गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

पुंबा's picture
पुंबा in काथ्याकूट
11 Apr 2018 - 9:07 pm
गाभा: 

गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते.

बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे:

१. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल.
२. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते.
३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते.
४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे.
५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये.

तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः

१. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते.
२. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ
३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये.
४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच.
५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये.

आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का?

या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच.

१. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे
२. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/
३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथेइथे
४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 9:18 pm | पगला गजोधर

गांजाबरोबर,
इच्छामृत्युसही कायदेशीर मान्यता मिळावी.

गांजास जर मान्यता दिली, तर ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर व्हावं, शस्त्र परवाना रद्द व्हावा,
आरोग्य विमा मधे, गांजासेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाम उपचार कव्हर नल व्हॉईड.

बमबोले म्हणायचं अन एक घच्च कश मारायचा!.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Apr 2018 - 9:08 am | अनिरुद्ध.वैद्य

हे नव्हत ऐकलं. भांगेचा संबंध जोडला जातो, कधीकधी प्रसादाशी, ते ठाऊक आहे.

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 10:13 am | जेम्स वांड

असे हल्लीच उज्जैन कुंभात एक शैव अघोरी बाबाजी बोलले होते, अर्थात ह्याला आधार देण्यास काहीही विदा वगैरे माझ्याकडे नाहीये. फिरता फिरता त्यांच्यासमोर बसून गप्पा मारल्या होत्या तेव्हा त्यांनी गप्पांच्या ओघात बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली ही एक.

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Apr 2018 - 11:48 am | अनिरुद्ध.वैद्य

अर्थात प्रसाद वगैरे गोष्टींना विदा नसतोच :) नशिबवान आहात अघोरी साधुंशी भेट घेतलीत!

गामा पैलवान's picture

12 Apr 2018 - 1:48 am | गामा पैलवान

गांजासंबंधी थोडी माहिती इथे आहे : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-42-09/7283-2013-02-06...

वरील दुव्यानुसार गांजा कायदेशीर करायला हरकत नसावी.

-गा.पै.

पुंबा's picture

12 Apr 2018 - 12:22 pm | पुंबा

हे भलतेच रोचक आहे..

प्रसाद गोडबोले's picture

12 Apr 2018 - 7:30 am | प्रसाद गोडबोले

माझ्या मते

माझ्या मते गांजा हे अगदीच निरुपद्रवी व्यसन आहे. पण समाजाने उगाचच टॅबु करुन ठेवल्यामुळे लोकं घाबरतात त्याला ! अमेरिकेत गांजा का बेकायदा केला ह्याचे विषयी ह्या विडीओ मधुन कळाले तेव्हा तर माझा विश्वासच बसला नव्हता !
The Sinister Reason Weed is Illegal

भारतात गांजा लीगलाईझ करु नये तर डिक्रिमिनलाईझ करावा असे माझे मत आहे ! लिगलाईझ केला की सरकार त्याचावर कर लादणार . त्यापेक्क्षा लीगलायझेशन नकोच ! डिक्रिमिनलाईझ केल्यास कसे कि गांजा पिणे गुन्हा मानण्यात येवु नये , विक्टिमलेस क्राईम समजुन सोडुन द्यावे ! गांजा पिवुन गाडी चालवल्यास लायसन्स जप्त करवा अन नाममात्र फाईन करावा ! वगैरे वगैरे !

असो. खरे तर गांजा सर्वसामान्यीकरण ह्या विषयावर पुरोगामी आणि परंपरावादी अशा दोन्ही समुदायांचे एकमत व्हायला हवे. पण तसे होईल अशी काही चिन्हे नाहीत !

अवांतर : भांग हा प्रकार तर निव्वळ स्वर्गीय असतो , त्यातही स्वतःच्या हाताने बनवल्यास थंडगार दुधात काजु बदाम पिस्ता वाटुन घालणे , अन स्वतःच्या हाताने वाटुन अन गाळुन गांजा घालणे हे सारे शौक करता येतात ! त्यातही एक औरच मजा आहे :) आणि पिल्यानंतर तर काय दोन दिवस ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे देहा कोण सांभाळी !! शंभो!!

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 8:48 am | जेम्स वांड

मलाना क्रीम सारखी अस्सल वाक्यं!

Jumping for joy

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Apr 2018 - 9:14 am | अनिरुद्ध.वैद्य

इन फॅक्ट मध्यप्रदेश अन राजस्थान आदी भागांमध्ये भांग कायदेशीर असतांना महाराष्ट्रात बंदी का असावी ते कळत नाही.

गांजाचे सेवनच केवळ वैध करावे की विक्री, विपणन, लागवड, व्यापार?
सध्या गांजा पुण्यातच अगदी आरामात कुठल्याही टपरीवर मिळतो, पार एसपीपर्यंत गांजा पुरवणार्‍यांचे लागेबांधी आहेत. हप्ते व्यवस्थित पोचतात, ज्यांना हवा आहे त्यांना मिळण्यात कुठलीच अडचण दिसत नाही. कायदेशीर केले तर हा भ्रष्टाचार थांबण्याची शक्यता तरे दिसेल.
निदान गांजाचे दुष्परिणाम यावर आधुनिक संशोधन तरी व्हावे. कायदेशीर मान्यतेचे पुढे बघू.

विजुभाऊ's picture

12 Apr 2018 - 10:20 am | विजुभाऊ

तेच तर म्हणतोय.
भांग गांजा अफू चरस मारीज्युआना या सगळ्यानाच कायदेशीर ठरवावे.
ते पिऊन अ‍ॅक्सीडेंट झाले तर ते कायदेशीर समजावे.
लोकसंख्या नियम्त्रणाला मदतच होईल पर्यायाने देशाच्या प्रगतीला

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 10:42 am | जेम्स वांड

उत्तम विचार, अपघात पण कायदेशीर ठरले म्हणजे मागे उरलेल्या परिवारास अजून गांजा प्यायला एकरकमी मदत राशी मिळेल अशी सोयच म्हणा ना! लोकसंख्या नियंत्रणाचे अजून काही कट्टर इलाज आले होते डोक्यात पण असोच..

सतिश पाटील's picture

12 Apr 2018 - 11:40 am | सतिश पाटील

मी एकदा वडला होता गांजा, सगळ दुनिया स्लो मोशन मध्ये चालतीये अस वाटत होत.

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 12:47 pm | जेम्स वांड

गांजा वडून एकदा आपण सोमाटणे फाट्याव टोल नाक्याव बसलो हुतो, अहाहा एकतर तिच्यायला तळेगाव वडगाव डिसेंम्बर थंडी त्यात गांजा, अरारा, १५० च्या स्पीड न जाणारी एक्सप्रेस हायवे वरली बीएमडब्ल्यू धाच्या स्पीड न चालल्या गत दिशी. मागच्या मागं गवताव पहुडलं का आकाशात सगळी नक्षत्रे अन तारे ठसठशीत दिसून येत!

जाबाली's picture

12 Apr 2018 - 11:45 am | जाबाली

शत प्रतिशत कराव !! अच्छे दिन आलेच कि !

पैसा's picture

12 Apr 2018 - 11:58 am | पैसा

भांग पिउन १२ तास नमस्कार घालणे किंवा लेझिम खेळणे याने बर्‍याच मोठ्या जन्तेचे फुकटात मणोरंजण होईल हा एक मोट्ठा फायदा आहे.

एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्‍या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का!

पुंबा's picture

12 Apr 2018 - 12:34 pm | पुंबा

वयाचे बंधन असेलच ना विक्रीसाठी. ५ वीला शिकणार्‍या विद्यार्थी/विद्यार्थीनीला मिळणारच नाही.
किशोरवयापासून गांजा घेणार्‍यांबद्दल:
When marijuana use begins in the teen years, it can have a significant impact on brain development, including decreased brain activity, fewer neural fibers in certain areas and a smaller than average hippocampus, which controls learning and memory functions.
लिंकः https://www.livescience.com/g00/24558-marijuana-effects.html?i10c.encRef...

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 12:43 pm | जेम्स वांड

द ग्रेट इंडियन फॅमिली सिस्टिम मदी आणणे म्हणजे एकतर मुद्द्यांचा दुष्काळ, किंवा गांजाच्या दुःपरिणामांस अजून भडकरित्या रंगवायचा एक केविलवाणा प्रयत्न, ह्या दोनपैकी एकच काहीतरी असू शकते, हे प्रतिसाद म्हणजे थेटरात सिनेमा सुरू व्हायच्या अगोदर 'मैं प्रकाश हूं मुझे मूह का कॅन्सर है, मैं गुटका खाता था' वाल्या जाहिराती सारखे असतात, करणारा समाजसेवा करून जातो अन पाहणारा ती ऍडही खुर्चीखाली पिचकारी मारून पाहतो
:D

पैसा's picture

12 Apr 2018 - 12:54 pm | पैसा

गांजा कधी ओढला असता तर कपाळाचे मुद्दे मिळाले असते ना! आम्ही फक्त ते लावून बसलेल्यांचे तमाशे बघितलेत इतकंच.

पण तुम्ही सांगा ना, तुमचं पोर किंवा बायको गांजा ओढते असं कळलं तर तुमची रिअँक्शन काय असेल? माझ्या घरात कोणी असे व्यसनी नाही हे सोडा. पण मी आकाश पाताळ एक करून अशा व्यक्तीला त्यातून बाहेर काढीन. बाकी काही नाही तरी पैशाचा अपव्यय हा फार मोठा मुद्दा आहे. गरीब घराला तर कोणतेच व्यसन परवडणारे नसते. गरज, आराम आणि चैन यातल्या कोणत्याच कॅटेगरी मध्ये जी गोष्ट येत नाही ती इकॉनॉमी ला परवडणारी नाही हे माझे मत.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 12:05 pm | सुबोध खरे

पैसा ताई
आपण भारतीय लोक (पुरुष) दांभिक आहोत.
मी पुरुष आहे तेंव्हा मी विकांताला प्यायला बसणार पण माझ्या बायकोने जर सांगितले कि मला पण विकांत एन्जॉय करायचा आहे मी पण मैत्रिणींबरोबर शुक्रवारी किंवा शनिवारी संध्याकाळी "बसणार" आहे.
एक वीकांती तुम्ही आणि एका वीकांती आम्ही
घराघरातून गहजब होईल कि नाही ते पहा.
"संस्कृती बुडाली" "उदात्त विचार" "स्त्री हि क्षणाची पत्नी आहे आणि अनंत कालची माता आहे" असे सर्व आरोळ्या ठोकायला मोकळे होतील.
येथे गांजा किंवा भांग पिऊन आम्ही कसे तर्रर्र झालो होतो याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगणाऱ्या आणि त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना जर आपल्या बायकोने कॉलेजात असंच केलं होतं असा सांगितलं तर ९० % लोकांना अप्स्माराचा झटका येईल.

पैसा's picture

13 Apr 2018 - 12:21 pm | पैसा

म्हणूनच पुन्हा पुन्हा विचारते आहे की तुमची काय प्रतिक्रिया असेल! तर कोणी बोलत नाहीत. जर भांग/गांजा एका माणसाला चांगली असेल तर ती त्याच्या बायको मुलांना पण चांगली असायला पाहिजे ना! प्रमाण कमी जास्त असेल एवडंच.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 1:39 pm | जेम्स वांड

हम प्रतिसाद मे लेट क्या हो गये आप तो नथ मे से तीर मारणे लगे!

माझी, बायको, मुलगी, मुलगा, बहीण, इत्यादी तुम्हाला आठवतील त्या सगळ्या नात्यांनी गांजाचे नव्हे तर कुठलेही व्यसन केले तर, भूतकाळात केले असले तर अन भविष्यात करायचे असले तरी, माझी काहीच हरकत नाहीये फक्त काही अटी (नातलग माझे त्यामुळे अटी माझ्या, वैयक्तिक आहेत उगाच सर्वत्रिकरण करू नये ही नम्र विनंती)

१. आपल्या नशेने कोणालाही बाधा (सामाजिक, आर्थिक, भावनिक) यायला नको
२. नशेचे पैसे स्वतः कमावलेले असावे, दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या जीवाशी खेळ नामंजूर
३. कोणाचीही कोणावरही कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नसावी, पियर प्रेशर मध्ये येऊन नशा करू नये.

बस, बाकी काही खास मागणे नाहीये

अवंतारात, तुम्ही लैच मनावर घेतलेला दिसतो पैसा जी आमचा प्रतिसाद, वैयक्तिक लागले असेल तर माफी मागतो, तसं मी काही लंच मध्ये अर्धी चपाती कमी खाल्ली नाहीये, तरी कोणाला मुद्दाम वैयक्तिक बोलण्याचा मानस नसतो म्हणून पुन्हा एकदा मनःपूर्वक माफी.

बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे इतके काही वाटत नाहीये.

पैसा's picture

13 Apr 2018 - 1:46 pm | पैसा

हा प्रतिसाद प्रामाणिकपणे अन गांजाच्या नशेत लिहिलेला नसावा एवढीच अपेक्षा! =))

अवंतारात, तुम्ही लैच मनावर घेतलेला दिसतो पैसा जी आमचा प्रतिसाद, वैयक्तिक लागले असेल तर माफी मागतो,

हे कशासाठी म्हणे? तुम्ही मला काही अपमानास्पद बोलला आहात का की जे मला कळले नाहीये?

बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे इतके काही वाटत नाहीये.

हे लैच्च मणोरंजक आहे.

माफी मागितल्याने माणूस झिजत नाही हो, फक्त वृत्ती हवी, गिरे तो भी टांग उपर अन मेरे मुर्गेकी एकही टांग छाप लोकांना जड पडते खरे पण जमले तर अप्रतिम शांतता मिळते.

