्रधान झाल्यावर मौत का सौदागर, नीच आदमी म्हणणे हे प्रेम दाखवणे आहे?
या उलट मोदींनी सूडभावना ठेऊन काँग्रेस वा गांधी परिवाराला काही केल्याचा पुरावा आहे का? भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते पण कोर्टाकडे रुजू करण्यात आले आहेत.
सभापती सुमित्रा महाजन यांनी सुद्धा राहुलच्या या कृती बद्दल नाराजी बोलून दाखवली.
राहुल फक्त मिठी मारून थांबले नाहीत तर स्वतःच्या जागेवर आल्यावर ज्योतिरादित्य शिंदेंकडे बघून डोळा मारला. आणि त्यांचे समर्थक मात्र राहुल गांधी किती परिपक्व झाले म्हणून उड्या मारत आहेत. चुकून माकून जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर खरंच अवघड आहे.
21 Jul 2018 - 8:49 pm | ट्रेड मार्क
१२६ विरुद्ध ३२५ मतांनी अविश्वास ठराव फेटाळला गेल्यावर संसदेतील मतदान यंत्रात गडबड आहे अशी आरडाओरड कोणी केली नाही. किंवा राहुल गांधींनी मिठी मारल्यामुळे हा नैतिक विजय झाला म्हणूनही अजून कोणी काही म्हणलं नाही!
21 Jul 2018 - 9:18 pm | नाखु
आरती
या सगळ्यात शरद पवारांना कुणीही बोलू दिले नाही का त्यांचीच बोलती बंद झाली आहे ते कळेना
नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला
21 Jul 2018 - 10:13 pm | मार्मिक गोडसे
शरद पवार राज्यसभेचे सभासद आहेत.
21 Jul 2018 - 11:09 pm | नाखु
कुणीच लोकसभेत नाही का?
21 Jul 2018 - 11:14 pm | मार्मिक गोडसे
राष्ट्रवादीचे खासदार तारीक अन्वर बोलले की काल.
21 Jul 2018 - 11:27 pm | मार्मिक गोडसे
तारीक अन्वर ह्यांचे भाषण,
https://youtu.be/tfzmmYJWEgk
21 Jul 2018 - 10:17 pm | Ram ram
ठाकरे बंधु काय म्हणतात आता यावर? मी भाजपचा पुरस्कर्ता आहे.
21 Jul 2018 - 10:30 pm | इरसाल
मला असं वाट्टं की ठाकरेंनी नरो वा कुंजरोवा चा प्रयत्न करुन पाहिला.
21 Jul 2018 - 11:37 pm | सोमनाथ खांदवे
काही नाही हो !!! शतप्रतिशत भाजपा करण्याचे शहांचे स्वप्न ठाकरे बंधू ची झोप उडवतयं , म्हणून उठसूठ भाजप मोदींचे पाय ओढण्याचे काम दोन्ही बंधू करत आहेत .
खरं म्हणजे भाजप ने प्रत्येक राज्यातील स्थानिक भागीदारा बरोबर ' राज्यात तुम्ही अन केंद्रात आम्ही ' अशी बोलणी करून केंद्रात पकड मजबूत केली पाहिजे .
पण भाजप च्या धुरीण नेते ग्रामपंचायत, जिल्हापरिषद मध्ये सुद्धा सेनेच्या विरोधात उमेदवार उभे करतात तर ते राज्यातील सत्ता सेनेला कधी देणार ?
22 Jul 2018 - 1:00 am | साहना
नेसूचे काढून डोक्याला बांधून तर प्रसिद्धी मिळते का हे पाहायचा हा काँग्रेसचा प्रयत्न होता असे वाटते. भाजपने ७२% मतांनी लोकसभेंत बहुमत सिद्ध केले.
राहुल गांधी ह्यांची मला आता किंवा यायला लागलीय. ह्या व्यक्तीचे हृदय राजकारणात नाही. कपिल सिब्बल, सिंघवी इत्यादी मंडळी बकरीला जबरदस्तीने गवत चारतात त्याप्रमाणे त्याला आपला अजेन्डा चारतात आणि स्वतःची अशी विशेष अक्कल नसल्याने हे मेंढरू ते खाऊन लठ्ठ होत चालले आहे.
राहुल गांधीं शाळकरी पोरटा असला तर त्या तुलनेत मोदी म्हणजे उसेन बोल्ट आहेत. त्यांच्या जिभेवर सरस्वतीने थयाथया डान्स केला आणि अनेक वायरल विडिओ निर्माण झाले. गांधी ह्यांची झप्पी म्हणजे विनोद झाला. मोदी ह्यांनी आपले भाषण ९ रात्रौ प्रायम टायम ला टाईम केले. म्हणजे सुमित्रा महाजन ह्यांनी त्याच प्रमाणे इतर मांडेन बोलायला वेळ दिला. ह्यावरून मोदी प्रचारयंत्रणेत किती माहीर आहेत ह्याची प्रचित येते.
