चार जाणकारांनी जरी तुम्हाला सांगितले की अमुक-तमुक वाईन उत्तम आहे, आणि तरी ती तुम्हाला चवीला आवडली नाही तर?
तेव्हा वाईनच्या बाटल्यांवरील लेबले वाचा (खिशातील पाकीट्देखील चाचपून पहा) आणि विविध वाईन्स खरेदी करून चाखा. त्यातून तुमची आवड तुम्हाला लक्षात येईल.
माझे वैयक्तिक मत - व्हाईट वाईनमध्ये Chardonnay आणि रेड वाईनमध्ये Shiraz. अर्थात तुम्हालाही त्या आवडण्याची सक्ती नाही आणि मलादेखील त्याचा का आवडतात त्याची कारणे देण्याची गरज नाही.
(सावध तळीराम) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जाणकारांद्वारे बर्याच वाईन्सना १०० पैकी पॉइंट्स दिले जातात. वाईनच्या बाटलीवर मग ९१ पॉईंट, ९३ पॉईंट इ. माहिती तुम्हांला पहायला मिळेल. वाईनमध्ये असणार्या घटकांबरोबरच ती किती काळ मुरवलेली आहे, यावर तिची चव आणि पर्यायाने किंमत ठरते.
दुसरं म्हणजे, जेवणात रेड मीट असेल तर सोबत रेड वाईन घ्यावी, कारण या वेळी मांसाच्या तीव्र चवीसमोर व्हाईट वाईनची चव फिकी पडू शकते. व्हाईट मीट (उदा. चिकन) किंवा मासे जेवणात असतील तर व्हाईट वाईन उत्तम. सुनील यांनी सांगितल्याप्रमाणेच शार्डने आणि शिराझ या दोन उत्तम प्रकारच्या वाईन्स आहेत (अनु. व्हाईट/रेड) शार्डने जरी मूळची फ्रेंच असली तरी सध्या कॅलिफोर्नियन शार्डनेज अधिक लोकप्रिय आहेत. (रॉबर्ट मोन्डावी, सोनोमा व्हॅली, केन्डॉल जॅक्सन इ. वाइनरीजच्या शार्डनेज चांगल्या असतात.)
अँटी ऑक्सिडण्ट्सचा संबंध शरीरातील "फ्री रॅडिकल्स" मुक्त करण्याशी व पर्यायाने कर्करोगाशी असावा. हृदयविकार वा मधुमेहाशी नाही. लाल वाईनपेक्षा जास्त अँटी ऑक्सिडण्ट्स हे फळांमध्ये व (दूध न घातलेल्या) चहामध्ये असतात. त्यामुळे केवळ अँटी ऑक्सीडण्ट्स हवे असतील तर हे अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.
एका चांगल्या दुकानात जा, (किंवा विमानतळावर ड्यूटी फ्री) तिथे वाईनच्या किंमती बघा काही बाटल्या महाग असतील. (ब्रॅन्ड नेम मुळे, टॅक्स मुळे काही बाटल्या महाग असतील. पण "माल" चांगला असण्याच्या शक्यता जास्त) त्या महाग बाटल्यांकी एक उचला. चांगली वाईन असण्याची शक्यता ९५%(बर्याचदा असते) (तुम्हाला आवडेल की नाही हा भाग वेगळा :-))
आपल्या प्रतिक्रियातून बरीच माहिती मिळ्त आहे.
शलाकाजीनी विकिपेडियाकडे ल़क्ष्य वेधल्या बद्दल आभ।री आहे.
भारतात इतर अल्कोहोलिक पेयान्पेक्ष्या वाईन्सचा खप केवळ ०.००५% आहे (सन्दर्भ www.hdfcsec.com म्हणुन त्यानि वर्षभरापूर्वि Champagne Indage ची शिफारस केली होती. आता पर्यन्त मा़झे Champagne Indage, १३९% वाढलेत).
जेन्व्हा मी फिरन्ग्यान बरोबर जेवतो, तेन्व्हा त्यान्चा वाईन्स बाबतचा चोखन्दळपणा पहावयास मीळ्तो.
दर्दि खवय्याला ज्याप्रमाणे ऊकडिचे मोदक किन्वा पुरणपोळित उन्निस बिस चालत नाही, त्याचप्रमाणे त्याना वाईन्स मधे उन्निस बिस चालत नाही.
