आज वटपोर्णिमेचा दिवस. दिवस भर सत्यवानाची सावित्री व ज्योतिबाची सावित्री या दोन स्त्रीयांची तुलनातमक चर्चा चालू आहे.सोशल मिडीयावर धो धो पोस्टं पडत आहेत.दोन्ही स्त्रीयांची चर्चा होत आहे पण दोघींना परस्परांच्या विरोधात उभं केलं जातं आहे.विज्ञान व धर्म या मध्ये ती लढाई चालू आहे असं वाटते आहे. दोन्ही लोंकामध्ये प्रचंड उत्साह आहे.असं प्रांसगीक लिहण्यात लोंकाना भारी हौस असते. तापला तवा टाका आपल्या भी पोळया.. ही भावना त्यात दिसून येते.
धर्म असो कीं विज्ञान दोन्हीला आपआपल्या मर्यादा आहेत. सावत्रीबाई फुलेनी स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी अनेक रूढी पंरपरावर मात करीत दांभीकते बरोबर लढाईच लढली. ज्ञानाचं भंडार खुलं केल आहे. पूर्णता पुरूषावर अंवलंबून असणारी स्त्री स्वावंलंबी झाली आहे.आता ती कशातच मागे राहीली नाही तरी स्त्री अत्याचार, बलात्कार, लैंगीकशाषण,मानसीक खच्चीकरण या गोषटीतून तीची सुटका नाही. भोगवस्तू.. या प्रतीमेतून अजून ही तिला बाहेर पडता आलं नाही. स्त्री प्रगत झाली आसली तरी भारतीय समाजात म्हत्तवाची विवाह संस्था खीळखीळ झाली आहे.विवाहबाहयं संबध,तकलादू प्रेमपकरण, मोडकळीस आलेली कुटूंब व्यस्था, बलात्कार, घटस्फोटाचं वाढतं प्रमाण अशा गोष्टीना मात्र आळा बसला नाही. चंगळवाद, स्वैराचार या गोष्टी मध्ये वाढ होत आहे.चंगळवादातूनच वीकृतीचा जन्म होतो. समाजात भंयकर स्वरूपाची विकृती वाढते आहे.
वट पोर्णीमा हा सण देशभर उत्सहानं साजरा करतात. हा सण पांरपारिक आहे. पंरपरा व रुढी निर्माण होताना त्यात समाज जीवनाची अपरिहार्यता व उपलब्धता लक्षात घेऊनच तयाला धार्मीक अधिष्ठान दिलेले असते.तसं ते देणं गरजेच असते.त्या शिवाय ते समाजात रूजत नाहीत.समाजात सण, उत्सवांच एक वेगळे स्थान असते. त्यात स्थल, कालानुसार काही बदल अटळ असतात. तसे बदल ही समृध्दं समाजजीवनासाठी अनिवार्य असतात.अलीकडे अनेक सण उत्सव साजरे करताना लोक त्यांना श्रध्दा व अंधश्रधदेच्या चरक्यात घालतात.त्यामुळे अनेक सण उत्सवाने साजरे केले जात नाहीत. काही सण तर फक्त औपचारीकता म्हणनू साजरे केले जातात.त्यात उत्साहच नसतो.
अनेक सणात कालसापेक्ष बदल ही झालेले आहेत.उदा.पोळयाच्या सणाला मातीच्या बैलाची पूजा करणे.नागपंचमीला नागाच्या चित्राची पूजा करणे,वटपोर्णिमेला फांदीला फेरे मारणे.असे बदल हे अटळच असतात.असे बदल स्वीकारून सण साजरे केले जातात. सा-याचं उत्सवांना व सणांना तर्काच्या किंवा विज्ञानाच्या भट्टीत नाही घालता येत. समाजात असलेल्या सा-याचं पंरपरा फेकून देऊन भागणार नसतं.उदा.माणसं मेल्यावर त्यांचा अंतविधी करायची काय गरज आहे?असं तर कुणाला वाढलं तर ? प्रेत हे निर्जिव असते.जैविक प्रक्रियेने त्याच रूंपातर भौतिक पदार्थात होणारच असते.त्याला ओला कचरा म्हणून कचराकुंडीत टाकून नाही भागणारं. मानवी भावना व संवेदना टीकून् ठेवायचे आसतील तर असं करून जमणार नाही.विज्ञान कदाचीत सत्या पर्यत् जाऊ ही शकेल( सापडलेले सत्य हे अंतीम सत्य नसतात) पंरतु नाती निर्माण करू नाही शकणारं.
