PDF फाईल्सबद्दल....

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
16 Jun 2018 - 4:38 pm

हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्‍या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत. याबद्दलच थोडी माहिती हवी आहे.या संदर्भाने खालील माहिती मिळाल्यास सर्वांनाच उपयोग होईल.

१) अशा प्रकारे दुसर्‍या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्‍या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?

२) समजा ठराविक लोकसंख्येला अशी PDF फाईल पाठवणं हा गुन्हा नसेल तर ती संख्या किती?

३) ही मर्यादा अोलांडल्यास भारतीय कायद्यान्वये काय शिक्षा होऊ शकते?

४) समजा जेवढ्या लोकसंख्येला PDF फाईल पाठवणे कायद्यात बसतं तेवढ्यांनाच मी पाठवली;पण ज्यांना पाठवली त्यांनी पुढे अनेक जणांना ती फाईल पाठवली तर या बद्दल मला शिक्षा होऊ शकते का? की मी स्वत:हून ज्यांना पाठवली नाही त्यांच्याकडे असणार्‍या फाईल्सबद्दलही मला शिक्षा होऊ शकते?

५) समजा या PDF फाईलमधील मजकूर कॉपी करता येईल अशी फाईल असेल किंवा तसा मजकूर कॉपी न करता येणारी स्कॅन केलेली PDF फाईल असेल तर यामुळे काही फरक पडतो का? म्हणजे कॉपी करता येणार्‍या PDF फाईलसाठी वेगळे नियम आणि स्कॅन केलेल्या PDF फाईलसाठी वेगळे नियम असं काही आहे का?

६) यापुढे जाऊन मूळ पुस्तकातील सर्व पानांची PDF फाईल बनवून तिचे वितरण केल्यास नियम वेगळे आणि काही ठराविक पानांचीच PDF फाईल बनवून वितरित करणे यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत का?

७) समजा माझ्याकडे एक पुस्तक आहे.ते पुस्तक ज्या प्रकाशन संस्थेने छापले आहे त्यांनी ते खुप वर्षे झालं परत छापलेलंच नाही; शिवाय हे पुस्तक सार्वजनिक वाचनालयातही उपलब्ध नाही अशा वेळी मी हे पुस्तक काही लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावं म्हणून स्कॅन करुन त्याची PDF फाईल बनवून ते व्हॉटसअॅप,फेबु किंवा मेल वरुन पाठवलं तर तो गुन्हा असेल का?असल्यास मग अन्य कोणत्या मार्गे हे पुस्तक मी इच्छुकांना जे एकाच गावात,शहरात राहत नाहीयेत त्यांच्यापर्यंत कसं पोहचवू शकतो?

८) कोणत्या प्रकारचे साहित्य फाईलच्या स्वरुपात पाठवणे हा गुन्हा नाही? म्हणजे कोणत्याही भाषेतले वर्तमानपत्र,मासिक,साप्ताहिक,पाक्षिक,दिवाळी अंक या प्रत्येकासाठी वेगळे नियम आहेत का?

९) फाईल बनवण्यास मनाई नाही पण त्याची प्रिंट काढून छापील प्रत जवळ बाळगणे हा मात्र गुन्हा असं अाहे का?

१०) मॅग्झटर,न्यूजहंट किंवा अशाच एखाद्या पेड अॅप किंवा पेड वेबसाईटवरुन मी पैसे भरुन एखादी PDF फाईल डाऊनलोड केली आणि इतरांसाठी मोफत वितरित केली तरीही हा गुन्हा/नियमभंग आहे का?

११) किती वर्षांपूर्वीचे जुने पुस्तक PDF स्वरुपात बनवून मोफत वितरित करणे हा गुन्हा नाहीये?

(कृपया किंडल,Wattpad किंवा अशाच कुठल्यातरी अॅप/साईट वाचनासाठी सुचवू नयेत.धागा PDF फाईल्स बनवणे आणि त्यांचे वितरण यांसंदर्भात आहे.)

प्रतिक्रिया

पैलवान's picture

16 Jun 2018 - 5:01 pm | पैलवान

माझे वैयक्तिक मतः (अर्थात, जर कायदेशीर मतप्रदर्शन हवे असेल तर हा प्रतिसाद तद्दन टाकाऊ समजावा.)
जर कॉपीराईटधारकाची लेखी परवानगी नसेल तर मुद्दे १-१० हे नियमभंग/चोरी/गुन्हा असावेत.

११) किती वर्षांपूर्वीचे जुने पुस्तक PDF स्वरुपात बनवून मोफत वितरित करणे हा गुन्हा नाहीये?
हा आकडा बहुधा ६० असावा.