हा प्रतिसाद प्रामाणिकपणे अन गांजाच्या नशेत लिहिलेला नसावा एवढीच अपेक्षा! =))

हा जर विनोद असेल तर अतिशय हीन अन बीभत्सरसाच्या अंगाने जाणारा विनोद आहे इतके खेदाने नमूद करतो. एखाद्याला 'प्रोफाइल' करणे म्हणजे किती चूक असते हे सोदोहारण दाखवणारा प्रकार म्हणजे हा 'विनोंद' होय.

पैसा's picture

13 Apr 2018 - 2:03 pm | पैसा

बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे

हा जेवढा विनोद आहे तेवढाच तो विनोद आहे. मी स्मायली तरी टाकली आहे. तुम्ही तीही विसरलात. काही फॉर्म्स वगैरे भरताना" मी पूर्णपणे शुद्धीत असताना, नशापाणी न करता सही करत आहे" असे आपण लिहितो तोही तुमच्या मते बीभत्स विनोद आहे का? का काय गंभीर आणि काय विनोद यात तुमची गल्लत होते आहे?

गांजाच्या नशेत कोणी मिपावर लिहू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण लिहिताना तुम्ही काही विचार केला असेल असे वाटत नाही. तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते? आपल्या जवळच्या माणासाने व्यसन केले तरी हरकत नाही म्हणणे हा उच्च प्रतीचा बेजबाबदारपणा झाला.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 2:19 pm | जेम्स वांड

तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते?

मुलगा/मुलगी - माझ्यावर अवलंबून असतील, कायदेशीर सज्ञान नसतील तर नशेला परवानगी नसेल, स्वतः कमाई करून त्यांनी वाटेल ते करावे. तोवर जर माझ्या पैशावर जगणार असतील तर माझ्या टर्म्सवरच जगायला हवे

बायको/भाऊ - तुम्हाला रोज गांजा ओढायचा ओढा, स्वतः कमवता , हरकत नाही, पण त्याचे इफेक्ट अन त्यामुळे तुमचे होणारे नुकसान (कामातील दिरंगाई, नशा इत्यादी मुळे) तुमचेच, ते निस्तरायला मी येणार नाही.

माझ्यामते हे पुरेसे स्पष्ट आहे

आता पुढे,

शालजोडीतले हाणायचा आव आणून कोणी कोणाला चक्क अप्समराचा पेशंट वगैरे म्हणत असेल, मेल शोव्हेनिस्ट म्हणून प्रोफायलिंग करत असेल (बहुसंख्य भारतीय पुरुषांचे) तर अजून काही संयुक्तिक प्रतिसाद सुचत नाही, स्वतः झेंडे घेऊन मग कोणी हसले तर इतके दुखायचे कारण नाही. इथे मात्र माझ्याबद्दल शष्प माहिती नसताना तुम्ही चक्क माझे 'गंजेकास' असे प्रोफायलिंग करून टाकलेत, फरक आला लक्षात तर पहा.

इत्यलम

पैसा's picture

13 Apr 2018 - 2:47 pm | पैसा

अवघड आहे. चालू दे तुमचे.

पैसा's picture

13 Apr 2018 - 2:04 pm | पैसा

बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे

हा जेवढा विनोद आहे तेवढाच तो विनोद आहे. मी स्मायली तरी टाकली आहे. तुम्ही तीही विसरलात. काही फॉर्म्स वगैरे भरताना" मी पूर्णपणे शुद्धीत असताना, नशापाणी न करता सही करत आहे" असे आपण लिहितो तोही तुमच्या मते बीभत्स विनोद आहे का? का काय गंभीर आणि काय विनोद यात तुमची गल्लत होते आहे?

गांजाच्या नशेत कोणी मिपावर लिहू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण लिहिताना तुम्ही काही विचार केला असेल असे वाटत नाही. तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते? आपल्या जवळच्या माणासाने व्यसन केले तरी हरकत नाही म्हणणे हा उच्च प्रतीचा बेजबाबदारपणा झाला.

सिद्धार्थ ४'s picture

13 Apr 2018 - 5:57 pm | सिद्धार्थ ४

>>आपल्या नशेने कोणालाही बाधा (सामाजिक, आर्थिक, भावनिक) यायला नको

आता मला एक सांगा नशेत असलेला कुठला मनुष्य हे भान ठेवेल? पण तुम्ही म्हणाले तसे हे सगळे कायदेशीर झाले तर सरकारचा प्रचंड खर्च वाचेल. म्हणजे कोणी नशेत १० लोकांना उडविले तर ते कायदेशीर होऊन खटले चालवण्याच्या खर्च वाचेल.

पैसे ताई अँड डॉक्टर खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 6:17 pm | सुबोध खरे

वांड साहेब
तुम्ही हा प्रतिसाद वैयक्तिक का घेतलात ते समजले नाही.
शिवाय त्यात स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेण्याचाही संबंध नाही.
पूर्ण जगाला अप्स्माराचे रुग्ण समजणे हा अर्थ तुम्ही कुठून काढलात हे समजले नाही.
"अपस्माराचा झटका" याला सध्या मराठीत "फेफरं येणं" म्हणतात. आणि हा शब्दप्रयोग श्री पु ल देशपांडे यांनी सुद्धा केलेला आहे ( म्हणजेच प्रचलित आहे)
खाली मी साध्या सरळ शब्दात म्हटले आहे कि कोणत्याही व्यसनाचे/ मादक द्रव्याचे उदात्तीकरण नको कारण काही तरी थ्रिलच्या नावाखाली संवेदनशील तरुण मुले त्याला बळी पडू शकतात.
बाकी बहुसंख्य भारतीय लोक या बाबतीत दांभिक आहेत याला मिपावरही बहुसंख्य लोक दुजोराच देतील कारण बहुसंख्य लोकांना आपल्या बायको किंवा मुलीने दारू /गांजा /चरस सार्वजनिक ठिकाणी उघडपणे प्यायलेली चालणार नाही.
व्यसनमुक्ती केंद्रावर काम केलेअसल्याने या प्रश्नाच्या मुळापर्यंत ( एके काळी) मी गेलो होतो आणि माझी मते काही वैद्यकीय ज्ञानातून, काही अनुभवातून आली आहेत. ती परिपूर्ण आहेत असाही माझा दावा नाही.
बाकी आपण माझ्या प्रतिसादाला फाट्यावर मारलेत काय किंवा महत्व दिलेत काय मला काहीच फरक पडत नाही
कोठेतरी काहीतरी खोल जखम झाली असावी असे वाटते आहे.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 1:46 pm | जेम्स वांड

मी गांजा/भांग,

चांगलं असल्याचं कुठेच बोललो नाहीये, त्यामुळे तत्सम शब्द माझ्या तोंडी घुसडू नका ही विनंती

, गांजाचा कुतुहलवश अनुभव घेऊन मी फक्त इतकं म्हणतोय की एवीतेवी गांजा विक्री, नशा, इत्यादींचे अर्थकारण काळ्या अर्थव्यवस्थेत राजरोस सुरूच आहे, टेरर फंडिंग सारखी त्याची साईड इफेक्ट बेक्कार आहेतच, तर त्याला सरळ दारू, तंबाकू प्रमाणे कायदेशीर करून टाकावे, आपण उलट त्यावर नीट टॅब ठेऊ शकू. बाकी गांजा भांगेतून महसूल वगैरे विषय सोडूनच देऊया.

टीप- मध्यप्रदेश राज्यात, देशी दारूचे अड्डे असतात तसे सरकारी अनुज्ञाप्राप्त भांग थंडाई दुकानेही असतात, ओंकारेश्वर क्षेत्री ती सहज दिसून येतील, त्यामुळे हा प्रयोग (भांग गांजा कायदेशीर करणे) आधी इतरत्र झालेला नाहीये अन आम्ही पूर्ण समाजाची वीण उसवेल असलं काहीतरी एनार्किस्ट बोलतोय असे अजिबात नाहीये.

पैसा's picture

13 Apr 2018 - 1:51 pm | पैसा

इतर आधुनिक ड्रग्ज पण कायदेशीर करावीत असे लॉजिक पुढे येऊ शकते ना! कायदेशीर करण्यापेक्षा मुळावर घाव घालणे जास्त चांगले नाही का?

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 1:57 pm | जेम्स वांड

अहो, जगातील सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान, कायदे-पोलीस-न्याय व्यवस्था असून जे अमेरिका, नेदरलँड सारख्या अतिप्रगत देशांना जमले नाहीये ते नवऔद्योगिक भारताला जमेल? तुम्ही म्हणताय तो आदर्शवाद म्हणून बेस्ट आहे पण प्रॅक्टिकल नाहीये. लोकशाही देश सोडाच फायद्याचे गणित पाहून दुबई, बहरिन, सारख्या ठिकाणी नशापाणी आजही मिळते (हातपाय कलम व्हायची भीती असूनही) तेव्हा आपण कुठल्या मुळावर घाव घालू शकतो हे तुम्हीच प्रमाणिकपणे विचार करून सांगा. ह्याला कडक रेग्युलेटरी प्रोसेस लावून थोडं कंट्रोल करू शकतो आपण अन मी तेच करायचं म्हणतोय.

अनुप ढेरे's picture

13 Apr 2018 - 2:25 pm | अनुप ढेरे

सहमत आहे.
जितक्या जास्तं गोष्टी इल्लिगल तितका जास्तं भ्रष्टाचार आणि ऑर्गनाइज्ड क्राईम. गांजा लिगलाइज करावा याच्याशी सहमत आहे.

( भारतीय परिप्रेक्ष्यात एक उदाहरण आहे म्हणतात. १९९० पर्यंत सोने आयात करण्यावर बंदी होती. या बंदीमुळे हाजी मस्तान दाऊद इब्रहीम इत्यादी लोकांनी सोने स्मगलिंगच्या धंद्यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाने पॉवर कमावली आणि आख्या देशाला डोईजड झाले.
गुजरातमधल्या दारुबंदीमुळे गब्बर झालेल्या माणसावर अलिकडेच पिच्चर आलेला. शाहरुख खानचा. )

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 2:33 pm | जेम्स वांड

आता कायदेशीर करा म्हणणे म्हणजे कोणाला उदात्तीकरण वाटत असेल तर आपला नाईलाज होय भाऊ. तुम्ही उदाहरणे भारी दिलीत. आवडलं आपल्याला.

पैसा's picture

13 Apr 2018 - 2:42 pm | पैसा

पोलिस आळा घालू शकत नाहीत म्हणून बाकी सगळे ड्रग, बिट कॉइन, वगैरे कायदेशीर करावे का? मला हे लॉजिक खरेच कळत नाही. अवैध दारू पिऊन मेलेल्याना पैसे वाटतात असले आपले अगाध लोक आणि सरकार आहेत. अमली पदार्थ लीगल केले तर काय परिणाम होतील याची फक्त कल्पनाच करून बघा.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 3:01 pm | जेम्स वांड

गांजा एखादवेळ ओढलाय मी, म्हणजे अनुभव म्हणून नंतर काही ती वाट धरली नाही, पण संगतीत काही मित्र आहेत त्यांच्यासोबत फिरून एक कळले

१. इतर ड्रग - प्रचंड जास्त महाग, हा एकच मुद्दा त्यांचं ट्रिकल डाऊन अरेस्ट करतो, कोकेन, मेथ, एलएसडी वगैरे तर अक्षरशः तोळ्यास हजारो रुपये वगैरे भावात असतात, अगदीच हुच्चभ्रु किंवा येणारे फिरंगी पर्यटक सोडून इतरांना सहसा ती परवडत नाहीतच, त्यांना मुळाशीच कंट्रोल करणे सोपे असते ते ह्यामुळेच अन ते व्हावे ही.

२. गांजा/भांग - घरच्या कुंडीतही लागवड करून घरच्या घरी प्रोसेस करता येईल (अर्थात सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार पोलीस बांबू मारतील). साधारण पन्नास ग्रॅम हलक्या प्रतीचा गांजा २०₹/पुडी हिशेबाने मिळतो , (किंवा २०१२-१३ मध्ये ) मिळत असे, उत्तम म्हणजे पार कळीचा माल म्हणतात तसलं घेतलं तर १००₹/ पन्नास ग्रॅम. ही किफायतीशीर किंमतच धोकादायक आहे. दुसरे हे, की हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम कडे गेलात तर विविक्षित ठिकाणी नाही तर पार रस्त्याच्या कडेला भांग/गांजा उगवलेला असतो, ह्याच्या मुळावर घाव घालायचा म्हणजे काय करावे? आता असले सार्वत्रिक नशापाणी जर सरकारी कंट्रोल मध्ये आणले तर किमान कुठून कुठं पैसा जातोय ते तरी कळेल, झिरपण्याचा वेग कंट्रोल करता येईल, पक्षी कधी भाव वाढवणे कधी घटवणे हे सरकारी अखत्यारीत राहील, शिवाय लीगल केले तर आज ड्रग अब्युज मध्ये जी मोठी लिस्ट आहे सबस्तानसेसची ती कल होऊ शकते, लीगल म्हणल्यावर कितीतरी लोक गांजावर स्वीच होतील अन आपसूकच सरकारी मॉनिटरिंग मध्ये येतील.

अनुप ढेरे's picture

13 Apr 2018 - 4:13 pm | अनुप ढेरे

बिट्कॉइन बेकायदेशीर करायचं नक्की कारण काय? मला वाटतं अमुक गोष्ट लिगलाईज का करायची या जस्तिफिकेशनपेक्षा यापेक्षा अमुक एक गोष्ट इल्लिगल का असावी याचं जस्तिफिकेशन हवं?

