लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी तूरडाळ
१ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी
१-२ हिरवे टोमॅटो
१/२ पेंडी (जुडी) पालक
५-६ हिरव्या मिरच्या
३-४ मोठ्या पाकळ्या लसूण
१ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा
साहित्य ब)
५-६ लांब हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
५-६ लसूण पाकळ्या
पेरभर आल्याचा तुकडा
१/२ ते १ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी खोबर्या चे काप
साधारण ४-५ टेबल्स्पून तेल
क्रमवार पाककृती:
साहित्य अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची.
लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे.
भाज्या धुवुन घ्यायच्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करायचे.
कुकरमधे तूरडाळ धुवुन घ्ययची. त्यात भाज्या, लसूण, आले, मिरच्या असे सगळे एकत्र करुन पुरेसे पाणी घालायचे. आणि नेहेमीप्रमाणे सगळे नीट शिजवून घ्यायचे.
कुकरचे प्रेशर उतरले की हे सगळे शिजलेले जिन्नस बारीक करुन घ्यायचे. हँडब्लेंडर/पुरणयंत्र/मिक्सर कशानेही बारीक करू शकता. हे सगळे खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घालायचे. साधारण आळूच्या भाजीसारखी कंसिस्टन्सी असली पाहीजे.
साहित्य ब) मधिल मिरच्यांचे तुकडे करुन घ्यायचे.
आले-लसूण वाटून गोळा करुन घ्यायचा.
एका मोठ्या पातेल्यात तेल तापवायचे. त्यात दाणे आणि खोबर्या्चे काप घालून थोडे गुलबट रंगावर परतून घ्यायचे.
मिरच्यांचे तुकडे आणि आले-लसणाचा गोळा किंचीत त्यावर टाकून परतून घ्यायचे.
आता शिजवून बारीक केलेली भाजी यावर घालायची.
मीठ घालून भाजी बारीक आचेवर उकळायची. दाणे, मिरच्या आणि खोबरे नीट शिजले पाहिजे.
ही अशी गरम गरम भाजी वाफाळत्या भाताबरोबर मस्त लागते. भाकरी, चपाती कशबरोबरही खाण्यास हरकत नाही.
प्रतिक्रिया
10 Jul 2018 - 10:02 am | एस
फोटू नाय तर पाककृती नाय. फोटू पायजेल. =)) =))
10 Jul 2018 - 10:38 am | shital
कसा टाकायचा माहित नाही
10 Jul 2018 - 11:09 am | श्वेता२४
सगळे साहित्य आहे करते आणि फोटू टाकते. बाकी तू काढलेले फोटो संमं ला विंन्नती करून टाकू शकतेस
10 Jul 2018 - 11:15 am | श्वेता२४
तिथे मिपा वर फोटो कसा चढवायचा याची प्रक्रिया दिली आहे मी त्याच पायऱ्या वापरल्या आता जमतंय मलाही
10 Jul 2018 - 1:19 pm | अनन्त अवधुत
आणि नो फुटू !!
बहोत नाइन्साफी है !
दत्त जयंतीचे भंडारे, गणपती विसर्जन, शाळा कॉलेज मधल्या पार्ट्या , यातले काहीही ह्या मिरच्यांच्या भाजी शिवाय कायम अपूर्ण वाटतात.
दिवाळी, एखादा सण- समारंभ यात फार गोड खाणे झाले कि एखाद्या रविवारी हीच भाजी आई अजूनही करते, आणि मग गाडी रुटीन ला लागते.
असो. फोटो ना टाकून इनोचे पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद!
10 Jul 2018 - 2:27 pm | श्वेता२४
10 Jul 2018 - 2:30 pm | श्वेता२४
.