22 Jul 2018 - 12:44 pm | गामा पैलवान
साहना,
प्रस्तुत तमाशा मोदींना अडचणीत आणण्यासाठी नव्हताच. विरोधी पक्षांचं नेतृत्व पप्पूच्या हाती यावं म्हणून ही धडपड होती. काँग्रेसेतर विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. मोदींना अपशकून होत नाहीये ना, मग विरोधी पक्षांना करूया अशी सोनियांची खेळी आहे.
अधिक माहिती : http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_21.html
आ.न.,
-गा.पै.
22 Jul 2018 - 7:55 am | ट्रम्प
भाजप को कोई तो बताओ लोकल पार्टी वाहां की डॉन होती है उनसे पंगा नही लेने का ,जो भी भाईगिरी करनी है वो दिल्ली में करने का !
22 Jul 2018 - 11:50 am | Ram ram
टरंपजी फाटायली का लोक्कल लोकांची?
22 Jul 2018 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झप्पीच्या वेळी आदरणीय फेकूसेठ इतके टरकलेले दिसले की जसं काही कोणी यांची कायमची खुर्ची खेचून नेणार आहेत की काय अशी भांबावलेली अवस्था दिसली. हहपुवा झाली. =))
लोकसभेत विरोधी पक्ष आहे, तो आकडेवारीवरुन दिसला आहे आणि ते सध्याच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात, महागाई विरोधात बोलतात हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे.
बाकी, आता पीएम की प्रतिमा वगैरे विनोदाचा विषय झाला आहे. नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो. =))
पहिलीतल्या मुलाला कळेल की लोकसभेत अविश्वास ठराव फेटाळल्या जाणारच होता त्यात काही आश्चर्य नव्हतं, पण किती पक्ष या फेकू नावाच्या व्यवस्थेला विरोध करतात हेही तितकेच महत्वाचं होतं.
पंतप्रधान आणि त्यांच्या सरकाराकडून लोकांची फसवणूक झाली आहे, अपेक्षा मोठ्या निर्माण केल्या आणि त्या पूर्ण करतांना त्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे, हे सत्य बदलू शकत नाही.
बाकी चालू द्या...!
-दिलीप बिरुटे
22 Jul 2018 - 10:19 pm | झेन
बाकी
नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो. =))
खरंच चालू द्या
23 Jul 2018 - 5:01 am | सोन्या बागलाणकर
वाह ! काय सॉलिड प्रूफ दिला आहे... Google म्हणजे जणू काळ्या दगडावरची रेषाच , नाही का?
तसं तर पप्पू गूगलल तर कोणाचं नाव पहिलं येत हे पण जरा बघा.
लागल्यास हे पण बघा....
https://www.youtube.com/watch?v=YuOBzWF0Aws
23 Jul 2018 - 6:50 pm | ट्रेड मार्क
तुमचा मोदीविरोध तर जगजाहीर आहे. पण त्या साठी तुम्ही कशाचं समर्थन करताय हे तुम्ही ध्यानात घ्याल अशी आशा होती.
नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो.
गूगल प्रमाण मानायचं तर पप्पू, इटालियन बारबाला, मौनमोहन हे सर्च करून बघा काय येतंय ते. मग हे रिझल्ट्स पण तुम्हाला तितक्याच प्रमाणात मान्य असले पाहिजेत.
पहिलीतल्या मुलाला कळेल की लोकसभेत अविश्वास ठराव फेटाळल्या जाणारच होता त्यात काही आश्चर्य नव्हतं, पण किती पक्ष या फेकू नावाच्या व्यवस्थेला विरोध करतात हेही तितकेच महत्वाचं होतं.
मग ठराव आणण्याचं एखादं योग्य कारण सांगा बघू. पप्पू कसा जाऊन मोदींना मिठी मारतो हे दाखवणे हाच उद्देश होता काय? ठरावाच्या एक दिवस आधी सोनियामातानी "आमच्याकडे अविश्वास ठराव पास करून घ्यायला संख्याबळ नाही असं कोण म्हणतय?" असा प्रश्न विचारला होता. मुळात किती पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला सपोर्ट केला सांगा बघू.
झप्पीच्या वेळी आदरणीय फेकूसेठ इतके टरकलेले दिसले की जसं काही कोणी यांची कायमची खुर्ची खेचून नेणार आहेत की काय अशी भांबावलेली अवस्था दिसली.
मुळात असं एखाद्यापाशी जाऊन उठायला सांगणे हेच अशोभनीय आहे. टरकलेले तुम्हाला वाटले असतील पण मला तरी असं वाटतंय की पप्पूला त्याच्या गोटातून सांगण्यात आलं असावं की तू जवळ गेलास की मोदी उठून उभे राहतील मग तू मिठी मार. पण मोदी तर उभेच राहिले नाहीत, त्यामुळे पप्पूने हातवारे करून उठायला सांगितलं पण तरीही मोदी उठले नाहीत. पण आपल्याला मिठी मारायला सांगितली आहे म्हणून ती मारलीच पाहिजे म्हणून पप्पूने झुकून मिठी मारली. सभागृहात मिठी मारणे आणि नंतर जागेवर जाऊन आपल्या सहकाऱ्याला डोळा मारणे यामध्ये तुम्हाला काहीच वावगे वाटत नाही?
