साहित्य-
2 चमचे तेल
7-8 छोटे हिरवे टोमॅटो
4 चमचे तीळ भाजून
3 चमचे शेंगदाणे भाजून
2 लसूण पाकळ्या
1 चमचा मीठ
2 चमचे गुळ पावडर
2-3 तिखट हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग
कृती-
2-3 चमचे तेलामध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घाला. मग टोमॅटोच्या फोडी घालून एक वाफ आणा.
आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो. 3-4 मिनिटात टोमॅटो मऊ होईल. गॅस बंद करून मिश्रण गार करत ठेवा. मिश्रण गार झाल्यावर मिक्सर मध्ये तीळ फिरवून घ्या.
मग शेंगदाणे व मिश्रण घालून फिरवून घ्या.
आता तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालून खमंग फोडणी करून घ्या आणि चटणीवर ओता.
नीट कालवून घ्या.
हि चटणी अत्यंत चविष्ट लागते. चपाती, पराठयासोबत खाता येईल किंवा याचे सँडविच सुद्धा बनवता येतील.
प्रतिक्रिया
2 Jun 2018 - 12:14 am | एस
पाककृती छान आहे. पण टोमॅटोची चटणी हा प्रकार आवडत नसल्याने पास! :-)
2 Jun 2018 - 6:03 am | सविता००१
खूप आवडते आणि अशीच करते
2 Jun 2018 - 7:23 am | manguu@mail.com
ही चटणी भाजीप्रमाणे भरपूर खाल्ली जाते . खाताना त्याच्या डोक्यावर तेल सोडायचे
2 Jun 2018 - 12:59 pm | श्वेता२४
प्रतिसाद देणाऱया सर्वांचे धन्यवाद. एस यांनी एकदा खाऊन बघायला हरकत नाही कदाचित त्यांचे मत बदलेल असे वाटते हि चटणी खरंच माझी खूप आवडती आहे आणि मीही भाजी ऐवजी हि चटणीच खाते
2 Jun 2018 - 6:03 pm | उगा काहितरीच
ओके ! करून बघायला हरकत नाही. सोपी पण वाटत आहे पाकृ.
2 Jun 2018 - 9:58 pm | पिंगू
अशी चटणी मी लाल टोमॅटोची बनवतो.
2 Jun 2018 - 10:15 pm | सस्नेह
मस्त रेसिपी !!
फोटो भारीच .
3 Jun 2018 - 2:54 pm | श्वेता२४
पिंगु आणि स्नेहांकिता☺️
3 Jun 2018 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
3 Jun 2018 - 8:21 pm | पद्मावति
मस्तच.
25 Sep 2018 - 4:35 pm | भिंगरी
मी पण बनवते पण गुळ नाही घालत
26 Sep 2018 - 9:49 am | सिरुसेरि
मस्त
26 Sep 2018 - 10:54 am | श्वेता२४
भिंगरी व सिरुसेरी