महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

तोतया शिवाजीं बरोबरचे वाटाडे - भाग - 2

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
15 Apr 2018 - 12:26 pm
गाभा: 

लढा पावनखिंडाचा वाटाडे - भाग 2
तोतया शिवाजीं बरोबरचे वाटाडे

ऐनवेळी सोपा झेल सुटलेल्या किंवा जवळूही गोल करता न आल्याने खेळाडूंची पराभूत मानसिकता जशी बराच वेळ टिकून असते तशीच अवस्था सिद्दीच्या सैन्याची झाली असेल. चार महिने गडाला गराडा घालून बसल्याने एक प्रकारची शीथिलता आलेल्या सेनेची भर पावसात मध्यरात्री झालेली परवड बोचणी देत असेल. आपल्या मुख्य सरदाराला फसवून शिवाजीने जो विश्वास घात केला याचा राग व हताशा प्रत्येक शिपायाला सतावत असणार. अश्या पराभूत मानसिकतेने निघालेल्या सैन्याला माहित नसलेला रस्ता, पावसाच्या सरींनी चिंब भिजलेल्या अवस्थेतून आपापल्या घोड्यांना सांभाळत पुढे सरकत जायचा वेग कमी असला तरी पायी चालणाऱ्या शिपायांच्यापेक्षा जास्त असावा.

12


गोफण व अन्य शस्त्र सामुग्री

तोतया शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली काही वाटाडे, पालखी सारख्या डोलीत महाराजांना ज्यांनी पाहिले होते अशांना ते महाराज असायची शक्यता निर्माण करेल असा पोषाख आणि आभूषणे घालून निघाले असावेत. पावसांच्या सरींनी चिंब भिजलेल्या तोतया शिवाजींसोबत गेलेल्या सैनिकांना महाराज खरोखरच कोकणात जाणार नसल्याचे माहित नसावे इतकी गुप्तता 'need to know' तत्वावर पाळण्यात आली असावी. त्यांच्याकडे मसाईपठारावरून जाणाऱ्या अंबा घाटातील मार्गाचे वाटाडे असावेत.
आपल्या बरोबरच्या सैनिकांसह जात असताना, मसाई पठारावरील मेट्याच्या आसपास गस्त घालणाऱ्या सिद्दी जोहरच्या शिपायांच्या नजरेस पडले असावेत. इतक्या रात्री, भर पावसात, जाणारे कोण असावेत याबद्दल शोध घेण्यासाठी काही सैनिक त्यांच्या मागोमाग घोड्यावरुन आले असावेत. अंधारात हे आपले सैनिक नाहीत. वेशावरून ते मराठे सरदारांच्या सैनिकांतील जथ्था असावेत, परंतु रात्रीच्या वेळी बाहेर जायचा परवाना न बाळगणाऱ्यांची ही बतावणी की ‘त्यांना कोकणात जायचा आदेश आला आहे म्हणून ते तातडीने जात आहेत’ खोटी असावी असे संशय घेऊन त्यांनी त्यांना खाली उतरवून चौकशी केली असावी. मराठीत बोलणाऱ्या तोतया शिवाजीचा कडक आवेश पाहून पथकाला सिद्दी जोहर यांच्या समोर उभे करणे गरजेचे वाटून त्यांना परत फिरायला लावले गेले असावे. हे पथक गडाच्या पायथ्यापासून २ - ३ किमी अंतरावर पकडले गेले असे मानले तर गडाच्या विरुद्ध दिशेच्या तीन दरवाजा भागातील खालच्या सपाट भागात मुख्य तळ ठोकून बसलेल्या सिद्दीच्या समोर यायला निदान 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला असेल. मधल्या काळात ज्या सरदारांच्या तुकडीतील ते मेटकरी होते त्यांना कळवले गेले. ते सरदार बातमीची शहानिशा करण्यासाठी सिद्दीच्या तंबूत हजर झाले असावेत.
पावसाने संतत धार लावली असताना, उद्या शिवाजीने पांढरे निशाण धरून शरणागती पत्करली की पुढे काय करायचे? त्याला बरोबर घेऊन कर्नूल प्रांतातील आपल्या वर्चस्वाखाली राज्य करायला मनवायचे? का विजापूरच्या कमकुवत राज्यसत्तेची मान्यता मिळवून आपला मार्ग मोकळा करायचा? का शिवाजी सोबत वेगळा करार करून पुढील काळात दोन्ही बाजूंनी विजापूरकर आदिलशाहीचा खातमा करून ती गादी बळकावण्याची? का मोगलांचा नवा सेनापती शाहिस्तेखानाकरून शिवाजीला काबूत आणायला आपण मदत करावी? मुघलांना आपल्या सैन्याची गरज नसेल तर शिवाजीला आपल्याकडे वळवून शाहिस्ताखानाला औरंगाबाद व बऱ्हानपुराकडे ढकलायला जवळ करावे? सर्व पर्यायांवर मनांत विचार आले असताना अचानक मेट्यावरून पकडलेल्या जथ्थ्याला समोर पाहताना 'हा शिवाजी तर नाही?' असे त्याला वाटत राहिले असावे. मृत अफझलखानाचा एकटा वाचलेला मुलगा फाजलखान तंबूत येताच, पाहता क्षणी 'ये सिवा क्या कर रहा रात में?' असे विचार करत असताना सर्व गोष्टी लक्षात येऊन सिवाने दगा देऊन आपल्याला फसवले आणि तो पळून जाताना अलगद हातात आल्याने सुखावलेल्या सिद्दीची झोप, 'ये तो असली सिवा नहीं है' या वाक्यानिशी खाडकन उतरली असावी.
‘गड उद्या खाली करून पकडले जाऊ नये म्हणून लपून कोकणात चाललो आहोत’. अशा वारंवार केलेल्या बतावणीतून तोतया सिवा काशीद आणि साथीदार कैदेत जीव गमावून बसले असावेत. या सर्व प्रकारात कमीतकमी आणखी एक तास वेळ गेला असावा. सिद्दीने आपल्या विश्वासातील म्हणून मसूद या जावई नातलगावर ताबडतोब त्याच्या घोडदळातील सैनिक पथकांना कोकणाच्या वाटेने खऱ्या शिवाजींच्या शोधात जायचा हुकुम केला असावा. खरा शिवाजी किती हजार सैन्य घेऊन गेला असावा याचा अंदाज घेतला असावा. इतके मोठे सैन्य बाहेर जाते तरी आपल्या सैन्याला पत्ता लागू नये यासाठी सर्व मेटेकऱ्यांना समोर हजर करून कसून चौकशी केली गेली असता शिवा पन्हाळगडावर असायची शक्यता खूप मोठी आहे असे जाणवले असेल. जर तो गड सोडून फरार झाला असेल तर त्याला विशाळगडावर जायच्या शिवाय पर्याय नाही. तिथे आधीच सुर्वे आणि दळवीच्या सैन्याचे तळ ठोकून आहेत यामुळे सिवाला तिथे जाऊन देखील पकडता येणे शक्य आहे. असा विचार करून मसूदच्या मदतीला अन्य सरदारांनी आपापले घोडदळ मसूदच्या पाठोपाठ पाठवायला हुकूम दिला असावा. 'पायदळाशिवाय जंगलातील वाटांवरील लढाईत सरशी होणार नाही' हे ओळखून सिद्दी जोहरने पायदळाला ताबडतोब निघायचा आदेश दिला असावा.

