नुकतेच केलेल्या एका ट्रिप मध्ये Watkins Glen State Park मध्ये जाण्याचा योग आला. हे पार्क न्युयॉर्क राज्यातील फिंगर लेक्स च्या भागात येत. फिंगर लेक्स हा पाच सहा अत्यंत निमुळत्या लांबलचक तलावांचा प्रभाग आहे. अतिषय सुंदर , घनदाट झाडीने भरलेला प्रदेश त्यात ही आपण लहान्पणी चित्रात ज्या निळ्यारंगाने नदी /तलाव रंगवायचो तितक्या नितळ निळ्या रंगाचे लेक्स . अतिषय सुंदर क्लायमेट असल्याने भरभराटीला आलेल्या वाईनरीज .
त्यामध्ये असणार्या सर्वात मोठ्ठ्या सिनेका लेक जवळील वॉटकिन ग्लेन्स हे नॅशनल पार्क ! ह्या इथे इंडियन ट्रेल आणि गोर्ज ट्रेल असे दोन अत्यंत सोपे ट्रेल्स आहेत . वेळेच्या भावी आम्ही केवळ गोर्ज ट्रेल केला.
१. जेकब्स लॅडर - गॉर्ज ट्रेल ची सुरुवात
२. गॉर्ज ट्रेल मधुन वाहणारा पाण्याच्या झरा
३.दगडांची वैशिष्ठपुर्ण संरचना - आपल्याला जिऑलॉजीतले काहीही कळत नाही पण हा लाईमस्टोन असावा काय ?
४. दगडा काप्त जाणार्या पाण्याचा प्रवाह
५. बाजुच्या डोंगराला तासुन बनवलेली पायवाट
६. झर्यामागुन एक फोटो ! पुर्वी असे ठोसेघरच्या छोट्या धबधब्यामागे जाता यायचे , पण आता बंदी घातली आहे :(
७. ह्या फोटोत ही घळ दगडात किती रुतली आहे ह्याचा अंदाज येईल !
८. घळ संपते तेथील अतिषय सुंदर ब्रिज (पुल / साकव ? ) इथे एकदम गॅन्डाल्फ ची आठवण झाली - यू शॅलनॉट पास !
९. सॅम्युअल वॉटकिन्स ह्यांनी घ्या झर्याच्या पाण्याचा वापर करुन जी फ्लोअरमिल / पिठाची गिरणी बनवली होती त्याचे मॉडेल ! साधारण ई.स.१७०० च्या शेवटी शेवटी बनवली होती म्हणे , १८३० पर्यंत फंक्शनल होती
हा प्रदेश आत्ताही इतका सुंदर आहे तर तेव्हा किती सुंदर असेल हा विचार मनात येऊन गेला!
कसलं भारी लाईफ असेल नै तेव्हा , फक्त एकदा नेटिव्ह इन्डियन्स , सिनेका लोकांना मारलं की व्होल वावर इज आवर्स ! असो.
बर्याच दिवसांनी काहीतरी ट्रेकसदृश करायचा योग आला , एकदम सह्याद्रीची आठवण आली , सांदण दरीची आठवण झाली :)
आता परतल्यावर तो ट्रेल परत एकदा कराय्ला हवा :)
________________________________________________
(क्रमशः)
# मी हिरव्या देशात होतो तेव्हा
प्रतिक्रिया
27 Jun 2018 - 2:15 am | राघवेंद्र
केंव्हा होतात हिरव्या देशात ?
27 Jun 2018 - 12:20 pm | जयन्त बा शिम्पि
आता आलो आहोत अमेरिकेत ,तर ह्या स्थळाला भेट देण्याचा विचार करित आहे. माहितीबद्दल धन्यवाद.
27 Jun 2018 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी सहल. मजा आली असेल हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहाने कापून खोल खोल होत गेलेल्या चिंचोळ्या दरीतून हिंडताना ! फोटोही मस्तं !
28 Jun 2018 - 8:29 am | प्रचेतस
क्या बात है प्रगो सर..!
अगदी सांधण दरीची आठवण करुन दिलीत बघा. अशीच अमेरीकेतील अनोखी स्थळे तुमच्या भटकंतीद्वारे येऊ द्यात.