देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा

क्रिप्ट's picture
क्रिप्ट in काथ्याकूट
27 Feb 2018 - 8:37 am
गाभा: 

इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत.

भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल.
थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2018 - 12:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान डीक्रिप्ट केले आहेस रे क्रिप्टा.

चौकटराजा's picture

27 Feb 2018 - 1:48 pm | चौकटराजा

नास्तिक व आस्तिक यात वाद काहीही असोत. एक प्रश्न असा आहे की देव हा साक्षीदार आहे की पक्षकार . त्याला भावना आहेत का ? तो असलाच तर त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे का ? या प्रश्नाची उत्तरे उपनिषदात मिळतात का ?

चौकटराजा's picture

27 Feb 2018 - 1:50 pm | चौकटराजा

देवाची भूमिका न्यायाधीशाची असेल तर तो ज्या निकषावर न्याया देतो त्या निकषांचा निर्माता कोण ?

सध्याच्या न्यायाच्या निकषांचा निर्माता कोण?

जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत?

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 4:41 pm | चौकटराजा

जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत?
आमचं ग्रुहीत चूक असेल तर आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे हे गृहित आपण कसं धरलंत ते सांगा ! इथं तुमची अध्यात्मिक खोली आहे तरी किती हे कळू द्या सर्वाना !

आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे

माझी वाक्ये पुनश्च वाचा. मी कोणतंही गृहितक केलेले नाही.

मराठी कथालेखक's picture

27 Feb 2018 - 1:49 pm | मराठी कथालेखक

पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी काही बिघडणार नाही. ज्यांना देव मानायचा त्यांनी तो मानत रहावा आणि ते मानत राहतीलच. ज्यांना तो नाही मानायचा ते नाही मानणार.
माझ्या मते विज्ञानाच्या पुस्तकात देव नाही, 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही. इलेक्ट्रॉन , प्रोटॉनही मी स्वतः बघायला गेलो नाही पण अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे अस्तित्व मान्य केलेय तर मी ही ते मान्य केलंय. आता माझा पोटापाण्याचा उद्योग सोडून मी शास्त्रज्ञ बनू शकत नाही.

'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.

प्रत्येक सत्यास पुरावा असतोच हे मानत बसायचे कारण काय असावे?

मराठी कथालेखक's picture

3 Mar 2018 - 7:45 pm | मराठी कथालेखक

देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.

यातला 'मला' हा शब्द महत्वाचा आहे असं नाही वाटत नाही का तुम्हाला ?
वाटत असेल तर मला 'देव आहे' असं न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे हे तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा.
धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2018 - 2:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

देव माना किंवा मानू नका, त्याने फारसा फरक पडत नाही, पण...

१. आपल्यासारखाच इतरांनाही आपले स्वतंत्र मत असण्याचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा... याला समता (equality) म्हणतात.

२. आपल्या मताचा इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या... याला सभ्यता (civility) म्हणतात.

३. दुसर्‍याचा मताचा आदर करा आणि आपले मत दुसर्‍याला पटवून देताना ते त्याच्यावर जबरदस्तीने लादले जाणार नाही याची काळजी घ्या... याला सहिष्णुता (tolerance) म्हणतात.

४. अनेक मतमतांतरे असली तरीही किमान मानवी मुल्यांच्या पायावर समाज सामंजस्याने राहू शकतो व विकास साधू शकतो, यावर विश्वास ठेवा... याला बंधुभाव (brotherhood) म्हणतात.

वरचे सर्व मुद्दे समजून उमजून वर्तन केले तरच मानवी समाज स्वातंत्र्यात व सुखसमाधानात राहू शकेल.

मानवी हक्कांच्या सद्य कल्पना मानवी विचारातूनच निर्माण झालेल्या आहेत. काळाबरोबर परिस्थिती जसजशी बदलत जाईल तसतशा या कल्पनांत विकास/बदल होत राहील. त्याकरिता देवाचे, धर्माचे किंवा एखाद्या विचारधारेचे अधिष्ठान असणे नसणे ही गोष्ट महत्वाची नाही, किंबहुना ते आवश्यकसुद्धा नाही. मानवी मनाचा प्रामाणिकपणा, समजूतदारपणा, चांगुलपणा व न्यायभावना पुरे होतील.

चौकटराजा's picture

27 Feb 2018 - 9:22 pm | चौकटराजा

या साठीच मी निरीश्वरवादी असलो तरी पूजा करतो , आरती करतो.भजन म्हणतो . प्रसाद घेताना मस्तकी लावतो . देवळात गेलो की तेथील सर्व नियम पाळतो . ( उदा लुंगी घालून जाणे - पदमनाभ मंदीर त्रिवेंद्रम ) . पण हे सर्व करताना मागत काहीच नाही .

जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय?

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 4:29 pm | चौकटराजा

जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय?
जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ?

आत खरे उत्तर - मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे ! बस इत्तकेच ! ती करमणूक मधुबालेचा पिकचर पाहिल्यावर मिळते. या दोन्ही आनंदात मी फरक करीत नाही. सबब ती करमणूक असल्याने खाली गावडे यानी म्हटल्याप्रमाणे कुणालाही त्याचा त्रास नाही. देवळाच्या लाईनीत रखडताना ज्याना अत्यानंद मिळतो त्यानी तो जरूर घ्यावा . मला त्यात देवळाचा नियम पाळल्याचा आनंद मात्र नक्कीच मिळतो.

जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ?

