स्टॅन्ड अप कॉमेडी.

चिनार's picture
चिनार in काथ्याकूट
21 Apr 2018 - 3:38 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो..
तर झालं असं की, एक-दीड महिन्यापूर्वी होळीच्या दिवशी कंपनीत एक छोटासा कार्यक्रम झाला. होळीचे गाणे म्हणणे, शेरोशायरी वगैरे वगैरे..तिथं अचानकच अस्मादिकांना स्फुरण चढलं. आणि ताबडतोब माईक हातात घेऊन स्टॅन्ड अप कॉमेडी सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. माझ्याच लिखाणातला काही भाग वापरून मी साधारण पंधरा मिनिटाचा कार्यक्रम केला. साधारण सत्तर-ऐंशी लोकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. बऱ्याच लोकांनी नंतर भेटून असे आणखी कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला.

मग थोडी चौकशी केल्यावर या क्षेत्रात येण्यासाठी आधी ओपन माईक प्रकारात प्रॅक्टिस करावी असे कळले. ओपन माईक म्हणजे शहरातल्या कॅफे,रेस्टॉरंट वगैरे ठिकाणी काही छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथल्या प्रेक्षकांसमोर जाऊन पाच-सात मिनिटाचे परफॉर्मन्स असतात. यासाठी कुठलेही शुल्क दिले-घेतले जात नाही. थोडी शोधाशोध केल्यावर,मागल्या आठवड्यात एका ओपन माईक मध्ये सादरीकरण केले. तिथेही प्रतिसाद चांगला मिळाला. पण दुर्दैवाने मी राहत असलेल्या नागपुरात असे कार्यक्रम फार कमी होतात.
याविषयी मिपाकरांचे थोडे मार्गदर्शन हवे आहे.

१. स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यासाठी आपणच ओपन माईक करावेत का? एका ओपन माईकचा साधारण खर्च पाच हजार असतो. त्यात कॅफेचं भाडं, साउंड सिस्टिमचा खर्च वगैरे येतो.
२. ओपन माईक मध्ये सुरवातीला प्रेक्षक गोळा करण्यासाठी काय करता येईल?
३. या प्रकारात अडल्ट आणि ड्युअल मिनिंग जोक्स जास्त प्रचलित आहेत. त्यांना प्रतिसादही चांगलाच मिळतो. पण स्टेजवर या प्रकारचा विनोद करण्यास मी इच्छुक नाही. याविषयी काय करावे?
४. स्वतः:चे व्हिडियो तयार करून नेटवर अपलोड करावे का? यासाठी कोणी तांत्रिक मदत करू शकत असल्यास उत्तम.

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Apr 2018 - 3:59 pm | पैसा

ओपन कॅफे पेक्षा आकाशवाणी/एफ एम वर संधी मिळणे शक्य आहे का?

ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तर नक्कीच करू शकता.

पैसा's picture

21 Apr 2018 - 4:03 pm | पैसा

इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कोणाशी बोलून बघा.