शिवाजी निसटून कमीत कमी 2 तास उलटून गेले असल्याने सिद्दी मसूद सासऱ्याच्या आज्ञेने आपल्या हबशी जातीच्या सैनिकांचे घोडदळ व बाजी घोरपडे या मराठा सरदाराच्या या भागाची व भाषेची माहितगार असलेल्या सेनेला बरोबर घेऊन रात्री भर पावसात तातडीने निघाला. जसे जसे इतर सरदारांना बातमी लागली तसे त्यांचे घोडदळ घेऊन मसूदच्या मदतीला निघाले. ज्या वाटेवर तोतया शिवाजी पकडला गेला तोच मार्ग धरून ते निघाले असे मानले तरी रात्रीच्या प्रवासात घोडे बुजणे, सुरवातीला जे घोडदळ गेले त्यांच्यामुळे ओली जमीन जास्त चिखलाची होऊन मागावून येणाऱ्या घोड दळाला अनेकदा उतरून घोड्यांना लगाम धरून नेणे प्राप्त झाले असेल.
ऐनवेळी सोपा झेल सुटलेल्या किंवा जवळूही गोल करता न आल्याने खेळाडूंची पराभूत मानसिकता जशी बराच वेळ टिकून असते तशीच अवस्था सिद्दीच्या सैन्याची झाली असेल. चार महिने गडाला गराडा घालून बसल्याने एक प्रकारची शीथिलता आलेल्या सेनेची भर पावसात मध्यरात्री झालेली परवड बोचणी देत असेल. आपल्या मुख्य सरदाराला फसवून शिवाजीने जो विश्वास घात केला याचा राग व हताशा प्रत्येक शिपायाला सतावत असणार. अश्या पराभूत मानसिकतेने निघालेल्या सैन्याला माहित नसलेला रस्ता, पावसाच्या सरींनी चिंब भिजलेल्या अवस्थेतून आपापल्या घोड्यांना सांभाळत पुढे सरकत जायचा वेग कमी असला तरी पायी चालणाऱ्या शिपायांच्यापेक्षा जास्त असावा.
पायदळाची एकूण १० हजारापेक्षा जास्त सेना वेगवेगळ्या पठाण आणि अन्य सरदारांत विभागलेल्या असल्याने ती निघायला पुढचे २-३ तास लागले असावेत. त्यांच्या तुकड्या कमी अधिक फरकाने संख्येने त्यांच्या बरोबर ठासणीच्या बंदुका, दारूगोळा, बत्ती लावायला आग लावायची सोय, भाले, तयार बाणांचे गठ्ठे अन्य सामान घेऊन रात्रीच्या अंधारात माहित नाही अशा ठिकाणच्या शोधात घेऊन जाताना त्यांना ऐत्यावेळी मिळेल त्या वाटाड्यांच्या सोबतीने घेऊन जायला भाग पडले असावे. त्यांना पेच निर्माण झाला असावा की मलकापूरवरून जावे का मसाईपठारावरून पांढरे पाणी कडून अंबाघाटातील मार्गाने जावे? कुंद पावसाच्या वातावरणामुळे बऱ्याच डोंगरांच्या रांगा ढगात दिसेनाशा होतात. सहज ओळखता येतात असे डोगरमाथे डोळ्यात भरत नसल्याने चाचपडत पुढे जावे लागणार होते... घोडे देखील अंधाराच्या वाटेवरून जाताना नाठाळपणा करत असावेत.
देशाच्या अन्य भागातील सैनिकांना साचलेल्या पाण्यातून, चिखलातील वाटेतून सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या वळवळणाऱ्या प्राण्यांमुळे व जळवा, विंचूंच्या दंशाला ही सामोरे जाताना जीव गमवावे लागत असावेत. सतत चालून चालून वैतागलेले, भुख़े-प्यासे सैनिक युद्धाच्या मानसिकतेत पुन्हा यायला वेळ लागतो. त्या काळरात्रीतून सकाळ झाल्यावर आठ वाजेपर्यंत 35 ते 40 किमी अंतर कापल्याने सिद्दी मसूद बरोबर तातडीने आलेल्या 300 ते 500 घोडदळ सैनिकांची प्रथम तुकडी मागावून येणाऱ्या सेनेच्या मदतीची वाट पाहात विश्रांती घेत असाव्यात. तोतयाने सांगितले तसे शिवाजी खरोखरच पळून गेला नसावा कदाचित तो पन्हाळ्यात बसून असून आपल्या सैन्याच्या विस्कळीतपणाचा फायदा घेऊन कोल्हापुराच्या दिशेने जाऊ शकतो किंवा वाटाघाटींना मुकाट्याने बसतो. अशा अनेक शक्यतांमुळे उगाच धावाधाव न करता मागाऊन येणाऱ्या कुमकीतून नव्या बातमीची वाट पहाणे शहाणपणाचा मार्ग वाटून तो थांबला असावा.

