ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 Apr 2018 - 8:12 am
गाभा: 

ग्रह/नक्षत्रे

१. प्राचीन काळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते हे लोकांना स्वत: पाहता येत होतं.त्यामुळे चंद्रामुळे मानवी जीवनावरसुध्दा काय परिणाम होतो याचा शोध घेण्यास चालना मिळाली असावी; पण अन्य ग्रह मात्र आकाशात चंद्राइतके स्पष्ट दिसत नाहीत,किंवा त्यांचं निरिक्षण करण्यासाठी,त्यांचे मानवी जीवनावरचे परिणाम तपासण्यासाठी त्यांचं सखोल निरिक्षण करणं गरजेचं होतं.पण प्राचीन काळी तितक्या सक्षम दुर्बिणी नव्हत्या.
हर्षल,नेपच्युन,प्लुटो हे तीन ग्रह तुलनेने अलिकडच्या काळातले म्हणता येतील.सूर्य,चंद्र सहज दिसतात.मंगळही थोडं बारिक निरिक्षण केलं असता दिसू शकेल पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत.
मग या ग्रहांचे मानवी जीवनावरचे परिणाम त्या लोकांनी कसे शोधून काढले असावेत? त्यासंबंधीचे नियम कसे बनवले असावेत?
अशाच प्रकारे नक्षत्रांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम प्राचीन काळी कसे शोधले गेले असावेत? कोणती साधनं या संशोधनासाठी वापरली गेली असावीत?

प्राचीन ग्रंथामंधे उदा. वराहमिहिरच्या पंचसिध्दांतिका या ग्रंथात ग्रहांची कार्यतत्वे दिली आहेत.ती आजही उपयुक्त आहेत.मग ती कोणत्या साधनाद्वारा शोधली गेली असावीत? हे शोधाशोधीचं काम नक्की कोणत्या कालखंडात झालं असावं?

बुध,शुक्र,गुरु,शनी यांचा शोध या प्राचीन संशोधकांना कसा लागला असावा? की हे काम एलियन्सचे असावे? त्यांनी मानवाला आयतंच हे ज्ञान दिलं असावं का?

तळटीप: इथे ग्रहांचा,नक्षत्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे गृहित धरले आहे.वरील ग्रहांचा शोध आणि त्यांचे मानवावरील परिणाम कसे शोधले गेले असावेत यावर चर्चा अपेक्षित आहे. ज्योतिष खरे की थोतांड यासाठी धागा काढलेला नाही.

रत्ने/स्फटीके

२. अंगठीत बसवलेला खडा किंवा रत्न हे स्फटीकाचेच रुप.याला Crystal म्हणू शकतो.अशा प्रकारे Crystal कोट्यावधी किमीवरुन येणार्‍या लहरी किंवा ग्रहांकडून जे काही येतं ते पकडू शकतो? घालणारी व्यक्ती कुठेही असली तरी?स्फटिकाची/रत्नांची लहरी इत्यादी स्विकारण्याची आणि त्या साठवण्याची ताकद किती असू शकते?

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2018 - 4:17 pm | प्रकाश घाटपांडे

http://www.misalpav.com/node/3977 हा धागा वाचा

मार्मिक गोडसे's picture

28 Apr 2018 - 8:49 pm | मार्मिक गोडसे

मंगळही थोडं बारिक निरिक्षण केलं असता दिसू शकेल पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत.
कोण म्हणतं?शुक्र तर कधीकधी संध्याकाळी सुध्दा स्पष्ट दिसतो. रात्रीच्या आकाशात बुध, गुरु, शनीही दिसतात, फक्त त्यांचे स्थान आणि उगवण्याची वेळ माहीत असणे गरजेचे आहे.
ग्रहांचे खडे घातल्याने फायदा होतो की नाही ह्याचा अनुभव नाही, परंतू काही खडे काढल्याने नक्कीच फायदा होतो. उदा: पित्त खडे , मूतखडे .

१) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व&१ संशोधन (म्हणा) खालडिअन&२ लोकांनी केलय. ते ग्रीकांनी इथे इपू दुसय्रा शतकात आणलं. हे राशीस्वामी इत्यादींंसह आपल्याकडचे चांद्रनक्षत्रफल आणि साडेसाती यास पारंपरिक म्हटलं जातं.

&१ - ग्रह काय करतात याची गृहितकं.
&२ - आताचा सिरिया, इराकचा भाग.

२) खडे आणि रत्ने हे तोडगे आहेत. ते ठरवणं हेसुद्धा समजुतींवरच आधारीत आहेत. त्याचा कीस पाडण्यात अर्थ नाही.
भांडखोर बायकोस पाचू ठीक असला तरी सैनिकास काय उपयोग? वेडसराला पुष्कराज वापरून पाहायला हवा. वाण्याला मोती लाभू शकतो.

उपयोजक's picture

28 Apr 2018 - 10:04 pm | उपयोजक

कंजुसजी!!

उपयोजक's picture

28 Apr 2018 - 10:29 pm | उपयोजक

१. याचा अर्थ ज्योतिष मूळचं खाल्डीयन/ग्रीक आहे?

२. तसं असेल तर त्यांनी हे संशोधन का केलं असावं?