आणि गांजा/ड्रग यावर उपाय म्हणजे उदात्तीकरण थांबवणे हे आहे. बंदी आणणे हे नाही. इथेच कोणीतरी लिहिलय. सिगारेटप्रमाणे वार्निग द्याव्यात पॅकवर. ( सिगारेट प्याकवरच्या वॉर्निंगचा भरपूर फरक पडतो असं वाचनात आलेलं कुठेशी. )

अनुपराव, सगळे दुराचार लिगल करावे मंता?

अनुप ढेरे's picture

13 Apr 2018 - 6:12 pm | अनुप ढेरे

दोन सज्ञान व्यक्तींमधला कोणताही व्यवहार इल्लिगल नसावा. एखादी व्यक्ती इतरांना त्रास न देता काही करत असेल तर ते इल्लिगल नसावं.

उदा: वेश्याव्यवसाय बेकायदेशीर नसावा या मताचा मी आहे.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 6:26 pm | सुबोध खरे

बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर करावा काय? म्हणजे ए के ४७ ए के ५६ इ.

दोन व्यक्तीमध्ये आपसात विनिमय होत असेल तर सरकारने का त्यात पडावे?

शिवाय दहशतवाद हि थांबवता येत नाही मग तो पण कर लावून कायदेशीर करावा काय?

म्हणजे एखाद्याला "ओलीस" ठेवायचे असेल तर सरकारला ३० % कर भरला कि झाले

वेश्या व्यवसाय कायदेशीर असणाऱ्या देशात सुद्धा वेश्यांच्या "शोषणाची आणि अनारोग्याची" फार मोठी समस्या आहे.
थायलंडच्या समस्ये बद्दल श्री बाजीप्रभू यानी थोडे फार लिहिलेले आहे.

जग हे केवळ काळे आणि पांढरे नसते

करड्या रंगाच्या बऱ्याच छटा असतात आणि त्यात कुठले चांगले आणि कुठले वाईट याची एक सुस्पष्ट रेषा असतेच असे नाही.

कायदे पंडितांना स्थळ काळ संस्कृती आणि लोकमानसाचा विचार करूनच कायदे करावे लागतात.

अर्थात चरस कायदेशीर करावा कि न करावा यालाही बरेच पैलू आहेत.

मी फक्त त्यातील वैद्यकीय पैलूचा थोडासा भाग पाहिला / वाचला/ अनुभवला आहे तेवढेच मत मी मांडतो.

तरीही संपूर्ण स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे झुकते त्यामुळे स्वातंत्र्य थोडेसे मर्यादेत ठेवले पाहिजे अशी माझी मनोवृत्ती झाली आहे.

अनुप ढेरे's picture

13 Apr 2018 - 10:38 pm | अनुप ढेरे

अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट नाहीये. सर्व इन्वॉल्व्ह्ड लोकांची मर्जी नाही या उदाहरणात. सो ओलिस/दशतवाद कायदेशीर करणे हे माझ्या वरील प्रतिसादातुन इम्प्लाय होत नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील कंसेंटने होणारा कोणताही व्यवहार ज्याने इतरांना थेट त्रास होत नाही असे सर्व व्यवहार लीगल असावेत.

बिटाकाका's picture

14 Apr 2018 - 5:31 pm | बिटाकाका

मला वैयक्तिकरित्या उदाहरणे तुमच्या वाक्याला धरूनच आहेत असे वाटले.
*******************
तुमचं वक्तव्य अतिशय बेसलेस आहे आहे असे वाटते. दोन व्यक्तींमधील व्यवहाराचे नियम हे त्या दोन व्यक्तींच्या गुणधर्मांवर आधारित नाही तर ज्याचा व्यवहार त्या जिन्नसावर आधारित असतात आणि असायलाच हवे.
******************
गांजाच्या व्यवहाराने इतरांना त्रास होतो की नाही? आणि म्हणून तो लिगल करणे योग्य की नाही?

अनुप ढेरे's picture

14 Apr 2018 - 10:09 pm | अनुप ढेरे

मी आत्ता चिलम पेटवली आहे. तुमचं काय बिघडलं?

असलं बेसलेस उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं, पण असो!
--------------------------------
आता पेटवलेली चिलीम ओढून रिकामी केल्यावर माझं किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं बिघडणारच नाही याची गॅरंटी देता येते का?

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 7:03 pm | सुबोध खरे

ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट नाहीये. सर्व इन्वॉल्व्ह्ड लोकांची मर्जी नाही या उदाहरणात.
मान्य.
उदाहरणे चुकलीच म्हणायची
दोन सज्ञान व्यक्तींमधील कंसेंटने होणारा कोणताही व्यवहार ज्याने इतरांना थेट त्रास होत नाही असे सर्व व्यवहार लीगल असावेत.
उत्तम
गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा कायदेशीर करून टाका.

मग बंदूक, ए के ४७, रॉकेट लॉन्चर विकत घेणे आणि विकणे अधिकृत करून टाका.

तसेच सार्वजनिक ठकाणी प्रेमाचे प्रदर्शन, संभोग करणे इ सुद्धा कायदेशीर करायला काय हरकत आहे? हा पण दोन सज्ञान व्यक्तीमध्ये संमतीने होणारा व्यवहारच आहे कि

अनुप ढेरे's picture

14 Apr 2018 - 10:08 pm | अनुप ढेरे

गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा कायदेशीर करून टाका.

+१

मग बंदूक, ए के ४७, रॉकेट लॉन्चर विकत घेणे आणि विकणे अधिकृत करून टाका.

अजुन पूर्ण विचार नाही केला पण इथे इतर अन्रिलेटेड लोक मरण्याची शक्यता प्रचंड आहे. सो ठाम मत नाही.

तसेच सार्वजनिक ठकाणी प्रेमाचे प्रदर्शन, संभोग करणे इ सुद्धा कायदेशीर करायला काय हरकत आहे?

पुण्यात झ पुलावर, किंवा एम्प्रेस गार्डनावर या एकदा. किंवा हुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला. सभोग नाही पण प्रेमाचे प्रदर्शन भरपुर चालु असतं. उलट हे असले अमुक-तमुक बेकायदेशीर सारख्या नियमांमुळे पोलिस छळतात जोडप्यांना.

बंदी घालणे हा अयशस्वी आणि काहीही अचिव न करू शकलेल्या राजकारणी लोकांचा केविलवाणा प्रयत्न असतो आपण काहीतरी केलं आहे हे दाखवण्याचा. प्लास्टीक बंदी, दारु बंदी, हुक्का बंदी, पॉर्न बंदी इत्यादी इत्यादी...

पैसा's picture

13 Apr 2018 - 2:36 pm | पैसा

चांगलं असल्याचं कुठेच बोललो नाहीये, त्यामुळे तत्सम शब्द माझ्या तोंडी घुसडू नका ही विनंती

इथे अहाहा ओहोह म्हणणारे दुसरे लोक आहेत. तुम्ही सगळ्यांच्या वाटच्या प्रतिक्रिया कशाला देताय! =))

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 2:48 pm | जेम्स वांड

असंय व्हय!

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2018 - 2:18 pm | श्रीगुरुजी

एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्‍या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का!

एका धाग्यावर न्यूड मॉडेलिंगचे तावातावाने समर्थन करणा-यांना मी विचारले होते की तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? यावर एकाही समर्थकाने स्पष्ट भूमिका न घेता हिंदुत्ववादी, कर्मठ, टिपिकल पुरूषी मानसिकता अशा शब्दात माझी संभावना केली होती.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 2:23 pm | जेम्स वांड

ह्यात काय हिंदुत्ववादी! खजुराहोच्या कामशिल्पांचा धर्म अन देश आपला, हे लिब्रांडू काय आपल्याला लिबरल आर्ट शिकवणार का आता!

उलट तुम्हाला टीपीकल एकपुस्तक एकेश्वरवादी , बुरका समर्थक, स्त्रीला वस्तू समजणाऱ्या दुसऱ्या एखाद्या बेकार धर्माचे पाईक म्हणले असते तर चालले असते, पण तशी जीभ वळणाऱ्याला लिब्रांडू नाही म्हणत ना!!

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2018 - 5:33 pm | श्रीगुरुजी

असा प्रतिसाद येणार हे वाटलंच होतं.

असो. फाटे न फोडता फक्त हो किंवा नाही या शब्दात तुम्ही सांगा.

१) न्यूड मॉडेलिंगचे तुम्ही समर्थन करता का?

२) समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का?

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2018 - 8:07 am | श्रीगुरुजी

प्रतिसादाची वाट पहातोय

जेम्स वांड's picture

14 Apr 2018 - 10:22 am | जेम्स वांड

न्यूड मॉडेलिंग वगैरे नाही आवडणार मला, पण तुम्ही का मनाला लावून घेतले, मी उलट लिब्रांडू जनतेस शिव्या देऊन एक पुस्तक एकेश्वरवादी जनतेचा दांभिकपणा हायलाईट करावा म्हणत होतो, काय राव गुरुजी आपलं परकं ओलं सुकंही न ओळखता येण्या इतका द्वेष अन तिरसटपणा नका ठेऊ इतकी विनंती करतो फक्त.

१. न्यूड मॉडेलिंगचे तुम्ही समर्थन करता का?
उत्तर: हो. मिटक्या मारत पहातो.

2. समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का?
उत्तर: नाही. कारण मी दांभिक आहे.

याउप्पर,

मी गांजाचे समर्थन करता का?
उत्तर: हो.

समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का?
उत्तर: हो.

mayu4u's picture

15 Apr 2018 - 1:47 pm | mayu4u

... जग आहे, हे का विसरता नेहमी?

मार्मिक गोडसे's picture

12 Apr 2018 - 1:48 pm | मार्मिक गोडसे

छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना प्रा. शिवाजीराव भोसले यांनी ,तरुणांनी शिवाजी महाराजांचा कोणताही आदर्श घेतला नाही तरी हरकत नाही, परंतू त्यांना कसलेही व्यसन नव्हतं हे लक्षात ठेवून तेवढाच आदर्श घेतला तरी पुरे आहे अशी जाणीव करून दिली. अक्षरशः कानाखाली वाजवल्यासारखं जाणवलं. छ. शिवाजी महाराज की जय! हेच एकमेव व्यसन.
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.

कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.

लै येळा सहमत. या एका वाक्यात सगळं आलं!

पुंबा's picture

12 Apr 2018 - 3:43 pm | पुंबा

वरील प्रतिसादात असहमत होण्यासारखे काहीच नाही.
मुद्दा गांजा या एकाच पदार्थासंबंधी आहे, ज्याची विक्री, सेवन, लागवड कायदेशीररीत्या वैध ठरवावी का? शिवाय, गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे, मग तो अंमली पदार्थाच्या यादीत का असावा?

पगला गजोधर's picture

12 Apr 2018 - 3:57 pm | पगला गजोधर

गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे

गांजा सेवनामुळे मेंदूवर परमनंट डॅमेंज होत का ? गांजा सेवनाचे दुष्परिणाम पुढील पिढीत जेनेटिकली कॅरीफॉरवर्ड होतात का ?

गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे तर, रेफ द्या, स्टॅस्टिटीकल डेटा रेफ द्या, WHO ने *डिस्क्लेमर दिलेत का ? निष्कर्ष प्रकाशित करताना ?

शिवाय, गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे,

हे म्हणणं चूक आहे. गांजा हे एक व्यसन आहे.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 9:46 am | सुबोध खरे

पुम्बा साहेब
गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे.
हे आपले विश्लेषण चुकीचे आहे.

Compound in Marijuana Appears Safe and Nonaddictive, WHO Says" हे शिर्षक आहे
आणि पहिले वाक्य
A compound in marijuana appears to be relatively safe and nonaddictive, according to a new report from the World Health Organization (WHO). असे आहे

गांजातील "कॅनाबिडायॉल" या द्रव्याचे व्यसन लागत नाही असेच वरील दुवा म्हणतो. हे द्रव्य अपस्मार सारख्या काही आजारात उपयोगी पडते. याचा अर्थ गांजा तील "एक द्रव्य" उपयुक्त आहे सर्वच्या सर्व द्रव्ये नाहीत.

"कॅनाबिडायॉल" या द्रव्याचे addiction potential अगदीच कमी आहे कारण त्याने "नशा" येत नाही.

पण गांजात सर्वात जास्त प्रमाणात असलेले द्रव्य THC किंवा टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल हे द्रव्य नशा आणणारे त्यामुळेच व्यसन लावणारे आहे

Unlike tetrahydrocannabinol (THC), which is another compound found in marijuana, CBD does not have "psychoactive" effects. In other words, CBD won't get you high.

कृपया गांजाचे व्यसन लागत नाही असा चुकीचा अर्थ काढू नये.

Recent data suggest that 30 percent of those who use marijuana may have some degree of marijuana use disorder. People who begin using marijuana before the age of 18 are four to seven times more likely to develop a marijuana use disorder than adults.
Those studies suggest that 9 percent of people who use marijuana will become dependent on it, rising to about 17 percent in those who start using in their teens.
https://www.drugabuse.gov/publications/research-reports/marijuana/mariju...

पुंबा's picture

13 Apr 2018 - 12:13 pm | पुंबा

हो तुमचे बरोबर आहे.
आणखी वाचले असता पुढील माहिती मिळाली:

Some people might argue that marijuana is not addictive, but scientific research indicates that's not entirely true. While marijuana is not physically addictive like alcohol or heroin, it can be psychologically addictive. Scientists call the psychological addiction to marijuana a “cannabis dependence disorder”.