हे माझ्या प्रश्नाचं हो असं उत्तर आहे.
=======================

मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे !

धर्म पाळणं करमणूक तर आहेच. पण केळ खाणारानं ते पांढरं असतं म्हणून खावं, ते मऊ असतं म्हणून खावं, ते स्वस्त असतं म्हणून खावं पण त्यात अन्नमूल्य आहे म्हणून खाऊ नये ही देखील आमच्यासाठी एक करमणूकच आहे.

चौकटराजा's picture

1 Mar 2018 - 7:13 am | चौकटराजा

इरतत्र खडवहीवर ही तुम्ही हे प्रतिसाद गमतीने लिहित असता असे लिहिले आहे. नास्तिकांच्या " चिकित्सक " व्रुतीची शाब्दिक चिरफाड हा तुमचा छंद आहे करमणूक आहे हे वाचून आनंद वाटला. असाच आनंद घेत रहा !

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2018 - 3:07 pm | प्रकाश घाटपांडे

मग कडवे नास्तिक तुम्हाला बूर्झ्वा बूर्झ्वा करुन अस्तिकांच्या गटात ढकलतील व तुम्हाला अस्पृश्य मानतील. :)

सतिश गावडे's picture

27 Feb 2018 - 10:45 pm | सतिश गावडे

हा प्रतिसाद कट्टर नास्तिक लोकांनी देवभोळ्या लोकांवर तुटून पडण्यापूर्वी मार्गदर्शक तत्वे म्हणून वाचला तर ते नास्तिक आस्तिक लोकांवर तुटून पडणारच नाहीत. =))

सरसकट श्रद्धेला विरोध न करता श्रद्धेच्या अनुषंगाने येणाऱ्या अपप्रवृत्तींना विरोध व्हायला हवा. उदा. कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको. मात्र गणपती पूजेचा उत्सव होऊन रस्त्यावर मंडप घालून वाहतुकीला जो अडथळा होतो, लाऊड स्पीकर आणि ढोल वाजवून जो मोठ्या आवाजाचा त्रास होतो त्याचा कडाडून विरोध करायला हवा. किंबहूना असा विरोध होण्यापेक्षाही सश्रद्ध लोकांनी विवेकी वृत्तीने वागून आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आनन्दा's picture

28 Feb 2018 - 9:07 am | आनन्दा

सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कृपेसाठी यातले कोणतेही प्रकार करत नाहीत.
हे सगळे करणार्‍यांचे हेतू वेगळे असतात, इतके नमूद करून खाली बस्तो.

सतिश गावडे's picture

28 Feb 2018 - 10:20 am | सतिश गावडे

सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कार्यक्रमात असे प्रकार करतात असे निरीक्षण आहे.

इथे मिपावरच गणेशोत्सवात ढोल बडवण्याचे समर्थन झाले होते एके काळी. :)

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2018 - 12:50 pm | श्रीगुरुजी

रस्त्यावर साज-या होणा-या सर्व जातीधर्मांच्या सर्व सण/उत्सव/समारंभांवर बंदी हवी.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2018 - 3:10 pm | प्रकाश घाटपांडे

खरच घालावी. पण तुम्ही जाणता हे भारतात लोकशाहीत शक्य नाही.

धर्म ही एक सार्वजनिक गोष्ट आहे.
लोकशाही विफल आहे म्हणून लोकशाही बर्खास्त करायची का? सार्वजनिकता हा धर्माचा अविभाज्य भाग आहे.

श्रद्धा आणि परंपरा या वेगळ्या गोष्टी आहेत..
श्रद्धा आणि श्रद्धेचा बाजार या देखील वेगळ्या गोष्टी आहेत..
आणि ढोल वाजवणे ही श्रद्धा तर नाहीच, पण परंपरा पण नवीनच आहे..

व्यक्तिशः मी श्रद्धाळू असूनदेखील कधीही मिरवणूक बघायला जात नाही, ढोल एक वेळ ठीक आहे, डीजे तर मला सहनच होत नाही..
जिथे गर्दी असेल तिथे मी सामान्यतः जात नाही..

माझं यनावालांच्या बरोबर पण हेच भांडण आहे.. ते सांगत असलेलया बऱ्याच गोष्टी मी मुळातच करत नाही, पण मी श्रद्धाळू आहे.मी व्यक्तिगत आयुष्यात ईश्वर मानतो. मग सरसकटीकरण करून तीच सगळी विशेषणे ते मला पण का लावतात हा मुख्य प्रश्न आहे..

सही पकडे हो. आणि हे सगळं दीडशहाणे लोक नास्तिक झाल्यामुळं झालं आहे. धर्म पाळणारे लोक मंजे नुसता गाळ उरला आहे. आणि धर्म न पाळणारे लोक व्यवस्थाविकृतीकरणात गुंतले आहेत.

घरीच काय सार्वजनिक स्थळी देखील ईश्वर मानावा या विचाराचा असलो तरी पुण्यात आल्यापासून गणपती हा शब्दही मला आवडत नाही. इथले गणेशोत्सव बिभत्स असतात.

मार्मिक गोडसे's picture

28 Feb 2018 - 3:49 pm | मार्मिक गोडसे

कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको.
अगदी बरोबर, परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये. श्रद्धा स्वतःपूर्ता मर्यादित ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही. विनाकारण बंधने कोणीच स्वीकारणार नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक.

परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये.

