आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.

आलमगिर's picture
आलमगिर in पाककृती
3 Jun 2018 - 2:40 am

खुपदा असं होत की नुस्ता वरण भात खायचा कंटाळा येतो त्यासाठी ही वरणाचीच पाककृती.

वरण- १वाटी
तूप ३ते ४ चमचे
जिरे , मिरची,मीठ चवीनुसार.

कृती एकदम सोप्पी तुप-जिरे-मिरचीची फोडणी करुन वरणावर घालायची मिश्रण एकजीव करायचे आणी गरम भात/पोळीशी खावयाचे.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 3:42 pm | श्वेता२४

आमच्याकडे नुसतं वरण म्हणजे डाळ शिजवायला लावतानाच त्यात जिरे हळद तेल घालतात आणि डाळ शिजल्यावर त्यात हिंग हळद मीठ किंचित गुळ घालतात . मी तर हे सगळंच एकदम घालून डाळ शिजवते म्हणजे भातावर डाळ आणि तूप घेतलं कि पूर्णान्न! तुमची मिरचीच फक्त नाही यात

अहो तूप-जिरे-मिर्ची फोडणी जमणे हाच तर Main twist आहे. ती जमली म्हणजे पोट टम्म होणार १००%

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 11:20 pm | श्वेता२४

तूप जिरे मीरचिची फोडणी जमणे हाच जर main twist होता तर पा कृ मध्ये सविस्तर फोटोसाहित टाकलं असतं तर या ट्विस्ट मध्ये आम्हिही पारंगत झालो असतो

अभ्या..'s picture

3 Jun 2018 - 3:46 pm | अभ्या..

आज्जी मॅगी करायच्या का?
असल्यास ती पाकृ कितव्या नंबराला येणारे?
मला पुरणपोळीपासून सावजी मटणापर्यंत सारे येते फक्त मॅगी शिकायचे राहिलेय...तेंव्हा जरा..

आमच्याकडे मॕगीच्या अळ्या खात नाहित. :-)

मॅगी आवडत नसेल तर चिंग्झ खा. मन्चुरियन स्वादचे मस्त लागते. डिमार्टमधे ५०% सूट मिळते किंमतीवर.

निशाचर's picture

4 Jun 2018 - 4:59 am | निशाचर

मला पुरणपोळीपासून सावजी मटणापर्यंत सारे येते फक्त मॅगी शिकायचे राहिलेय

मग आम्हाला सावजी मटण शिकवून दुवा घ्या की...

खुपदा असं होत की नुस्ता चहा करायचा कंटाळा येतो त्यासाठी ही चहाचीच पाककृती.

चहापत्ती - अर्धा चमचा
साखर - १ चमचा

कृती एकदम सोप्पी-चहापत्ती आणि साखर एकत्र करायची आणि हातावर घेऊन एकदम तोंडात टाकून चावायची. चहाची तल्लफ भागते.

यशोधरा's picture

3 Jun 2018 - 5:00 pm | यशोधरा

=))

कशाला कशाला त्यापेक्षा रेड लेबलच्या जाहिरातीतल्या सारखं करा की. आणी भुरका शेजारी जाऊन चहा!

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 4:30 pm | श्वेता२४

कुणी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत कस करायचं याची पाकृ टाका

बाहेर गाड्यावर स्वस्त मिळेल ते! लिंब फार महाग आहे. :-)

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 11:25 pm | श्वेता२४

चहा शेजारी जाऊन प्यायचा , सरबत गाड्यावर जाऊन प्यायचं. तरी बरं फोडणीचा ट्विस्ट जमलं नाही तर हा वरण भात हॉटेलात जाऊन खा म्हणून नाही सांगितलंत

१) वरणाची डाळ शिजत लावून त्यात जिरे, हिंग हळद घालून शिजल्यावर मिठ घालून मिरच्या कोथिंबीर घालायची. कधीतरी चेंज म्हणून लसुण व टोमॅटोही टाकते.
२) एक फोडणीच वरण त्यात फोडणीला लसुण, राई, जिर, हिंग हळद, मिरची, कढीपत्ता घालून शिजल्यावर टोमॅटो, मिठ, कोथिंबीर, थोड ओल खोबर घालते
३) आंबट वरण करताना थोडी तुरडाळ व थोडी मुगडाळ शिजवून त्यात हिंग, हळद, मसाला घालून हवे ते जिन्नस म्हणजे बटाटा किंवा सुरण घालून मग त्यात चिंच किंवा कोकम, गुळ, मिठ घालून शिजल्यावर वरून फोडणी देते. फोडणीत राई, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे घालूण थोडी करपट फोडणी घालते. ही खमंग असते फोडणी.

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 12:27 pm | श्वेता२४

आंबट वरण करताना थोडी तुरडाळ व थोडी मुगडाळ शिजवून त्यात हिंग, हळद, मसाला घालून हवे ते जिन्नस म्हणजे बटाटा किंवा सुरण घालून मग त्यात चिंच किंवा कोकम, गुळ, मिठ घालून शिजल्यावर वरून फोडणी देते. फोडणीत राई, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे घालूण थोडी करपट फोडणी घालते. ही खमंग असते फोडणी. वरुन फोडणी कधी दिली नव्हती . करुन बघते. धन्यवाद वेगळी टीप दिल्याबद्दल

एस's picture

4 Jun 2018 - 12:06 pm | एस

.

मनिमौ's picture

4 Jun 2018 - 3:54 pm | मनिमौ

मॅगीचि कृती मिळाली तर मला बी हवीच आहे. झालच तर बोर्नविटा, टॅन्ग सरबताची पाकक्रुती मिळाली तर धागालेखकाचे जाहीर आभार मानण्यात येतील

सुप्रिया's picture

6 Jun 2018 - 2:03 pm | सुप्रिया

खाटं वरण काल केले होते. मस्त लागले. नुस्त्या वरणभातापेक्शा छान लागले.