होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.

shashu's picture
shashu in काथ्याकूट
14 Apr 2018 - 12:26 am
गाभा: 

होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.

लहानपणी शाळेत ६वी 7वी इयत्तेत असताना (१९९६-९७) आम्हाला भूगोल विषय शिकवावयास एक बाई होत्या (त्याकाळी आम्ही बाईच म्हणायचो). शिकवताना नैसर्गिक साधन-संपत्ति याचा उल्लेख कुठे आला तर त्यांची काही ठरलेली वाक्य असायची ती वाक्य त्या आमच्या बधिर मडक्यात सोडली जायची. त्यांची दूरदृष्टि खरेच कौतुकास्पद होती.
ती वाक्य अशी
" नैसर्गिक साधन-संपत्ति (तेल, गैस आणि इतर खानिजे) ही मर्यादित आहे. तुमच्या पिढीने कितीही काळजीपूर्वक ती वापरली तरी नक्कीच एक दिवस ती संपणार आणि पुन्हा मानव जात आपल्या पारंपारिक शेतिकडे वळणार, कारण जगण्यासाठी दूसरा पर्यायच नसणार. पेट्रोलियम साठे व खानिजे संपले की मशीनरी ला तेल मिळणार नाही. उद्योग (धंदे नाही) बंद पडणार. गाड्या बंद पडणार, दळण-वळण साधने बिनकामी होणार. विज उत्पादन बंद होणार. बघा पुढील २०-३० वर्षत हळूहळू याचा 'प्रत्यय' तुम्हाला येइलच. पुन्हा एकदा या पृथ्वी वर सोन्याचे (सोनियाचे नाही) दिवस येतील" इत्यादी इत्यादी.....
लहान असल्या कारणाने यातले गाम्भीर्य तेव्हा उमजत नव्हते. (असे सर्व ऐकल्यानंतर आम्हा बालमनाला प्रश्न पडायचा की जर पुढे जावून आपणास शेतीच करायची आहे तर मग आपण शिकतोय कशासाठी?:))
जसजसे मोठे होत गेलो तसे या विषयीचे (मर्यादित साधन-संपत्ति) गाम्भीर्य समजत गेले आणि मग कधी कधी विचार करू लागलो की खरेच ही साधन-संपत्ति संपलीे तर येणारे दिवस कसे असतील?

तर हे सर्व आठवून लिहायचा मुळ उद्देश असा की
हल्लीच बहरीन या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑइल आणि गैस चे साठे सापडले.
Link
https://m.economictimes.com/news/international/business/bahrain-announce....सिम्स

तेथे पत्रकार परिषद घेवुन तशी घोषणाच करण्यात आली.
आणि पुन्हा एकदा त्या बाई आणि त्यांची वाक्य डोक्यात घोंगावु लागली.
खरेच ही साधन सम्पप्ती मर्यादित आहे का? आणि असेल तर मग ती नक्की कधी संपणार? अजुन किती काळ-वेळ लागेल ती संपावयास? कोणी सांगेल का मला? मिपा सदस्य, जाणकार यावर काही सांगू शकतील का? (अगदी भविष्य पाहणारे सुद्धा यावर आपले मत मांडू शकतात. हे चेष्टने नाही म्हणत आहे मी).

योगायोगाने ऑइल, गैस आणि पॉवर याच क्षेत्रात चाकरी करत असल्याने या विषयी कायम मनात द्विधा मनस्तिथि असते. कारण या जगात लहान मोठ्या अश्या हजारो कंपन्या आहेत की ज्या या क्षेत्रात कायम काम करत असतात. वर्ष्यातिल काही दिवस सोडले तर नेहमी नवनवीन प्रोजेक्ट्स वर तेथे काम केले जाते.
क्लाइंट कमीतकमी वेळेत आपला कारखाना उभा राहून उत्पादन कसे चालू करता येइल यावर भर देत असतात आणि ऑइल, गैस चे उत्पादन कसे जास्तीत जास्त घेता येइल याचे प्रयत्न केले जातात.
इतके सर्व असुनही अजुन तरी काही मला तो 'प्रत्यय' आलेला नाही.

म्हणूनच होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

14 Apr 2018 - 9:35 am | प्रदीप

तुम्ही ऑइल, गैस आणि पॉवर याच क्षेत्रात चाकरी करताहात, तेव्हा माझ्यासारखा ह्या विषयातील अनभिज्ञ आपणांस काय सांगणार? पण काही वर्षांपूर्वी डॅनिएल यर्गिन ह्यांचा 'द प्राईझ' नावाचा ह्या विषयावरचा 'टोंब' वाचला होता, त्यात तेल व त्यापासून निर्माण केले जाणारे पदार्थ ह्यांचा, सुरूवातीपासून, ते सुमारे ८० च्या दशकापर्यंतचा सविस्तर इतिहास होता. त्या पुस्तकात, अगदी प्रथम अमेरिकेत तेलाचे साठे फिलॅडेल्फिया, पेन्सिल्वानिया येथे सापडले, नंतर ते दक्षिणेतील काही टापूंत सापडले ह्याची माहिती आहे. हे माझ्या आठवणीनुसार १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात झाले असावे. असे साठे ज्या परिसरांत सापडले, तिथे रातोरात कसा कायापालट झाला, माणसांचा ओघ तिथे सुरू झाला (वाहत्या 'गंगेत हात धुवून घेण्यास) वगैरेचे सविस्तर वर्णन आहे. पुढे त्या साठ्यांचा ओघ आटला. तेथील माणसे त्या वस्त्याच सोडून जाऊ लागली व पहाता पहाता त्या सर्व वस्त्या बकाल झाल्या, ह्याचेही वर्णन केले आहे.