राष्ट्रगीताच्या गायनाच्या वेळी ज्यास घटनात्मक संचारस्वातंत्र्य आहे त्यास एकाच ठिकाणी थांबण्याचे बंधन घालू नये. त्याला सैरावैरा पळू द्यावे. त्या वातावरणाची एकूणता अशी काही नसते. प्रत्येक जण सुटा सुटा असतो.

मार्मिक गोडसे's picture

1 Mar 2018 - 8:40 am | मार्मिक गोडसे

राष्ट्रगीताबाबत तसं काही बंधन नसल्यास ,हो.
मुळ मुद्द्याला बगल देण्यासाठी असंबद्ध उदाहरण देऊन विषय भरकटवणे हाच तुमचा कायम उद्देश असतो.

मराठी कथालेखक's picture

3 Mar 2018 - 7:54 pm | मराठी कथालेखक

असा समंजसपणा असला की वाद होत नाहीत. माझी पत्नी अस्तिक तर मी नास्तिक आहे पण आमचे (निदान या विषयावरुन) कधी वाद होत नाहीत. शिवरात्रीलाही ती माझ्याकरिता नेहमीचा स्वयंपाक करते तर तिच्या इच्छेखातर मी तिच्यासोबत शिर्डीच्या मंदिरात रांगेत तासभर उभा होतो (कारण तिला एकटीला रांगेत उभ रहायला सांगणे मला योग्य वाटलं नाही) आणि मग दर्शनाची वेळ आल्यावर मी हात न जोडताच पुढे सरकलो याबद्दल तिलाही काही वाटले नाही.

आपल्या प्रतिक्रियेशी पूर्णत: सहमत आहे।

सतिश गावडे's picture

27 Feb 2018 - 10:50 pm | सतिश गावडे

देव कसा आहे याबद्दल विविध धर्म, पंथ, ग्रंथ इत्यादींमध्ये एकवाक्यता नाही मग देव आहे की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा बरे?

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2018 - 11:25 pm | श्रीगुरुजी

त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे मार्गदर्शन घ्या किंवा गतकाळातील सत्पुरूषांनी लिहिलेल्या ग्रंथात सांगितलेल्या मार्गाने जा किंवा कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च शोध घ्यायचा प्रयत्न करा.

सतिश गावडे's picture

27 Feb 2018 - 11:46 pm | सतिश गावडे

माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं तर धर्म, पंथ आणि ग्रंथ या यादीत सत्पुरुषही जोडा. :)

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2018 - 12:05 am | श्रीगुरुजी

माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे. ते पुन्हा एकदा वाचा.

सतिश गावडे's picture

28 Feb 2018 - 12:35 am | सतिश गावडे

बरे. :)

विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरे तर आहे. फक्त माणसांनी ग्रंथांमधील अर्थाचा अनर्थ केला. जर रूढार्थाने पहिले तर सर्वच धर्म ईश्वराचा/उच्च अध्यात्मिक शक्तीचा स्वीकार करतात. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मात निर्गुण, निराकार ईश्वराचा उल्लेख आढळतो. बायबल मध्येही ईश्वराचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात ओम तत् सत हि संकल्पना आहे तशी ख्रिस्त लोकांमध्ये Trinity आहे. बुद्ध जैन आणि शीख हे धर्म हिंदू धर्माच्याच शाखा मानल्या जातात आणि बर्याचश्या ईश्वरीय संकल्पना हिंदू धर्मातूनच आल्या आहेत. सारांश विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरी तर आहे. परंतु समस्या तेंव्हा निर्माण होते जेंव्हा माझा धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.

arunjoshi123's picture

28 Feb 2018 - 3:28 pm | arunjoshi123

नास्तिकांचे प्रकार अस्तिकांच्या प्रकारांपेक्षा अगणित आहेत. सतिशजींना नास्तिक बनताना हाच प्रश्न का पडत नसावा?

arunjoshi123's picture

28 Feb 2018 - 3:26 pm | arunjoshi123

सतिशजी,
विविध धर्म, पंथ, विचारधारा, इ चा संदर्भ घ्यायचाच कशाला?
आपल्याला कोणते प्रश्न पडतात, त्यातल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत नि ती काय आहेत हे पुरेसं नाही का? बाकी लोकांनी अनालिसिस करताना काय दिवे लावले त्याच्याशी आपल्याला संबंध नसावा.

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 4:34 pm | चौकटराजा

गौतम बुद्धाला॑ देवाचे अस्तित्व मान्य नव्हते हे खरे का ? ते असेल तर बौद्ध धर्म इतका जगात का पसरला ? की गौतमाचे तत्वद्नान ही " निरर्थक " म्हणायचे ?

गौतम बुद्धाला देव, दानव, भूते इ सर्वांचे अस्तित्व मान्य होते, नेतृत्व नाही.

चौकटराजा's picture

1 Mar 2018 - 5:18 am | चौकटराजा

आपल्या वरील विधानाला संदर्भ॑ द्या अथवा आपण फक्त शाब्दीक युक्तीवाद करता असे मी समजेन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2018 - 10:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

27 Feb 2018 - 11:49 pm | सतिश गावडे

आयुष्य हे शेअर मार्केटसारखे असते. चढउतार येणारच. जेव्हा आयुष्य उंची गाठते तेव्हा राजा असल्यासारखे वागू नका. त्या उंचीचा अंदाज घेऊन आयुष्याचं कल्याण करा. आणि जर पडता काळ असेल तर घाबरुन जाऊन माघार घेऊ नका. पुन्हा चांगले दिवस येणारच असतात. जसा सेन्सेक्स बराच पडून पुन्हा उसळी मारतो तसे.

