महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

गाडीच्या इंजिनात शिरणारे उंदीर कसे रोखावेत?

Primary tabs

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in तंत्रजगत
28 Feb 2018 - 11:54 am

मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती. दुसरया दिवशी ऑफिसला सुट्टी घेउन ग्यारेज मधे काम करुण घेतले. त्यानंतर व्यवस्थित चालली. बिल झाले ३०० रुपये.

काल जिमला जाताना पुन्हा बंद पडली, त्याच मेकनिक्ला बोलावले, धक्का मारून्ही चालू होईना, मेकनिकच्या मतानुसार हा उंदराचाच प्रताप आहे, त्याने मागच्या वेळी अजूनही काही वायरी खाल्ल्यात त्यामुळ कदाचित शोर्ट सर्किट देखिल झाले असू शकते. गाड़ी रात्री त्याच्या ग्यारेज्वर लावली, यावेळी ऑफिसला सुट्टी घेऊ शकलो नाही.

गाड़ी निदान सुरु झाली तर तिला टाटाच्या अधिकृत सर्विस सेंटरमधे दाखल करायची आहे. १५ दिवस अगोदर सर्विसिंगला दिली तेव्हा त्यांना या उंदीराचे प्रताप सांगायचे विसरलो मी त्यांना. उंदीर जरी लहान असला तरी त्याने दिलेला मनस्ताप खुप मोठा आहे. नेमक्या कामाच्या वेळेला गाड़ी रुसून बसली तर पुढचे सगळ प्लानिंग बोम्बलते.
नो एंट्री नावाचे एक औषध आणले होते इंजिनवर फवारायला, परंतु ते लावल्यावर उग्र वास येतो अणि निदान २ दिवस गाड़ी वापरायची नाही अणि वापरली तर एसी लावायचा नाही, हे झेपणार न्हव्ते म्हणून ते औषध अजुन तसेच पडून आहे. गायछाप तंबाखूची पुड़ी देखील सॉक्स मधे बांधून ठेवली आहे इंजिनला, पण मेकनिक म्हणतो यावर काहीही उपाय नाही.

आपल्याकडे काही उपाय आहेत का? कृपया सांगावे, आभारी राहीन.

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

28 Feb 2018 - 12:13 pm | योगी९००

तंबाखूची पुडी इंजिनाच्या जवळ ठेवली तर वासाने उंदीर येत नाहीत असे कोठेतरी वाचले होते. हे करून बघा.
किंवा सर्व वायरींना तंबाखूचे कोटींग मारा.

नाहीतर मांजर पाळा.

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 12:56 pm | सतिश पाटील

तंबाखूची पुड़ी ठेवलिये इंजिन जवळ.
मांजर पण आहे घरी. तिला दिवसभर गाड़ीजवळ बांधून ठेवणे शक्य नाही.

मांजराचे नाव राजेश ठेवा आणि त्याच्याकडे चुन्याची डबी द्या. उंदीर नुसती तंबाखू खाणार नाही. चुना मागायला मांजराकडे येणार. मग मांजर उंदराला खाईल. मग तुम्ही गाडीत बसून भूर्र्र्र्र्र जावा.

मांजर खूप म्यु म्यु आवाज करील त्यापॆक्षा एक साप सोडा इंजिन मध्ये..

का असं करताय ..
सापळा लावून उंदीर पकडा.. पकडून त्याचे चिमट्याने सर्व दात काडा. आणि शेपूट बांधा त्याचे वायरल.
आता कुरतडत बस म्हणावं..

पार्कींगची जागा बदलता येत असेल तर उत्तम.
त्याच बरोबर
बॉनेट मधे उंदरांच्या बसायच्या ठराविक जागा/फटी असतात (बॅटरी चा टॉप, ईंजिन/फिल्टर टॉप इ. इ. )
त्या ठिकाणि भांडी घासायचा तारेचा काथ्या विसकटुन (टोचेल असा) घट्ट बांधुन/खोचुन ठेवा...
माझ्या कार चा प्रॉबलेम सॉल्व्ह झाला ह्याने...

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 12:57 pm | सतिश पाटील

पार्किंगची जागा नेहमी बदलतो मी. भांडी घासायचा तारेचा काथ्याचा प्रयोग करुण पाहतो.

प्रसाद_१९८२'s picture

28 Feb 2018 - 1:10 pm | प्रसाद_१९८२

तारेचा काथ्या "Highly inflammable" असतो. त्यावर एकादी ठिणगी जरी पडली तरी तो पेट घेतो. तेंव्हा जरा जपून.

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 2:21 pm | सतिश पाटील

बरे झाले सावध केलेत.

कुशल द. जयकर's picture

28 Feb 2018 - 1:27 pm | कुशल द. जयकर

ऱ्याट कील च पेस्ट मेडीकल मधे मीळते ते हातात ग्लोज घालून वायर ना लावा

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 2:22 pm | सतिश पाटील

हा प्रयोग करुण पाहतो.

गाडीत शिवसेनेचे स्टीकर लावा. त्यामुळे "इंजीनात " यायला उंदीर घाबरतील

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 2:23 pm | सतिश पाटील

काचेवर सेनेचा झेंडा अगोदरच आहे. तरीही उंदीर येतोच इंजिनात

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2018 - 6:08 pm | टवाळ कार्टा

_/\_

एकुलता एक डॉन's picture

1 Mar 2018 - 6:35 pm | एकुलता एक डॉन

इंजिनात झेंडा लावा

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Mar 2018 - 8:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

लय भारी लॉजिक

मार्मिक गोडसे's picture

28 Feb 2018 - 2:49 pm | मार्मिक गोडसे

गाडीखाली गाजर ठेवा. गाजर उंदराच्या दातात अडकते, त्यामुळे तो अस्वस्थ होतो व दातात अडकलेले गाजराचे तुकडे काढण्यात मग्न होतो.
पेपरमिंटच्या वासाने उंदीर दूर पळतो असं म्हणतात. तोही प्रयोग करून बघा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2018 - 4:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एकदा हे वाचून बघा, यात बरेच पर्याय दिलेत.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2018 - 12:26 am | पिवळा डांबिस

काय मस्त आठवण करून दिलीत हो! धुमशान घातली होती मिपाकरांनी त्या धाग्यावर!! आठवणीने ड्वाले पानावले. :)
बाय द वे, उंदराने गाडीच्या वायर खाण्यावर उपाय नाही. मी स्वतः दोनदा ह्याचा अनुभव घेतलेला आहे (आणि रिपेरिंगवर काही शेकडा डॉलर घालवलेले आहेत.)
अमेरिकेसारख्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेल्या देशातही ह्यावर काही उपाय शोधला जाऊ नये ही अमेरिकेला अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
(चंद्रावर माणसं पाठवली म्हणतात, शिंदळीचे!!)

इरसाल's picture

1 Mar 2018 - 2:02 pm | इरसाल

शिंदळीचे म्हणुन त्यांना ते समजणार आहे का, काही तरी अमेरिकन नाव पाडा तुम्ही.

फटींमध्ये रॅट किलरच्या वड्या काही दिवस ठेवा.
मी केला होता हा उपाय. उंदराने वायपरचा पाईप आणि वायरिंग कुरतडले होते. वड्या ठेवल्यांनंतर उंदीर गायब झाला.

सतिश पाटील's picture

28 Feb 2018 - 6:00 pm | सतिश पाटील

गाडीत मेला बिला तर जास्त त्रास व्हायचा.
डांबर गोळ्या ठेवल्याने किंवा निलगिरिचे तेल फवारले तर काही फरक पडतो का?

शिवाय's picture

28 Feb 2018 - 6:23 pm | शिवाय

मानवी केस ठेवा .. जरा लांब असले तर बरे .. असं म्हणतात मानवी केसांना उंदीर घाबरतात ... केस चुकून तोंडात गेला तर जीव गुदमरून आपण मारू शकतो हे त्यांना बहुधा माहित असावं ...

