तरुण म्हणवता म्हणवता आत्ता तीस ते पस्तीस वर्षाचा झालेला , आज आपला भारत देश एका मिनिटाने म्हातारा झाला.

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
27 Apr 2018 - 1:44 pm
गाभा: 

हो हे खरंय .. आज अकरा निष्पांप कोवळी मुलं चिरडून मेली ट्रेनखाली . अरे , कुठे कुठे म्हणून छाप लावायचं . सालं असलं काही वाचलं कि डोकंच चालेनासे होते. खरंच मला आता काहीच सुचत नाहीय . दिवसाढवळ्या अंधार दाटलाय . हे असंच शिरकाण चालू राहिलं तर काही खरं नाही . मी नेहेमी देवाकडे प्रार्थना करतो निरागस मुलांचे रक्षण करण्यासाठी पण ती काही फळाला येतेय असे दिसत नाही . अनाथालयात स्वतः जाऊन भरगोस मदत करतो , निव्वळ त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं तरी मला ढसाढसा रडू येते . हात आपोआप मोकळे होतात . देवाकडे करून भाकतो त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी . काही मुलांना वेळ मिळेल तसा शिकवतो, देतो गणिताचे मोफत धडे . त्यांचे गरीब आईबाप भरपूर आशीर्वाद देतात . तरीही हे असं वाचलं कि मन खूप खूप विषन्न होते . हे कधी थांबणार ? मला तरी काहीच सुचत नाही आहे . कुणीतरी यावर प्रकाश टाकेल का ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर