सल्ला हवा : लोखंडी तवा

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in काथ्याकूट
23 Apr 2018 - 10:25 am
गाभा: 

मी काल एक लोखंडी कढई आणि एक लोखंडी तवा विकत घेतला आहे.
त्यावर "वर्जिन लोखंडाच्या पट्टीपासून तयार केलेले आहे " असे लिहिलेले आहे.
वरील भांडी आणि बीड (कास्ट आयर्न) यांच्यात काय फरक आहे ?

त्यावर "ते आधीच सिझन केलेले आहेत" असा कोणताही उल्लेख नाही. तरीही त्यांच्यावर काळे कोटिंग आहे. साबणाने आणि ब्रशने घासले तर काळे कोटिंग निघत आहे. हे आधीच केलेले सिझनिंग आहे का?

तरीही मी एका कढईला घास-घासून, बोटाला काळे लागणार नाही इथवर आणले आहे. त्यानंतर तेल लावून गरम केले.

त्या कढईत आज सकाळी पालकाची भाजी केली. इतक्या लवकर भाजी करणे योग्य आहे का? भाजी उतरवल्यावर जे थोडेसे पाणी उरले होते त्यात काळे सूक्ष्मकण दिसले. "इतना टार, इतना टार " या झैरातीची धडकी आधीच भरलेली आहे त्यामुळे म्हणा हवंतर, ही भाजी खायचे मन होईना.

जर तवा/कढई व्यवस्थित सिझन करून घ्यायचे असेल तर काय करावे लागेल? आणि किती दिवस करावे लागेल?

शिवाय एकदा केलेले सिझनिंग किती काळ वापरावे? पुन्हा सगळं घासून नव्याने सिझनिंग करण्याची वारंवारता किती?

प्रत्येक वापरानंतर भांडे साबणाने/राखेने धुतले तर चालते का? कि साफ करून तसेच ठेवून द्यावे? प्रत्येक वापरानंतर तेल चोपडून ठेवावे लागते का?

[संपादक: मला प्रश्नोत्तरे प्रकारात लेखन करायला परवानगी नाही त्यामुळे काथ्याकूट प्रकारात करावे लागते आहे]

प्रतिक्रिया

नॉनस्टिक कोटिंगवाला तवा घेऊन त्यावरचं { आतून लावलेलं } कोटिंग खरवडून काढलं?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Apr 2018 - 12:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

नाही. लोखंडीच घेतलं. पण त्यावर काळे आवरण आहे कसलं!

अभ्या..'s picture

23 Apr 2018 - 4:43 pm | अभ्या..

व्हर्जिन लोखंडाची पट्टी म्हणले की हसू आले.
असो. माझ्या स्वल्प बुध्दीनुसार बीडाचे म्हनजे कास्ट आयर्न हे साच्यातून काढलेले लोखंड असते. उंचावरुन पडले की फुटते, सच्छिद्र असते थोडेसे.
बाजारातले तवे नीट बघितले तर मशीनवर टर्निंग केलेले दिसतात. शिवाय काळा कलर लावलेला असतो. ते कोटिंग नसते. कोटिंग असले तर बोटाला लागणार नाही. बहुधा तवा काळाभोर दिसावा आणि गंज लागू नये म्हनून हा कलर लावत असावेत. कारण थोड्या दिवसानी उघड्या तव्यावर थोडेसे पाणी जरी राहिले तरी तांबूस गंज चढतो.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Apr 2018 - 12:27 pm | हणमंतअण्णा शंकर...

अभ्याजी, धन्यवाद.

गंज चढला आहे. आता विटेने घास घासून कोटिंग आणि गंज काढून टाकतो. पुन्हा तेल लावून गरम करतो. दहाएकवेळा केल्यावर वापरायला काढतो. बरंच मेंटेनन्सचं काम आहे एकंदरीत.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 4:48 pm | जेम्स वांड

अजो साहेबांना सल्ला मागा, लोहयुगापासून अवकाशयुगा पर्यंत, मार्गे मेटलर्जीची आयमाय करीत लेखापेक्षा दिडपड लांब सल्ला मिळेल! :))

एमी's picture

23 Apr 2018 - 9:09 pm | एमी

https://www.maayboli.com/node/25369 तव्यांबद्दलची चर्चा

इकडे पहिल्यापासून चर्चा तापलीच पाहिजे.