अभ्या..'s picture

21 Apr 2018 - 4:16 pm | अभ्या..

स्वतः क्रियेटिव्ह स्क्रिप्टिंग करुन ते फ्ल्युएन्ट आणी स्टाईलमध्ये सादर करण्याची आवड असेल तर एफेम चॅनल्स वर संधी आहे.
आता चिनारभाव एक्दम क्रीस्पी आणि स्टायलिश लिहितात हे माहीत आहे पण त्यांचा आवाजाचा पोत/टेक्श्चर कसे आहे किंवा लिहिलेले सादर करण्याची स्टाईल कशीय ते महत्त्वाचे आहे. थोडंसं ईंटरॅक्टीव्ह वाटेल (म्हनजे लिसनरशी संवाद साधताय असे वाटेल) असे छोटेछोटे स्क्रीप्ट्स तयार करुन ते प्रोफेशनल स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करा. मग ते नुसते ऑडिओ असु देत की व्ह्डिओ. व्हिडीओ करताना मात्र ड्रेस, बॅक्ड्रॉप, चेहर्‍याचे हावभाव, हातवारे ह्याची पूर्ण प्रॅक्टीस करुनच तयार करुन घ्या. हा तुमचा पोर्ट्फोलिओ तयार होईल. मग एफेम चॅनल्सवर तुम्ही हे देऊ शकता. अगदीच आरजे म्हणून लगेच नसले तर स्टुडिओ आर्टिस्ट, क्रियेटिव्ह कंटेट रायटर, अ‍ॅड साठि व्हॉईसोव्हर अशी बरीच कामे एफेम चॅनेलमध्ये चालतात.
पोटापुरती नोकरी करुन ह्या फिल्डमध्ये साधण्यासारखे करीयर म्हनाजे स्टेज अँकरिंग. लै अफाट संधी आहे हो ह्यात. आता तर व्ह्डिओ प्रेझेंटेशन मध्ये पण हायर्ड अँकर्स् कडून काम करुन घेतले जाते.
ते अ‍ॅडल्ट आणि ड्युएल मिनिंग जोकचे इतके काही महत्त्व नसते. त्याचा विचार न केल्यास उत्तम.
प्रेक्षक मिळवण्यासाठी सरळ युट्युबचा आसरा घ्या. काही चांगले स्क्रीप्टस वर स्टॅण्डप्स तयार करुन अपलोड करा. त्याची जमेल तितकी फुकटात झैरात करा. (व्हाटसप, फेसबुक, गुगलप्लस, मित्रमंडळी, नातेवाईक, कलीग्स)
बेस्ट ऑफ लक.

चिनार's picture

21 Apr 2018 - 4:34 pm | चिनार

धन्यवाद अभ्या भौ..
तू म्हणतोय तसं स्क्रिप्ट्स तयार करायला घेतो आता.
यु ट्यूब वर टाकण्यासाठी सुद्धा प्रोफेशनल स्टुडियोतून व्हिडियो करून घ्यावे का? कारण अगदीच मोबाईलवर केलेले व्हिडियो जास्त वेळ पाहता येत नाहीत. आणि या स्टुडियोवाल्यांचे चार्जेस कसे असतात?

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2018 - 4:27 pm | पिलीयन रायडर

भाडीपा वाल्यांनी SMS (सिक्रेट मराठी स्टॅन्ड अप बहुदा) ह्या नावाने काही तरी सुरू केलं आहे. तिथे संपर्क करून बघा. पुणे मुंबईतच होतात बरेच शो, पण मध्ये एकदा ते नागपूरला गेले होते.

जोक्स नॉन व्हेजच असायला हवेत असं काही नाही. फॅमिली ओडियन्स साठी असूच शकते की स्क्रिप्ट.

युट्युब चॅनल सुरू करू शकता. प्राजक्ता कोळी चे युट्युब चॅनल पटकन आठवलं, बघून घ्या.

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2018 - 4:33 pm | पिलीयन रायडर

आणि हो, भाडीपा करिता सारंग साठ्ये ला संपर्क कराल तेव्हा आपल्या मिपाचा रेफरन्स द्या. गोष्ट तशी.. मध्ये त्याची (आणि निपुणची) मुलाखत घेतली होती आपण.

सारंगचा मेल आयडी हवा असेल तर कळवा. चांगला माणूस आहे तो. करेल मदत. (आजमितीच्या अनुभवा वरून!)

चिनार's picture

21 Apr 2018 - 4:37 pm | चिनार

धन्यवाद पिरातै..
सारंग साठ्येचा इमेल आय डी द्या. संपर्क करून बघतो.

जेम्स वांड's picture

21 Apr 2018 - 4:51 pm | जेम्स वांड

१. स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यासाठी आपणच ओपन माईक करावेत का? एका ओपन माईकचा साधारण खर्च पाच हजार असतो. त्यात कॅफेचं भाडं, साउंड सिस्टिमचा खर्च वगैरे येतो.
ही डेड इन्व्हेस्टमेंट असेल (तूर्तास तरी) इतके ध्यानी ठेवा. उगीच एका ओपन माईक मागे पाच पाच हजार घालवण्यात शहाणपण खासेच नसेल, असे माझे वैयक्तिक मत. आधी उत्तम यु-ट्युबर व्हा, मोठी कॉमेडी हाऊसेस बरेच वेळा नवीन टॅलेंट हंट करताना युट्युब रेफर करतात, किंवा तुम्ही स्वतः जरी सिरीयस बिझनेस मध्ये उतरायचं म्हणत असाल तर सिव्ही वर भरपूर युट्यूब ऍक्टिव्हिटी दिसणे श्रेयस्कर.
२. ओपन माईक मध्ये सुरवातीला प्रेक्षक गोळा करण्यासाठी काय करता येईल?
ओपन माईक नको तूर्तास हे आधीच बोलून झालोय इथे वेगळं काही बोलत नाही

३. या प्रकारात अडल्ट आणि ड्युअल मिनिंग जोक्स जास्त प्रचलित आहेत. त्यांना प्रतिसादही चांगलाच मिळतो. पण स्टेजवर या प्रकारचा विनोद करण्यास मी इच्छुक नाही. याविषयी काय करावे?