शुभ रात्रकाळ

पुन्हा चांगले दिवस येणारच असतात.

काय संबंध? उगंच काहीही?

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 11:08 pm | सतिश गावडे

लय भारी पेटून उठता राव तुम्ही. तुमचे हे पेटून उठणेच आम्हाला प्रतिसाद द्यायला मजबूर करते बघा. ;)

क्रिप्ट's picture

28 Feb 2018 - 2:54 am | क्रिप्ट

----देव बीव काय नसतं. देवा बिवाच्या नादी लागू नका -----दिलीपजी, हेच सरसकट विधान अनुभवाच्या जोरावर तपासून घ्या असे आपले अध्यात्म सांगते. मी लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांनी तो प्रयत्न पूर्वी केला त्यांना अगदी याउलट अनुभव आला आहे. आणि असे अनुभव कालातीत आहेत.

'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है''
मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2018 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा !

विजुभौ, भक्तांचं देवाचं वेड गेल्याशिवाय अच्छे दिनाची शक्यता वाटत नै.

बाय द वे, विजुभाऊ तुम्हाला कोंचा देव आवडतो ? तेहतीस कोटी पैकी, भारी वगैरे वाटतो ? प्रसन्न वगैरे होईल आणि म्हणेल बेटा मांगो, तुम्हे जो मांगना है वह मांगो ? काय मागाल तुम्ही ? :)

-दिलीप बिरुटे
(विजुभौच्या लेखनाचा भक्त) ;)

६ कोटी लोक मारणार्‍या माओला पुजणारे पु ल देशपांडे इत्यादि अज्ञानी लोक जोपर्यंत नास्तिक अंधपणे फॉलो करणे सोडणार नाहीत....तोपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत.

सखाराम_गटण्या's picture

30 Sep 2018 - 12:28 pm | सखाराम_गटण्या

हे काहीतरी नवीनच वाचतो आहे. ह्याबद्दल ऐकले किंवा वाचले नव्हते काही पुरावा आहे का कुठल्या लेखात वा त्यांनीच कुठल्या पुस्तकात असे लिहिले आहे ?

सध्याला आनंदी दिवस चालू असतील तर?

देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य.

देव बीव काय नसतं मंता? वास्तव आणि तुम्ही स्वत: काय शून्यातून टपकले? चांगल्या विचारांची कास धरा (जनरली आधुनिक विचार घाण असतात). पुरोगाम्यांच्या नादी लागू नका. असतील दिवस चांगले तर माजू नका, तेही दिवस निघून जाऊ शकतात. दिवस काही चांगले वाईट नसतात. ईश्वराला भजून सारे दिवस आनंदात राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2018 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेवर कण्ट्रोल ठेवा काका. देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते, देवा बीवांचं खुळ सोडा. व्यक्तिगत रोखाची भाषा सोडून लिहिता आलं तरी तुमचा देव तुम्हाला पावला असे म्हणू या....बाकी तुमचं चालू द्या.....शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

बहुतेक तुम्हाला माजू नका असं म्हटलेलं आवडलेलं दिसत नाही. ठिक आहे , ते मातू नका असं वाचा किंवा तुम्हाला जे काय शिष्ट वाटतं ते वाचा. तुम्ही जे काय नास्तिकी डोस दिलेत त्याचं मी अस्तिकी रुपांतरण केलं आहे. स्वतःचं काहिही बोललेलो नाही. मूळ उद्देश तुमच्याइतकाच चांगला आहे.

देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,

नास्तिकांना वठणीवर आणण्यासाठी ईश्वराशीही पंगा घेणं वर्थ आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली नास्तिकांनी अपप्रचार करून सगळ्यांची अस्तिकता खोखली गेली आहे. आमचा ग्रह नासवला. आमची मूल्यं नासवली. आमची जीवनशैली नासवली. आमची मनं नासवली.
=============================
जे काही लिहिलं आहे ते "नास्तिकांना" उद्देशून लिहिलं आहे (जसं यनावाला वैयक्तिक लिहित नाहीत म्हणता तसं.). आपला व्यक्तिगत आदर आहे. ते तुमच्या विधानाचं उत्तर असल्यानं गैरसमज होऊ शकतो हे समजू शकतो.

बिटाकाका's picture

1 Mar 2018 - 10:43 pm | बिटाकाका

आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,

अर्रे देवा! म्हणजे अजून संशय आहेच तर! मला वाटलं कन्फर्म झाले असेल आतापर्यंत देव नाहीये ते. माणसाने कसं सुबुद्ध नास्तिक असावं, निर्बुद्ध तर....असो!

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 4:47 pm | चौकटराजा

म्हणेल जग आम्हास मद्यपि परवा कसली मग त्याची !
परसुनि त्याचे शब्द रूढीचे दास झणी ते खवळू द्या
देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या

शरद's picture

28 Feb 2018 - 9:43 am | शरद

(1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
(2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.

आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये
(1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे

(2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत
हे स्पष्ट केलेत तर माझ्या सारख्याला अभ्यास करणे सोपे जाईल.
उपनिषदाचे नाव, अध्याय, मंत्र असे दिल्यास वाचणे सोपे होईल.
जर वरील (1) व (2) प्रमाणे स्वच्छ उल्लेख नसतील तर कोणत्या श्लोकांवरून आपल्याला तसे वाटले हे जरी सांगितले तरी उपयोग होईलच.
(हातात समिधा घेऊन प्रश्न विचारणारा नम्र जिज्ञासू)
शरद

माझा स्वतःचा उपनिषदांचा अभ्यास नगण्य आहे. पण जो काही आहे तो या पुस्तकावरूनच आहे - "उपनिषदांचा अभ्यास". लेखक - के. वि. बेलसरे.

