साहित्य
३ ते ४ मध्यम आकाराचे पापलेट, अख्खे, साफ करून, चिरा मारून
१/२ वाटी अमूल बटर
१५ ते २० लसूण पाकळ्या
२ चमचे मीठ
२ चमचे काळीमिरी पावडर
१ चमचा मिक्स्ड हर्ब्स/ओरेगॅनो सीझनिंग
१ चमचा रेड चिल्ली फ्लेक्स
एका लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
पापलेटला काळीमिरी आणि मीठ, आतून बाहेरून लावून साधारण १५ ते २० मिनिटे ठेवावे. तो पर्येंत लेमन गार्लिक बटर बनवून घेणे.
एका छोट्या कढईत, बटर घालावे. गॅस मंद ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. मंद आचेवर लसणीचा छान वास सुटेस्तोवर हलवत राहावे (लसूण जळता कामा नये). लसूण शिजला, कि त्यात मिक्स्ड हेर्ब्स, चिल्ली फ्लेक्स घालून अजून १ ते २ मिनिटे बटर हलवून घेणे. गॅस बंद करून त्यात एका लिंबाचा रस घालावा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिश्रणाची चव घेऊन मीठ घालावे.
ग्रिल पॅन मोठ्या गॅस वर चांगला तापू द्यावा. ब्रश ने थोडंसं तेल लावून, पॅन वर पापलेट भाजायला घ्यावा. एका बाजूला साधारण ३ ते ५ मिनिटे भाजून मग पापलेट दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा.. दोन्ही बाजूने भाजून झाला कि वरून ब्रशने लेमन गार्लिक बटर दोन्ही बाजूने लावून गरम गरम पापलेट सलाड सोबत सर्वे करावा!
बटर, लसूण, आणि लिंबा मुळे एक अप्रतिम चव येते. अर्थातच पापलेट जितका ताजा तितकी जास्ती ह्याची मज्जा!
प्रतिक्रिया
27 Apr 2018 - 2:14 pm | manguu@mail.com
आता माशाच्या आकाराचे वांगे शोधावे लागेल.
10 May 2018 - 5:04 pm | विशुमित
वांगी भेटली तर द्या वानवळा पाठवून..!
27 Apr 2018 - 2:18 pm | कपिलमुनी
प्रेझेंटेशन मध्ये तुम्हि जगातल्या टॉप शेफच्या तोडीचे आहात .
27 Apr 2018 - 6:10 pm | केडी
प्रोत्साहाना बद्दल आभारी आहे...
_/\_
10 May 2018 - 5:05 pm | विशुमित
खूप सहमत.
ते भाजलेले लिंबू बघा की.. कुठनं सुचते एवढे राव.!
27 Apr 2018 - 3:13 pm | श्वेता२४
पक्की शाकाहारी असले तरी ही पाककृती वाचायला व पाहायला आवडली
27 Apr 2018 - 3:54 pm | चांदणे संदीप
पापलेट लैच्च आवडला! तोंपासु!
Sandy
27 Apr 2018 - 6:23 pm | उगा काहितरीच
सुख !
28 Apr 2018 - 4:02 pm | नूतन सावंत
केडी, भीषण भालो.
28 Apr 2018 - 5:21 pm | केडी
धन्याबादा....
28 Apr 2018 - 7:47 pm | तुषार काळभोर
तरी चिकन ब्रेस्ट वर हा प्रयोग करून बघतो.
28 Apr 2018 - 8:08 pm | निशाचर
फोटो मस्तच!
28 Apr 2018 - 10:09 pm | मदनबाण
मिपावरच्या अश्या पाकृ पाहुन पाहुन मी मस्त्याहारी होणार एक दिवस ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing part 2
28 Apr 2018 - 11:02 pm | पिंगू
प्रेझेंटेशन दिमाखदार आहे. कोपर्यांवर स्मोकवलेले कांदा आणि लिंबू आवडले.
29 Apr 2018 - 8:27 pm | एस
करणार!
30 Apr 2018 - 2:15 pm | सोत्रि
बटर पार वितळून गेलंय, गार्लिक बटर साॅस क्रीमी असता तर झॅक झाले असते!
- (खवय्या) सोकाजी
1 May 2018 - 6:28 pm | केडी
साॅस क्रिमी कसा करायचा जरा सांगाल का?
1 May 2018 - 10:19 pm | सोत्रि
मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत घोळवत मेल्ट करायचे.
‘मंद आच‘ हा की पाॅईंट आहे.
https://youtu.be/l9XtQ4bGb_s
https://youtu.be/84zkT4FIaOk
हे दोन व्हिडीयो रेफरंससाठी.
- (खवय्या) सोकाजी
2 May 2018 - 8:41 am | केडी
मंद का, बरं बरं...
4 May 2018 - 8:17 pm | आनंदी गोपाळ
थोडक्यात लोण्याचे तूप होऊ न देता फक्त मेल्ट करायचे.
9 May 2018 - 3:33 pm | पियुशा
जबराट !!!
9 May 2018 - 4:41 pm | जागु
लय भारी.
10 May 2018 - 1:35 pm | सुमीत भातखंडे
भारीये
10 May 2018 - 3:52 pm | कंजूस
नवनीत अवगुंठीत लसुण अन लिंबू चटणीतील फडफडीत पापलेट, मदनबाणा. पनीरच्या पापुद्र्यांत वांग्याचे काप घालून काम होईल.
10 May 2018 - 8:40 pm | वीणा३
मस्त रेसिपी. जबरदस्त सादरीकरण!!!
पनीरच्या पापुद्र्यांत वांग्याचे काप घालून
अरे देवा !!! :प :)