ह्यात दोन मुद्दे, तुम्ही स्ट्रगलर असताना तुम्हाला तसा चॉईस नसतो, जी जॉनर जनतेतून मागणी जास्त येते ती सादर करावी लागतील, अर्थात जर तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून कॉमेडी करणार नसाल तर 'गेलात उडत मी अश्लील जोक सांगणार नाही' असे म्हणू शकता बेलाशक. तसंही इंग्रजी स्टँडप मध्ये सगळ्या भारतीय स्टँडप कॉमेडियन्सने रसेल पीटर्सचा आदर्श ठेऊन भरपूर अश्लील विनोद अक्षरशः हागुन ठेवलेत.

दुसरा मुद्दा, अश्लील जोक हे मुळात वाईट नसतात ते सांगायची शैली मॅटर करते, अश्लील जोक तुम्ही आम्हीही सांगतो अन 70एमएम वर दादा कोंडकेही सांगून गेलेत, ती वेंधळं राहून अश्लील, द्विअर्थी कोट्या करायची कला असली तर अश्लील जोक्स वाईट नाहीत, पाळण्यालायक नियम म्हणजे स्त्री पुरुष संबंध, स्त्री पुरुष शरीर रचना इत्यादी वर्णन करायला प्रचलित शब्द वापरू नयेत! अश्लीलरसातील जोक्सही ग्रेसफुली सांगणे एक कला होय. सुरुवातीलाच नकार घंटा वाजवू नयेत अशी विनंती. तुमचे सभ्य विनोदात भागत असले तर ठीकच आहे जबरदस्ती अश्लील विनोद नको पण एकंदरीत ऍक्टला उठाव (शब्दशः नाही! (अश्लील विनोद उदाहरण!)) येणार असेल तर कुठलाच विनोद प्रकार त्याज्य ठेऊ नका.

४. स्वतः:चे व्हिडियो तयार करून नेटवर अपलोड करावे का? यासाठी कोणी तांत्रिक मदत करू शकत असल्यास उत्तम.
हा सगळ्यात बेस्ट इलाज हा मुद्दा क्रमांक चार न करता मुद्दा क्रमांक एक करा. अन तांत्रिक मदत वगैरे काहीच मोठं जांबल तंत्र नाहीये हो, यु ट्यूब वरच 'how to upload videos on youtube' सर्च केलेत तरी खंडीभर विडिओ मिळतील, लाभ घ्या अन सुरू व्हा

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!.

चिनार's picture

21 Apr 2018 - 5:06 pm | चिनार

धन्यवाद वांड भौ..
माझा कुठल्याच प्रकारच्या विनोदाला विरोध नाही. पण दहा मिनिटाच्या भाषणात एखाद-दुसरा अश्लील विनोद असावा. आणि तो ही विषयाला धरून आणि दर्जेदार..एवढंच म्हणणं आहे.
बाकी तुमच्या म्हणण्याशी सहमत..
यु ट्यूब व्हिडीयोच्या मागे लागतो आता.

जेम्स वांड's picture

21 Apr 2018 - 5:13 pm | जेम्स वांड

तुम्ही कदाचित युट्युब वर स्टँडप पाहिली असेल खूप पण माझे काही आवडते विनोदवीर सुचवतोय , वैशिष्ट्ये सोबत जोडून, तुम्ही नसतील पाहिलेले तर नक्की पहा, आपण आपल्याबाजूने व्हॅल्यू ऍड करीत राहावे आपल्या कलेत कसे?