पण गेल्या दशकांत अमेरिकेतच शेल ऑईलचे साठे मिळाले, व नव्या तंत्रज्ञानुसार त्यांचे उत्खनन करता येऊ लागले, आणि, मला वाटते (चूभुद्याघ्या) आता अमेरीकेस तेल फारसे आयात करावे लागत नाही. तेव्हा, तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल, तसतसे नवीन साठे, तेही नवीन 'प्रकारचे'-- उपलब्ध होत जातील. उर्जा निर्मीतीचे इतर मार्ग आहेत (सौर वगैरे) पण बरीच वर्षे त्यांत झटापट करूनही अद्यापि हे मार्ग 'फिजीबल' नाहीत. तेव्हा, तेल, गॅस ह्यांचे साठे धुंडाळण्याचे व त्यांजवर नवनवीन प्रक्रिया करण्याचे सुरूच राहील, असे वाटते.

जाता जाता, सर्वच तेल कंपन्यांना त्यांच्या तेलसाठ्यांचा (सध्या वापरांत असलेल्या तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या पण अजून कार्यरत नसलेल्या साठयांचा) एस्टिमेटेड अंदाज वार्षिक अहवालात द्यावा लागतो. तुम्ही त्या क्षेत्रांत असल्याने, तुम्हाला ह्याची माहिती असावी?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2018 - 10:41 am | डॉ सुहास म्हात्रे

खरेच ही साधन सम्पप्ती मर्यादित आहे का? आणि असेल तर मग ती नक्की कधी संपणार? अजुन किती काळ-वेळ लागेल ती संपावयास? कोणी सांगेल का मला?

पृथ्वीच्या ४.५ बिलियन वर्षाच्या आयुष्यात तिचा प्रत्येक भूभाग अनेकदा लक्षावधी वर्षे पाण्याखाली गेला आहे आणि लक्षावधी वर्षे पाण्यावर आलेला आहे. त्यामुळे, सैद्धांतिकदृष्ट्या (theoretically) आणि व्यवहारातही सद्या पाण्याच्या वर किंवा खाली असलेल्या पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागाखाली खनिज तेल आहे. थोडक्यात, पृथ्वीने तिच्या ४.५ बिलियन वर्षांच्या कालखंडात जमवलेले हे इंधन व्यावहारीक दृष्ट्या न संपणारे आहे.

प्रश्न फक्त असा आहे की, "कोणत्या जागेवरचे तेल बाहेर काढणे व्यापारी दृष्ट्या आणि इतर कोणत्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल ?"

कच्च्या (क्रूड) तेलाचा भाव १९४६ पासून १९७५ पर्यंत $१.६३ पासून $४.७५ पर्यंत वाढला होता. नंतर तो वाढत जाऊन १९८४ ला $२८.७५ झाला. त्यावेळेस, शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन तंत्रज्ञान वापरून तेल काढणे करणे फायदेशीर ठरले असते. पण, १९८६ साली भाव $ १४.४४ इतका पडला (काही जणांच्या मते शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन आणि इतर तंत्रज्ञान वापरून तेल काढल्यास ओपेकचा दबदबा कमी होईल म्हणून तो मुद्दाम पाडला गेला. आणि त्यामुळे बिलियन्स खर्च करून शोधलेले तंत्रज्ञान व्यापारी दृष्ट्या तोट्याचे झाल्याने खरोखरच बासनात बांधून ठेवले गेले).

नंतर भाव परत हळू हळू वाढत $८०-९० च्या पुढे गेल्यावर शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन (मुख्यतः कॅनडा) आणि हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग (मुख्यतः अमेरिका) या तंत्रज्ञानांनी तेल काढणे फायदेशीर झाले. त्यामुळे ओपेकच्या तेलाचे भाव $४०-५० इतके आले आणि त्याच्या आसपास राहिले आहेत. यामागे, अमेरिका-कॅनडा यांचे तेल उत्पादन जेवढे कारणीभूत आहे तेवढीच किंवा कांकणभर जास्तच ओपेकमधील दुफळीही (आणि त्यामुळे ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त तेल लपूनछपून उपसून जास्त पैसे कमावण्याची ओपेकमधील देशांची प्रवृत्ती) कारणीभूत आहे. तरीही, जोपर्यंत ओपेकचा तेलाचा भाव $३५ च्या खाली जात नाही तोपर्यंत नवे तंत्रज्ञान फायदेशीर असेल आणि त्यामुळे त्याला नजिकच्या काळात धोका होणार नाही असेच दिसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2018 - 10:54 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यामुळे, सद्या जे नवीन साठे मिळाले अशी बातमी येते ती दोन कारणांनी असते :

(अ) व्यापारी दृष्ट्या उपयोगी नवीन साठ्याचा शोध लागणे,

किंवा

(आ) पूर्वी माहीत असलेला तेलाचा साठा, सद्याच्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे आणि / किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे व्यापारी दृष्ट्या फायदेशीर होणे.

manguu@mail.com's picture

15 Apr 2018 - 6:36 pm | manguu@mail.com

तेलाच्या किमती वाढल्या की प्रत्येक गोष्टीच्या विक्री किमतीत वाढ होते. त्यात ते ॲडजस्ट् होते.

पुंबा's picture

16 Apr 2018 - 7:58 pm | पुंबा

वर श्री. प्रदीप यांनी सांगितलेले द प्राईझ आणि त्याच लेखकाचे द क्वेस्ट ही दोन्हीही पुस्तके सदर विषय समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.