मेटे म्हणजे काय? कशासाठी?

मेट म्हणजे गडाच्या भवताली 2 ते 5 किमी अंतरावर टेहळणीकरता लावलेली चेक पोस्ट... ती अशा मोक्याच्या ठिकाणी असावीत की तेथून दूरवरच्य हालचाली कळाव्यात. काही संशयास्पद दिसले तर त्याला तत्परतेने मुख्यालयात पेश करायची जबाबदारी...
14

.. भाग २ समाप्त …

सौजन्य  शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई
सौजन्य शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2018 - 1:32 pm | टवाळ कार्टा

रोचक आहे....वाचत आहे

अर्धवटराव's picture

15 Apr 2018 - 9:54 pm | अर्धवटराव

.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 10:02 am | श्रीगुरुजी

छान लिहिले आहे.

पुभाप्र.

शशिकांत ओक's picture

16 Apr 2018 - 11:38 am | शशिकांत ओक

नवीन पद्धतीने विचार मांडले आहेत.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 10:06 am | श्रीगुरुजी

महाराज परमुलुखात आग्र्याच्या कैदेत असताना सुद्धा निसटल्यानंतर वेगाने दूर जाण्यासाठी त्यांच्या माणसांनी घोड्यांची व्यवस्था केली होती. पन्हाळ्यावरून निसटण्यापूर्वी अशी व्यवस्था का करता आला नसावी?

पन्हाळ्यावरून निसटण्यापूर्वी अशी व्यवस्था का करता आला नसावी?

या विषयावरील पुस्तक परिचय मधे यावर त्या लेखकांनी प्रकाश टाकला आहे. वाटांचे सर्व्हे करायला, घोडे आणि अन्य मदत मिळवण्यासाठी आत बाहेर करायला परवानगी नसताना करता येत नसावी. फक्त पांढरे निशाण घेऊन वाटाघाटी करायला जाताना वरिष्ठांच्या परवानगीने गडावरून खाली उतरण्याची सोय करून दिली असेल

शशिकांत ओक's picture

21 Apr 2018 - 11:51 pm | शशिकांत ओक

महाराजांच्या हेरांना दरवाजा उघडून बाहेर जाऊन बातम्या काढून परत सिद्दीच्या सैनिकांचा सक्त पहारा तोडून चोरून परत येता आले असते का? एखाद्या वेळी बाहेर सटकणे शक्य आहे पण परत येणे अवघड आहे असे वाटते.

चित्रगुप्त's picture

22 Apr 2018 - 3:57 am | चित्रगुप्त

अत्यंत रोचक आणि रोमांचक लेखमाला.