वाईनचे तापमान, वास (बुचाचा वास वाईन मध्ये असल्यास ती वाईन जुनी आणि पिण्यास अयोग्य मानतात), after test इ.चि खात्री पटली की मगच ती पितात.
वाईन पिताना/पिण्यापूर्वी साईट (वाईनमधे बुचाचे कण तर तरंगत नाहीत ना, पेल्यातील द्रवाची पेल्याला स्पर्शणारी सर्वात वरची कड पारदर्शक आहे ना {यामागचे कारण विसरलो} हे तपासण्यासाठी ), स्वर्ल (ऑक्सिडेशन होऊन वाईनचा स्वाद नीट यावा म्हणून), स्मेल (त्या विशिष्ट वाईनचा गंध जर तुम्हांला आवडला नाही, तर बव्हंशी तिची चवही आवडण्याची शक्यता कमी असते -- म्हणून सामान्यांसाठी; तर त्या वाईनचा जुनेपणा, तिच्यातले घटक इ. इ. ओळखता यावे म्हणून तज्ञांसाठी) आणि सिप (एक लहानसा घोट जिभेखाली ठेवून त्याचा आस्वाद घेणे) असे चार महत्त्वाचे 'एस' आहेत. [काही महिन्यांपूर्वी जाऊन आलेल्या वाईन टेस्टिंग टूरमधील लक्षात राहिलेले काही माहितीचे थेंब :)]
वाईनसाठी (द्राक्षासवासाठी) वापरल्या जाणार्या लाल (काळ्या) द्राक्षांचा गर पांढराच असतो. साले सोलून गराचा रस काढून आंबवला तर आसव पांढरे होते. द्राक्षासव आंबत असताना काही काळ साले त्यात राहू दिलीत तर सालातील रंग आणि फिनॉलिक रसायने द्राक्षासवात उतरतात आणि आसव लाल होते.
त्यामुळे रंगाबरोबर चवीत, तुरटपणात फरक पडतो. लाल रंगाच्या मांसाबरोबर लाल आसव, पांढर्या रंगाच्या मांसाबरोबर पांढरे, हे फार ढोबळ झाले. मध्ये मी लाल भोपळ्याची पातळ आमटी सूप म्हणून वाढली, आणि तिच्याबरोबर कॅबर्ने सोव्हिन्यों (लाल) द्राक्षासव जोडले, तसेच साल्मन माशाबरोबर लाल रियोहा; खाणार्यांना आवडले असे त्यांनी मनापासून सांगितले. "तिखट" (म्हणजे सौम्य-ते-मध्यम) भारतीय जेवणासाठी थोडेसे गोडसर द्राक्षासव देण्याची पद्धत (उदा. पिनो ग्री, रिएस्लिंग, वगैरे) ठीक आहे, पण कल्पनाशक्तीला इतकीही तोकडी ठेवू नये.
बुचाचा वास घेऊन इतकेच कळते की ते सडले आहे की नाही. वर नंदन यांनी चार "स"कारांचे चांगले वर्णन केलेलेच आहे.
माझ्या अनुभवात भारतीय मित्रांना सफेतमध्ये सुरुवात करायला आवडते. कारण लालमधली टॅनिक चव ही आवडायची असते असे पहिल्या चुसकीत कळत नाही. (टॅनिन तुरट असतात, जिभेवर त्यांचा राप चढल्यासारखा भास होतो.) आणि आवड नसली तर नाक दाबून "शिकण्यासाठी" काहीही प्राशन करण्यात काय हशील? त्यातल्या त्यात माझ्या भारतीय मित्रांना सुरुवातीला गोडकडे झुकणारी पेये आवडतात. मग त्यांना अगोड शार्दोनेच्या "Oakच्या लाकडाच्या वासाचे" मनापासून कौतुक नसते. सवय झाली की मग ही कौतुके सुरू होतात.
त्यापेक्षा आवडीने प्यालेली लांब नावाची गोड जर्मन द्राक्षासवे बरी - गेवुर्त्झरामिनेर, लिएबफ्रौझमिल्ख (लांब कुठलेही नाव!) त्यातल्या त्यात रिएसलिंग इतकी गोड नसते, तरी गोड असते. (ओळख वाढल्यानंतर ही गोड पेये भलतीच कंटाळवाणी, एकसुरी वाटू लागतात...) पांढर्या द्राक्षासवामधला आंबटपणा प्रसंगाला साजेसा असावा. एखाद्या ऊन दुपारी, पार्कमध्ये वनविहार करत असताना पेय जरा आंबट असले तर तजेलदार असते. जेवताना एखाद्या खाद्याच्या जोडीने थोडे कमी आंबट चांगले लागते.