चहाबिस्कीट's picture

16 Jun 2018 - 7:42 pm | चहाबिस्कीट

समजा माझ्याकडे एक पुस्तक आहे.ते पुस्तक ज्या प्रकाशन संस्थेने छापले आहे त्यांनी ते खुप वर्षे झालं परत छापलेलंच नाही; शिवाय हे पुस्तक सार्वजनिक वाचनालयातही उपलब्ध नाही अशा वेळी मी हे पुस्तक काही लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावं म्हणून स्कॅन करुन त्याची PDF फाईल बनवून ते व्हॉटसअॅप,फेबु किंवा मेल वरुन पाठवलं तर तो गुन्हा असेल का?

या मुद्द्याशी निगडित अमेरिकेत काही खटले चालू होते/आहेत. इंटरनेट अर्काइव्ह या संस्थेचा ओपन लायब्ररी https://openlibrary.org/ हा उपक्रम आहे, तो नजरेखालून खालावा. कॉपीराइटमध्ये असलेली, पण प्रकाशनसंस्थेने बरीच वर्षे नवीन आवृत्ती न काढलेली बरीच पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत. तुम्ही सुद्धा स्कॅन करून पुस्तके तिथे अपलोड करू शकता.

चहाबिस्कीट's picture

16 Jun 2018 - 7:49 pm | चहाबिस्कीट

तुम्हाला अनॉनिमस रहायचे असेल तर उत्तम पर्याय म्हणजे स्कॅन केलेले पुस्तक लायब्ररी जेनेसिस वर अपलोड करणे. इच्छुक लोक तिथून डाउनलोड करू शकता. पण मी हे फक्त आउट ऑफ प्रिंट पुस्तकांसाठीच रेकमेंड करेन. मूळ लेखकाचे आर्थिक नुकसान नको!

उपयोजक's picture

16 Jun 2018 - 9:13 pm | उपयोजक

प्रतिसाद माहितीपूर्ण चाहाबिस्कीट!

प्रतिसादकांबद्दल आदर ठेउन, उपरोक्त प्रतिसादांबद्दल गंभीर साशंकता आहेत हे आग्रहपूर्वक लक्षात घ्यावे असे वाटते.

(उत्तरदायकत्वास नकार लागू)

माहितगार's picture

18 Jun 2018 - 10:41 am | माहितगार

उलट्या क्रमाने उत्तरे देतो.

कृती, लेखक/कवि , चढवणारा भारतीय भारातात आहे असे गृहीत धरून उत्तरे देत आहे.

११) किती वर्षांपूर्वीचे जुने पुस्तक PDF स्वरुपात बनवून मोफत वितरित करणे हा गुन्हा नाहीये?

लेखकाच्या मृत्यू नंतर ६०* वर्षे पूर्ण झालेली कृती ( इफेक्टीव्हली ६१ वर्षे कारण मृत्यू नंतरची ६० वर्षे मोजल्यानंतरचा ३१ डिसेंबर उलटून जाऊ द्यावा लागतो)

उत्तरदायित्वास नकार लागू

माहितगार's picture

18 Jun 2018 - 10:55 am | माहितगार

१०) मॅग्झटर,न्यूजहंट किंवा अशाच एखाद्या पेड अॅप किंवा पेड वेबसाईटवरुन मी पैसे भरुन एखादी PDF फाईल डाऊनलोड केली आणि इतरांसाठी मोफत वितरित केली तरीही हा गुन्हा/नियमभंग आहे का?

मी पैसे भरुन एखादी PDF फाईल डाऊनलोड केली आणि इतरांसाठी मोफत वितरित केली तरीही हा गुन्हा/नियमभंग आहे का?

* वितरणाबाबत पूस्तक कॉपीराईट मध्ये आहे अथवा नाही हा मुख्य मुद्दा आहे, कॉपीराईट मध्ये असेल तर सहसा गुन्हा/नियमभंग ठरेल. (अर्थात संबंधीत वेबसाईटच्या नियम अटी तपासणे आणि वेबसाईट प्रशासनाकडून शंकानिरसन करुन घेणे श्रेय्स्कर असू शकते.)

** कॉपीराईट मध्ये नसेल तर तुम्ही कोणत्या पेड अनपेड स्रोतातून घेतले हा मुद्दा नाही, -भारतीय न्यायालयीन निकालानुसार- एकदा कॉपीराईट बंधन संपले की सहसा संपलेले रहाते, पण यातही अल्पसे बारकावे शिल्लक रहातात ज्या बाबत कायदेविषयक बारकावे आणि न्यायालयीन निर्णयातील बारकावे समजून घेणे गरजेचे असू शकते.

