नाचणीचे शेंगोळे
१. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत.
२. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी.
३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे.
प्रतिक्रिया
22 May 2018 - 8:12 pm | उगा काहितरीच
शेंगोळे हा प्रकार अजिबातच आवडत नाही . माफ करा , पण वरचा फोटो पाहून असलेली ०.००१२% इच्छा पण मरून गेली.
22 May 2018 - 8:40 pm | एस
ही वेगळीच पद्धत दिसते आहे. चक्क द्राक्षे घातली आहेत सजावटीसाठी! शेंगोळी ही दाण्याच्या आमटीत छान लागते.
23 May 2018 - 12:42 am | पिंगू
तूरडाळीची आमटी जरा जास्तच घट्ट झालेली दिसतेय.
23 May 2018 - 4:17 am | चामुंडराय
शेंगोळ्या बरेच वर्षानंतर नुकत्याच खाण्यात आल्या.
आवडल्या.
त्या कुळीथाच्या होत्या बहुतेक.
23 May 2018 - 6:10 am | शाली
नाचणीच्या त्याही तुरडाळीमध्ये, हा प्रकार माहीत नव्हता. काहीसा चकोल्या (वरणफळे) सारखा प्रकार दिसतोय.
आमच्याकडे कुळीथाच्या (हुलगे) केल्या जातात व खुप आवडीने खाल्या जातात.