आवडीला सुरुवात करण्यासाठी लालमध्ये शिराझ चांगली आहे, हे खरे. अगदी कळे-न-कळे गोड असते, आणि "दाट". ही ऑस्ट्रेलियामधली बहुतेक वेळा बरी असते. फ्रान्समध्ये हिलाच "सिरा" असेही म्हणतात. तिथून सुरू करून अन्य लाल प्रकारात जरूर आवड जोखावी. शिराझ ही "सोपी" असते. आवड वाढेल तशा आणखी गुंतागुंतीच्या चवी आवडू लागतील.
अर्थात "क्ष" कंपनीची शिराझ उत्तम असू शकते, आणि "य" कंपनीची शिराझ एकदम भंकस. त्यामुळे एखाद्या उत्पादकाचे पेय आपल्याला आवडू लागले, तर ती खूणगाठ बांधावी!
अवांतर : मावळावर मोहाची दारू लोक इतक्या दर्दीपणे पीतात की विदेशी लोकांच्या व्हिस्कीप्रेमाने तोंडात बोटे घालावीत. मला ती दारू आवडली नसल्यामुळे त्याची जाणकारी मी मिळवली नाही. पण या बाबतीत दर्दीपणा फक्त विदेशी लोकांत असतो हे फारसे पटत नाही. मध्यमवर्गीय मराठी माणसात नसतो, ते ठीकच आहे - हे नेहमीचे पेय नव्हे, तर जाण कधी येणार?
जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे.
हे तर आहेच,हेसन मध्ये सफरचंदाची वाईन फार प्रसिध्द आहे पण ती सर्वांना आवडतेच असे नाही.तसेच नाताळच्या सुमाराला इथे ग्लु वाईन चे फार प्रस्थ असते.ग्लु वाईन म्हणजे रेड वाईन मध्ये विविध मसाले घालून ती उकळवतात आणि कपातून गरम गरम पितात.ऍपल वाईन सुध्दा नाताळ पार्ट्यांमध्ये गरम पितात.
वर नंदनने म्हटल्याप्रमाणे ४ एस तर महत्त्वाचे आहेतच, पण वाईनचे तापमानही विशिष्ट असावे याबद्दल फिरंग्यांचा कटाक्ष असतो.
सेक्ट/शँपेन: चिल्ड सर्व करतात.(उंच निमुळता पेला)
व्हाईट वाईन: कोल्ड सर्व करतात.(गोल आणि वर थोडा उभट, उंच दांडीचा पेला)
रेड वाईनः रुम टेंपरेचरला सर्व करतात.(अर्थात येथे कक्ष तापमान २० ते २२ अंश से असते म्हणा!)(व्हाईट वाईन सारखाच, पण आकाराने मोठा आणि अगदी गोल ,वर उभट नसणारा पेला)
ग्लु वाईनः गरम(चहासारखी गरम) सर्व करतात.(कप/मग)
ऍपल वाईनः रुम टेंप ला किवा गरम सर्व करतात.उसाच्या गुर्हाळात जो पेला असतो ना,तसाच काहीसा पेला त्यासाठी वापरतात.
कोणती वाईन कोणत्या पेल्यातून सर्व करावी हे सुध्दा काटेकोरपणे पाहतात.
स्वाती
नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे.
नाशिक परिसरात, स्पेन, फ्रान्स आणि इटालियन कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य-करार (Collabaration) करून वाईन बनवणार्या कंपन्या आहेत.
उत्तम प्रतीच्या वाईन्स वाजवि दरात मिळण्याचे भारतातिल एकमेव ठिकाण म्हणजे नाशिक (१/२ बाटली रु. १४०/- रु. २५०/-).
आमचे गोरे फिरंगी नाशिकमध्ये जायला नेहमी खुश असतात.
मात्र भरपेट जेवल्या (प्यायल्यावर), त्यांची ती एस्प्रेस्सो कॉफि काही सापडत नाही. नाशिक मध्ये "कॅफे कॉफी डे" कुठे आहेत?