१. निशांत तन्वर

बऱ्यापैकी शुद्ध हिंदीत कॉमेडी, फिजिकल, सेक्स कॉमेडी कमी, स्व-ताडन थोडे जास्त (स्वतःच्या लुक्स वरून, हा एक जबरी हतकांडा होय) कॉर्पोरेट कल्चर, प्रेम, नाईनटीज किड्स लाईफ वगैरे वर चांगला बोलतो

२. संदीप शर्मा

दिल्लीकर, मुंबईकर वगैरे ग्राम वैशिष्ट्य विषयावर उत्तम बोलतो, अतिशय संथपणे बोलता बोलता प्रेक्षकांची फिरकी घ्यायचं कसब वाखाणण्याजोगे आहे

अजून आठवतील तसे देतो

अतुल खत्री आणि झाकीर खान हे दोघे माझ्या आवडते आहेत.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 12:20 pm | जेम्स वांड

अलटीमेट आहे, एकतर स्मॉल टाऊन बॉय, त्यात दिसायला एकदमच सामान्य, नव्वदीतले पोरगे, बहुसंख्य प्रेक्षक ह्याच काही मुद्द्यांवर धरून ठेवतो तो. त्यातही त्याचे पॉजेस अफलातून असतात

हो अगदी आपल्यातला वाटतो तो..
विनोदपण नैसर्गिक असतात.

पुंबा's picture

23 Apr 2018 - 1:31 pm | पुंबा

++११११
दोघेही आवडते.
कुणाल कामरा आणि अनिर्बान दासगुप्ता हे दोघेही उत्तम वाटतात.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 1:44 pm | जेम्स वांड

उत्तम कॉमेडियन आहे पण राजकारणात नको तितका रस घेऊन बरबाद झाला, धंदाही बसला अन पतही गेली

पुंबा's picture

23 Apr 2018 - 2:05 pm | पुंबा

हो..
लोकविरूद्धम ना करणियम नाचरणियम हे लक्षात ठेवले नाही.
पण कॉमेडीची जाण छान आहे त्याची.

अश्लील जोक हे मुळात वाईट नसतात ते सांगायची शैली मॅटर करते, अश्लील जोक तुम्ही आम्हीही सांगतो अन 70एमएम वर दादा कोंडकेही सांगून गेलेत, ती वेंधळं राहून अश्लील, द्विअर्थी कोट्या करायची कला असली तर अश्लील जोक्स वाईट नाहीत, पाळण्यालायक नियम म्हणजे स्त्री पुरुष संबंध, स्त्री पुरुष शरीर रचना इत्यादी वर्णन करायला प्रचलित शब्द वापरू नयेत! अश्लीलरसातील जोक्सही ग्रेसफुली सांगणे एक कला होय. सुरुवातीलाच नकार घंटा वाजवू नयेत अशी विनंती. तुमचे सभ्य विनोदात भागत असले तर ठीकच आहे जबरदस्ती अश्लील विनोद नको पण एकंदरीत ऍक्टला उठाव (शब्दशः नाही! (अश्लील विनोद उदाहरण!)) येणार असेल तर कुठलाच विनोद प्रकार त्याज्य ठेऊ नका.

+१११

अगदी हसवलंच पाहिजे असं काही नाही. किर्तनही करू शकता. भरपूर श्रोतावर्ग आहे अध्यात्म विषयाला.
श्रोत्याला गुंगवून ठेवणे तिथे साध्य होईल,चार पैसेही मिळतील.

मोबाइलमध्ये एचडी व्हिडिओ ( 1280x720 )हे रेझलुशन उत्तम.

चित्रगुप्त's picture

21 Apr 2018 - 8:56 pm | चित्रगुप्त

चिनारभौ तुमच्या विशेष कलागुणाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
तुमच्या कलागुणाला व्यावसायिक वाव आणि यश वगैरे कसे लाभेल हे सांगणारे तुम्हाला मिपावर आणि अन्यत्र भेटतीलच. मात्र एक कलावंत म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो.

त्यातली पहिली म्हणजे आधी सिद्धी, मग प्रसिद्धी. हे सूत्र जन्मभर लक्षात ठेवा.
तुमच्या क्षेत्रातील उत्तम कलावंतांच्या कलेचा आणि जीवनाचा अभ्यास करत रहा. शक्यतो त्यातील काहींशी प्रत्यक्ष मैत्री करता आली तर उत्तमच.
व्यावसायिक यश मिळू लागले तरी आपली कला कधी बाजारोन्मुख होऊ देऊ नका.
व्यावसायिक यश आणि प्रसिद्धीचे वलय यात कलावंत गुरफटू लागला की त्याच्या प्रतिभेला ओहोटी लागते, याची उदाहरणे भरपूर मिळतील. तेंव्हा 'सावधपण सर्वविषयी' हे समर्थवचन लक्षात असू द्या.
शेवटी कलेतून लाभणारे समाधान हे सर्वोपरी असून बाकी सर्व गोष्टी दुय्यम, ही प्रचिती कधीतरी येईलच.