धन्यवाद या माहितीबद्दल.

अर्धवटराव's picture

12 Apr 2018 - 4:55 pm | अर्धवटराव

कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.

पर्फेक्ट. लाखो वर्षे लागली मानवाचं शरीर/मेंदु इव्होल्व व्हायला. त्याची अशी माते करणं कधिही समर्थनीय नाहि.

arunjoshi123's picture

12 Apr 2018 - 5:38 pm | arunjoshi123

कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.

एकदम बराबर बोले हो गोडसे साहब.
==============================
व्यसन कदाचित मानवतेचा अविभाज्य अंग असावं. पण व्यसनी लोक कमीत कमी असावेत. या गोष्टींचे नियमन करणारी केंद्रीय रेग्यूलेटरी बॉडी असावी.
========================
व्यसनाधिनतेला कोणत्याही हालतीत कायदेशीरपणाचे वा नैतिकतेचे अधिष्ठान देऊ नये.

जेम्स वांड's picture

12 Apr 2018 - 5:57 pm | जेम्स वांड

तुम्ही जे म्हणताय न

या गोष्टींचे नियमन करणारी केंद्रीय रेग्यूलेटरी बॉडी असावी.

तेच बहुदा धागलेखक म्हणत असावेत, गांजा इललीगल म्हणून फुकणारे थांबत नाहीत. जे खकाने होऊन वाया गेलेत त्यांना पाहून काही कवळी मंडळी प्रयोग करायला जातात अन मातेरे करून घेतात, त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, सिगरेटच्या पाकिटावर जसे कॅन्सरग्रस्त मंडळींचे फोटो असतात तसे गांजाच्या पुडीवर (होत असल्यास) मेंदूवर होणारे परिणाम दाखवणारा सिटी स्कॅन वगैरे छापावेत, ज्याला ओढून मरायचं आहे त्याला ओढू देत मग.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 9:50 am | सुबोध खरे

त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, सिगरेटच्या पाकिटावर जसे कॅन्सरग्रस्त मंडळींचे फोटो असतात तसे गांजाच्या पुडीवर (होत असल्यास) मेंदूवर होणारे परिणाम दाखवणारा सिटी स्कॅन वगैरे छापावेत, ज्याला ओढून मरायचं आहे त्याला ओढू देत मग.
गांजा ओढल्याने झालेल्या आजारावर सरकारने (फुकट) इलाज करावा कि नाही याबद्दल आपले काय मत आहे?
तसंच गर्द, हेरॉईन, कोकेन पण ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आणि मरावं. कुटुंबाची धूळधाण झाली तर करू द्यावी
आणि
हेल्मेटची सक्ती का करावी? लोकांना डोकं फोडून घेऊन मरायचं असेल तर मरू द्यावं याबद्दल आपले काय मत आहे?

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 10:10 am | जेम्स वांड

आमची मते काहीही असो, ती चुकीचीच आहेत अन तुम्ही म्हणताय तितकेच काय ते बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, चहाचे व्यसन लागू शकते का हो डॉक्टर साहेब?

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 10:37 am | सुबोध खरे

व्यसन कुठलंही वाईटच
मग ते चहाचं असो किंवा आत्मस्तुतीचं असो
बाकी
गांजा ओढल्याने झालेल्या आजारावर सरकारने (फुकट) इलाज करावा कि नाही याबद्दल आपले काय मत आहे?
तसंच गर्द, हेरॉईन, कोकेन पण ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आणि मरावं. कुटुंबाची धूळधाण झाली तर करू द्यावी

याबद्दल आपला म्हणणं काय ते हि समजू द्या.

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 1:28 pm | जेम्स वांड

कायदेशीर केले तर ते सज्ञान लोकांसाठीच करणार सरकार, त्यामुळे ज्याला जसे मरायचे आहे (गांजा पिऊन, चरस अफू ओढून ) त्याचे ते त्याने स्वतः ठरवावे बरंका डॉक्टर साहेब. नशा करायचं स्वातंत्र्य तितकं द्यावं, किंबहुना इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा आणल्यास नशेडी मंडळींस कडक शासनही करावं, एरवी तुम्ही लीगल करा की करू नका गांजा विक्री होणारच आहे, लीगल करून रेग्युलेट केल्याने झाला तर फायदाच होईल असे वाटते, पण म्हणून सरकारने त्यातून होणाऱ्या इफेक्ट वर काही करू नये, नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये.

बाकी आत्मस्तुतीवर (माझेच खरे) साहेब बोलणे म्हणजे उत्तम विनोदबुद्धी असल्याचं निदर्शक आहे!, लगे रहो.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 6:32 pm | सुबोध खरे

नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये.

नशेमुळे, विषारी दारूमुळे माणसं मरतात त्यांच्या निष्पाप बायका मुलांना सरकारने काही मदत करावी का वाऱ्यावर सोडून द्यावे?

कां विषारी दारू स्वस्त मिळते म्हणून लोक पितात त्यात सरकारची चूक काहीच नाही.

तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आपलं काय म्हणणं आहे?

म्हणजे अवर्षण अवकाळी पाऊस सुद्धा काय सरकारने आणलेला नसतो. (कृपया पक्षीय राजकारण बाजूला ठेवा केवळ मानवतावादी विचार करा)

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 8:06 pm | जेम्स वांड

शेतकाऱ्यांवरची मते इथे मांडली तर लैच धुरळा उठेल, ते नंतर कधीतरी प्रसंगोत्पात मांडतो.

वरती तुमचा एक प्रतिसाद म्हणतोय त्या प्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य स्वैराचारकडे झुकते त्यामुळे थोडीफार बंधने हवीतच. मी नेमकं तेच म्हणतोय, स्वैरपणे गांजाचा व्यापारउदीम सुरुये त्याला कडक सरकारी बंधने घाला, मिळणे दुरापास्त करा, त्यातूनही ज्याला खाज आहे तो घेऊन ओढो अन आपली कर्मफळ भोगो.

पैसा's picture

13 Apr 2018 - 9:09 pm | पैसा

आज गांजाची दुकाने उघड नसतात, ते बेकायदा आहे म्हणून बरीच सरळ मार्गी मुले त्याच्या वाटेला न जाणारी असतात. बंधने घालून कायद्यात आणले तर पिअर प्रेशर म्हणा, इतर काही कारणाने त्याचे सेवन करण्याचे प्रमाण निश्चित वाढेल. पैशासाठी लहान मुलांनाही गांजा विकायला लोक कमी करणार नाहीत. विकत घेणाऱ्या पोराचे आधार कार्ड थोडेच कोणी तपासेल?

जेम्स वांड's picture

14 Apr 2018 - 6:53 am | जेम्स वांड

कायदेशीर असतात भर बाजारात गावाच्या मधोमध सुद्धा सापडतात, किती पियर प्रेशर वाढलेलं आढळून आलंय पोरांवर (सरळमार्गी पोरांवर) किंवा किती वाढलं आहे प्रमाण दारुबाजी करायचं? वाढलंही असेल तर त्याला फक्त गावात असलेलं दुकान किती टक्के जबाबदार आहे अन फिल्मी प्रभाव, नक्की पियर प्रेशर कश्याने वाढते, हे तुम्ही आकड्यात सांगू शकाल?

पण अन्य एका प्रतिसादात डॉ खरे म्हणतात की गुटख्यावर बंदी घातल्यानंतर त्याचे सेवन ५३% कमी झाले. तेच इथेही लागू असायला हरकत नाही. कायदेशीर रित्या उपलब्धता हा जर परिणाम करणारा घटक असेल तर गांजा सेवन त्यामुळे ५ ते १०% वाढणार असेल तरी भयावह आहे.

चरस कोकेन सगळी गांजाची पिलावळ असेल तर नक्की काय कायदेशीर करणार?

अनेक सरकारी योजना कागदोपत्री उत्तम असतात, अंमल बजावणी करताना त्यांचे भरीत होते. आपण खूप अपरिपक्व लोक आहोत. परिणामांची जबाबदारी लोकांवर टाकणं आपल्याकडे अजिबात शक्य नाही. त्यामुळे आहेत ते निर्बंध उठवण्यापेक्षा तंबाखू सुद्धा सहज मिळणे दुरापास्त व्हावे अशी मागणी का करू नये?

गांजा सेवन regulate म्हणजे काय करणार? पैसे सरकारला मिळणार नाहीत. नुसता डाटा कसाही मिळतो.

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 10:08 am | सुबोध खरे

वांड साहेब
सहज उपलब्धता आणि व्यसने यांचा अतिशय जवळचा संबंध आहे हे असंख्य संशोधनांती सिद्ध झालेले आहे.
मुळात ते सहज उपलब्ध आहे आणि कायदेशीर याचा अर्थच त्यात काही वाईट नाही असा संदेश तरुणांना मिळतो.
यामुळेच वैद्यकीय शास्त्रज्ञ केवळ चरस गांजाच नव्हे तर तंबाखूच्या सर्व उत्पादनावर बंदी आणा असेच जगभर सांगत आहेत.
गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. पण तंबाखू जितक्याजास्त प्रमाणात आणि जितक्या जास्त संख्येने सेवन केला जातो त्या परिमाणामुळे त्याची व्यापकता/ भयानकता वाढली आहे.
त्याचे उत्पादन नियंत्रित करणे जास्त सोपे आहे.म्हणून सरकार त्याच्यावर नियंत्रण आणू शकते. दुर्दैवाने तंबाखूची स्थिती वेगळी आहे.
सरकार लोकानुनय करणारे अनेक निर्णय घेत असते जे अंतिमतः समाजाच्या हिताचे नसतात. यात विडीवरील कर न वाढवणे आहे. तंबाखूच्या उत्पादन विक्री आणि विपणना( जाहिराती)तून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते.
त्यातून तंबाखूची लॉबी हि फार सशक्त आहे आणि त्यांचे सरकारातील लागेबांधे फार खोल, दूरवर आणि उन्मूलन न करता येण्यासारखे आहेत.
शिवाय तंबाखूच्या उत्पादनात वितरणात शेतकरी, शेतमजूर, विडीकामगार, पानवाले इ बरयाच लोकांना रोजगार मिळतो त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. कोणतेही सरकार इतका दूरगामी विचार करून काम करीत नाही. प्रत्येक पक्ष आपल्याला ५ वर्षे काम करायचे आहे आणि परत पुढची निवडणूक लढवायची आहे एवढाच विचार करते. (असे दूरगामी काम केले असते तर आपली लोकसंख्या १० कोटीच्या वर गेली नसती)
असो
तात्पर्य -- सहज उपलब्धता हे एक व्यसनाधीनतेचे फार महत्त्वाचे कारण आहे.
आपल्याला रस असेल तर खालील दोन दुवे वाचून पहा.
In unadjusted city-stratified Cox proportional hazard models, perceived accessibility increased the risk for smoking initiation among nonsmokers and regular smoking among all participants in a dose-response fashion. Perceived accessibility also increased the risk for smoking progression among initiators in a dose-response fashion. The associations between perceived accessibility and smoking were robust to adjustment for peer and parental smoking. Youths with both perceived accessibility and peer-smokers had a higher risk of regular smoking and progression after initiation than either factor alone. These associations were stable to adjustment for potential confounders other than peer smoking.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2478499/

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/i-was-the-terrori...

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 10:21 am | सुबोध खरे

हा दुसरा दुवा सर्वानी जरूर उघडून पाहावा अशी कळकळीची विनंती आहे.

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2018 - 10:21 am | प्रसाद गोडबोले

आपली ह्या विषयावर आधीही चर्चा झाली तस्मात जास्त काही न बोलता केवळ खालील एक प्रश्न विचारत आहे >

गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत.

ह्या विधानाला काहीतरी सबळ आणि विश्वासार्ह सांख्यिकिय आधार द्यावा . सांख्यिकिय आधार नसल्यास " हे केवळ वैयक्तिक मत आहे" इतके तरी मान्य करावे .

कारण तुर्तास आम्हाला उपलब्ध असलेल्या माहीती नुसार गांजा हा नक्कीच अल्कोहोल आणि तंबाखुच्या तुलनेत अत्यल्प हानिकारक आहे, शिवाय गांच्या अतिसेवनामुळे मृतु झाल्याचे एकही उदाहरण ( किमान अमेरिकेत तरी) नाही !

विकिपेडीया संदर्भासह खालील चार्ट देतो :
a

संदर्भ : Nutt, D; King, LA; Saulsbury, W; Blakemore, C (24 March 2007). "Development of a rational scale to assess the harm of drugs of potential misuse". Lancet. 369 (9566): 1047–53. doi:10.1016/s0140-6736(07)60464-4. PMID 17382831.

अवांतर : हा काही आस्तिकनास्तिक धागा नाही आणि आम्ही चणेवालेही नाही तस्मात आपण सबळ पुरावा दिल्यास आम्हाला आमची मते बदलण्यात कमीपणा वाटणार नाही असे विनम्रतेने नमुद करत आहे !

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 2:06 pm | सुबोध खरे

गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत.

यात कोकेन अफू हेरॉईन हे तर तंबाखू पेक्षा जास्त घातक आहेतच.

गांजा /चरस/ हे एकाच झाडाचे असल्याने दोघांचा परिणाम एकच आहे.

एकटे पाहिले (STANDALONE ) तर गांजा चरस याच्यावर तंबाखू पेक्षा कमी अवलंबित्व (DEPENDANCE OR ADDICTION POTENTIAL) आहे म्हणजे सोडल्यावर होणार त्रास किंवा सोडण्यात येणारे अडथळे नक्कीच कमी आहेत किंवा प्रत्यक्ष तंबाखू पेक्षा चरस/ गांजाने शारीरिक इजा( PHYSICAL DAMAGE/HARM) सुद्धा नक्कीच कमी होते यात अजिबात शंका नाही.