आम्ही तर बुवा क्वार्टर वाले. चकणा शाकाहारी असेल तर काही पण चालतो. या मिसळ पाव वर वाईनची इतकी माहिती मिळाली, पुढल्या खेपेला क्वार्टर नाही बाटलीच आणतो, ज्या रंगाची मिळेल त्या रंगाची .... चढेल ना पण? .... नाहीतर बिसलेरी वाटायची.
बाय द वे ..... ति पोर्ट वाईन का काय ती, ती कुठल्या पोर्ट वर भेटेल ....???
पोर्ट वाईन म्हणजे पोर्तुगीज पद्धतीची वाईन. तीचे चाहते फार नाहित, कारण ती गोड असते (अल्कोहोल मिश्रीत सरबत).
वाईन हा खाद्यान्नाचा एक भाग मानला जातो. म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात).
वाईन हे पेताडांचे पेय मानले जात नाही. तरीही त्याला अपवाद सर्वत्र आहेत.
वा वा,
धन्यवाद. हि माहिती मोलाची .... म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात). आम्ही सध्यातरी भारतातच असल्याने कधी वाईन घ्यायची वेळ आल्यास भारतिय चकणाच बरा.
प्रतिक्रिया
14 Dec 2007 - 10:13 pm | राजे (not verified)
ती लाल असते व ती पांढरी असते.... ईतकेच मला तर माहीत आहे बुआ..... ;}
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
14 Dec 2007 - 10:15 pm | विसोबा खेचर
ह्यावरची चर्चा वाचायला आवडेल! :)
14 Dec 2007 - 10:24 pm | राजे (not verified)
वर उल्लेखलेल्या विनोदी प्रतिसादानंतर एकदम माहीतीपुर्ण प्रतिसाद.
दोन्ही प्रकारच्या वाईन मध्ये जे उपलब्ध घटक [केलोरीज] आहेत ते सारखेच आहेत / असतात. [असला तरी थोडा फार फरक असतो..]
उदा. येथे पाहा.. http://www.annecollins.com/calories/calories-wine.htm
दोन्ही मध्ये काहीच फरक नसतो व सला तरी तो फक्त रंगाचाच असावा असा कयास.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
14 Dec 2007 - 10:25 pm | सुनील
चार जाणकारांनी जरी तुम्हाला सांगितले की अमुक-तमुक वाईन उत्तम आहे, आणि तरी ती तुम्हाला चवीला आवडली नाही तर?
तेव्हा वाईनच्या बाटल्यांवरील लेबले वाचा (खिशातील पाकीट्देखील चाचपून पहा) आणि विविध वाईन्स खरेदी करून चाखा. त्यातून तुमची आवड तुम्हाला लक्षात येईल.
माझे वैयक्तिक मत - व्हाईट वाईनमध्ये Chardonnay आणि रेड वाईनमध्ये Shiraz. अर्थात तुम्हालाही त्या आवडण्याची सक्ती नाही आणि मलादेखील त्याचा का आवडतात त्याची कारणे देण्याची गरज नाही.
(सावध तळीराम) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Dec 2007 - 7:27 am | नंदन
जाणकारांद्वारे बर्याच वाईन्सना १०० पैकी पॉइंट्स दिले जातात. वाईनच्या बाटलीवर मग ९१ पॉईंट, ९३ पॉईंट इ. माहिती तुम्हांला पहायला मिळेल. वाईनमध्ये असणार्या घटकांबरोबरच ती किती काळ मुरवलेली आहे, यावर तिची चव आणि पर्यायाने किंमत ठरते.
दुसरं म्हणजे, जेवणात रेड मीट असेल तर सोबत रेड वाईन घ्यावी, कारण या वेळी मांसाच्या तीव्र चवीसमोर व्हाईट वाईनची चव फिकी पडू शकते. व्हाईट मीट (उदा. चिकन) किंवा मासे जेवणात असतील तर व्हाईट वाईन उत्तम. सुनील यांनी सांगितल्याप्रमाणेच शार्डने आणि शिराझ या दोन उत्तम प्रकारच्या वाईन्स आहेत (अनु. व्हाईट/रेड) शार्डने जरी मूळची फ्रेंच असली तरी सध्या कॅलिफोर्नियन शार्डनेज अधिक लोकप्रिय आहेत. (रॉबर्ट मोन्डावी, सोनोमा व्हॅली, केन्डॉल जॅक्सन इ. वाइनरीजच्या शार्डनेज चांगल्या असतात.)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
15 Dec 2007 - 7:41 am | सर्किट (not verified)
ज्यांना हृदयविकार आहेत, अथवा मधुमेह आहे, त्यांनी पांढरी वाईन शक्यतो घेऊ नये. ह्याचे कारण की अँटी ऑक्सिडण्ट्स ह्या वाईन मध्ये कमी असतात.