तुमच्या प्रश्नाचं सरळ उत्तर त्यात आहे की नाही हे मला माहित नाही. अजून तेवढा अभ्यास झालेला नाही. पण कदाचित तुम्हाला फायदा होईल म्हणून सांगितले.

राघव

शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु शंकराचार्यांनी १० उपनिषदांवर टीका लिहिली आहे त्यामुळे ते महत्वाचे मानले जातात. त्यांची नावे येथे देतो
ईश, केन, कठो, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्य
बाकी वर दिल्याप्रमाणे उपनिषदे वाचलीत तरी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. Youtube वर रामकृष्ण मिशन चे स्वामी सर्वप्रियानंद यांचे मांडुक्य उपनिषद वर खूप छान व्याख्यान आहे IIT मध्ये दिलेले. तेही पहा. https://www.youtube.com/watch?v=eGKFTUuJppU&t=436s
आणि जमल्यास त्यांची बाकी व्याख्याने पण ऐका.

शरद's picture

3 Mar 2018 - 7:31 pm | शरद

माननीय श्री. क्रिप्टजी,
मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा. तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे. मला पाहिजे असलेली माहिती इथे परत एकदा लिहतो. त्याबद्दल लिहा ही नम्र विनंती.
(1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
(2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.

आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये
(1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे

(2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत ? हे संबंधित उपनिषदाचे नाव, अध्याय (वल्ली) मंत्र क्रमांक या क्रमाने सांगा.

आपला नम्र,
शरद,

"मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा"
शरदजी, मला वाटते मी तुम्हाला उत्तर आधीच दिलेले आहे. तसेच आपल्या विधानामध्ये विरोधाभास दिसत आहे. एकीकडे विचारता कोणत्या उपनिषदात विचारलेले लिहिले आहे आणि दुसरीकडे म्हणता मी नाव विचारले नाही. पुन्हा सांगतो मी सांगितलेली १० उपनिषदे वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल (वाचली नसल्यास निदान सुरुवात तरी करा). आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर २३९ उपनिषदे असतील तर मी तुम्हाला १० च सांगितली आहेत यावरूनच समजले पाहिजे होते की मी तुम्हाला २३९ मधून निवडक १० सांगितली आहेत ते केवळ संख्या आणि नावे देण्याकरिता नाही तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यात दडले आहे म्हणून. असो.

"तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे." -- तुम्ही व्याख्याने ऐकलीत का? कदाचित त्यामधून तुम्हाला तुमचे उत्तर मिळू शकले असते. न ऐकताच ते असंबंधित आहे असे म्हणणे बरोबर नाही.

आता याही १० मधून जर तुम्हाला हवे असेल मांडुक्य उपनिषद आणि केनोपनिषद वाचा. केनोपनिषद प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. आणि शेवटी उत्तर म्हणून जे सांगितले आहे ते कसे प्राप्त करावे याचेही मार्गदर्शन आहे. मांडुक्य उपनिषदात ओम वरील ध्यान सांगितले आहे (मंत्र क्रमांक मुद्दामच देत नाही (माहित असूनही). थोडे कष्ट तुम्हीही घ्या :) )

राही's picture

28 Feb 2018 - 3:42 pm | राही

आध्यात्मिक ग्रंथ शेकडो आहेत. कपाटांत तर आहेतच पण जालावरही आहेत. अनेक जण ते वाचत असतील. (खरे )संतसुद्धा अनेक आहेत. त्यांचे हजारोंनी सच्छिष्य आहेत. या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते. कोsहम् , मी कोण आहे, मी काय आहे, माझे गुण कोणते, दोष कोणते, माझी क्षमता किती, या सगळ्याला जोखून मी किती उड्या माराव्यात अथवा शांत राहावे, सुखदु:खांना कसे सामोरे जावे हेच मुख्यतः शिकायचे असते. स्थिरचित्त होऊन विवेकबुद्धी धारदार करायची असते. हे घडले की 'लीलया भवजलं तरणीयम्' ही पायरी गाठायला कितीसा वेळ? असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात. पण परमसंतांच्या सर्वच शिष्यांना हे आत्मदर्शन होईलच असे नव्हे. 'वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां,यथैव तथा जडे, न तु खलु तयोर्ज्ञाने वृद्धीं करोति, अपहरति वा'. पण सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर मणि चकाकतो, मातीचा गोळा नव्हे. 'मणि:, न मृदां चयः' याचे कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आणि क्षमता वेगळ्या आहेत. जेव्हढे दान मिळाले आहे, ते पुरेपूर वापरणे इतकेच आपल्या हातात असते. आणि तेच शिकायचे असते. तुझा तूच उद्धारकर्ता असेही संत सांगतातच. देव म्हणजे शब्दशः ' one who shines forth'. असे तेजस्वी, ओजस्वी बनण्यासाठी चित्तस्थैर्य आणि विवेकाची जरूरी असते. मग आपणच देव आणि आपला देह हेच देवाचे मंदिर.

या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते.

+१११

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 4:37 pm | चौकटराजा

राम राम अवघे जन म्हणती
कोणी न जाणती आत्माराम ......