झेन's picture

28 Feb 2018 - 10:37 pm | झेन

सध्या ब-याच ठिकाणी गीरीपुष्प (उंदीर मारी)ची फुले फुललेली आहेत, ती फुले गाडी च्या पार्किंग जवळ ठेवा. त्या फुलांमुळे उंदीर आणि तत्सम सरपटणारे जीव मरतात किंवा लांब जातात म्हणे.

सतिश पाटील's picture

1 Mar 2018 - 4:25 pm | सतिश पाटील

काल मेकनिकने दुरुस्त करुण दिलेली गाड़ी आज पुन्हा सकाळी रुसून बसली. ३ तास उपद्व्याप केल्यानंतर मेकनिक म्हणतो नोझल मधून इंधन पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. नोझल ची सर्विस करावी लागेल. ते उंदरामुळ ख़राब झालेल नाहीये. उंदरामुळ जे ख़राब झाले होते आम्ही ते मागच्या महिन्यातच दुरुस्त केलय.
सर्विस सेंटर ला विचारल्यावर ते म्हणे सर्विस चा खर्च ३५ हजारापर्यंत जाईल, नोझल जर बदलावे लागले तर खर्च अजुन वाढेल.
मेकनिक म्हणतो तिच सर्विस मी तुम्हाला ८ हजार पर्यन्त करुण देऊ शकतो. नोझल जरी बदलावे लागले तरी आम्ही जुन्या गाड्यांचे लावू शकतो.
च्यायला.....आता हे का्य नवीनच....

पैसा's picture

1 Mar 2018 - 8:18 pm | पैसा

गाडीला किती वर्षे झाली? एक्सचेंज करा आता. एवढा खर्च करण्यापेक्षा.

अभिजीत अवलिया's picture

2 Mar 2018 - 10:22 am | अभिजीत अवलिया

एक्सचेंज करुन आता काय होईल असे वाटत नाही.
कारण जरी एक्सचेंज करायचे म्हटले तरी विकत घेणारा यांना नोझल दुरुस्तीचे पैसे कापूनच पैसे देणार. त्यामुळे असे ना तसे आर्थिक नुकसान झालेलेच आहे.
तसेच नवीन गाडीचे पण उंदीर नुकसान करेलच. ते जास्त खर्चिक होईल.

पैसा's picture

2 Mar 2018 - 1:13 pm | पैसा

३५ हजारात दुसरी एखादी चालणारी गाडी येईल.

कपिलमुनी's picture

2 Mar 2018 - 1:03 pm | कपिलमुनी

rat sticky pad वापरुन बघा , थोडा जास्त खर्च होइल ,पण उन्दिरे मरतील

चौकटराजा's picture

2 Mar 2018 - 7:53 pm | चौकटराजा

इन्जिनात घड्याळ ठेवा.... इन्जिन जर घड्याळाला घाबरते तर उंदीर का नाही घाबरणार ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Mar 2018 - 8:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

सिक्सर मारलीत राव

मार्कस ऑरेलियस's picture

28 Mar 2018 - 1:29 am | मार्कस ऑरेलियस

उंदिर

उंदिर पडुन खायला सुरुवात करा . रानाचा मेवा ! दोन वाटे थोरल्या भगताच्या घरी पाठवा. आपट्याच्या बामणानं सागितल्यापासनं नाग्या उंदिर आणि मोर खात नाही , त्याला पुन्यवंत व्हायचय म्हणे !

मर्द मराठा's picture

13 Apr 2018 - 12:20 am | मर्द मराठा

माझ्या नव्या कोर्‍या गाडीला ही साडेसाती लागली होती.. तारेच्या जाळिचे तुकडे (काथ्या नाही) कापून तारेने गुन्डाळले महत्वाच्या पोईन्ट्स् ना.. जिथे वायर्स कनेक्ट होतात तिथे आणि उन्दिर बसतात असे वाटले तिकडे.. तेव्हापासून गेली ४ वर्शे काही त्रास नाही... उन्दिर फिरत असतात आजुबाजुला पण बोनेट मध्ये अजिबात घुसत नाही.. एकमेव जालिम उपाय आहे हा..