लाल वाईन मध्ये जास्त. डॉक्टर लोकांनी काढलेले हे निष्कर्ष आहेत, मी नाही.
त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाल वाईन अधिक चांगली.
असो.
- सर्किट
15 Dec 2007 - 10:57 am | आजानुकर्ण
अँटी ऑक्सिडण्ट्सचा संबंध शरीरातील "फ्री रॅडिकल्स" मुक्त करण्याशी व पर्यायाने कर्करोगाशी असावा. हृदयविकार वा मधुमेहाशी नाही. लाल वाईनपेक्षा जास्त अँटी ऑक्सिडण्ट्स हे फळांमध्ये व (दूध न घातलेल्या) चहामध्ये असतात. त्यामुळे केवळ अँटी ऑक्सीडण्ट्स हवे असतील तर हे अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.
15 Dec 2007 - 7:38 am | सहज
एका चांगल्या दुकानात जा, (किंवा विमानतळावर ड्यूटी फ्री) तिथे वाईनच्या किंमती बघा काही बाटल्या महाग असतील. (ब्रॅन्ड नेम मुळे, टॅक्स मुळे काही बाटल्या महाग असतील. पण "माल" चांगला असण्याच्या शक्यता जास्त) त्या महाग बाटल्यांकी एक उचला. चांगली वाईन असण्याची शक्यता ९५%(बर्याचदा असते) (तुम्हाला आवडेल की नाही हा भाग वेगळा :-))
15 Dec 2007 - 1:20 pm | शलाका पेंडसे
या विषयावरील अधिक माहिती इथे मिळू शकेल.
15 Dec 2007 - 2:08 pm | धोंडोपंत
चर्चा विषय चांगला आहे. पण या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत तोकडे असल्याने आम्ही फक्त वाचनाचे काम करतो. आपले चालू द्या.
आपला,
(अनभिज्ञ) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
15 Dec 2007 - 6:30 pm | संजय अभ्यंकर
आपल्या प्रतिक्रियातून बरीच माहिती मिळ्त आहे.
शलाकाजीनी विकिपेडियाकडे ल़क्ष्य वेधल्या बद्दल आभ।री आहे.
भारतात इतर अल्कोहोलिक पेयान्पेक्ष्या वाईन्सचा खप केवळ ०.००५% आहे (सन्दर्भ www.hdfcsec.com म्हणुन त्यानि वर्षभरापूर्वि Champagne Indage ची शिफारस केली होती. आता पर्यन्त मा़झे Champagne Indage, १३९% वाढलेत).
जेन्व्हा मी फिरन्ग्यान बरोबर जेवतो, तेन्व्हा त्यान्चा वाईन्स बाबतचा चोखन्दळपणा पहावयास मीळ्तो.
दर्दि खवय्याला ज्याप्रमाणे ऊकडिचे मोदक किन्वा पुरणपोळित उन्निस बिस चालत नाही, त्याचप्रमाणे त्याना वाईन्स मधे उन्निस बिस चालत नाही.
वाईनचे तापमान, वास (बुचाचा वास वाईन मध्ये असल्यास ती वाईन जुनी आणि पिण्यास अयोग्य मानतात), after test इ.चि खात्री पटली की मगच ती पितात.