चौकटराजा's picture

28 Feb 2018 - 5:11 pm | चौकटराजा

देव नाहीच देव्हार्यात देव नाही देवालयी
कुथे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी
शोधीशी मानवा राउळी मंदिरी. नांदतो देव हा आपल्या अंतरी
नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी.

देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे. आमची आजी म्हणत असे " देव आपल्यावर काही घेत नाही "आजोबा म्हणत .. लग्नाच्या मंत्रात बे चा पाढा घुसडला तरी ते कुणाला कळणार नाही इतकेच त्याकडे लोकांचे लक्ष असते. मी गीतेचा पंधरावा अध्याय
अस्खलित म्हणून दाखवल्यावर मामा म्हणाला " अर्थ किती श्लोकांचा उलगडला ? " आजीने आईला आई लहान असताना बजावले होते " दुधावरची साय खाल्ल्याने आई मरते. " माझी आई प्रयोग करून मत बनविनारी होती. तिने दुधाची साय खाऊन पाहिली. त्यानंतर माझी आजी सुमारे ४० वर्शानी मरण पावली. मी एका धार्मिक घरात जन्माला आलो. उतरवून टाकलेल्या लिंबाचे सरबत करून ही पिऊन बघितले . आज ६५ व्या वर्शीही कोणत्याही भुताला मला हात लावायला जमले नाही.भावाच्या अंत्या विधीला जानवे लागेल ते नव्हते म्हणून पुडी च्या दोर्याचे जानवे करून घातले गायत्री मम्त्र न म्हणता. काही बिघडले नाही. माझे आजोबा गणपती बनवीत व न खपलेले गणपती सहज मोडून टाकीत . म्हणत " अरे त्या तर मातीच्या मूर्ती ! " म्हणूनच मी म्हटले आहे तुम्ही किती प्रयोगमार्गी आहात यावर तुमचे पुढील जीवनात तत्चज्ञान ठरत असते. आजही भू: ..... या सात पातळ्या गायत्री मम्त्रात सांगितलेल्या आहेत त्याचा अर्थ किती भक्ताना माहीत आहे मला शंका आहे. एक तरी ओवी अनुभवावी हेच खरे ! पण तथाकथित भक्त ती तरी अनुभवून पहातात का .. हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे. हे सांगायला कोणाही संताची गरज काय ?

राही's picture

28 Feb 2018 - 6:27 pm | राही

अतिशय आवडला. संपूर्ण सहमत. उरलेल्या गणपतिमूर्तींच्या विल्हेवाटीचा किस्सा तर अगदी रॅशनल विचार दाखवतो. अलीकडे मुंबईत विसर्जन झालेल्या मूर्तींची विटंबना होते अशी हाकाटी असते. काही स्वघोषित स्वयंसेवक अशा मूर्ती समुद्रातून 'वाचवतात'. म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्याला लागल्या तर त्यांची भग्न अंगे गोळा करून हारीने ठेवतात. पूजाबिजा आरतीबिरती होते आणि साग्रसंगीत पुन्हा विसर्जन होते. आता ही उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या? पुढच्या भरतीच्या वेळी जे काही व्हायचे ते होईलच ना? फार तर मोठ्या ट्रकमधून नेऊन त्या श्रेडर किंवा तत्सम यंत्रामध्ये घालाव्यात. एरवी किनाऱ्यावर घाण साचते ती उचलायला कोणी नाही. नको तिथे उत्सव आणि टाळ चिपळ्या कशाला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2018 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला...!!

-दिलीप बिरुटे

सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे.

+१. अशा अन्य अनेक उपासना आहेत.
======================

देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.

संकल्पना एंटीटी नसते हि एक विचित्र आणि अर्धवट थेरी आहे.
चलनातील मूल्याला मूर्त रुप देण्यासाठी नाणे बनवले जाते. मग काय मूल्य ही एक संकल्पनाच आहे, ती एक एंटीटी नाही असं म्हणणार? प्रत्येक संकल्पना ही एक एंटिटी असते.
भौतिकशास्त्रातील उर्जा ही देखील थेट मोजता येत नाही. थेट डिटेक्ट करता येत नाही. म्हणून काय उर्जा हि एंटिटि नसते म्हणता? मग द्रव्यात रुपांतर तिचंच होतं ना?
कृपया ज्या शब्दांचं मूलभूत आकलन नाही ते वापरून जी विचारधारा तुमची नाही तिकडे विक्षिप्त मते देऊ नकात.
==============================

हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे.

नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.

चौकटराजा's picture

1 Mar 2018 - 7:27 am | चौकटराजा

नास्तिक माणसाविषयी आपल्या कल्पना भलल्याच रंजक आहेत. तुम्हाला कोणी सांगितले की नास्तिक माणूस मनाचे अस्तित्व नाकारतो म्हणून. तुम्हाला कोणी सांगितले त्याला दैव ही पूर्ण पणे सम्कल्पना अमान्य आहे म्हणून. ? तुम्हाला कोणी सांगितले की तो कंप्लिट अश्रद्ध असतो म्हणून? देव नाही ही देखील त्याची श्रद्धाच असते. ती प्रयोगाअंती, चिंतना अन्ती, अनुभवा अंती, निरिक्षणाअंती झाली आहे ही नाही हे महत्चाचे. जसे जानवे हे ब्रहम्गाठीचे कवच असणारे दिव्य असे काही नाही तो एक साधा दोरा आहे. हे मी प्रयोगाअन्ती मान्य केले आहे. नास्तिक माणूस हा फक्त हैड्रो कार्बन व कर्बो हैद्रेट ची भाषा जाणतो असा आपला कयास असला तर तो दुरूस्त करून घ्या !
( आता यावर असा माझा कयास आहे हे तुम्ही गृहित कसे धरले असा तुमचा प्रश्न मला व इथे इतराना ही अपेक्शित आहेच ! हेवेसानल ! ) असो.