समाजव्यवस्थेची ही काही अनिर्वायता असते. लहान मोठे सण उत्सव साजरे करून माणसं आनंद निर्माण करू शकतात. पलीकडील संस्कृती मध्ये अनेक डे साजरे केले जातात. उदा. फादर्स डे, मदर्स डे ,व्हॅलेटाईन डे….बर्थ डे… ॲन्वसरी डे… अशा डे मधून आपला आनंद सार्वजनीककरण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या भावना व्यक्त करण्याचं ते नि मीत्तं शोधलं जातं. अनेक डे सरकारी फतवा काढून ही उत्साहाने साजरे केले जात नाहीत. उलट ती सजा वाटते.वृक्ष लागवडीचं जाहीर कार्यक्रम कीती तथ्यशून्य असतात हे सर्वाना माहीत असून ही राबवले जातात. पर्यावरणासाठी आम्ही कीती आग्रही अहोत याचं ते ढोंग असते. स्व्च्छता दिवस. पर्यावरण दिवस, जलदीन असे दिवस साजरे करताना भावनीक ओल आपण तयार नाही करू शकलो तर त्या दिवसाच्या साजरीकरणात उत्साह नसतो. तो कुठून आणायचा ?पंच महाभूतांना देवत्व बहाल करणर आपली संस्कृती आहे.त्यातून भावनीक बंध जोडायचा प्रयत्न केला आहे.मानवी भावनेला छेडण्यासाठी भय,लोभ हीच प्रेरणा आसते. या सर्वांच भय दाखवून त्यांची पूजा करण्याचा आपल्या पूर्वजांचा प्रयत्नं असू शकतो. नसला तरी तो होता असे सांगणे आपल्या हीताचे आहे.
भारतीय समाजात विवाह संस्थेला फार महत्तव आहे.संसारात स्त्री व पुरूषाने प्रेमाने संसार करावा किंवा एकमेंकांशी प्रमाणिक राहावं असं वाटत असेल तर त्या एकनिष्ठेतेचं प्रदर्शन ही होणं गरजेचं असतं.वटपोर्णिमा सारखे सण असं व्यकत् होण्याची संधी देतात.सत्यवान व सावीत्रीची कथा कीती खरी कीती खोटी त्यात फंछयात पडायचं नाही.आपल्या पतीवर उदात्त प्रेम करणा-या जीददी सत्रीची कथा आहे.ती पुरूषाची गुलाम म्हणून ते सारं करीत नाहीत तर ती प्रेमा पोटी करते.
विवाहीत जीवानात पतीव्रत्य महत्त्वाचं आहे.ते बळकट करण्यासाठीची ती कथा आहे.अर्थात सा-याच वडाला फेरे मारणा-या स्त्रीया आपल्या पतीशी प्रमाणिक असतातच असं नाही.तसचं सारेच नवरे सात जन्म स्वीकारावेत अशा लायकीचे असत नाहीत. व्यभिचाराला थोडासा ब्रेक बसावा.आपलं नात सात जन्माचं आहे. अशी भावना निर्माण होऊन दोष व गुणांसह माणसाला स्वीकारण्याची धारणा निर्माण या सणामुळे होऊ शकते.पती आणि पत्नीत प्रेम भावना वाढीस लागते.विवाहसंस्था बळकट करण्यासाठी हे गरजेचे आहे.वृक्षपूजा होते आहे. वडाची झाड सरपण म्हणून वापरलं जात नाही.या कथेतून पेरलेली ही भय प्रेरणा आहे.
मानवी नाते द्रढ व्हावीत तसेच निसर्गाप्रती भावनीक नाती निर्माण व्हावीत म्हणून भारतीय सणांच स्वरूप तयार होत गेले आहे.भाऊबीज, रक्षाबंधन,बहिण भावाची नाते अधिक द्ढ होण्यास मदतच करतात.पूर्वा आपल्या बहीणचं संरक्षाणाची जबाबदारी भाऊ घ्यायचा आता ही त्याची गरज नाही असं नाही.या सणातून प्रेमभवाना वाढीस लागणस मदतच होईल.दसरा,दिवाळी असे सण आई वडिल व जेष्ठांचा आदर करण्यासाठीचं प्रयोजन करतात. पाडव्यला नवरा आणि बायको एकमेंकांना अलंगन देतात. औक्षण केलं जात.संक्रांत, वटपोर्णिमा या सणातून स्त्री व पुरूष यांच्यातील प्रेम भावना व नाते संबध दृढच होतील.
छोटे मोठे सण उत्सव माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करतात.नाते व प्रेम वाढीस लावले जाते.स्त्री व पुरूष यांची कृत्रीम नाती मान्य नसतील. स्त्री म्हणजे एक मादी व पुरूष म्हणजे एक नर हेच नात मान्य असणारे लोक कंत्राटी मॅरेज करतात. हेच नाते सत्य आहे व तेच एक तिम सत्य आहे असे मानणा-या लोंकांनी सण,उत्सव यांचया भानगडीत पडू नये.सण् मानव निर्मीत असतात. माणसं स्वार्थी असतात.