पप्पूने त्याआधी सभागृहात पुरावे नसलेले दावे केले. राफेल खरेदीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना पप्पूचा दावा खोडून काढावा लागला. सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे काँग्रेसच्याच सरकारने २००८ साली गुप्ततेचा करार केला होता आणि काँग्रेसचाच अध्यक्ष असा कुठलाही करार नाहीये असं संसदेत सांगतोय. २००८ साली हा गुप्ततेचा करार काँग्रेसने का केला असेल हे अगदी पहिलीतल्या मुलालाही माहित असेल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पप्पूला कोणाला भेटवण्यात आलं काय माहित!
24 Jul 2018 - 9:03 pm | मार्मिक गोडसे
पंतप्रधान आणि त्यांच्या सरकाराकडून लोकांची फसवणूक झाली आहे, अपेक्षा मोठ्या निर्माण केल्या आणि त्या पूर्ण करतांना त्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे, हे सत्य बदलू शकत नाही.
पंतप्रधान विरोधी पक्ष्याच्या एकाही मुद्याला नीट उत्तर देऊ शकले नाही. सत्तेत येउन चार वर्ष होऊनही स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात का नाही आला ह्यावर पं.प्रधान गप्प.
नोटबंदी नंतर काश्मीर मधील दगडफेक बंद होईल असा दावा सरकार करत होती , मग ती बंद का झाली नाही असा प्रश्न फारूक अब्दुल्ला ह्यांनी विचारला, पंतप्रधान गप्प.
रोजगार निर्मितीचे पंतप्रधानांचे दावे तर अगदी हास्यास्पद होते, काय ते ट्रक, टेम्पो, विक्रीतून रोजगार निर्मिती झाली. जणू काही सरकारनेच ही विक्री केली.
जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान पटकावले हे मोठया गर्वाने पंतप्रधानांनी सांगितले, परंतू सरकारच्या कोणत्या आर्थिक निर्णयामुळे हे साध्य झाले हे पंतप्रधान सांगू शकले नाही.
संसदेत भाषण देण्याची सवय नसल्यामुळे पंतप्रधान संसदेत नव्हे,तर एखाद्या प्रचार सभेत भाषण ठोकत आहेत असं वाटत होतं.
24 Jul 2018 - 10:14 pm | ट्रम्प
गोडसे साहेब ,
भाजप ला केंद्रातील सरकार चालवण्याचा काँग्रेस इतका अनुभव नाही त्यामुळे होत आहेत थोड्याशा चुका , म्हणून काय ती निर्लल्ज भामटी काँग्रेस परत डोक्यावर बसवून घ्यायची ?
मोदींचा नोटबंदी चा उद्देश चांगला होता पण पुढाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करून घेतली आणि जबाबदारी मोदींच्या गळ्यात पडली हे सर्वश्रुत आहे .
" पंतप्रधान आणि त्यांच्या सरकाराकडून लोकांची फसवणूक झाली आहे, अपेक्षा मोठ्या निर्माण केल्या आणि त्या पूर्ण करतांना त्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे, हे सत्य बदलू शकत नाही. " या बाबतीत पूर्णपणे सहमत .
25 Jul 2018 - 12:14 am | मार्मिक गोडसे
भाजप ला केंद्रातील सरकार चालवण्याचा काँग्रेस इतका अनुभव नाही त्यामुळे होत आहेत थोड्याशा चुका , म्हणून काय ती निर्लल्ज भामटी काँग्रेस परत डोक्यावर बसवून घ्यायची ?
भाजपला नव्हे, पंतप्रधानांना म्हणा. नुसता अहंकार भरला आहे, अशीच अहंकारी एक दोन डोकी घेवून देश चालवायला निघालेत पंतप्रधान.
GST बिल योग्य वेळी पास करुन काँग्रेसने धूर्त चाल खेळली हे मागे मी एका प्रतिसादात लिहिले होते. GST चा दर १८% पेक्षा अधिक असू नये अशी काँग्रेसची अट होती, सरकार २८% वर अडून होती, हा दर सरकारला अडचणीत आणू शकेल ह्याची काँग्रेसला खात्री होती. आज तो अंदाज खरा ठरलाय. एकवर्षांपूर्वी २८% करश्रेणीत २२८ वस्तू होत्या , आज ह्या करश्रेणीत फक्त ३५ वस्तू उरल्या आहेत, २-३ महिन्यात त्याही वगळल्या जातील. म्हणजे सगळया वस्तू आणि सेवा ह्या १८% किंवा त्यापेक्षा कमी करश्रेणीत येतील. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आपण कसे बरोबर होतो हा मुद्दा मांडतील तेव्हा पंतप्रधानांची गोची होईल हे नक्की.
25 Jul 2018 - 10:00 am | सुबोध खरे
बिरुटे सरांचा मोदी द्वेष इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असे वाटले नव्हते.