* कायदेविषयक समस्या सहसा डाऊनलोड अथवा रिसीव्ह करण्यात नाहीत, पण कायदेविषयक अडथळे वितरणाच्या प्रसंगापासून आहेत. (अपवादांबद्दल भारतीय कॉपीराईट कायद्याचे कलम ५२ अभ्यासावे) .

माहितगार's picture

18 Jun 2018 - 11:06 am | माहितगार

९) फाईल बनवण्यास मनाई नाही पण त्याची प्रिंट काढून छापील प्रत जवळ बाळगणे हा मात्र गुन्हा असं अाहे का?

प्रश्नात बहुधा चुकीची गृहीतके अध्याहृत असण्याची शक्यता असावी, कोणत्याही वितरणापूर्वी कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेणे श्रेयस्कर असावे अथवा भारतीय कॉपीराईट कायद्याचे चार-पाच तरी पारायणे समजून घेऊन करावीत. पुस्तक छापिल अथवा डिजीटल स्वरुपात जवळ बाळगण्यात समस्या नाहीत आधीच्या उत्तरात म्हटल्या प्रमाणे कायदे विषयक अडथळे सहसा वितरण बिंदूपासून चालू होतात.

(सॉफ्टवेअर बाबत नियमावली कदाचित वेगळ्या असू शकतातका की ज्यां बद्दल माझे फारसे वाचन नाही )

* उत्तरदायित्वास नकार लागू

माहितगार's picture

18 Jun 2018 - 11:16 am | माहितगार

८) कोणत्या प्रकारचे साहित्य फाईलच्या स्वरुपात पाठवणे हा गुन्हा नाही? म्हणजे कोणत्याही भाषेतले वर्तमानपत्र,मासिक,साप्ताहिक,पाक्षिक,दिवाळी अंक या प्रत्येकासाठी वेगळे नियम आहेत का?

* सर्वच साहित्यिक कृतींना एकसारखे नियम लागू व्हावेत, जेव्हा लेखक कवि चा मृत्यू अधिक ६१ वर्षे होऊन गेली तेव्हा वितरीत करणे गुन्हा नाही,

* लेखक कवि किंवा अधिकृत कॉपीराईट मालकाने अधिकृत लेखी परवानगी ज्या ज्या उद्दीष्टासाठी दिली ती उद्दीष्टे पार पाडणे गुन्हा नाही पण दिलेल्या परवानगीच्या पलिकडे जाणे अवैध होऊ शकते.

* जे साहित्य अनामिक लेखकाचे आहे , पुरेसे प्रयत्न करूनही लेखकाबद्दल संपर्कासाठी माहिती हाती अशा साहित्याबद्दल कॉपीराईट कायद्यात सवलत उपलब्ध होऊ शकते पण गुन्हा नाही हे निश्चित करुन घ्यायचे असेल तर भारतसरकारच्या कॉपीराईट ऑफीसला रितसर विनंती करून रित्सर परवाना घेणे अथवा कायदे विषयक सल्लागारांचा सल्ला घेणे श्रेयस्कर असावे.

उत्तरदायीत्वास नकार

माहितगार's picture

18 Jun 2018 - 11:21 am | माहितगार

७) समजा माझ्याकडे एक पुस्तक आहे.ते पुस्तक ज्या प्रकाशन संस्थेने छापले आहे त्यांनी ते खुप वर्षे झालं परत छापलेलंच नाही; शिवाय हे पुस्तक सार्वजनिक वाचनालयातही उपलब्ध नाही अशा वेळी मी हे पुस्तक काही लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावं म्हणून स्कॅन करुन त्याची PDF फाईल बनवून ते व्हॉटसअॅप,फेबु किंवा मेल वरुन पाठवलं तर तो गुन्हा असेल का?असल्यास मग अन्य कोणत्या मार्गे हे पुस्तक मी इच्छुकांना जे एकाच गावात,शहरात राहत नाहीयेत त्यांच्यापर्यंत कसं पोहचवू शकतो?

* लेखक आणि प्रकाशन संस्था यांच्यात लेखी करार काय झाले आहेत -लेखकाने प्रकाशनसंस्थेस कोण्कोणते अधिकार करारातून प्रदान केले आहेत (आणि कोणते नाही) - त्यावर अवलंबून असावे. प्रकाशनसंस्थेची लेखी अनुमती अथवा कायदे विषयक सल्लागाराचा सल्ला घेणे श्रेयस्कर असावे

उत्तरदायित्वास नकार लागू

माहितगार's picture

18 Jun 2018 - 11:30 am | माहितगार

६) यापुढे जाऊन मूळ पुस्तकातील सर्व पानांची PDF फाईल बनवून तिचे वितरण केल्यास नियम वेगळे आणि काही ठराविक पानांचीच PDF फाईल बनवून वितरित करणे यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत का?