धन्यवाद चित्रगुप्तजी ..तुम्ही सांगितलेल्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2018 - 10:32 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

तुम्हाला खरेच मनापासून आवडते ते झोकून देऊन करण्याचा प्रयत्न करा... त्यात कसर नको. आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी असा एक तरी प्रामाणिक प्रयत्न केलाच पाहिजे. तसे केले तरच स्वतःची ओळख बनवणारे काहीतरी घडू शकते... इतर सर्व आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते, तिचाही थोडाबहुत विचार करणे आवश्यक असते.

उत्तम यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

मला या विषयातील फारसे माहीत नाही. तुम्हांला अगदी दणदणीत शुभेच्छा! प्रयत्नांची कास सोडू नका.

तुम्हाला आतापर्यंत जिथे सादरीकरण केलेत तिथे उत्तम प्रतिसाद मिळाला हे वाचून भारी वाटले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
लवकरच तुमची स्टँड अप कॉमेडी पहायला मिळो.

भरपूर शुभेच्छा. स्टँडअप कॉमेडी हा अतिशय आवडता प्रकार. पण स्वभाषेत फार नाही पहिले. रसेल पीटर्स फारच एका पठडीतील जोक्स करतो (वेगवेगळ्या पद्धतीने रेसिझम - अति स्टिरीओटाईपिंग), त्यामुळे जास्त पचला नाही.
जेरी साइनफिल्ड , ख्रिस रॉक मस्त आहेत. साइनफिल्ड सीरिअल पण खास त्याच्या सुरुवातीच्या छोट्या स्टँडअप रुटीन मुळेआवडते. लुई सी के पण चांगला आहे, पण ती कॉमेडी कधीतरी फारच डार्क होते.

अर्धवटराव's picture

23 Apr 2018 - 9:49 pm | अर्धवटराव

या संपूर्ण प्रकरणात तुमचा पहिला परिच्छेद सर्वात महत्वाचा आहे. तुम्हाला स्फुरण चढलं, आपल्याच लेखातलं मटेरीयल कसं वापरता येईल हे चटकन लक्षात आलं, तुम्ही ते लाइव्ह कंपोज केलं आणि ताबडतोब पेश केलं. तुम्हाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला त्यात या चारही घटकांचं काँट्रीब्युशन आहे. स्टॅण्ड-अप कॉमेडीची मजा तिच्या ताजेपणात आहे. मिमीक्री, शारीरीक / मानसीक व्यंगात्मक टिका, चित्रपटांची रेवडी उडवणं वगैरे फॉर्मुले वापरुन बरेच लोक काहि काळ गाजवतात. बळजबरीने केलीली अडल्ट, द्वैअर्थीक कॉमेडीसुद्धा याच प्रकारातली. पण त्याला लगेच मर्यादा पडतात.

स्वतःला जाणवणार्‍या गुदगुल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हाच तुमच्या यशाचा आत्मा. त्या जाणिवेवरुन त्याच्या प्रक्षेपणाचं माध्यम ठरलेलं असेल. केवळ विचार आणि आवाजाची डिमांड असेल तर एफएम / ऑडीयो ल्किप्स बेस्ट पर्याय. थोडाफार अभिनय लागणार असेल तर व्हिडीयोला पर्याय नाहि. एकदम प्रोफेशनल रेकॉर्डींग करण्याअगोदर तुमच्य पर्फॉर्मन्सला आवश्यक असं आपल्याच घरात प्रकाश योजना, नेपथ्य वगैरे वातावरण निर्माण करुन साधं मोबाइलवर रेकॉर्डींग करुन बघा. असा सगळा अभ्यास करुन घरीच बनवलेले अशक्य सुंदर व्हिडीओ ढिगाने सापडतील नेटवर. आवष्यक असल्यास प्रॉप देखील स्वत:च बनवता येतील.