श्री राहुल गांधी त्यांच्या गळ्यात पडेल असे श्री मोदींना वाटलेच नव्हते असे दिसते.
UPA च्या संपूर्ण कारकिर्दीत श्री मोदींच्या मागे सरकारी यंत्रणा हात धुवून लागलेली असताना ते घाबरले नाहीत तर श्री राहुल गांधींच्या अशा भंपक स्टंटला ते घाबरतील असे शेम्बड्या पोरालाही वाटणार नाही.
बाकी चालूच द्या
26 Jul 2018 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> बिरुटे सरांचा मोदी द्वेष इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असे वाटले नव्हते.
ऑ...! हे कुठं वाचायला मिळेल. ;)
सॉरी हं डॉक्टरसाहेब तुमचं फेकूप्रेम विसरुन गेलो होतो.
क्षमस्व. ;)
-दिलीप बिरुटे
(डॉक्टरसाहेबांच्या प्रेमामुळे पोच द्यायला आलेला)
25 Jul 2018 - 9:56 pm | प्रसाद गोडबोले
बाकी, आता पीएम की प्रतिमा वगैरे विनोदाचा विषय झाला आहे. नुसतं गुगलवर फेकू असं सर्च केलं की निकाल समोर येतो. =))
>>>
सहज म्हणुन बिरुटे असे गुगल सर्च करुन पाहिले तर एका माकडाला कडेवर घेतलेल्या एका आज्जीबाईंचे फोटो दिसत आहेत ! कसला योगायोग आहे ! लोल !!
22 Jul 2018 - 1:31 pm | सोमनाथ खांदवे
बरं झालं पप्पू ने लोकसभेत मान्य केलं त्याला पप्पू म्हणतात !!
म्हणजे इथून पुढे गुलामांनीं भक्तांवर केस ठोकायला नकोत . खरी मजा 2019 जशी जवळ येईल तेंव्हा येणार आहे. मायावती आणि ममता यांना आत्ताच पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली आहेत तर सोनिया म्याडम च्या मुलाला लग्ना अगोदर 2019 चा अश्वमेघ जिंकून दाखवायचा आहे .
मॉब लिचिंग प्रकरणे थांबली नाही तर भाजप साठी ते सायलेंट किलर ठरण्याची शक्यता वाटते , कारण असल्या केसेस मूळे भाजप बद्दल नकारात्मकता वाढून एक मोठा प्रवाह विरोधात जाऊ शकतो . बरं त्या मॉब लिचिंग बद्दल मोदी , शहा किंवा इतर कोणीही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही ( व्हाट्स ऍप चा गळा दाबला तेवढं सोडून ).
भाजप ने स्थानिक पक्षा बरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले नाही तो पक्ष भाजप च्या विरोधात लढणार , गोहत्याबंदी मारली गेलेली मुस्लिम व तीन तलाक कायद्या मूळे मुस्लिम समुदाय भाजप च्या विरोधात , दलित लोकांना सुद्धा त्यांचे नेते ( भीमा कोरेगाव सारखे ) काहीतरी खुसपट काढून भाजप च्या विरोधात भडकवत राहणार .
अशा परिस्थितीत भाजप च्या पाठीमागे किती मतदार राहतील हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे .
22 Jul 2018 - 1:34 pm | प्रसाद_१९८२
कॉंग्रेसने स्वत:च्या अब्रुची लक्तरे, स्वत:च वेशीवर टांगलीत. :))
--
22 Jul 2018 - 1:43 pm | गामा पैलवान
लोकहो,
पप्पू मोदींना आलिंगन देतांनाचं हे छोटंसं चलचित्र कृपया पहा : https://www.youtube.com/watch?v=c7mXWuOH5xA
पप्पू मोदींना उठायची खूण करतो आहे. त्यावेळेस मोदींच्या चेहेऱ्यावर नाराजीमिश्रित विस्मय दिसतो आहे. कशासाठी उठायला लावतोस असा काहीसा भाव आहे. सामान्य माणसाच्या इतक्या जवळ कोणी विनाकारण येत असेल तरी शंका उद्भवते. इथे तर देशातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. असो.
मग पप्पू मिठी मारतो. नंतर बाजूला होतो. तो बाजूला झाल्यानंतरही मोदींना कळलं नाहीये की हे काय चाललंय ते. ते 'हे काय' असे पृच्छादर्शक हातवारे उजव्या हाताने करतात. मग त्यांची ट्यूब पेटते आणि हसून पप्पूला परत बोलावून हस्तांदोलन करताकरता काहीतरी सांगतात.
हा सगळा घटनाक्रम ज्यातनं सुरू झाला ती पप्पूची खूण उपरोक्त चलचित्रात नीटशी दिसंत नाही. परंतु ती अतिशय अवमानकारक असावी असं मोदींच्या हावभावावरून वाटतंय. 'चल ऊठ रे चायवाल्या' अशा छापाची अक्कल पप्पूची स्वत:ची वाटंत नाही. कोणीतरी डोक्यात भरवून दिलेली वाटते.
