महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ?

Primary tabs

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in तंत्रजगत
12 Mar 2018 - 12:38 pm

नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ? आधीचे tata photon चे data card हे नुकतेच ती कंपनी बंद पडल्यामुळे बाद झाले आहे .

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

12 Mar 2018 - 1:46 pm | दुर्गविहारी

एअरटेलचे फोर-जी हॉटस्पॉट घ्या. मस्त स्पीड आहे. जीओचे हॉटस्पॉट डाँगलही कदाचित उत्तम चालत असेल. पण रेंजचि खात्री नाही असे आमच्या मोबाईलच्या व्हॉटस अ‍ॅपग्रुपमधल्या सदस्यांचे मत आहे. एअरटेलचे टॉवर बर्‍यापैकी असल्याने रेंजची अडचण येणार नाही.
अमेझॉनवर एअरटेलचे फोर-जी हॉटस्पॉट ९९९/- ला मिळते. एअरटेलचे कार्ड टाकून ४९८/- चा पॅक मारला कि तीन म्हिने काळजी नाही. मला तर खुपच छान स्पीड मिळतो आहे. शिवाय गरज पडल्यास मोबाईल, लॅपटॉप असे एकाच वेळी वापरुनही चांगला स्पिड मिलतो असा स्वानुभव आहे.

दीपक११७७'s picture

14 Mar 2018 - 11:44 pm | दीपक११७७

Tata वाले ५५० मध्ये GSM data card देत आहेत ना?

manguu@mail.com's picture

26 Mar 2018 - 12:31 pm | manguu@mail.com

डाँगल कुठलेही घेतले तरी त्यावर कोणतेही कार्ड चालते.

पैसा's picture

26 Mar 2018 - 2:39 pm | पैसा

माझे टाटा दोकोमो सिम शिस्तीत सुरू आहे. मी परवाच आधार ओटीपी वापरून लिंक केले. 3g सगळ्यात स्वस्त स्कीम मध्ये देत आहेत. एवढेच काय २४० मिनिटे isd फुकट रोज 1.4 gb डाटा आणि unlimited लोकल कॉल्स एवढे सगळे ११९ रुपयात २८ दिवसाकरिता दिले आहेत. टाटा फोटॉन cdma वर असेल तर cdma सेवेचे काय झाले ते मात्र माहीत नाही.

रत्नागिरी आणि गोवा इथे एअरटेल ची बोंब आहे. आयडिया ही धड चालत नाही. जिओ ठीकठाक.

बहूदा,

आमचे आणि टाटाचे जास्त पटत नसावे...

आगाऊ म्हादया......'s picture

18 Apr 2018 - 9:57 pm | आगाऊ म्हादया......

जिओ आणा कुणाचं तरी, रेंज कशीय ते पहा.
चांगली असेल तर नक्की घ्या. जिओफाय 5 आलंय बाजारात. बॅटरी जास्त आहे त्याला. 999ला मिळतं ते जिओफाय 2 पण भारीच आहे. खिशात मावतं तेच. इतर मावत नाहीत. 4 डिव्हाईस जोडून पण उत्तम चालतंय.