नवीन सायकल खरेदी बाबत मार्गदर्शन हवे आहे.

मेघनाद's picture
मेघनाद in काथ्याकूट
21 Apr 2018 - 1:19 am
गाभा: 

मिपाकरांना नमस्कार,

गेले बरेच दिवस मनात एक विचार घोळतोय. मोदक, मार्गी ह्यांसारख्या सायकल वीरांचे लेख वाचतोय, त्यांच्या विक्रमांना मनापासून सलाम. आपणहि सायकल घ्यावी आणि मनसोक्त भटकंती करावी ह्या विचाराने फारच जोर धरला आहे. गेली काही वर्ष सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा जपूनच भटकंती करावी लागेल.

सुरवातीला काही दिवस ३-४ किमीची रपेट मारून शरीराला सायकलची सवय करून घेणार आहे. हे झालं कि हळूहळू पल्ला वाढवायचा आहे. हे सर्व सायकलिंगचे लेख वाचूनच ठरवलं आहे. मुद्दा असा आहे कि मला नवीन सायकल विकत घ्यायची आहे, किंवा कोणाकडे जुनी पण उत्तम स्थितीतली सायकल मिळाली तरी चालेल. कारण सायकलिंगचा उत्साह किती टिकेल हे माहित नाहीये, मनाची फुल्ल तयारी आहे, बघू!

माझी उंची ५ फूट ४ इंच आहे, बांधा मध्यम आहे. सायकल व्यवस्थित चालवता पण येते तूर्तास काही वर्षांचा खंड पडलेला आहे. मी हायब्रीड प्रकारची सायकल घेण्याच्या विचारात आहे. हे व खाली दिलेले सर्व मुद्दे लक्षात घेऊन जाणकार मिपाकरांनी सायकल खरेदी साठी मार्गदर्शन करावं हि विनंती.

१. नवीन सायकल कोणत्या ब्रॅण्डची घ्यावी किंवा जुनी पण उत्तम स्थितीतली कोणाकडे असेल तर सुचवावी.
२. मी हायब्रीड प्रकार निवडला असला तरी मिपाकरांनी योग्य तो प्रकार सुचवावा.
३. नवीन सायकल दुकानातून घ्यावी कि ऑनलाईन संस्थळावरून घ्यावी ?
४. माझं राहत घर डोंबिवली मध्ये असल्यामुळे सायकल रपेट करायची संधी कितपत मिळेल हि शंकाच.
५. १५ हजारांपर्यंत कुठली सायकल घेता येईल?
६. सायकल गिअर वालीच हवी आहे.

मिपाकरांच्या प्रतिसादांची वाट बघत आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

यावर एक लेख आलेला आहे. किंवा डोंबिवली साइकल ग्रुपशी संपर्क करणे.
मिपाकर भटक्या खेडवाला मार्गदर्शन करतात.

मेघनाद's picture

22 Apr 2018 - 12:04 pm | मेघनाद

धन्यवाद मी संपर्क करतो.

मार्गी's picture

21 Apr 2018 - 8:30 am | मार्गी

आपल्या सायकलिंगला शुभेच्छा!! माझा नामोल्लेख केल्याबद्दल धन्यवाद! पूर्वी अनेक लेख इथे व माबोवर आलेले आहेत. माझा नंबर ९४२२१०८३७६. व्हॉटस अप केल्यास सविस्तर बोलूया.

धन्यवाद, मी आपल्याला लवकरच संपर्क करतो.आपले लेख वाचुनच ही स्फूर्ती मिळाली आहे.

एस's picture

21 Apr 2018 - 9:00 am | एस

हा धागा पहा.

http://www.misalpav.com/node/34470

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Apr 2018 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... तीन चार हजार किंमत असलेली मलाही सुचवावी.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

21 Apr 2018 - 9:50 am | प्रचेतस

a

मार्गी's picture

21 Apr 2018 - 12:49 pm | मार्गी

ही सायकल खूपच जबरदस्त आहे. २० किमी स्पीडने पळते. मी ६० किमी पळवली नुकतीच. ज्यांना मोस्टली सपाटीच्या रस्त्यावर १०० किलोमीटरपर्यंत सायकलिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी ही व बीएसए एसएलआरसुद्धा चांगल्या आहेत. ही दुधवाला सायकल इतकी पळते हे कळाल्यावर साध्या सायकलींविषयी असलेले अनेक भ्रम दूर झाले.

अमित खोजे's picture

3 May 2018 - 7:31 pm | अमित खोजे

अर्रे तुफान पळते हि . विशेषतः उतारावर तर मोठे चाकं असल्याने इतरांच्या खूपच पुढे जाते.
हिला शिमानो चे गियर लावून घेतले. तेव्हा फक्त ३५०० खर्च आला होता.

२००८ मध्ये पुण्यात झालेल्या एन ड्यू रो मध्ये मी हि वापरली होती. डोंगर चढ व उतार गियर लावल्यामुळे सहज चढून जायची.

बाकी फार काही तांत्रिक ज्ञान मला नाही पण २-३ वर्ष वापरली मी. म्हणजे या सायकलला गियर लावून घेणे कितपत योग्य वगैरे. मोदक, मार्गी मार्गदर्शन करतीलच. नंतर चोरीला गेली पण :(

मार्मिक गोडसे's picture

21 Apr 2018 - 12:02 pm | मार्मिक गोडसे

सायकलविषयी सर्व काही
https://www.maayboli.com/node/64918

गिअरवाली सायकल १५ हजारंपर्यंत हवी असल्यास माँट्रा किंवा बिटवीन कंपनीची सायकल घ्या.
हायब्रीड घेताय याचे विशेष कांही कारण..? एमटीबी भक्कम असते आणि लवकर पंक्चर होत नाही.
बाकी व्यायाम सुरू करा म्हणजे पहिल्यांदा सायकल चालवल्यानंतर त्रास होणार नाही.

एस's picture

24 Apr 2018 - 5:00 pm | एस

Btween पेक्षा Schnell ची सायकल घ्या असे सुचवेन.

हायब्रीड सायकल पळायला चांगली असते असं वाचनात आलं म्हणून. माँट्रा डोंबिवली मध्ये बघायला मिळत नाहीये. आणि ऑनलाईन वर फुल्ली असेम्बल्ड सायकल मिळत नाही असे प्रतिसाद वाचलेत.

आजच लुमाला ची हायब्रीड आणि हायड्रा ची मटिबी बघून आलो. लूमाला चे टायर फार बारीक वाटले, पण सायकल चालवायला छान वाटली. दोन्ही सायकल्स हलक्या आहेत एका हाताने उचलता येतील अश्या. लुमाला तर १० वर्षाची वॉरन्टी देते आहे.

लुमाला सायकल
LUMAALA Cycle

वरील दोन ब्रॅण्ड्स बद्दल काय मत आहे?

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 9:17 am | कपिलमुनी

किती ₹ ??

दुकानदार १४५०० सांगतोय. आणि हायड्रा चे १०५००. खरेदीच्या वेळी बहुतेक काहीतरी कमीजास्ती होईल.

माझ्या सोसाइटीत ( डोंबिवली त)राहणाय्रा मुलाने एक जुनी रेसर दोन वर्षांपूर्वी घेऊन नर्मदा परिक्रमा केली.१००- १८०-२८०पर्यंत असे अंतर दिवसाला घेतले.