काहीका असेना, मोदींची २०१९ ची निश्चिती होते आहे. धन्यवाद पप्पू!
आ.न.,
-गा.पै.
23 Jul 2018 - 12:47 pm | विजुभाऊ
या अविश्वास ठरावाची काय गरज काय ?
त्याचे कारण काय होते?
यातून काही साधले गेले का?
विरोधी तसेच सत्ताधारी यांना आत्मपरिक्षणाची संधी मिळाली का?
दोन्ही ना आप आणि पर कोण हे समजले का? ( शिवसेनेचे मात्र कारण नसताना उगाचच नेसूचे सुटले )
कोणी नवे मित्र जोडले जुने तोडले?
हा हिषेब कुठेच जुळत नाही
26 Jul 2018 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अविश्वास ठराव पडणारच हे नक्की होतं, मग ठराव कशाला आणला गेला असेल ? तेलगू देसमपार्टीने हा अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्यांना इतर पक्षांनी पाठींबा दिला. विरोधी पक्षांना सरकारच्या विरोधात आपली मतं मांडण्याची संधी होती. सत्ताधारी पक्षाला नागडं करण्याची एक संधी अविश्वास ठरावाच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षाने मिळवली. चार राज्याच्या निवडणूका आता जवळ येत आहेत तेव्हा एकमेकांना जोखण्याचीआणि एकमेकांना चव्हाट्यावर आनण्याची संधी अविश्वास ठरावाने मिळणार होती म्हणून हा अविश्वास ठराव आणल्या गेला असावा, असे वाटते.
तेलगू देसमला आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा न मिळण्याचा राग काढायचा होता. सत्ताधारी पक्षाने सत्तेवर येतांना जी आश्वासनं जनतेला दिली होती ती त्यांनी पूर्ण केलीत का याच्यासाठी विरोधकांना आपलं अस्तित्व दाखवण्याची आणि सरकारवर टीका करण्याची ही संधी होती. विरोधी पक्ष म्हणून आपण कुठे आहोत या भाजपीय वादळात स्वत:ला शोधता येणार होतं आणि म्हणून मा.मोदी हे 'हा देश का चौकीदार नाही'' या मुद्द्यावर राहूल गांधींना बोलण्याची संधी मिळाली. राफ़ेलचा मुद्दा अंगलट आला असला तरीही सत्ताधार्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करीत राहूल गांधींचे मुद्दे काँग्रेसच्या गोटात आत्मविश्वास वाढविणारं होते म्हणून ही संधी त्यांच्या दृष्टीने उत्तम होती. सर्वच विरोधी पक्षांना सरकारच्या चिंध्या करण्यासाठी ही संधीच होती.
भाषणानंतरच्या गळाभेटीनंतर मा.मोदीं क्षणभर गांगारुन गेलेले दिसले, हडबडून गेले होते. मा.मोदींनी उठून गळाभेट घेतली असती तर तो काही मा.मोदींचा कमीपणा ठरला नसता, (उगाच संसदीय उच्चभ्रूपणा पुढे करण्याची गरज नव्हती ) पण त्यांना ते करता आलं नाही. एक खिलाडू वृत्ती दाखवता आली असती पण ते मोदींना जमले नाही, म्हणूनच नंतरच्या प्रचारसभावजा भाषणात मा.मोदींना हे सर्व विसरावं लागलं.
तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ही शिवसेनेची अवस्था आहे, महाराष्ट्रात हाल आहेत आणि केंद्रातही हाल आहेत, उगाच आपली शोभा नको म्हणून त्यांचा निर्णय पटणाराच आहे. आता भाजपाने दिलेली आश्वासनं ते पूर्ण करत नसतील तर ती आम्ही पूर्ण करुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे हे विसरलेल्या सरकाराच्या नाकावर टीच्चून ''चलो आयोध्या'' आंदोलन हाती घ्यावे लागलेले दिसत आहे.
राजकारणात कोणीच कोणाचं कायमचं शत्रू नसतं हे धोरण असल्यामुळे मित्र जोडणे तोडणे याला काही अर्थ असत नाही. आकड्यांचा खेळ, घोडाबाजार आणि सौद्यांचा खेळ, मैत्रीत आणि राजकीय जुमल्यात आपल्या पक्षाला, स्वतःला फायदा किती याचं गणित तिथे असतं म्हणून मैत्री वगैरे सबकुछ झूट असतं.
तूर्तात इतकेच.
-दिलीप बिरुटे
(विजूभौचा अराजकी मित्र)
23 Jul 2018 - 12:51 pm | सोमनाथ खांदवे
काँग्रेस ने कार्यकारिणी च्या बैठकीत 200 जागा निवडून आणायचे टार्गेट ठरवले आहे आणि पंतप्रधानचे उमेदवार म्हणून राहुल गांधी चीं निवड केली . सध्याच्या 44 जागांच्या तिप्पट जागा निवडून आणू शकण्याची खात्री कोर्टातील केस मध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या चिदम्बरम या नेत्याने दिले . चिदंबरम हे आज पर्यंत तामिळनाडू विधानसभा च्या ककाँग्रेस ला सन्मानजनक जागा निवडून आणून देऊ शकले नाही व स्वतः जनतेतून निवड होऊन लोकसभेत जावू न शकल्या मूळे कायम राज्यसभेत चोरदारवाजाने जातात तेच लोकसभे साठी बढाया मारत आहेत .