नास्तिक माणूसही कलाकार, आस्वादक, रसिक असू शकतो बरे ! त्याचा अस्तित्व मानण्याला देखील विरोध नाही. त्याचा प्रश्न एकच आहे तो निगोशिअबल आहे की नाही ? आणि जर असेल तर त्याला अनुरणिया थोकडा की आकाशा एवढा हे कसे समजायचे ?

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 11:10 am | सतिश गावडे

नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.

उत्तम विनोद :)

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2018 - 9:21 pm | चौथा कोनाडा


असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात.

+१११

क्रिप्ट's picture

28 Feb 2018 - 6:27 pm | क्रिप्ट

देव ही एक संकल्पनाच आहे.---- असे तुम्हाला वाटते कारण तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाही आणि तो यावा म्हणून तुम्ही खास असा प्रयत्नही केला नाही.
विवेकानंदांनी एक खूप छान कथा सांगितली आहे. एकदा एका डबक्यात राहणाऱ्या बेडकाला मोठ्या तलावातून एक बेडूक भेटायला येतो. तलावातील बेडूक म्हणतो- अरे या डबक्यात कसला राहतोय, चल मी तुला माझं मोठ घर दाखवतो. तिथे खूप पाणी आहे आहे. राहून तुला खूप आनंद मिळेल. तो बेडूक कधी डबक्याबाहेर राहिलेला नसतो त्यामुळे तो विचारतो तुझं घर किती मोठं आहे? या माझ्यापेक्षा दुप्पट, तिप्पट? तलावातला बेडूक म्हणतो अरे त्यापेक्षा खुप मोठं आणि खूप सुंदर. तू चल तर खरं ...फक्त तिथं जायची वाट थोडी कठीण आहे. पण काळजी नको मी आहे. डबक्यातल्या बेडकाला मात्र यावर विश्वास बसत नाही. उलट तो तलावातल्या बेडकालाच मूर्ख, बावळट, आणि खोटारडा समजतो आणि पुन्हा डबक्यातच उरलेलं जीवन कसंबसं कंठतो.
आपल्या सगळ्यांचेही असेच आहे (त्यात मीही आलोच म्हणा)....आपण डबक्यातले बेडूक बनून राहतो. अनेक संत पुरुष, द्रष्टे मंडळी वेळोवेळी येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात , लिखित स्वरूपात त्यांचे ज्ञान सोडून जातात आणि फक्त म्हणतात- या वाटेवर तू चालायला तरी लाग...मी तुझ्या सोबत आहे आणि तुला तलावापर्यंत (स्वरूपापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत) नक्की घेऊन जाईन. परंतु आपण त्या डबक्यातल्या बेडकासारखे आपण फक्त शंका घेऊन, बाहेर पडायचा प्रयत्न सुद्धा न करता त्याच डबक्यात पूर्वग्रहदूषित बनून राहतो.

राही's picture

28 Feb 2018 - 7:00 pm | राही

असहमत. जे आणि जिथे जीवन व्यतीत करायचे आहे तिथे त्या त्या सभोवतालात पूर्ण क्षमतेनिशी आणि आंतरिक समाधानाने ते व्यतीत व्हावे हेच जन्माला आलेल्याचे इतिकर्तव्य आहे. लाखोकरोडो लोकांसाठी हेच योग्य आहे. ईश्वराचा साक्षात्कार त्यांच्यासाठी वेगळा असा काही नसतो. ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात. ते बिचारे सुखात असतात. हे सुख म्हणजे माया, भ्रम , अज्नान असे म्हणणारे म्हणोत बापडे.

मारवा's picture

28 Feb 2018 - 8:21 pm | मारवा

ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात.

हे फार भारी हे

अजुन एक लगेच आठवलेला किस्सा
एका कल्ट चा गुरुजींचा कोर्स सुरु होता. जीवनाची कला वगैरे तेव्हा लाईट गेली. आणि हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या. सभोवताली झाडे होती.
वार्‍याची एक छानशी झुळुक आली काय नी लगेच..
"देखो गुरुजीने आपके लिए हबा भेजी है " बोलो जय गुरुदेव
म्हणज सांगायच तात्पर्य की कुठल्याही पातळीवर श्रद्धा जाऊ शकते.
मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ? अस विचारायच नसत ( आणि तुम्ही जरी विचारलच तरी मग तुम्हाला गुरु शक्तीची प्रचिती कशी आली असती ? च्या प्रतिप्रश्नावर डोक फोडुन घ्यायची तयारी हवी )

इरसाल's picture

1 Mar 2018 - 12:35 pm | इरसाल

भारीच.
ह्या लोकांची कॅपॅसिटी अक्षरशः शुन्यातुन जग निर्माण करण्याची असते, असले प्रतिप्रतिप्रति प्रश्न विचारुन भंडावुन सोडण्यात.

मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ?