परंतु खाली मीच दिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जसा जसा काळ जातो तशी चरसमुळे येणारी नशा कमी होत जाते.
त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.

आज कुछ तुफानी करते है

करायला जातात आणि कायमचे व्यसनाच्या विळख्यात अडकतात.

दुर्दैवाने अशी द्रव्ये सेवन करणारे किंवा अशी द्रव्ये विकणारे दलाल पण तेच किंवा त्यांच्याच संपर्कात असल्याने या पायऱ्या चढणे फारच सोपे असते. आणि मग हे लोक कोकेन हेरॉईन सारख्या जास्त किक देणाऱ्या आणि मग तीच किक पार्श्वभागावर मारणाऱ्या व्यसनात जातात जेथून कायमचे परत येणारे फार म्हणजे फारच कमी असतात( फार तर १ %)

केवळ गांजा किंवा चरस हा तंबाखू इतका अपायकारक नसेल परंतु तंबाखूमुळे तुमचे "व्यक्तिमत्व"(personality) आणि तुमची "कामगिरी"(performance) बदलत नाही. तंबाखू मुले माणूस "ट्रान्स" मध्ये जात नाही. (माझी न मी राहिले अशी स्थिती होत नाही) अगदी चेन स्मोकर असेल तरीही यंत्र गाडी चालवणे किंवा धोकादायक ठिकाणी (उदा. ट्रेकला) गेल्यावर स्वतःला आणि दुसऱ्याला इजा करण्याची शक्यता हि कोणतेच व्यसन नसणाऱ्या माणसाइतकीच असते. ( पॅसिव्ह स्मोकिंगचा दुसऱ्याला धोका सोडला तर)

अशी स्थिती चरस किंवा गांजा ची ( दारूची सुद्धा नाही).

बँक किंवा कार्यालयातील रखवालदारापासून पोलीस किंवा सैनिक याना चरस किंवा गांजा पिऊन बंदूक सांभाळणे अशक्य आहे. हि स्थिती तंबाखूची नाही.

एखादा सैनिक गांजेकस असेल तर त्याला व्यसनातून सोडवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तर लष्करातून अशा माणसाला सक्तीने निवृत्त केले जाते.(हीच स्थिती दारूचीसुद्धा आहे). पण हि स्थिती तंबाखूची नाही.

केवळ लॅन्सेटच्या अभ्यास कागदातून येणारा निष्कर्ष घेऊन आपल्याला चरस किंवा गांजा सारख्या अमली पदार्थावरील बंदी उठवणे हा आत्मघात ठरेल.

सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे.

मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2018 - 5:08 pm | मार्मिक गोडसे

सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे.
परफेक्ट.
साप म्हणू नये धाकला आणि गांजा म्हणू नये आपला.

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2018 - 4:47 am | प्रसाद गोडबोले

त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.

ह्या विधानालाही काहीही सांख्यिकिय आधार उपलब्ध्द नाहीये !

मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या

येस सर ! आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे आणि त्या मताला तुर्तास तरी कोणताही वैज्ञानिक आधार , सबळ पुरावा नाही ,

जोवर दुष्परिणाम पुराव्याने शाबित होत नाही तोवर गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे आणि तंबाखु आणि अल्कोहोल्च्या तुलनेत तर नक्कीच कमि हानिकारक आहे ! आणि म्हणुनच ते डिक्रिमिनलाईझ करावे असे माझे मत आहे ! आणि त्याच्यावर आधिकाधिक प्रयोग आणि संशोधन व्हावे ! प्रयोग करुन टी.एच.सी आणि सी.बी.डी. चे ऑप्टिमल प्रमाण शोधुन काढावे .

रच्याकने

____/\____

तिमा's picture

14 Apr 2018 - 4:51 pm | तिमा

शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना कधीही छ. असे आधी लिहू नये. नाहीतर तुमचा छिंदम होईल!!!

दीपक११७७'s picture

12 Apr 2018 - 2:59 pm | दीपक११७७

जर गांजा विक्रि अधिकृत केली तर, त्या वर जिएसटी किती टक्के असावा?
टक्क्याचा विचार करतांना गांजा हा अत्यंत गरीब व्यक्तीही घेतो हे ध्यानात ठेवावे

yes

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2018 - 5:07 am | प्रसाद गोडबोले

शुन्य टक्के !

कमर्शियल लेव्हल ला उत्पादन आणि विक्री करु देवु नये , विक्री करताना कोणी सापडला तर त्याचे प्रॉडक्ट सरकार ने जप्त करावे आणि सरकार मान्य दुकानातुन विकावे ! पण उगाच जी.एस.टी सारख्या नसत्या उठाठेवी नसाव्यात कारण शेवटी हे शेतीतील उत्पन्न आहे ! ज्याला हौस आहे त्याला वैयक्तिक जास्तीतजास्त १ झाड लावायची परवानगी असावी. तुळशी वृंदावन असते तसे एक गांजा वृंदावन असावे . आणि रोज आपले एखाद दुसरे पान "खावे" ज्याने त्याने ! बदल हवा असेल म्हणाजे सटाईव्हा च्या ऐवजी इन्डिका किंव्वा हायब्रिड स्ट्रेन्स वगैरे तर स्मॉल स्केलवर कम्युनिटी करुन छोटेसे गार्डन मेंटेन करावे ( अर्थात प्रत्येकी एक झाड हा नियम न मोडता ) :)

दररोज मोजुन एकच पान खाणार्‍याला काही मेजर दुष्परिणाम होतील असे वाटत नाही . ( कारण मुळातच दुष्परिणाम होतात ह्याला कोणाताच सबळ पुरावा नाहीये !)

कन्ट्रोल्ड कंझम्शमन इज की टू ह्यॅप्पीनेस !

मला गांजाचा अनुभव नाही पण कुतुहल आहे.
जसे दारु बद्दल म्हणता येईल की - साधारण ६० च्या एका पेग नंतर (व्हिस्की) डोक जरा हलकं वाटत.. छान /प्रसन्न वाटतं.. दोन तीन पेग झाले की की पावले , जीभ अडखळू लागतात.. पण जसं जसं अन्न पोटात जाईल तसतसं पुन्हा जीभेवर , अडखळणार्‍या पावलांवर नियंत्रण येतं.. रात्री घेतल्यावर कधी दुसरे दिवशी डोके दुखणे, मळमळ्णे ई हँग ओव्हर होतं. अशा नशेत गाडी चालवणे वा दुसरी महत्वाची कामे करणे धोक्याचे असते.
तर सिगरेटमुळे असे काही परिणाम होत नाही..जसे अडखळणे वगैरे .. त्यामुळे सिगरेट ओढून वाहन चालवण्यात काही धोका नसतो.
तसं गांजाबद्दल काय सांगता येईल ? वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं पण तरी अधिक विस्ताराने कुणी सांगू शकेल काय ?

मार्मिक गोडसे's picture

12 Apr 2018 - 5:51 pm | मार्मिक गोडसे

वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं

गाडीच्या आरशावर सुरक्षा सूचना असते "Obects in mirror are closer than they appear" सवयीने अंदाज येऊ लागतो तसंच काहीतरी असेल.

खिलजि's picture

12 Apr 2018 - 5:36 pm | खिलजि

भांगेचा अनुभव

आम्ही कॉलेजला असताना ,, आमच्या ग्रुपमध्ये मोनीश अमृते नावाचा मुलगा होता .. हिंदू कॉलनीत राहायचा .. बाबा नव्हते त्याला ... आमचे त्याच्या घरी येईन जाणे असायचे .. त्याची आईही फार प्रेमळ होती ... कधी घरी आम्ही गेलो तर मस्त खाण्यापिण्याची रेलचेल असायची ... मोनीश मस्तीमध्ये /अभ्यासातही खूप हुशार असल्याने जवळजवळ ताईत होता सर्व ग्रुपचा .. एकदा रंगपंचमीला आम्ही कॉलेजमध्येच जमायचे ठरवले होते ... तिथून कुणीतरी खुळचट कल्पना काढली कि आपण भंगपण प्यायचे ... थोडा अनुभव घ्यायला काय हरकत आहे ... झालं .. सर्व तयारी झाली .. यथेच्छ रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही जमलो ... तिथेच रस्त्यावर भंगप्रश्न सुरु झाले .. मी आणि इतर काही मित्रांनी जरा बेतानेच दबकत दबकत स्वाद घेतला ... आमची गाडी रुळावर होती ... दोन एक ग्लास रिचवल्यावर आम्ही नाद सोडून दिला .. पण आमचे मोनीश भाऊ काही ऐकायलाच तयार नव्हते .. चालू होती सुस्साट गाडी ... आणि अचानक त्याला किक बसली ... तो बसल्या जागीच वेड्यासारखा बडबडायला लागला .. रास्ता वाकडा होतोय ... पकड .. पकड मला .. आम्हाला सुरुवातीला वाटलं कि हा साला टाईमपास करतोय .. च्यामारी पंधरावीस मिनिट होऊन गेली तरी याची गाडी काही रुळावर येईना ... कितीही झालं तरी आम्ही त्यावेळी जुनिअर कॉलेजातले .. बाजूलाच सिनिअर लोकांचा प्लॅन चालला होता .. त्यात आम्ही जरा अननुभवी .. म्हंटल त्यांची मदत घ्यावी ..म्हणून मदत घ्यायला गेलो ... ते लोकही धावून आले .. पण हे भाऊ काय ऐकायलाच तयार नाहीत .. रस्ता वाकडा होतोय .. धाव धाव .. इकडे तिकडे नुसती पळापळ चाललीय .. काय करायचे तेच कोणालाच काहीच सुचत नव्हते .. सरळ आम्ही त्याला उचलला आणि थेट घरी घेऊन गेलो .. पायऱ्या चढताना पण तेच चाललेलं साहेबांचं ... मला चांगलं आठवतंय त्याच्या घरच्यांसमोर आमचा पुरा पंचनामा झाला होता .. त्याची आई काही सोडायला तयार नव्हती आम्हाला .. दोष आम्हालाच देत होती ... मी तर त्या प्रकरणाचा एव्हढा धसका घेतला कि काही विचारू नका .... हे साहेब नंतर चार दिवसांनी कॉलेजात उगवले .. तेव्हा खूप दिवस चर्चेचा विषय होते .. सर्व पोरी एकदम वाघ मारल्यावानी त्याला बघायच्या नि हसायच्या ....

गांजा प्रकरण

हे सर्व धंदे कॉलेजात केलेले बरं का ...आता नाही ...

कॉलेजात आम्ही एकदा गांजाचा अनुभव घ्यायचा ठरवलं .. उदानी नावाच्या मित्राने सर्व तरतूद फ्रीमध्ये केलेली होती ... चिलीम आणि इतर ... कुठेतरी एक फक्त पडीक जागा बघायची आणि ठोकायची .. सर्व बालगोपाल उत्सुक होते .. तशी सिगारेट जवळचीच होती त्यामुळे हे प्रकरण काही अवघड जाणार नाही याची खात्री होती ... तर आम्ही सारे जमलो ... तो सुट्टा ठोकण्यासाठी ... कधी एकदा ठोकतोय असं झालं होत ... चला सुरुवात झाली उदानीपासून .. तो आधीच सारीत होता .. चिलीम सुलगावली आणि थेट आत .. डोळे गच्चं मिटून एखाद्या ध्यानस्थ संन्याश्यावानी त्याचा थाटमाट होता .. एकेक करत फिरत माझ्यापाशी आली .. मी कसे प्यायचे ते त्यालाच विचारले ... तो फक्त एव्हढेच बोलला कि "" बम भोले बोल और सीन फैलाके जोरदार खिच "" .. झालं .. अशी ओढली कि काही इचारू नका ... बस्स .. तेव्हढाच पुरेसा होत नंतरच्यांसाठी .. मला काहीच बोलता येत नव्हतं .. नाकातोंडातून धूर आणि धूर ... आत छातीत काहीतरी ढवळून ढवळून बाहेर येतंय असं वाटत होत ... जवळजवळ दोनएक मिनिट तरी धूर बाहेर येण्याचा कार्यक्रम चालला होता.. मग मात्र बाकीचे धास्तावले ... उदानी असं काही हसत होता कि काय इचारू नका ... नंतर मात्र एक विचित्र ग्लानी येत होतीआणि ती जवळजवळ प्रॅक्टिकल संपेपर्यंत येताच होती ... प्रॅक्टिकल झाल्यानंतरही तिचा प्रभाव कायम होता .. एक विचित्र कंटाळा .. कशातच काडीचाही रस नव्हता .. सर्व साले उगाच धावपळ करतायत असं वाटत होत ... एकेकाच्या पेकाटात लाथ मारून त्यांना थोडं गप्प बसवावंसं वाटत होत .. पण लाथ मारणार कोण ? पाय उचलायचाही त्राण नव्हतं .. साल पाय उचलून लाथ मारायला कोणातरी भाड्याने विकत घ्यावंसं वाटत होत .. कि बाबा ये .. हा माझा पाय उचल आणि घाल एकेकाच्या पेकाटतात ... हाण त्याच्या मायला एकेकाला .. असा काहीसा प्रकार होता .. गांजानंतर ... एकंदरीत सर्वात घाणेरडा प्रकार गांजाचा तो म्हणजे त्याचा गलिच्छ वास .. सालं कोलगेट पाण्यात मिसळून सरबत करून जरी गुळण्या केल्या तरी त्याचा वास काही तासांपर्यंत दरवळत राहतो ... तर असं हे प्रकरण आहे एकंदरीत .. याला कायदेशीर मान्यता दिली तर दुसरं काही होनार नाही पण एक मात्र नक्की होईल ...कि जे गांजा ओढणारे आहेत त्यांचा कामाचा ताण कमी होईल आणि घरच्यांचा वाढेल ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मराठी कथालेखक's picture