सन्जय अभ्यन्कर
15 Dec 2007 - 8:02 pm | नंदन
वाईन पिताना/पिण्यापूर्वी साईट (वाईनमधे बुचाचे कण तर तरंगत नाहीत ना, पेल्यातील द्रवाची पेल्याला स्पर्शणारी सर्वात वरची कड पारदर्शक आहे ना {यामागचे कारण विसरलो} हे तपासण्यासाठी ), स्वर्ल (ऑक्सिडेशन होऊन वाईनचा स्वाद नीट यावा म्हणून), स्मेल (त्या विशिष्ट वाईनचा गंध जर तुम्हांला आवडला नाही, तर बव्हंशी तिची चवही आवडण्याची शक्यता कमी असते -- म्हणून सामान्यांसाठी; तर त्या वाईनचा जुनेपणा, तिच्यातले घटक इ. इ. ओळखता यावे म्हणून तज्ञांसाठी) आणि सिप (एक लहानसा घोट जिभेखाली ठेवून त्याचा आस्वाद घेणे) असे चार महत्त्वाचे 'एस' आहेत. [काही महिन्यांपूर्वी जाऊन आलेल्या वाईन टेस्टिंग टूरमधील लक्षात राहिलेले काही माहितीचे थेंब :)]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
17 Dec 2007 - 8:19 pm | छोटा डॉन
माझ्या माहितीप्रमाणे विदेशात "वाईन " बरोबर ऊत्तम प्रतीचे "खारवलेले चीज " चकणा म्हणून खातात. हो पण या गोष्टीसाठी वाईन मात्र "रेड च " हवी .....
17 Dec 2007 - 10:43 pm | संजय अभ्यंकर
आपले म्हणणे खरे आहे.
वाईन बद्दल चर्चा करताना लक्षात आलेल्या काही गोष्टि म्हणजे, भारतात, वाईनला फारसे महत्व नाही.
विदेशात, वाईनमधॅ मुरवलेल्या तंबाखूपासुन सिगार तथा पाईपची तंबाखु बनवितात.
तसेच, केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात.
रेड वाईन्सच्या कोलेस्टेरॉल प्रतिबंधक गुणांमुळे त्याचे सेवनहि भारतच्या तुलनेत ज्यास्त आहे.
जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे.
संजय अभ्यंकर
17 Dec 2007 - 11:15 pm | सुनील
भारतात, वाईनला फारसे महत्व नाही.
खरे आहे. आम्हाला झटकन कीक देणारी पेयेच जास्त आवडतात!! (अशुभस्य शीघ्रम्)
केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात.
खरे आहे. आयुष्यभर मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणार्या माझ्या आजोबांना अनवधानाने (वाईन चॉकलेट मार्फत) "पाजण्याचे" पातक माझ्या डोक्यावर आहे!
परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे.
हे देखील खरे. वाईन द्राक्षाचीच असते असे नाही. प्लम आणि बेरींपासूनदेखील वाईन बनवितात (पण ती कितपत "उत्तम" असते त्याची कल्पना नाही)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Dec 2007 - 4:38 am | धनंजय
वाईनसाठी (द्राक्षासवासाठी) वापरल्या जाणार्या लाल (काळ्या) द्राक्षांचा गर पांढराच असतो. साले सोलून गराचा रस काढून आंबवला तर आसव पांढरे होते. द्राक्षासव आंबत असताना काही काळ साले त्यात राहू दिलीत तर सालातील रंग आणि फिनॉलिक रसायने द्राक्षासवात उतरतात आणि आसव लाल होते.
त्यामुळे रंगाबरोबर चवीत, तुरटपणात फरक पडतो. लाल रंगाच्या मांसाबरोबर लाल आसव, पांढर्या रंगाच्या मांसाबरोबर पांढरे, हे फार ढोबळ झाले. मध्ये मी लाल भोपळ्याची पातळ आमटी सूप म्हणून वाढली, आणि तिच्याबरोबर कॅबर्ने सोव्हिन्यों (लाल) द्राक्षासव जोडले, तसेच साल्मन माशाबरोबर लाल रियोहा; खाणार्यांना आवडले असे त्यांनी मनापासून सांगितले. "तिखट" (म्हणजे सौम्य-ते-मध्यम) भारतीय जेवणासाठी थोडेसे गोडसर द्राक्षासव देण्याची पद्धत (उदा. पिनो ग्री, रिएस्लिंग, वगैरे) ठीक आहे, पण कल्पनाशक्तीला इतकीही तोकडी ठेवू नये.
बुचाचा वास घेऊन इतकेच कळते की ते सडले आहे की नाही. वर नंदन यांनी चार "स"कारांचे चांगले वर्णन केलेलेच आहे.