व्हरजिन लोखंड, तवा सीझनवणे वगैरे वाचून गदगदून आले. आम्ही वर्षानुर्षे साधा लोखंडी तवा वापरत आलेलो आहोत. दर वेळी किंवा दोन-तीन दिवसातून एकदा मऊ विटेच्या तुकड्याने घासून चकचकीत करायचा आणि लगेच पुसून ठेवायचा. काय बी होत नाय.
बोहरा बाजारात उत्तम लोखंडी तवे मिळतात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Apr 2018 - 12:31 pm | हणमंतअण्णा शंकर...

चित्रगुप्त, गदगदून आले त्याला काही करता येणार नाही. वीट कितपत भाजलेली असावी असंही विचारून पाहावं असं मनात आलं. तुम्ही आवंढास गिळला असेल एव्हाना!

असो, पण, गांभीर्याने विचारतो,

गंज येणं साधारणतः किती वापरणे बंद होतं?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Apr 2018 - 12:32 pm | हणमंतअण्णा शंकर...

गंज येणं साधारणतः किती वापराने बंद होतं?

तापवून तापवून लोखंडाचे काय स्टेनलेस स्टील होणारे का? ;)
जोपर्यंत ते लोखंड आहे आणि त्यावर डायरेक्ट पाणि लागले आणि राहिले (जर तेल किंवा तत्सम इतर काही थर नसताना) तर गंजणारच. सतत वापर आणि वापरुन झाल्यावर कोरडा करुन पातळ तेलाचा हात फिरवून ठेवणे हाच उपाय.

अरविंद कोल्हटकर's picture

23 Apr 2018 - 11:18 pm | अरविंद कोल्हटकर

तवा सीझनिंग वरून आठवले.

जुन्या दिल्लीमध्ये ’गली पराठेवाली’ मध्ये मिळणारे पदार्थ इतके चवदार का असतात? ह्याचे कारण म्हणजे शहाजहानच्या काळात विस्तवावर चढलेले तवे अजून उतरवण्यात आलेले नाहीत!

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 6:47 am | जेम्स वांड

पहिला तवा १८७०च्या दशकात चढला.

तुमचे रावळगुंडवाडी गाव जर अमेरिकेत असेल तर व्हर्जिन लोखंडवाला, सीझनाळलेला तवा 'ऑरगॅनिक', 'ग्लुटेन फ्री' आणि एफडीए सर्टिफाईड असल्याची खात्री करून घ्या.
.

प्रसाद गोडबोले's picture

24 Apr 2018 - 1:06 am | प्रसाद गोडबोले

ऑर्गॅनिक , ग्लुटेन फ्री लोल लोल !!

अजुन कोशर / जैन / हुमेन / इथिकली कॅचड असले काही टॅग लावता येतील !!

तुषार काळभोर's picture

24 Apr 2018 - 7:36 am | तुषार काळभोर

वेगन राहिलं

कंजूस's picture

24 Apr 2018 - 8:30 am | कंजूस

वोकच्या आकाराची कढई/पॅन अजुनही मिळत नाही सहजासहजी.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2018 - 9:54 am | चौथा कोनाडा

मला तर हा हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ड्युआयडी वाटतोय ( कारणः इचित्र नाअव अन सभासद काळः 3 months 2 weeks)
२०१९ निवडणुका व मोदींवरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी हा नवा तवा तापवायला तर घेतला नसेल ?

कोण असावा बरे हा ड्युआयडी?

वडाप's picture

26 Apr 2018 - 8:37 pm | वडाप

काय पावनं काय म्हनता?