12 Apr 2018 - 6:31 pm | मराठी कथालेखक

तुमचा अनुभव विस्तृतपणे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

मी तंबाखू एकदाच चाखली होती. ऑफिसमधल्या एका मित्राने तंबाखू चुन्यासोबत मळून दिली.. जीभेवर थोडावेळ तंबाखू ठेवून तिचा रस पोटात गेल्याव्र फार विचित्र वाटलं. शरीरात उष्णता वाढली , डोकं दुखायला लागलं.
पण तेच सिगारेटनी इतकं काही होत नाही... (काही वर्षांपुर्वी मी नियमितपणे दिवसाला पाच-सहा तरी सिगारेट्स ओढायचो)... म्हणजे सिगरेट ही तंबाखूची सौम्य आवृत्ती आहे असं म्हणता येईल. पण सिगरेटचा मेंदूवर फारसा परिणाम होत नाही वा नशा आणि त्याआधारे तणावाचे तात्पुरते विस्मरण असे होत नाही. थोडक्यात सिगरेट्ने माणूस वेगळ्या जगात जात नाही.
दारुने तसा माणूस वेगळ्या जगात जातो आणी तणाव विसरतो. पण दारु चढायला अणि उतरायलाही बराच वेळ लागतो. आणि दारु पुर्ण चढलेली असताना साधे सरळ चालणेही कठीण होवून जाते .. वाहन चालवणे वगैरे तर अशक्यच
गांजा किंवा तत्सम पदार्थ वापरुन असे काही नशेचे साधन बनवता येईल का की ज्याने मेंदूवर त्वरीत पण अगदी सौम्य परिणाम होईल.. चिंता/तणाव तात्पुरत्या विसरता येतील पण त्याचवेळी अगदी तोल सांभाळणेही कठीण झाले असे मात्र होणार नाही.

गामा पैलवान's picture

12 Apr 2018 - 7:48 pm | गामा पैलवान

म.क.,

कमी दारू प्यायली की सौम्य परिणाम होतो. पण त्याने किक बसंत नाही. सांगायचा मुद्दा काये की मात्रा उत्तरोत्तर वाढवंत न्यायची अनिवार इच्छा होते.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

13 Apr 2018 - 10:06 am | मराठी_माणूस

मित्राचे नाव खरे असल्यास तसे करणे टाळा

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2018 - 7:21 pm | श्रीगुरुजी

"बंटा"ची गोळी काय असते?

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 10:11 am | जेम्स वांड

भांग, कंपाउंडेड, घोटलेली, अशी गोळी.

विशुमित's picture

13 Apr 2018 - 10:15 am | विशुमित

<<<एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते.>>
==>> लखनौच्या आसपास अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारी कर्मचारी काय फरफट करतात याची द्रावक हकीकत ऐकली होती.
लोकांच्या संसाराची राख रांगोळी करून गब्बरच करायचंय ना मग गांज्याची शेती करण्यापेक्षा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला दारू दुकानाचे लायसेन्स मोफत काढून द्या. कधीच आत्महत्या करायची वेळ येणार नाही. (उपरोधिक प्रतिक्रिया आहे)

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 10:34 am | सुबोध खरे

एक सुरस वैज्ञानिक सत्य

चरस किंवा गांजाच्या जुन्या व्यसनामुळे amotivation syndrome नावाचा आजार होतो.

याचे मूळ असे आहे. आपल्या मेंदूत चरसमधील द्रव्यांशी साधर्म्य असणारे संवेदक (endocannabinoid receptors) असतात. आपल्याला आनंद उल्हास आल्हाद वाटतो त्यावेळेस मेंदूत 2-Arachidonoylglycerol (2-AG) आणि anandamide हि द्रव्ये तयार होतात आणि हि द्रव्ये वरील संवेदकाना उद्दीपित करतात आणि आपल्याला वरील "सुंदर भावनांचा" अनुभव येतो.

गंमत म्हणजे आपण जेंव्हा मलईयुक्त चरबीयुक्त पदार्थ खातो तेंव्हा पण मेंदूत याच द्रव्यांचा स्त्राव वाढतो यामुळे असे पदार्थ खाल्ले कि आपल्याला एक सुखद अशी गुंगी येते. म्हणून आपल्याला मलई, रबडी, बासुंदी, लोणी, तूप, चिकन तंदुरी, मटण, मिसळीवरील तर्री सारखे पदार्थ सारखे खावेसे वाटतात.

याच संवेदकात अडथळा आणणारे एक द्रव्य रिमोनाबंट ( अकॉम्पलिया या नावाने) युरोपात लठ्ठपणावर औषध म्हणून बाजारात आले होते. यामुळे असे चरबीयुक्त पदार्थ पाहावेसे/खावेसे वाटणार नाहीत आणि त्याबद्दल नॉशिया येईल. दुर्दैवाने या औषधाचा दुष्परिणाम म्हणजे नैराश्य आणि आत्महत्येचे विचार असे असल्याने हे औषध बाजारातून परत काढून घेतले गेले. पण या अनुभवातून वैद्यकीय शास्त्रज्ञ एक महत्त्वाचा धडा शिकले ते म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुख समाधानाने व्यतीत करण्यासाठी या संवेदकांचे काम व्यवस्थित चालू असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि जेंव्हा हे संवेदक नीट काम करीत नाहीत तेंव्हा माणूस नैराश्य आत्महत्येचे विचार अशा आजारांची शिकार होतो.
गांजेकस/ चरस पिणारे लोक असतात त्यांना सुरुवातीला चरस मधील THC या द्रव्याने असाच उच्च आणि उत्तुंग अनुभव येतो म्हणून ते परत परत चरस पीत राहतात. परंतु जसा काळ जातो तसा या संवेदकांची संवेदना बोथट होत जाते आणि त्या माणसाला असा परिणाम होण्यासाठी/उच्च आणि उत्तुंग अनुभव येण्यासाठी जास्तीत जास्त चरस/ गांजा प्यावा लागतो. आणि या संवेदकांची संवेदना बोथट झाल्यामुळेहे गांजेकस निरुत्साही औदासिन्य नैराश्यवादी आत्महत्येचे विचार या विकारांना बळी पडतात. या गांजेकसांचे आयुष्य म्हणजे केवळ गांजा पिऊन पडून राहणे एवढेच होऊन राहते.
अर्थात अशी स्थिती बरेच दिवस गांजा पिणाऱ्यांची होते. सठी सहामासी पिणाऱ्यांच्यात अशी स्थिती होत नाही
पण केवळ थ्रिल साठी परत परत चरस पिणाऱ्यांपैकी १५-१७ % टक्के लोक अंती अशा आजाराचे शिकार होतात.

लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.

विशुमित's picture

13 Apr 2018 - 10:47 am | विशुमित

<<<लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो.>>>
==>> करोडो की बात ...!!

लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.

बेलाशक सहमत..

कपिलमुनी's picture

13 Apr 2018 - 2:27 pm | कपिलमुनी

डॉक्टरांनी माहितीपूर्ण प्रतिसाद दिला आहे . धन्यवाद डॉक्टर !!
कोणत्याही अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे.

नाखु's picture

14 Apr 2018 - 10:45 am | नाखु

अंमली धाग्यांपासून सुद्धा !!!!!!

भेंडी नाखु

ज्या पदार्थाच्या सेवनाने मानसिक अवस्थेत इतका जबरदस्त बदल होतो तो पदार्थ अपायकारक किंवा किमान मानसिकदृष्टया एडिक्टिव नसेल यावर विश्वास बसत नाही.

डॉ. खरे यांच्या प्रतिसादांना सुप्परलाईक..

खिलजि's picture

13 Apr 2018 - 1:40 pm | खिलजि

नक्की .. काळजी घेईन पुढे ... धन्यवाद

सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि's picture

13 Apr 2018 - 1:41 pm | खिलजि

निदान वाईट गोष्टी असतील तर नाव टाळेन म्हणतोय .. बाकी काही मजेशीर आणि चांगले अनुभव नावासहित शेयर करेन
सिद्धेश्वर विलास पाटणकर

जेम्स वांड's picture

13 Apr 2018 - 3:20 pm | जेम्स वांड

खालील तक्ता हा नारकोटिक कंट्रोल ब्युरो उर्फ एनसीबीच्या २०१५ वार्षिक रिपोर्ट मधून घेतलेला आहे, नारकोटिक उर्फ भांग (फक्त भांग बरंका) लीगल असलेल्या मध्यप्रदेशचे आकडे बघा एकदा, ह्याचं कारण आहे लीगलायझेशन

.

तरी ह्यात भांग हे एकच नारकोटिक कव्हर केलं आहे, गांजा, अफू, इत्यादी नाहीये! तेही अफूची रिकव्हरी आहे! म्हणजे एक सबस्तान्स लीगल करता दुसऱ्याच्या मागणी, पुरवठा, इत्यादींवर दिसण्यालायक असर पडू शकतो, असा निष्कर्ष काढायला वाव आहे पुरेपूर.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 9:07 pm | सुबोध खरे

पण हा तक्ता तर पकडलेल्या "अफूचा" आहे.
गांजाचा आणि या अफूचा संबंध काय?

जेम्स वांड's picture

14 Apr 2018 - 6:55 am | जेम्स वांड

एक सबस्तान्स लीगल करता दुसऱ्याच्या मागणी, पुरवठा, इत्यादींवर दिसण्यालायक असर पडू शकतो, असा निष्कर्ष काढायला वाव आहे पुरेपूर.

पैसा's picture

13 Apr 2018 - 9:21 pm | पैसा

पंजाब आणि राजस्थान ही सीमावर्ती राज्ये आहेत. तिथे पाकिस्तानच्या वरद हस्तामुळे अमली पदार्थ सेवनाची समस्या जास्त उग्र बनली आहे असे वाचलेले आठवते.

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 9:30 pm | सुबोध खरे

होय
कारण पाकिस्तानचे लष्कर या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे.
पण ते सर्व बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानातून तस्करी केलेल्या अफू बद्दल आहे. त्याचा गांजाशी संबंध नाही.
http://thebalochistanpost.com/2017/08/pakistan-army-becomes-largest-bene...
https://groups.google.com/forum/#!topic/soc.culture.pakistan/Yihv9mBSyp0

मजा आली .. वादविवाद बघून ... अजून एक व्यसन किशोरवयीन मुलांमध्ये चालू आहे ते म्हणजे " आयोडेक्स पाव " ... अगदी सर्रास चालू असते .. दे मार ... त्याआधी काय तर ... कफ सिरप पूर्ण बाटली रीती करायचे... त्यावर बंदी आणली आता तर हे " आयोडेक्स पाव " जोरदार चालले आहे ... एकूण काय तर " आजच्या तरुण पिढीला यातून बाहेर काढायचे असेल तर स्पर्धात्मक वाटचालीवर वादविवाद व्हावेत .. व्यसनांवर नव्हे .. हे माझे वैयक्तिक मत आहे ... आज जो काही शिक्षणाचा बाजार झाला आहे त्याला आपण पालकमंडळीच काही अंशी जबाबदार आहोत .. व्यवस्थित मुलाची व्यवस्था केली आणि त्याला आपण दिलेल्या सुविधांची जाणीव करून दिली कि एक अनामिक दडपण त्या बालमनावर वाढत जाते ... आणि अंशतः तेच या व्यसनप्रकियेत महत्वाचा भाग बनते ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर

ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची पखरण करण्याचे व्यसन ही फार त्रास करते हो वाचकांच्या डोळ्यांना.
जरा तेवढे ............

कपिलमुनी's picture

13 Apr 2018 - 5:47 pm | कपिलमुनी

खुद के नाम मे दो दो टींब होनेवाले दुसरों के पूर्णविराम नही गिना करते अभ्या.. सेठ

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Apr 2018 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुनिवर, यु टू ना... म्हणजे अगदी... ?! =)) =)) =))

manguu@mail.com's picture

13 Apr 2018 - 3:47 pm | manguu@mail.com

किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा
किसीको देखे साँसों से उभरता है नशा
बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा
नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा
खिली खिली हुई सुबह पे है शबनम का नशा
हवा पे खुशबू का बादल पे है रिमझिम का नशा
कहीं सुरूर है खुशियों का कहीं ग़म का नशा
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
मैकदे झूमते पैमानों मैं होती हलचल
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा

विशुमित's picture

13 Apr 2018 - 3:52 pm | विशुमित

_/\_

manguu@mail.com's picture

13 Apr 2018 - 3:48 pm | manguu@mail.com

किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा
किसीको देखे साँसों से उभरता है नशा
बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा
नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा
खिली खिली हुई सुबह पे है शबनम का नशा
हवा पे खुशबू का बादल पे है रिमझिम का नशा
कहीं सुरूर है खुशियों का कहीं ग़म का नशा
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
मैकदे झूमते पैमानों मैं होती हलचल
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा

खिलजि's picture

13 Apr 2018 - 4:11 pm | खिलजि

अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम भारी हायेस . चाल आजपासून एक टिम्बच टाकत जाईन . मला वाटत

धन्यवाद .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम भारी हायेस . चाल आजपासून एक टिम्बच टाकत जाईन . मला वाटत कि मी जेव्हा टंकत असतो तेव्हाच अनावधानाने हि उधळण होत असावी .