माझ्या अनुभवात भारतीय मित्रांना सफेतमध्ये सुरुवात करायला आवडते. कारण लालमधली टॅनिक चव ही आवडायची असते असे पहिल्या चुसकीत कळत नाही. (टॅनिन तुरट असतात, जिभेवर त्यांचा राप चढल्यासारखा भास होतो.) आणि आवड नसली तर नाक दाबून "शिकण्यासाठी" काहीही प्राशन करण्यात काय हशील? त्यातल्या त्यात माझ्या भारतीय मित्रांना सुरुवातीला गोडकडे झुकणारी पेये आवडतात. मग त्यांना अगोड शार्दोनेच्या "Oakच्या लाकडाच्या वासाचे" मनापासून कौतुक नसते. सवय झाली की मग ही कौतुके सुरू होतात.
त्यापेक्षा आवडीने प्यालेली लांब नावाची गोड जर्मन द्राक्षासवे बरी - गेवुर्त्झरामिनेर, लिएबफ्रौझमिल्ख (लांब कुठलेही नाव!) त्यातल्या त्यात रिएसलिंग इतकी गोड नसते, तरी गोड असते. (ओळख वाढल्यानंतर ही गोड पेये भलतीच कंटाळवाणी, एकसुरी वाटू लागतात...) पांढर्या द्राक्षासवामधला आंबटपणा प्रसंगाला साजेसा असावा. एखाद्या ऊन दुपारी, पार्कमध्ये वनविहार करत असताना पेय जरा आंबट असले तर तजेलदार असते. जेवताना एखाद्या खाद्याच्या जोडीने थोडे कमी आंबट चांगले लागते.
आवडीला सुरुवात करण्यासाठी लालमध्ये शिराझ चांगली आहे, हे खरे. अगदी कळे-न-कळे गोड असते, आणि "दाट". ही ऑस्ट्रेलियामधली बहुतेक वेळा बरी असते. फ्रान्समध्ये हिलाच "सिरा" असेही म्हणतात. तिथून सुरू करून अन्य लाल प्रकारात जरूर आवड जोखावी. शिराझ ही "सोपी" असते. आवड वाढेल तशा आणखी गुंतागुंतीच्या चवी आवडू लागतील.
अर्थात "क्ष" कंपनीची शिराझ उत्तम असू शकते, आणि "य" कंपनीची शिराझ एकदम भंकस. त्यामुळे एखाद्या उत्पादकाचे पेय आपल्याला आवडू लागले, तर ती खूणगाठ बांधावी!
अवांतर : मावळावर मोहाची दारू लोक इतक्या दर्दीपणे पीतात की विदेशी लोकांच्या व्हिस्कीप्रेमाने तोंडात बोटे घालावीत. मला ती दारू आवडली नसल्यामुळे त्याची जाणकारी मी मिळवली नाही. पण या बाबतीत दर्दीपणा फक्त विदेशी लोकांत असतो हे फारसे पटत नाही. मध्यमवर्गीय मराठी माणसात नसतो, ते ठीकच आहे - हे नेहमीचे पेय नव्हे, तर जाण कधी येणार?
18 Dec 2007 - 1:05 pm | स्वाती दिनेश
जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे.
हे तर आहेच,हेसन मध्ये सफरचंदाची वाईन फार प्रसिध्द आहे पण ती सर्वांना आवडतेच असे नाही.तसेच नाताळच्या सुमाराला इथे ग्लु वाईन चे फार प्रस्थ असते.ग्लु वाईन म्हणजे रेड वाईन मध्ये विविध मसाले घालून ती उकळवतात आणि कपातून गरम गरम पितात.ऍपल वाईन सुध्दा नाताळ पार्ट्यांमध्ये गरम पितात.
वर नंदनने म्हटल्याप्रमाणे ४ एस तर महत्त्वाचे आहेतच, पण वाईनचे तापमानही विशिष्ट असावे याबद्दल फिरंग्यांचा कटाक्ष असतो.
सेक्ट/शँपेन: चिल्ड सर्व करतात.(उंच निमुळता पेला)
व्हाईट वाईन: कोल्ड सर्व करतात.(गोल आणि वर थोडा उभट, उंच दांडीचा पेला)
रेड वाईनः रुम टेंपरेचरला सर्व करतात.(अर्थात येथे कक्ष तापमान २० ते २२ अंश से असते म्हणा!)(व्हाईट वाईन सारखाच, पण आकाराने मोठा आणि अगदी गोल ,वर उभट नसणारा पेला)
ग्लु वाईनः गरम(चहासारखी गरम) सर्व करतात.(कप/मग)
ऍपल वाईनः रुम टेंप ला किवा गरम सर्व करतात.उसाच्या गुर्हाळात जो पेला असतो ना,तसाच काहीसा पेला त्यासाठी वापरतात.