नॉनव्हेज मटेरीअल तुमच्या कॉमेडीच्या अनुषंगाने येत असेल तर बिंधास्त वापरा. जर ते तुम्हाला अश्लील वाटलं नाहि तर तुमच्या प्रेक्षकांनाही वाटणार नाहि.

सुरुवातीच्या काळात गणपती, दहिहंडी वगैरे उत्सवात आपली कला प्रदर्शीत करता येईल. अर्थात, तिथे मर्यादा सांभाळाव्या लागतील. नागपूरात शेकड्याने ऑर्केस्ट्रावाले असावेत. प्रत्येक कॉलेजमधे वार्षीक मोहोत्सव होत असतात. राजकीय विषयांवर बोलायचं असल्यास निवडणुकांचा हंगाम म्हणजे पर्वणी. अगदी राजकीय पक्षाच्या मंचावर देखील पर्फॉर्म करता येईल.

लास्ट बट नॉट द लिस्ट... मिपावर टाका आपले धागे. मिपाकर 'प्रामाणीक' प्रतिक्रीया तर देतीलच, प्रसिद्धीची सुद्धा सोय आपोआप होईल ;)

धन्यवाद..दोन-दोन मिनिटाच्या स्क्रिप्ट्स लिहितो आहे. लवकरच व्हिडीयो तयार करेल.

कलेच्या क्षेत्रात आम्ही नापास वर्गातील माणसं आहोत.
त्यामुळे तुम्हाला केवळ शुभेच्छा सोडून देण्यासारखं काहीच नाही आमच्याकडे.
परंतु आपले खुसखुशीत लेख आवर्जून वाचतो. विनोदाचं अंग आहे आपल्याकडे.
आपली प्रगती उदंड होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2018 - 9:53 pm | मुक्त विहारि

+ १

नाखु's picture

27 Apr 2018 - 10:36 pm | नाखु

मा e कौतुक
"चिनार्या ,बाकी हे बरं केलेस हो, लोकांना रडवायला सगळेच आघाडीवर असतात.हसवणारे कोणीच नाही,इतरांवर हसतील पण निर्भैळ हसवायला जमत/आवडत नाही, त्यालाच विचारवंत म्हणतात असं यांनी परवा कुठे मिपा व्याख्यानात वाचलं म्हणे,मला कुठे व्याख्यान ऐकायला वेळ आहे!

आणि स्क्रीप्ट का काय ते सूनबाई लागले दाखव तिनं नाक नाही मुरडलं तर अजिबातच लाजू नकोस.मिपाकर आहेतच धीरमदतीला!!

धीरोदात्त माई प्रकाशीत "माईंची पत्र आणि पात्रं"या लेखातून साभार.

चिनार's picture

22 Oct 2018 - 12:43 pm | चिनार

स्टॅन्ड अप कॉमेडीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही ना काही कारणाने अजून पर्यंत जास्त जोर लावता आलेला नाहीये. मधल्या काळात काही स्क्रिप्ट्स तयार केल्या आणि नागपूरला ओपन माईक मध्ये सादर केल्या. रिस्पॉन्स चांगला मिळतोय. काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या गणेश उत्सवात पाच-सात मिनिटाचे एक सादरीकरण केले. त्याचाच व्हिडियो you ट्यूब वर अपलोड केला. मोबाईल वर चित्रीकरण असल्यामुळे दर्जा तेवढा चांगला नाहीये. त्यात सोसायटीच्या मुलांचा गोंधळ (ज्यात आमची कन्या सुद्धा आहे) !
असो. मिपाकर आपलेच आहेत. सांभाळून घेतील ह्याची खात्री आहे. बघून प्रतिक्रिया द्यावी.
चांगल्या आवाजासाठी हेड फोन्स वापरावे.

https://youtu.be/cmIx81CTek4

हेच घरी ओडिओ रेकॅार्ड करा, अपलोड करा#१, लिंक द्या.

#१ clyp dot it
किंवा jumpshare dot com

चिनार's picture

22 Oct 2018 - 5:08 pm | चिनार

हे काय आहे?

क्लिप - ओडिओ शेअरिंग साइट,
जम्पशेअर - फोटो,/विडिओ/,पिडिएफ,/ओडिओ शेअरिंग लिंक देता येते.