दिग्विजय आणि जनार्दन द्विवेदी बैठकी कडे फिरकले नाही हे विशेष !!!!
23 Jul 2018 - 4:43 pm | गामा पैलवान
लोकहो,
मिठी मारण्यापूर्वी पप्पूची महान बडबड ऐका : https://youtu.be/KbB6rTKdbGI?t=2m10s
मै काँग्रेस हूं, और ये सब काँग्रेस है. काँग्रेसने और इस भावनाने देशको बनाया है. मै इस भावनाको आप सबके अंदरसे निकाल दूंगा.
अहाहा, लगे राहो पप्पूभाय !
आ.न.,
-गा.पै.
23 Jul 2018 - 8:34 pm | सोमनाथ खांदवे
बलिशपणा चा कहर करतो हा भावी पंतप्रधान ,
कुठल्याही घटने साठी मोदींना जबाबदार कस पकडू शकतो ?
याला त्याची आई , मित्र किंवा इतर बुजुर्ग नेते मंडळी कसे काहीच सांगत नाही ? कस वागावं , कस बोलावं काहीच लिमिट नाही ?
मतिमंद म्हणावे तर त्यांचे कार्यकर्ते आणि मीडिया रागा ला डोक्यावर कसे घेत आहेत ?
त्यादिवशी लोकसभेत मोदींना बळेबळे मिठी मारून प्रेमभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय अस दाखवलं पण पुढच्याच मिनिटाला डोळा मारून ते सगळं नाटक होत असं सिध्द केलं.
पुढची बातमी लोकसत्ता मधील आहे , ट्विट करण्याची त्याला घाई किती असते हे त्यातून सिद्ध होत
एखादी मारहाणीची किंवा जमावाकडून हल्ल्याची घटना घडते तेव्हा आनंद व्यक्त करणे बंद करा असा उपरोधिक सल्लाही पियुष गोयल यांनी दिला. अलवर येथील घटना घडल्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तुमच्या निवडणुकीतील फायद्यासाठी लोकांमध्ये तेढ पसरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नका. अलवर येथे एका तरूणावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला ६ किलोमीटर अंतर घेऊन जायला पोलिसांनी तीन तास लावले.याच घटनेचा उल्लेख करत रागा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांचा क्रूर न्यू इंडिया आहे अशा आशयाचे ट्विट पप्पू यांनी केले.
24 Jul 2018 - 10:24 am | टवाळ कार्टा
महाराष्ट्राची एक अख्खी पीढी राजकारण्यांची मिंधे बनायला अडाण*ट राहिली असे वाटते आहे....आणि वारकरीसुद्धा काही बोलत नाहीत
ब्राम्हणांना शिव्या घालतात पण त्याच्वेळी मराठ्यांनी ओबीसींना, ओबीसींनी महारांना, महार मांगांनी आणि कोणाला तशीच सापत्नतेची वागणूक दिलेली हे "सोयिस्करपणे" विसरतात....चालूदे....अशीच प्रगती राहिली तर लवकरच आपला पाकिस्तान्/बांग्लादेश बनणे दूर नाही
25 Jul 2018 - 1:11 am | गामा पैलवान
मार्मिक गोडसे,
तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.
१.
कारण की सत्तेत आले तेव्हा स्विस बँकेतला काळा पैसा क्यारेबियन बँकांत जाऊन पडला होता. मोदी सत्तेत येत्या क्षणी काय परिस्थिती होती ती इथे बघायला मिळेल :
http://www.lokmat.com/manthan/black-money-and-attitude/
हा पैसा स्विस बँकांतून पसार झालेला असल्याने परत आणता आला नाही. तसा तो आणायची गरजही नाही. २०१४ ते २०१६ पर्यंत मोदींनी काळ्या पैशाच्या स्वर्गभूमींशी नेमके करार केले. नंतर २०१६ च्या अखेरीस नोटाबंदी केली. त्यामुळे हा बेहिशोबी पैसा त्यांच्या मालकांना भारतात आणता येणार नाही. काळ्या पैशाला अटकाव करायला माझ्या मते इतकं पुरेसं आहे.
२.
असा दावा केल्याचं मलातरी आठवंत नाही.
३.
रोजगारनिर्मितीसाठी ट्रकटेंपो विकायची काय गरज? भज्ज्या तळूनही रोजगार निर्माण होतो. माहित नाही वाटतं तुम्हांस? पण तुमची कल्पना एकंदरीत आवडली. अमित शहा उघड्या अंगाने भजी तळायला बसलेत आणि मोदी ऑर्डरी घेऊन पुडे बांधताहेत. मस्त व्यंगचित्र होईल. (बाजूला थारुड्या पप्पूस भजी, फाफडा व जिलबी तळतांना उत्पन्न होणाऱ्या विविध रोजगारांची व्यवच्छेदक लक्षणे समजावून सांगतोय.)