धन्यवाद .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि's picture

13 Apr 2018 - 4:31 pm | खिलजि

अभ्या .. मित्रा या तुझ्या अभिप्रायावर एक स्माईली ची उधळण होऊन जाऊ देत .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आगाऊ म्हादया......'s picture

13 Apr 2018 - 4:43 pm | आगाऊ म्हादया......

ज्यांना हवंय त्यांना ते असंही मिळतंच आहे. व्यसनी मंडळी समजा ह्या सहज उपलब्ध व्यसनाने मेली तर असा काय फरक पडणारे.? देअर चोईस. मी तर मस्त पार्लर टाकीन त्यांच्यासाठी. केवढी मोठी बिझिनेसची संधी आहे ही.

वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे समर्थन करण्याकरीता लिहिला नव्हता. गांजाला कायदेशीररीत्या मान्यता मिळावी असेही माझे म्हणणे नाही.
गांजा खरोखरच जितका समजला जातो तेवढा हानीकारक आहे का? गांजाला कायदेशीर रूप दिले तर गांजा सेवन करणार्‍यांचे प्रमाण वाढेल का? व्यवस्थित क्वालिटी कंट्रोल, रेग्युलेशन करणे शक्य असेल तर आतापेक्षा ते चांगलेच नाही का? गांजाचे उदात्तीकरण समाजात देव- सदगुरू म्हणून मान्यता पावलेल्या लोकांकडून होते असे नाही का? गांजाचे स्मगलिंग करणार्‍या टोळ्या, या व्यवसायांतून मिळणारा पैसा समाजविरोधी तत्वांच्या हाती जाणे या प्रश्नांची चर्चा करणे हा उद्देश होता.
गांजा कायदेशीर केल्यामुळे अमेरिकेत कोणते असे तोटे दिसून आले जे भारतात यायची आपणास भिती वाटते हा देखिल प्रश्न विचारावासा वाटतो.
माझ्या मते, बंदी हा उपाय कधीच उपयोगाचा नसतो. आपल्यासारख्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यव्स्थेत बंदीमुळे आयतेच कुरण उपलब्ध होते. आज, गुटख्याचेच पहा, बंदी आहे, कुठे कुठे गुटख्याच्या गाड्या पकडल्याचेदेखिल बातम्यात येते मात्र गुटखा खाणार्‍यांना गुटखा मिळणे थांबले का याचे उत्तर नकारार्थी येते. बंदीपेक्षा व्यवस्थित रेग्युलेशन, दुष्परिणामांबद्दल जागृती व एकूणच सेफ पर्याय उपलब्ध करण्यासाठी संशोधन हा योग्य पर्याय वाटतो. निकोटिनमुळे होणारे मृत्यू गांजाआमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा हजारोंच्या पटीने जास्त असताना सिगारेटवर बंदी नाही व गांजावर आहे हे विचित्र खरेच वाटत नाही का?

सुबोध खरे's picture

13 Apr 2018 - 9:03 pm | सुबोध खरे

पुम्बा साहेब

सगळेच सरकारी निर्णय चूक असतात असे नाही.

गुटखा बंदी नंतर गुटखा खाणाऱ्यांची संख्येत ५३% कमी झाली हि उपलब्धी मोठी नाही काय?

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/ban-on-gutka-made-53-us...
केवळ सहज उपलब्ध आहे म्हणून सेवन जास्त होते हि वस्तुस्थिती आहे.

गोव्यातील स्थानिक लोकांच्या दारूसेवनाचा/ व्यसनाचा प्रश्न किती गंभीर आहे याच्या कडे पहा. कारण सहजा सहजी दारू उपलब्ध आहे.

महसूल मिळतो आणि पर्यटनास उत्तेजन म्हणून दारूची दुकाने बंद करता येत नाहीत पण संसाराची धूळधाण होते त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

दुवा http://goastreets.com/goa-and-the-pain-of-alcoholism/

व्यसन एखाद्याने करावे की नाही हा समजा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न मानला तरीही त्या व्यसनाने त्याच्या घराची जी धूळधाण उडते तिचे काय हा मुख्य मुद्दा आहे. सभोवताली अनेक अशी उदाहरणे आणि फरफट पहिली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला , त्याच्या उदात्तीकरणाला आणि त्याच्या कायदेशीर बनवण्याला माझा व्यक्तिशः विरोध आहे.

इत्यलम!

त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला , त्याच्या उदात्तीकरणाला आणि त्याच्या कायदेशीर बनवण्याला माझा व्यक्तिशः विरोध आहे.

ही भुमिका ठीकच आहे.
परंतू, उदात्तीकरण म्हणजे काय? अमुक महाराजांची मुर्ती चिलिमिशिवाय कधीही नसते, तमुक महाराजांना चिलीम अर्पण केली तर ते नवसाला पावतात ह्या गोष्टी उदात्तीकरणात येतात का?

एस's picture

13 Apr 2018 - 6:59 pm | एस

होय.

कधी संधी मिळाल्यास कश मारुन पहायची इच्च्छा आहे. मेंदुत आधीच इतका केमिकल लोच्या आहे, त्यात वेगळा प्रयोग... अजुन काय ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2018 - 10:55 pm | टवाळ कार्टा

अ‍ॅमस्टरडॅममध्ये गांजा कायदेशिररित्या विकला जातो....तिथे किती लोक त्याच्या आहारी जाउन फालतूगीरी करायला लागले याचा विदा कोणी देउ शकेल का?
रच्याकने मिपावर काही विशिष्ठ धाग्यांवर लोक इतकी कि घाण करतात....ते गांजा मारुन कि गांजा न ओढता हे कसे समजेल?

जेम्स वांड's picture

14 Apr 2018 - 6:57 am | जेम्स वांड

मी वर एका उदाहरणात नेदरलँड उल्लेखले आहे ते त्यामुळेच.

सुबोध खरे's picture

14 Apr 2018 - 1:01 am | सुबोध खरे

https://news.vice.com/article/trouble-in-europes-pot-paradise-a-bloody-g...
ट का शेट हेही वाचून पहा

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2018 - 2:40 am | टवाळ कार्टा

इत वस सर्चस्म ;)

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2018 - 11:52 am | मार्मिक गोडसे

आतापर्यंत आपल्या नात्यातील, मित्रपरिवारातील किंवा परिचयातील एखाद्याचे जीवन, कुटुंब कुठल्याना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेल्याने उद्ध्वस्त झालेले माहीत नसलेली व्यक्ती सापडणे अशक्य आहे. तरुणपणी एक थ्रील म्हणा,मित्रांचे अनुकरण करण्याची कृती म्हणा किंवा मित्रांचा दबाव म्हणा एका सिगारेटच्या झुरक्यावर किंवा दारूच्या एका पेगवर थांबत नाही. कुठलेही सेलिब्रिशन दारू व सिगारेट शिवाय होऊच शकत नाही अशी भंपक मानसिकता होऊन जाते. मित्रांच्या लग्नात ग्रुप करता 'खास' व्यवस्था केली जाते. ह्या कंपुमधून बाहेर पडायचे म्हटलं तरी अशक्य होऊन जातं. शंकरा पासून ते टिळकांपर्यंतचे आदर्श फेकले जातात. पुरुषार्थ डीवचन्याचे प्रकार होतात. बरेच जण इच्छा असूनही बाहेर पडू शकत नाही.एखाद्या मित्राचे पालक आपल्याला विनंती करतात, बाबारे आम्ही खूप समजावून सांगितले मुलाला पण तो आमचं ऐकतंच नाही, तुम्ही सांगून बघा , ऐकेल तुमचं. आता ह्यांना काय सांगणार ?आमच्यामुळेच तो घोड्यावर बसला, घोड्याचा लगाम आता त्याच्या हातात आहे. हो म्हणायचं फक्त. हा घोडेस्वार कधीच हाती लागत नाही. कधीतरी दमून स्वार खाली पडतं, तो पर्यंत त्याचं कुटुंब उध्वस्त झालेलं असतं. असं अनेक अभिमन्यू रोज आजूबाजूला घडत असतात. आजचे सौम्य व्यसन उद्या उग्र रूप धारण करू शकते. एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज उपलब्ध होऊ लागला की पुढच्या व्यसनांच्या पायऱ्याही सहज चढल्या जातील.

एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज उपलब्ध होऊ लागला की पुढच्या व्यसनांच्या पायऱ्याही सहज चढल्या जातील.
परफ़ेक्ट.
गांजा मुळे येणारी नशा नंतर नंतर येईनाशी होते आणि मग या पुढच्या पायऱ्या फार पटकन चढल्या जातात ज्या अटळ विनाशाकडे घेऊन जातात.
हाताशी आलेला तरुण मुलगा असा विनाशाच्या गर्तेत जात असलेला पाहणे हि पालकांसाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे आणि देशासाठी अतिशय घातक गोष्ट आहे.

झेन's picture

14 Apr 2018 - 2:44 pm | झेन

गोडसेजी पुढच्या व्यसनांच्या. . . .
एकदम रियालिस्टीक.
- गांजा डेंजरज नुसत्या धाग्यात पण एवढी मारामारी ः)
बाकी जसे जगात सगळे पांढरे आणि काळे असे काही काही नाही तसे ग्रे एरिया/व्यसने असणारचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर अवैध गांजा विकणाऱ्या मधे बायकापण आहेत, पिढ्यानपिढ्या विकणारी कुटुंबे आहेत मग अधूनमधून आत जाउन येणं आलंच. जास्त पैशाच्या अमिशानं अल्पवयीन पण असतात आणि त्यांना वापरणारे आधि त्यांना गांजाची सवय लावतात. एकदम तरूण पोरं जेलमधे गेल्यावर त्यांच पुढं सेक्शुअल एक्सप्लाँयटेशन वगैरे आलंच.

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2018 - 3:52 pm | श्रीगुरुजी

माझ्या दोन परिचितांचे दारूच्या व्यसनामुळे यकृत खराब होउन वयाच्या ५० च्या आसपास निधन झाले आहे. मुलांचे अर्धवट वय (१५ ते २० वयातील मुले), दारूपायी भरपूर पैसे उधळलेले, रूग्णालयात अनेक दिवस उपचारांमुळे भरपूर खर्च झालेला . . . अशामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची अगदी वाईट परिस्थिती आहे.

... यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का?

प्रसाद_१९८२'s picture

15 Apr 2018 - 3:56 pm | प्रसाद_१९८२

मला वाटते,
भारतात एकाद्या वस्तूवर बंदी घालण्याचे प्रमुख कारण म्हणजे पोलीस, सरकारी अधिकारी व इतर लोक यांच्या पोटा-पाण्याची कायमची सोय व्हावी म्हणून. या बंदीच्या निमित्ताने ह्या सर्वांना तेवढीच चिरिमीरी खायला मिळते.

या धाग्याच्या धुळवडीत उतरण्याची इच्छा नव्हती, पण मुक्तांगण विषयी काही वैयक्तिक अनुभव आहेत म्हणून राहवलं नाही.

नशेचे समर्थन करणार्यांनी फक्त काही पाने वाचून पहा.
http://tusharnatu2013.blogspot.com/

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2018 - 9:06 am | प्रसाद गोडबोले

सदर व्यक्तीला कोणते व्यसन होते काहीतरी स्पष्ट करा , त्यांची फिजिकल डिपेन्डॅबिलिटी आणि फिजिकल हार्म ह्यांची गांजा सोबत तुलना करा , मग बोलु. उगाचच गोष्ठींना " नशा" असे सरसकटीकरण करणार असाल तर जगातले अर्धे अधिक लोक दारु पितात किंव्वा तंबाखु खातात त्यांना मुक्तांगणला पाठवावे लागेल आधी !

तुषार नातू यांना गांजाच काय इतरही जी शक्य असतील ती व्यसने होती. तुमचा फिजिकल फंडा माझ्या डोक्यावरून गेला त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार. आणि हो, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, जगातले अर्धे लोक जर दारू - सिगारेटच्या व्यसनाधीन असतील तर नक्कीच मुक्तांगणला पाठवायला हवेत. बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत, आणि कायदा , पोलीस या भीतीने व्यसनं थांबतही नाहीत. त्यासाठी व्यसन मुक्तीचेच प्रयत्न करावे लागतात.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 10:03 am | मार्मिक गोडसे

जगातले अर्धे अधिक लोक दारू व तंबाखूच्या आहारी का गेलेत?

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 10:50 am | सुबोध खरे

CONCLUSIONS:
The results of the present study suggest that increasing cannabis use in late adolescence and early adulthood is associated with a range of adverse outcomes in later life. High levels of cannabis use are related to poorer educational outcomes, lower income, greater welfare dependence and unemployment and lower relationship and life satisfaction. The findings add to a growing body of knowledge regarding the adverse consequences of heavy cannabis use.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/18482420

हे हि वाचून पहा
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3711606/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19937639

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 11:42 am | मार्मिक गोडसे

निदान भारतात व्यसनाच्या आहारी जाण्याचे स्त्रियांचे प्रमाण किती आहे?

