आठवण

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
27 Oct 2008 - 10:43 pm
गाभा: 

मिसळपाव करांच्या स्मृती प्रमाणे
तात्या उर्फ विसोबा खेचर ह्यांनी ह्या दिवाळित रौशनी चे पुढील भाग द्यावयाचे कबूल केले होते.

तरि संबधितांना त्याची आठवण करून द्यावी म्हणून हा खटाटोप.

:)

प्रतिक्रिया

प्राजु's picture

27 Oct 2008 - 10:49 pm | प्राजु

कित्येक दिवाळ्या येतील आणि जातील.. पण तात्यांच्या मूड लागेल तेव्हाच ते लिहिणार. सो.. अपेक्षा ठेवू नका.. :)
शेवटी तात्यासुद्धा स्वतंत्र भारताचे रहिवासी आहेत त्यामुळे नेते मंडळींचा आश्वासन देण्याचा वाण नाही पण गुण थोडा तरी लागणारच ना ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

तात्या, लवकर टाका कि पुढचे भाग..

शैलेन्द्र's picture

29 Oct 2008 - 12:16 am | शैलेन्द्र

तात्या, दिवाळीत रोशनी झाली पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे...

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2008 - 12:17 am | बिपिन कार्यकर्ते

तात्याला, खव मधून, प्रतिसादांमधून आठवण करुन देत आहोत. पण प्राजु म्हणते तसं तात्या मूड लगेंगा तब्बीच लिखेंगा... फिर भी आपुन याद दिलाते रैने का.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 12:41 am | विसोबा खेचर

विलंबाकरता मनापासून सॉरी. सध्या रौशनी डोक्यात नाही. सवडीने लिहितो...

पुन्हा एकदा माफी मागतो...परंतु त्या मुडात गेल्याशिवाय रौशनीचं पुढलं लेखन नीट जमणार नाही.

असो,

आपला,
(स्वान्तसुखाय) तात्या.

चतुरंग's picture

29 Oct 2008 - 1:02 am | चतुरंग

ग्लेनफिडिचचा एखादा खंबा, बिझलेरी, बर्फ, खारे काजू, तळलेल्या पापलेटची डिश नेऊने द्या रे त्या तात्याला आणि एखादी मस्त मैफिल वगैरे जमवता आली तर पहा तिथेच, त्याशिवाय आमचा तात्या मुडात यायचा नाय आणि ती रौशनीसुद्धा आम्हाला गावायची नाय!! ;)

चतुरंग

नेत्रेश's picture

29 Oct 2008 - 2:43 am | नेत्रेश

रोशनी पुर्ण करायच्या आधी गेलात तर बर्याच मि.पा.करांचे आत्मे अनंत काळ भटकत रहातील.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 7:54 am | विसोबा खेचर

रोशनी पुर्ण करायच्या आधी गेलात

का रे बाबा नेत्रेश? माझ्या जिवावर का उठला आहेस? :)

मनोगती आहेस की काय? ;)

तात्या.