४.
तुम्हीच सांगा शासनाच्या कोणत्या आर्थिक निर्णयाने हे साध्य झालं ते.
५.
मोदींना संसदेत भाषण द्यायची सवय नाही म्हणता? ही त्यांची संसदेतली (मी पूर्णपणे न बघितलेली) काही भाषणे :
इ.स. २०१७ : https://www.youtube.com/watch?v=JJ4puFg29oM
इ.स. २०१६ : https://www.youtube.com/watch?v=rVTrl_8CCQs
इ.स. २०१५ : https://www.youtube.com/watch?v=MF0hhKIe-Tw
इ.स. २०१४ : https://www.youtube.com/watch?v=shK1CAivJis
पप्पूने कधी उघडलंय का तोंड?
आ.न.,
-गा.पै.
25 Jul 2018 - 10:08 am | मार्मिक गोडसे
कारण की सत्तेत आले तेव्हा स्विस बँकेतला काळा पैसा क्यारेबियन बँकांत जाऊन पडला होता
आणि आता स्विस बँकेत भारतीयांच्या ठेवीत जी भरघोस वाढ झाली त्यातला सर्व पैसा हा काळा नाही ह्याचा साक्षात्कार सरकारला झाला, इथल्या बँकांमध्ये आपला कष्टाचा पैसा सुरक्षित राहू शकत नाही ह्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे सरकारने.
असा दावा केल्याचं मलातरी आठवंत नाही.
तुम्हालाच काय पंतप्रधानांनाही आता आठवत नाही, की नोटबंदी नक्की कशासाठी केली होती.
तुम्हीच सांगा शासनाच्या कोणत्या आर्थिक निर्णयाने हे साध्य झालं ते.
२०१४ ला भाजपला बहुमताने निवडून स्थिर सरकार दिल्यामुळे, परदेशी गुंतवणूकदारांनीं आत्मविश्वासाने येथे गुंतवणूक केली व येथील उद्योगपतींनी भाजपला भरघोस पक्षनिधी देऊन सरकारकडून बरंच काही पदरात पाडून आपला विकास साधला आहे. सरकारने कोणताही क्रांतिकारक आर्थिक बदल घडवून आणलेला नाही, तसं असतं तर ढोल बडवले असते की पंतप्रधानांनी.
मोदींना संसदेत भाषण द्यायची सवय नाही म्हणता? ही त्यांची संसदेतली (मी पूर्णपणे न बघितलेली) काही भाषणे :
तुम्ही ही भाषणं संपूर्ण ऐका मग ठरवा.
पप्पूने कधी उघडलंय का तोंड?
मी पप्पू समर्थक नाही, परंतू पप्पूच्या एका कृतीमुळे पंतप्रधान गोंधळले व त्यांच्यातला पप्पू बाहेर आला व त्यांनी संपूर्ण भाषणात दाखवून दिले की आपण पप्पूची मक्तेदारी हिरावून घेऊ शकतो आणि त्यात ते कुठेही कमी पडले नाही.
25 Jul 2018 - 4:22 pm | अनुप ढेरे
याला काय आधार. बात्म्या तर याच्या एकदम विरुद्ध सांगत आहेत.
25 Jul 2018 - 6:03 pm | सोमनाथ खांदवे
ते म्हणजे गेली दोन तीन वर्षे ' कॉफी पिणे आरोग्यास हानिकारक आहे ' तर कधी ' कॉफी हृदया साठी चांगली असते ' असं झालं .
स्विस बॅकं आणि भारतीय सरकार यांचे आकडे कधी टॅली व्हायचे .
25 Jul 2018 - 8:07 pm | मार्मिक गोडसे
याला काय आधार. बात्म्या तर याच्या एकदम विरुद्ध सांगत आहेत.
असेलही तसं.
मागील तीन वर्ष भारतीयांच्या स्विस बँकेतील ठेवी घटल्या होत्या, गेल्यावर्षीपासून त्यात वाढ झाली.
https://www.google.co.in/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/money-d...
26 Jul 2018 - 11:02 am | सुबोध खरे
गोडसे बुवा
क्रेडिट सुईस किंवा यु बी एस (युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड) मध्ये तुम्ही मुदत ठेव ठेवलीत तर तो आपण ज्याला रूढार्थाने "स्विस बँकेत" ठेवतो तसला बेहिशबी पैसा होत नाही.
गेल्या वर्षभरात असा जबाबदार (accountable) पैसे वाढला आहे. बेहिशेबी नाही. हा कोणाकडून आला आणि कसा आला याचा माग ठेवला जाऊ शकतो.
समजून घेता येत असेल तर ठीक आहे नाही तर सोडून द्या.