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 12:02 pm | सुबोध खरे

Cannabis is the most common illicit drug used worldwide and it is used frequently by Canadian teenagers. Cannabis use during adolescence can cause functional and structural changes to the developing brain, leading to damage. Marijuana use in this age group is strongly linked to: cannabis dependence and other substance use disorders; the initiation and maintenance of tobacco smoking; an increased presence of mental illness, including depression, anxiety and psychosis; impaired neurological development and cognitive decline; and diminished school performance and lifetime achievement. Rates of acute medical care and hospitalization for younger children who have ingested cannabis unintentionally are increasing. Ongoing debate concerning cannabis regulation in Canada makes paying close attention to the evidence for its health effects and ensuring that appropriate safeguards are in place, vital public health priorities.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/29480902

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 12:27 pm | सुबोध खरे

Gone to Pot - A Review of the Association between Cannabis and Psychosis.
Cannabis is the most commonly used illicit drug worldwide, with ~5 million daily users worldwide. Emerging evidence supports a number of associations between cannabis and psychosis/psychotic disorders, including schizophrenia. These associations-based on case-studies, surveys, epidemiological studies, and experimental studies indicate that cannabinoids can produce acute, transient effects; acute, persistent effects; and delayed, persistent effects that recapitulate the psychopathology and psychophysiology seen in schizophrenia. Acute exposure to both cannabis and synthetic cannabinoids (Spice/K2) can produce a full range of transient psychotomimetic symptoms, cognitive deficits, and psychophysiological abnormalities that bear a striking resemblance to symptoms of schizophrenia. In individuals with an established psychotic disorder, cannabinoids can exacerbate symptoms, trigger relapse, and have negative consequences on the course of the illness. Several factors appear to moderate these associations, including family history, genetic factors, history of childhood abuse, and the age at onset of cannabis use. Exposure to cannabinoids in adolescence confers a higher risk for psychosis outcomes in later life and the risk is dose-related. Individuals with polymorphisms of COMT and AKT1 genes may be at increased risk for psychotic disorders in association with cannabinoids, as are individuals with a family history of psychotic disorders or a history of childhood trauma. The relationship between cannabis and schizophrenia fulfills many but not all of the standard criteria for causality, including temporality, biological gradient, biological plausibility, experimental evidence, consistency, and coherence. At the present time, the evidence indicates that cannabis may be a component cause in the emergence of psychosis, and this warrants serious consideration from the point of view of public health policy.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24904437

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 12:39 pm | सुबोध खरे

Cannabis use: a perspective in relation to the proposed UK drug-driving legislation.
With regard to THC (Δ(9)-tetrahydrocannabinol), the main psychoactive constituent identified in the plant Cannabis sativa L, several facts are indisputable. Cannabis remains the most commonly used drug in the UK among those who reported driving under the influence of illegal drugs in the previous 12 months.
There is a significant dose-related decrement in driving performance following cannabis use;

raised blood THC concentrations are significantly associated with increased traffic crash and death risk.
When cannabis and alcohol are detected together, there is a greater risk to road safety than when either drug is used alone. Patterns of use are important when interpreting blood concentration data:
Smoking infrequently a single cannabis cigarette leads to peak plasma THC concentrations (21-267 µg/L) causing acute intoxication.

In habitual, daily users, plasma THC concentrations range from 1.0 to 11.0 µg/L and are maintained by sequestration of the drug from the tissues. These facts undoubtedly make setting thresholds for drug-driving legislation difficult but there is clearly a case for cannabis. Determining minimum blood THC concentrations at which a driver becomes sufficiently impaired to be unable to safely drive a vehicle is of particular concern given the increasing medicinal use of the drug. Internationally legislation for driving under the influence of drugs (DUID) is based on either a proof of impairment or a per se approach. For the latter this can be either zero-tolerance or based on concentration limits such as those used for alcohol. The different approaches are considered against current scientific evidence.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24327278

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2018 - 1:54 pm | मार्मिक गोडसे

When cannabis and alcohol are detected together, there is a greater risk to road safety than when either drug is used alone.
गांजाचे समर्थन करणाऱ्यांनो अजूनही विचार करा.

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 8:24 pm | सुबोध खरे

जाऊ द्या हो गोडसे साहेब
गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे असे समजणाऱ्याना कुठे समजवायला जाताय?

गांजाच्या उपयोगांवर पतंजली आयुर्वेद करणार संशोधन

वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या खासदारांची गांजा कायदेशीर करावा ही मागणी

राजीव गांधी सरकारच्या अगोदर भारतात गांजा बेकायदेशीर नव्हता म्हणे, नंतर त्यांच्याकाळात अमेरिकन दबावाखाली गांजा बेकायदेशीर ठरला का? ,समकालीन राजकारण, पॉलिसी इत्यादींची माहिती असणार कोणीतरी काही सांगू शकेल का?

manguu@mail.com's picture

21 Apr 2018 - 11:32 pm | manguu@mail.com

https://en.m.wikipedia.org/wiki/Cannabis_in_India

भारतात cannabis वर इंग्रजकाळापासुनच बंदी आहे.

फक्त काही राज्यात भांग अलाउड आहे . ( शिवरात्री , प्रसाद इ कारणांस्तव. )

जेम्स वांड's picture

22 Apr 2018 - 7:05 am | जेम्स वांड

मग सांगणारा गांजा पिऊन सांगत असेल!

खरंतर काल रात्रीच प्रतिसाद टंकायला घेतला होता, पण धाग्यावारचे सगळे प्रतिसाद वाचले नव्हते म्हणून आत्ता लिहितोय.

तुमचा प्रश्न: गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?
माझे उत्तर: नाही. गांजाला भारतातच काय तर जगात कुठेही कायदेशीर मान्यता मिळू नये.

वरील उत्तर हे माझं वैयक्तिक मत असले तरी ते कुठलेही आदर्शवादी लेखन, बातम्या किंवा माहिती वगैरे वाचून बनलेले नसून काही निकटवर्तीयांनी भोगलेल्या वा भोगत असलेले गांजासेवनाचे दुष्परिणाम प्रत्यक्ष बघून बनलेले आहे. २० एप्रिल २०१८ ला एका शाळू सोबत्याचा गांजाच्या अतिसेवनाने ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यूही झाला आहे.

काहीवर्षांपुर्वी पर्यंत गावखेड्यांमध्ये, शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये आणि जेल मध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपुरते मर्यादित असलेले हे व्यसन पुढे पुढे इंटरनेटवर अंत्यंत पद्धतशीरपणे गांजाचे ग्लोरीफिकेशन करून त्याचे मार्केटिंग करत करत आज जवळपास सगळ्याच शहरांमधल्या शाळा, कॉलेजच्या गेट पर्यंत पोचले आहे. पुण्यात देशाच्या विविध भागांतून आणि विदेशातून मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणेच गांजा पिणाऱ्या/ओढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील देशात सर्वात जास्त झाली आहे.

मागच्या वर्षी बिबवेवाडी मधील एका हॉस्पिटल मध्ये माझा भाचा टायफॉइड झाल्याने ॲडमिट होता. त्यावेळी मला तीन दिवस हॉस्पिटल मध्ये थांबायला लागले होते. आठ दिवसांपासून ICCU मध्ये उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थी रुग्णाला अतिदक्षता विभागातून बाहेर काढून सेमी स्पेशल वॉर्ड मध्ये भाच्याच्या शेजारच्या बेडवर हलवण्यात आले. वीस-एकवीस वर्षाच्या त्या रुग्णाच्या कॉलेज मधील मित्र मैत्रिणींचा तिथे सतत राबता होता. त्याचे आई वडील तिथे नसले कि त्यांच्यात ज्या गप्पा व्हायच्या त्या ऐकून हसावं का रडावं हेच समजत नव्हतं. त्यांचा सर्व ग्रुपच नाशेडी होता, अगदी मुली सुद्धा. सुरवातीचे दोन दिवस त्या मुलाला व्हेंटीलेटर वर ठेवले होते तेव्हाचे त्याचे नाका-तोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेतले, सोशल मिडियावर शेअर केलेले त्याचे फोटो सवंगड्यांनी त्याला दाखवले तेव्हा "भेन्चोद ये मै है? ड्यूड आय लूक सो डिफरंट " हि त्याची प्रतिक्रिया ऐकून तर डोक्यात संतापाची तिडीकच उठली.

नंतर डॉक्टरांशी बोलताना समजले कि त्याची इथे भरती होण्याची हि चौथी वेळ आहे, आधीच्या तीन वेळी एवढी गंभीर परिस्थिती नव्हती पण ह्यावेळी त्याने गांजा सोबत मेथ, एलएसडी वगैरेचे कॉम्बिनेशन ट्राय केले होते त्यामुळे कोमा मध्ये गेला असताना त्याला येथे दाखल केले होते.

बाहेरून काही शारीरिक बदल जाणवत नाही, दारू सारखा वास येत नसल्याने घरच्यांना काही पत्ता लागत नाही असे अनेक फायदे(?) सांगून नवनवीन तरुणांना ह्या नशेकडे आकर्षित केले जाते. सुरुवात तुलनेने स्वस्त अशा गांजा भरलेली सिगरेट, चिलीम, बॉंग पासून करून मग हळूहळू किमतीने आणि नशेने जास्त असलेल्या ईतर अंमली पदार्थांकडे नकळत त्यांचा प्रवास सुरु होत जातो.

कात्रजलगतच्या जांभूळवाडी येथे डोंगरावर असलेल्या माझ्या मित्राच्या 'हेल्प' नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात दोन तीन वेळा जाणे झाले आहे. तिथे उपचार घेणाऱ्या लोकांच्या कहाण्या पण मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. (तिथे एकदा तुषार नातुंशीही भेट झाली होती.)

गांजाच्या नियमित सेवनाने त्यतल्या THC ह्या घटकामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती आणि कार्यशक्ती वर गंभीर असे कायमस्वरूपी परिणाम होतात. 'गांजा पिये राजा' अशी एक जुनी म्हण देखील हिंदीत प्रचलित आहे. ज्याला स्वतःला कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे नसतात, बुद्धी वापरून कुठलेही काम करायचे नसते तसेच कुठलेही शारीरिक कष्टाचे काम करायचे नसते त्याचं लोकांनी गांजा सेवन करावे अशा अर्थाने ती वापरली जाते. गांजा पिताय म्हणजे तुम्ही राजा आहात असा अर्थ काढणे सर्वस्वी चुकीचे आहे.

दिशाहीन, विचारहीन, बुद्धिहीन, निस्तेज अशी नुसती हाडामासाची जिवंत पण त्यांना शहाणं म्हणावं का वेडं हा प्रश्न पडावा अशी बधीर भावी पिढी निर्माण होऊ द्यायची नसेल तर गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह न धरता वा त्याचे समर्थन न करता उलट जेवढे लोक सद्यस्थितीत त्याच्या आहारी गेले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढणे जास्त गरजेचे आहे.

गम्मत म्हणून वा अनुभव घ्यावा म्हणून अशा प्रतिबंधित गोष्टींची नशा करणे, तिचे समर्थन करणे हा भाग वेगळा पण सगळ्यांनाच कुठे थांबायचे हे समजत नसल्याने आणि प्रत्येकाची नशा पेलण्याची शारीरिक व मानसिक क्षमता वेगवेगळी असल्याने त्याचे व्यसन लागण्याची शक्यता आणि परिणाम सहन करण्याची क्षमताही व्यक्तिगणिक वेगवेगळी असते हे विसरून चालणार नाही.

दारू/सिगरेट/तंबाखू सेवन आता एवढे कॉमन झाले आहेत कि एक व्यसन म्हणून त्यांच्याकडे तेवढे गंभीरपणे बघितले जात नाही कि लपवले जात नाही. कुठलीही गोष्ट सिध्द करण्यासाठी पुरावा/डेटा मागितला जातो. परंतु गांजा आणि ईतर अंमली पदार्थांचे व्यसन असे आहे कि पालकांना आपला पाल्य ह्याच्या आहारी गेलाय हे माहित झाले तरी त्याची वाच्यता करणेही लज्जास्पद वाटते. आपल्या आजूबाजूला राहणारे कित्येक जण ह्यातून उद्भवलेल्या दुषपरिणामांवर हॉस्पिटलमधे अथवा ३० ते ४० दिवसांसाठी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असतात पण हि माहिती घरच्यांकडून लपवली जाते. समाजातली बदनामी टाळण्यासाठी पोलीस केस न होऊ देता प्रकरण दाबण्याकडे कल असतो. ऑफिस कडून मुलाबाळांच्या किंवा स्वतःच्या उपचारांवर झालेल्या वैद्यकीय खर्चाची रिएम्बर्समेंट मिळत असून सुद्धा मेडिकल रिपोर्ट वर कशासाठी उपचार घेतलेत त्याचा उल्लेख असल्याने ऑफिसमध्ये नाचक्की नको म्हणून अक्षरशः वीस पंचवीस हजारांपासून लाखभर रुपयांची हॉस्पिटलची बिलेही स्वखर्चाने भरली जातात. अशा तेरी भी चूप मेरी भी चूप प्रकारामुळे ह्या गंभीर व्यसनाची आणि त्याच्या दुष्परिणामांची खरी आकडेवारी/सांख्यिकी मिळणे अशक्य होऊन बसते.

प्रतिसाद फारच लांबतोय याचे भान आल्याने आवरता घेतोय. सर्वच अनुभव लिहायचे म्हंटले तर लेखच होईल. पण सर्वच पालकांना विशेषकरून पुण्यातल्या पालकांना एक विनंती करतोय कि त्यांचा मुलगा वा मुलगी ह्या वाटेला गेला/गेली आहे का याची खात्री करून घ्या. दुर्दैवाने दारू सारखा उग्र वास येत नसल्याने ते सहसा चटकन लक्षात येत नाही पण सतत कुठ्यातरी तंद्रीत असणे, समोरचा काय बोलतोय किंवा विचारतोय ह्याचे नेहमीपेक्षा उशिराने आकलन होणे, डोळे थोडेसे लालसर, खोल गेलेले किंवा सतत विचारांत हरवलेली नजर ह्या लक्षणांवरून त्याचा अंदाज घेता येतो.

प्रचेतस's picture

2 Oct 2018 - 8:10 pm | प्रचेतस

उत्कृष्ट प्रतिसाद.