परशुराम साेंडगे,पाटाेदा
प्रतिक्रिया
28 Jun 2018 - 10:11 pm | सोमनाथ खांदवे
उच्च शैक्षणिक प्रगती चे प्रमाण वाढल्या नंतर वट पौर्णिमा सारखे सामाजिक मागासलेपण असलेले हे असले सण बंद पडतील .
28 Jun 2018 - 11:07 pm | जेम्स वांड
परशराम भाऊंनीही आपली पोळी गरम तव्यावर टाकली एकदाची!
28 Jun 2018 - 11:59 pm | Ram ram
परशरामजी तुमच्याशी हजारदा सहमत. शिवजयंतीला माळ्यांनी जोतीबांचा मेसेज फिरवला पहिल्याने शिवजयंती साजरा करणारा माणूस म्हणून व आता दोन्ही सावित्रींची तुलना. वरून भ्रष्ट भुजबळचं उदात्तीकरण. सोमनाथ खांदवेभौंनी वहीनीला वड पुजू दिला नसेलच कारण ते पुढारेल हैती ना.
29 Jun 2018 - 8:25 am | सोमनाथ खांदवे
आसकस ? ग्येली व्हती वडाच झाड पुजायला . आपण कसा काय इरोध करायचा ? आस्ति ज्याची त्याची इच्छा !!!!
गावा मदी बायको ज्या झाडाला पूजते त्याच झाडाच्या फांदीनं तीला मार्त्यात का नाय ' रामराम ' पाव्हन ?
29 Jun 2018 - 12:05 am | Ram ram
वांड भो परतेक ठिकाणी वांडपणा करने का नै, संस्कार नामकी चीज हय क्या नै?
29 Jun 2018 - 9:02 am | जेम्स वांड
भले ते देऊ काशेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानु काटी
संस्कार आहेत.
29 Jun 2018 - 12:52 am | साहना
कालच इंस्टाग्राम वर मी एक फोटो पहिला :
#HusbandLogevity Vrat to make your husband last longer
29 Jun 2018 - 8:57 am | जेम्स वांड
द्या पाहू मग त्या फोटोची लिंक (इन्स्टाग्रामची) आम्हीही पाहून घेतो, आनंद/हास्य वाटल्याने वाढेल नाही का? का आनंद वाटणे वगैरेही धिम्मी प्रकार असतात म्हणे?
29 Jun 2018 - 11:15 am | साहना
दुर्दैवाने प्रायव्हेट आहे !
29 Jun 2018 - 12:54 am | साहना
पती पत्नीला दीर्घायु लाभो इतपर्यंत ठीक आहे पण सात जन्म एकाच जोडीदार वगैरे थोडे जास्त होते असे वाटते. इतके जन्म असतील तर थोडी व्हरायटी नको का जीवनात ? हे म्हणजे आयुष्यभर एकाच रेस्टोरंट मधील अन्न मिळो असे मागण्यासारखे आहे. कर्मकांडांचा मी फार आदर करते पण अति सर्वत्र ...
29 Jun 2018 - 12:59 am | साहना
> चंगळवाद, स्वैराचार या गोष्टी मध्ये वाढ होत आहे.चंगळवादातूनच वीकृतीचा जन्म होतो. समाजात भंयकर स्वरूपाची विकृती वाढते आहे.
हे शंभर टक्के असत्य आहे. ३०-५० वर्षे आधी स्त्रीचे शोषण जास्त होत होते. पुरुषांचे बाहेरची बाई ठेवण्याचे प्रमाण जास्त होते, श्रीमंत लाला आपल्या गड्या माणसाच्या बाईवर वाईट नजर ठेवण्याचे प्रमाण जास्त होते, दुष्ट काका आपल्या टीनएज पुतणीवर अत्याचार करण्याचे प्रमाण जास्त होते. आज काल मुले बॉयफ्रेंड वगैरे ठेवतात, बरोबरीने शिकतात आणि जे काही करतात ते कन्सेंट ने करतात. समाजातील विकृती आज फार कमी आहे. आज स्त्री अत्याचार झाला तर आवाज उठवते म्हणून अत्याचार जास्त होत आहेत असे वाटते पण प्रत्यक्षांत स्त्री आवाज करेल ह्या भयानेच गिधाडे जास्त भटकत नाहीत.
29 Jun 2018 - 1:46 pm | जयन्त बा शिम्पि
पुरुष प्रधान व्यवस्था पुर्वीपासून चालत आली आहे म्हणून सध्या तरी बरे आहे. उद्या जर स्त्री-प्रधान व्यवस्था अमंलात येवू घातली तर पुरुषांना कोणते व्रत करावे लागेल ? मागे असेच " कोकिळा व्रत " अनेक महिलांनी केले होते ,हे अनेकांना आठवत असेल. त्याही वेळी मला असे वाटले होते की भविष्यात पुरुषांना " कावळा व्रत " ( खरं म्हणजे 'डोमकावळा ' हा अधिक शोभून दिसणारा शब्द असावा.) करावे लागणार.