26 Jul 2018 - 11:24 am | मार्मिक गोडसे
क्रेडिट सुईस किंवा यु बी एस (युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड) मध्ये तुम्ही मुदत ठेव ठेवलीत तर तो आपण ज्याला रूढार्थाने "स्विस बँकेत" ठेवतो तसला बेहिशबी पैसा होत नाही
बरोबर आहे.
25 Jul 2018 - 11:16 am | माहितगार
25 Jul 2018 - 11:16 am | माहितगार
25 Jul 2018 - 6:07 pm | सोमनाथ खांदवे
डबल बटर डबल चार्ज पडल !!
25 Jul 2018 - 3:59 pm | विजुभाऊ
अविश्वास ठराव आला आणि गेला.
मधल्यामधे काँग्रेस ने आपली अक्कल काढून घेतली.
मोदी , राहुलच्या गळाभेटीच्या काव्याला बळी पडले.
जो मुद्दा अगदी किरकोळ होता त्याला अमाप प्रसिद्धी दिली गेली.
अर्थात हे आपल्या अक्कल वंत मिडीयामुळे.
अविश्वासाच्या ठरवाला काडिची किंमत न देता नंतर लगेचच मोदी रवांडा दौर्यावर गेले.
दरम्यान भारताने शेसेल्स मधे सैन्य तळ उभा करण्यासाठी करार केला, श्रीलंकेत चीनच्या बंदरा शेजारचाच एक विमानतळ वापरासाठी करार केला.
या काही किरकोळ आंतरराष्ट्रीय घडामोडी कोणीच छापल्या नाहीत.......
25 Jul 2018 - 4:44 pm | शाम भागवत
फ्रान्स ३२ जग्वार विमाने देणार आहे. तेही फुकटात. हे राहिले की हो.
:)
25 Jul 2018 - 8:11 pm | मार्मिक गोडसे
जो मुद्दा अगदी किरकोळ होता त्याला अमाप प्रसिद्धी दिली गेली.
अर्थात हे आपल्या अक्कल वंत मिडीयामुळे.
मिडियापेक्षा पंतप्रधानच ह्याला जास्त जबाबदार आहेत.
25 Jul 2018 - 5:58 pm | गामा पैलवान
मार्मिक गोडसे,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
इथल्या बँका असुरक्षित असतील तर लोकं इथेच काळा पैसा गुंतवतील ना? परदेशात कशासाठी नेतील? परत आणणं कटकटीचं झालंय.
२.
नोटाबंदीची उद्दिष्टे (इंग्रजी दुवा) : http://www.sify.com/news/10-long-term-goals-of-demonetization-news-colum...
इथे नक्षलवादी व अतिरेक्यांच्या मुसक्या आवळणे हा हेतू दिला आहे, मात्र काश्मीरी दगडफेकीकडे स्पष्ट निर्देश नाही.
३.
अरे वा, म्हणजे तुम्हांस कळावं म्हणून मोदींनी ढोल वाजवले पाहिजेत की काय! मग ढोल कशाला बडवताय म्हणून टीका करायला तुम्ही मोकळे! चांगली युक्ती आहे.
४.
काही गरज नाही. भाषणं न ऐकताच मी ठरवलंय की मोदींना संसदेत भाषणांचा अनुभव व सवय आहे.
५.
व्हेरी गुड.
पीएचडीच्या प्रबंधात पप्पूला स्पेलिंग मिस्टेक सापडली. त्यावरून त्याने आपण प्रबंधकर्त्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला. तो पप्पूच्या बुद्धीप्रमाणे बरोबर आहे. तस्मात चिंता नसावी.
आ.न.,
-गा.पै.
25 Jul 2018 - 8:13 pm | मार्मिक गोडसे
इथल्या बँका असुरक्षित असतील तर लोकं इथेच काळा पैसा गुंतवतील ना? परदेशात कशासाठी नेतील? परत आणणं कटकटीचं झालंय.
तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते कळलं नाही.
25 Jul 2018 - 11:54 pm | गामा पैलवान
मा.गो.,
काळा पैसा परदेशात कशासाठी न्यायचा? तो केव्हाही भारतात परत अंत यावा म्हणून ना? पण तो तसा आणणं जिकिरीचं झालं तर परदेशी नेण्यात काय अर्थ?
आ.न.,
-गा.पै.
26 Jul 2018 - 1:07 am | मार्मिक गोडसे
पण तो तसा आणणं जिकिरीचं झालं तर परदेशी नेण्यात काय अर्थ?
२००७ पासून p-notes सारखी बिळे हळू हळू बंद केली होती. त्यामुळे तेव्हाही परदेशातून काळा पैसा येथे आणणे कठीण झाले होते की.
25 Jul 2018 - 7:53 pm | सुबोध खरे
पीएचडीच्या प्रबंधात पप्पूला स्पेलिंग मिस्टेक सापडली. त्यावरून त्याने आपण प्रबंधकर्त्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला. तो पप्पूच्या बुद्धीप्रमाणे बरोबर आहे. तस्मात चिंता नसावी.
LLRC