कोणती वाईन कोणत्या पेल्यातून सर्व करावी हे सुध्दा काटेकोरपणे पाहतात.
स्वाती
18 Dec 2007 - 8:15 pm | संजय अभ्यंकर
आपल्या लिखणावरुन आपण जर्मनित रहता असे वाटते.
युरोपातील (तसेच जगातिल अनेक देश) देश, आपापल्या देशातील वाईन्सची वैशिष्ट्ये जपतो.
जर्मनही त्याला अपवाद नाहीत. ते स्ट्रॉबेरीची वाईन अप्रतिम बनवितात.
संजय अभ्यंकर
9 Jan 2008 - 12:43 am | सुनील
अरे इथे कोणी नाशिककर आहे का? जरा जाऊन या आणि सांगा कसे वाटले ते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jan 2008 - 12:25 am | संजय अभ्यंकर
सुनीलजी,
नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे.
नाशिक परिसरात, स्पेन, फ्रान्स आणि इटालियन कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य-करार (Collabaration) करून वाईन बनवणार्या कंपन्या आहेत.
उत्तम प्रतीच्या वाईन्स वाजवि दरात मिळण्याचे भारतातिल एकमेव ठिकाण म्हणजे नाशिक (१/२ बाटली रु. १४०/- रु. २५०/-).
आमचे गोरे फिरंगी नाशिकमध्ये जायला नेहमी खुश असतात.
मात्र भरपेट जेवल्या (प्यायल्यावर), त्यांची ती एस्प्रेस्सो कॉफि काही सापडत नाही. नाशिक मध्ये "कॅफे कॉफी डे" कुठे आहेत?
संजय अभ्यंकर
10 Jan 2008 - 12:36 am | सुनील
नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे.
मान्य. पण वाईन पिण्याचे "कल्चर" भारतीयांनी अजूनतरी आपलेसे केलेले नाही.
भारतीय हे मूळातच "पेग्"बहाद्दर!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jan 2008 - 1:31 pm | धमाल मुलगा
एकदाच रेड वाईन घेतली होती, आवडली ही होती, पण पुन्हा तशी क॑पनी न मिळाल्याने पुन्हा काही योग जुळून नाही आला.
अन सुनीलभौ, 'पेग' बहाद्दर तसे शेरातच थोडेफार घावनार, तशी तर आपल्याकडे 'क्वाट्टर' शिष्टीमच जोरात चालते, न्हाई का?
असो,
आपला,
- (ताम्र वारूणी साधक) धमाल.
10 Jan 2008 - 4:41 pm | बहुरंगी
आम्ही तर बुवा क्वार्टर वाले. चकणा शाकाहारी असेल तर काही पण चालतो. या मिसळ पाव वर वाईनची इतकी माहिती मिळाली, पुढल्या खेपेला क्वार्टर नाही बाटलीच आणतो, ज्या रंगाची मिळेल त्या रंगाची .... चढेल ना पण? .... नाहीतर बिसलेरी वाटायची.
बाय द वे ..... ति पोर्ट वाईन का काय ती, ती कुठल्या पोर्ट वर भेटेल ....???
11 Jan 2008 - 12:16 am | संजय अभ्यंकर
बहुरंगी साहेब,
पोर्ट वाईन म्हणजे पोर्तुगीज पद्धतीची वाईन. तीचे चाहते फार नाहित, कारण ती गोड असते (अल्कोहोल मिश्रीत सरबत).
वाईन हा खाद्यान्नाचा एक भाग मानला जातो. म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात).
वाईन हे पेताडांचे पेय मानले जात नाही. तरीही त्याला अपवाद सर्वत्र आहेत.
संजय अभ्यंकर
11 Jan 2008 - 10:50 am | बहुरंगी
वा वा,
धन्यवाद. हि माहिती मोलाची ....
म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात).
आम्ही सध्यातरी भारतातच असल्याने कधी वाईन घ्यायची वेळ आल्यास भारतिय चकणाच बरा.
आपला,
बहुरंगी मिसळे