नियम एकसारखेच असतात, ( कॉपीराईटड असल्यास आर्थीक दंडा च्या रकमेत किरकोळ फरक पडू शकेल असे उत्तर कदाचित देता येऊ शकेल पण तेही अंशतः दिशाभूल करणारे असेल)

कॉपीराईट विषयक शंका विचारणार्‍यां बर्‍याच जणांबाबत एक नेहमी वाटते, आपण शाळेत असताना विनंती पत्रे लिहिण्यास शिकलो आहोत ना , शिक्षक आणि शाळेने दिलेल्या त्या ज्ञानाचा फायदा करुन घेऊन कॉपीराईट मालकांशी लेखी संवाद साधणे , अधिकृत लेखी परवानगी मिळवणे सर्वात उत्तम.

माहितगार's picture

18 Jun 2018 - 11:49 am | माहितगार

१) अशा प्रकारे दुसर्‍या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्‍या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?

२) समजा ठराविक लोकसंख्येला अशी PDF फाईल पाठवणं हा गुन्हा नसेल तर ती संख्या किती?

३) ही मर्यादा अोलांडल्यास भारतीय कायद्यान्वये काय शिक्षा होऊ शकते?

४) समजा जेवढ्या लोकसंख्येला PDF फाईल पाठवणे कायद्यात बसतं तेवढ्यांनाच मी पाठवली;पण ज्यांना पाठवली त्यांनी पुढे अनेक जणांना ती फाईल पाठवली तर या बद्दल मला शिक्षा होऊ शकते का? की मी स्वत:हून ज्यांना पाठवली नाही त्यांच्याकडे असणार्‍या फाईल्सबद्दलही मला शिक्षा होऊ शकते?

५) समजा या PDF फाईलमधील मजकूर कॉपी करता येईल अशी फाईल असेल किंवा तसा मजकूर कॉपी न करता येणारी स्कॅन केलेली PDF फाईल असेल तर यामुळे काही फरक पडतो का? म्हणजे कॉपी करता येणार्‍या PDF फाईलसाठी वेगळे नियम आणि स्कॅन केलेल्या PDF फाईलसाठी वेगळे नियम असं काही आहे का?

कोणत्याही प्रकारच्या वितरणकरु इच्छित कलाकृतीच्या पुर्नवापरासाठी, मुलतः लेखकाची (पण लेखक एखाद्या लेखी कराराने प्रकाशकाशी बांधील असल्यास प्रकाशकाची सुद्धा) लेखी अनुमती हवी. आपल्याला पत्र लेखनाची कलाशक्ती आहे ह्याचे हनुमाना प्रमाणे स्मरण करुन लेखक प्रकाशक त्यांचे वंशज यांच्याशी लेखी अनुमती मिळवण्यासाठी लेखी संवाद साधणे सर्वोत्तम, भारतीय कॉपीराईट कायद्याचे चार ते पाच वेळा पारायण करुन कायदेविषयक तज्ञांचा गरजेनुसार सल्ला घेणे श्रेयस्कर. कॉपीराईटेड असलेल्या कॉणत्याही कलाकृतीचे कायद्यात न बसणारे वापर अवैध ठरु शकतात.

लेखन कॉपीराईटेड असेल आणि लेखक प्रकाशकांची उचित लेखी अनुमती नसेल तर प्रश्न क्रमांक १ ते ६ मधी कृती अवैध ठरण्याची शक्यता असू शकते. कायद्यात उपलब्ध अपवादांसाठी भारतीय कॉपीराईट कायद्याचे कलम ५२ अभ्यासावे. पण पळवाटा शोधण्यापेक्षा लेखी संवाद साधण्याच्या कलेचे स्मरण करुन कॉपीराईट मालकांशी संवाद साधणे खरेच श्रेयस्कर असते असे आतापावेतोच्या अभ्यास व अनुभवातून प्रांजळपणे वाटते.

उत्तरदायित्वास नकार लागू

उपयोजक's picture

18 Jun 2018 - 2:07 pm | उपयोजक

माहितगार!

मराठी कथालेखक's picture

18 Jun 2018 - 6:31 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देवू शकेल अशी कायदेतज्ञ व्यक्ती मिपावर नसावी त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही या विषयातील तज्ञ अशा वकीलाकडून मिळवावीत असे मी सुचवेन