३. या संशोधनासाठी दुर्बिणी किंवा आवश्यक साधनं कशी बनवली? दुर्बिणी इतक्या प्राचीन आहेत का?

४. ही निरीक्षणं फायनलाईज्ड करण्यापूर्वी किती काळ ती केली गेली असावीत?

>>ग्रहांची कार्यतत्वे दिली आहेत.ती आजही उपयुक्त आहेत.मग ती कोणत्या साधनाद्वारा शोधली गेली असावीत? >>

कार्यतत्वे आणि कार्यकत्व या शब्दांमध्ये गल्लत होतेय का? ज्योतिषात कार्यकत्व हा शब्द आहे तो अमुक एक ग्रह जातकाच्या कोणत्या गुणांवर प्रभाव टाकतो ही गृहितककं ठरवण्यासाठी साधनं,दुर्बिणी नाही लागत.

क्र २) - हे लोक व्यापार करत ,वाळवंट आणि समुद्रात रात्रीही प्रवास करत. तेव्हा ग्रह तारे दिशा दाखवत. ( यास निरयन निरीक्षणं म्हणतात) आयुष्यातल्या घटनांशी संबंध जोडायचा हळूहळू प्रयत्न झाला असणार.
फाइनलाइझ्ड झाली असं कोणीच म्हणत नाही.

उपयोजक's picture

29 Apr 2018 - 10:49 am | उपयोजक

दुरुस्तीबद्दल धन्स! :)

'सामान्य विज्ञाना'चे सामान्य ज्ञान असले तर गुरु, शुक्र हे ग्रह सहज ओळखता येतात, किंबहुना मंगळापेक्षाही सहज. बुध, शनी यांचे मात्र नक्की स्थान माहित असावे लागते.

चौकटराजा's picture

2 May 2018 - 4:07 pm | चौकटराजा

बुध वा शनी पंचागाचा आधार घेतल्या शिवाय नक्की दिसणारा नाही .

दीपक११७७'s picture

30 Apr 2018 - 1:05 pm | दीपक११७७

ग्रहांच नक्षत्रांच मानवावर परिणाम होत असावा
एक अनुभव सांगतो.
एका मुस्लीम व्यक्ती शी नातेवाईक सोबत भेट घेतली
तो व्यक्ती चेह-यावरुन जन्म वार सांगायचा
त्याने माझा जन्मवार, माझ्या भावजीचा, पुतण्याचा तसेच एका मित्राचा , वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटीत अचुक जन्मवार सांगीतला होता.
तो चेह-याच निरीक्षण करायचा व सांगाच्या
ही घटना एकदम सत्य आहे.
साधारण १६-१७ वर्षा पूर्वीची.
यावरून जन्मावेळी ग्रहांचा व नक्षत्रांचा परिणाम शरिरावर होतो या दाव्याला पुष्टी मिळते (किमान माझ्या पुरते तरी).
सध्या एवढेच.

चौकटराजा's picture

2 May 2018 - 4:04 pm | चौकटराजा

त्या माणसाने तुमचा चेहरा पाहिला जन्मवार सांगितला इथपर्यंत चेहरा हे इनपुट व जन्मवार हे आउट पुट हा परस्पर संबंध प्रस्तापित होतो . यात ग्रहः नक्षत्रे ही संप्रेरक म्हणून आली की काय ?

दीपक११७७'s picture

2 May 2018 - 10:17 pm | दीपक११७७

वार पासुन पुढे खणतं खणतं गेला तर मुळाशी ग्रह नक्षत्रच सापडतील.
You can try

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2018 - 10:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्योतिष खरे की थोतांड यासाठी धागा काढलेला नाही.

छ्या, मला या विषयावर धागा काढायचा होता, याला काय अर्थ आहे. बो़लू दिलं पाहिजे लोकांना. :)

बाय द वे, कोणतेच दगड गोटे कोणाच्या आयुष्यात कोणतीच उलथापालथ करु शकत नाही, कोणत्याच दगड गोट्यांचा म्हणजे ग्रहांचा आणि बोटातील खड्यांचा माणसावर कोणताच परिणाम होत नाही. ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने यांच्या नादी लागू नका. हाती काहीही येत नाही. पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे. आयुष्याचा मौल्यवान वेळ या दगड गोट्यांसाठी घालवू नका. मस्त बियरच्या पॅक भरा. हॉट घेत असाल तर ९० एमएल आठवड्यात एकदा घेत चला. चांगला चखना घ्या, संपवा. भांडन करु नका. कुंटुंबाशी बोला. फिरवून आणा. विषय संपला. एवढे दोन शब्द बोलून या धाग्यावरुन रजा घेतो. बाकी चर्चा चालू ठेवा. सालं लै मनोरंजन होतं. आयुष्यात मनोरंजन लागतं.

-दिलीप बिरुटे
(ब्लाइंडर ग्रहावर बसलेला) ;)

महत्वाकांक्षा नसलेली माणसं निरनिराळे उपाय करून पाहात नाहीत. आहे ते प्राक्तन पत्करून एकाच धोंड्यामागच्या सावलीत पडून राहतात. उगाच कशाला ठेचकाळत दुसरे धोंडे शोधत फिरायचं? कुठेही बसायचंच आहे ना?