एवढा झंड असेल तर मूळात ईश्वरानं पर्फेक्ट, परिपूर्ण असं विश्व का निर्माण केलं नाही असा तो प्रश्न आहे.
------------------
समजा ईश्वरानं लै भारी जग बनवलं असतं; समजा प्रत्येकाला ईश्वरानं अनादी अनंत असं अस्तित्व दिलं असतं; अमर/निरोगी असा देह दिला असता; संपूर्ण भूतकाळ, वर्तमानकाळ यांचं ज्ञान दिलं असतं; विश्वाचं सगळं ऐहिक, अध्यात्मिक स्वरुप स्पष्ट करून सांगीतलं असतं, हे दाखवायला वेगवेगळ्या प्रयोगशाळा नि विद्यापीठे काढली असती; दु:ख दिलं नसतं, शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण करायला हवं ते सर्व दिलं असतं नि त्यात कष्टाचा काही भाग काहीही ठेवला नसता; प्रबल, सुदृढ मानसिकता दिली असती; सर्व तंत्रज्ञाने नि त्यांनी बनू शकणार्‍या गोष्टी आयत्या बनवून दिल्या असत्या; कोणत्याही शारीरिक मर्यादा दिल्या नसत्या (श्वास घ्यावाच लागणे, इ); नैसर्गिक स्रोत हवे तेवढे ठेवले असते; बुद्धी, तर्क, आणि सार्वभौम इच्छा अफाट दिली असती; ईश्वरत्व दिलं असतं.....
................ तरी हा प्रश्न पुन्हा आलाच असता.
कारण अशा तगड्या माणसाचं डोकं चालतच राहिलं असतं नि काय कमी आहे याचा अजून एक मोठ्ठा नन्नाचा पाढा बनवला गेला असता.
====================
सबब पहिले अगोदर काय काय कमी आहे त्याची एक्झॉस्टीव लिस्ट बनवायचे सामर्थ्य आणा. मग ईश्वराला परिपूर्णतेचे सल्ले देऊ.

जे आणि जिथे जीवन व्यतीत करायचे आहे तिथे त्या त्या सभोवतालात पूर्ण क्षमतेनिशी आणि आंतरिक समाधानाने ते व्यतीत व्हावे हेच जन्माला आलेल्याचे इतिकर्तव्य आहे. लाखोकरोडो लोकांसाठी हेच योग्य आहे.

पुरोगामी मंडळी भारतीय लोक असेच समाधानाने जगले त्याला त्यांचा ऐतिहासिक मूर्खपणा म्हणतात. प्रगती करायची म्हणजे हालचाल करावी लागणार, डबक्यातनं बाहेर यायला लागणार. आता हे लेखक अध्यात्मिक प्रगतीसाठी हालचाल करा म्हणाले कि बाजू पलटली. यावेळेस आहोत तिथे सुखाने राहावे!

क्रिप्ट's picture

28 Feb 2018 - 11:51 pm | क्रिप्ट

+१. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांना डबक्यातच सुख मानून राहायला आवडत. बर त्याबाहेर काहीतरी आहे याचा शोध घ्या म्हंटलं तरी ते त्यांना नको असतं आणि तरीही डबक्याबाहेर काहीतरी आहे यावर विश्वास ठेवायलाही ते तयार नसतात. श्रीकृष्णाने गीतेमध्ये उगाच नाही म्हंटल की हजारातून एखादाच माझ्यापर्यन्त पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि अश्या हजार प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला येऊन मिळतो.

भगवद्गीता प्रक्षिप्त आहे ना?

arunjoshi123's picture

28 Feb 2018 - 11:34 pm | arunjoshi123

ईश्वराचा साक्षात्कार त्यांच्यासाठी वेगळा असा काही नसतो.

http://www.swamivivekanandaquotes.org/2013/04/swami-vivekananda-quotes-o...

Every man must develop according to his own nature. as every science has its methods, so has every religion. The methods of attaining the end of religions are called yoga by us, and the different forms of yoga we teach, are adapted to the different natures and temperaments of men. We classify them in the following way, under four heads:
Karma-Yoga— The manner in which a man realizes his own divinity through works and duty.
Bhakti-Yoga— The realization of the divinity through works and duty.
Raja-Yoga— The realization of the divinity through the control of the mind.
Jnana-Yoga— The realization of a man;s own divinity through knowledge.
There are all different roads leading to the same centre— God.

विवेकानंद वैगेरेच्या ईश्वराबद्दलच्या, ईश्वरप्राप्तीबद्दलच्या विचारांबद्दल आपलं हेच मत आहे का?

मूकवाचक's picture

1 Mar 2018 - 9:10 am | मूकवाचक

मार्कस यांनी यनावाला यांच्या एका धाग्यावरच्या प्रतिसादात आत्मप्रचिती, गुरूप्रचिती वगैरेचा उल्लेख केला होता. अशी प्रचिती घेतलेल्यांसाठी देव (किंवा अधिदैविक तत्व) ही निव्वळ संकल्पना उरत नाही.

प्रचिती ही व्यक्तिनिष्ठच असते, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही. व्यक्तिनिष्ठ प्रचिती घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले कायमचे परिवर्तन सश्रद्ध व्यक्ती अग्राह्य धरत नाहीत आणि त्यामुळे जे जे वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही ते सारे थोतांड असा अट्टाहास धरणार्‍या इहवादी लोकांशी त्यांचा सुखद संवाद संभवत नाही हे यातले त्रांगडे आहे. असो.

(श्रद्धाच नव्हे तर अश्रद्धा देखील तर्कदुष्ट आणि हास्यास्पद पातळीवर जाउन अभिव्यक्त होउ शकते हे मिपाकरांसाठी वेगळे सांगायची गरज नाही. )

मूकवाचक's picture

1 Mar 2018 - 9:10 am | मूकवाचक

मार्कस यांनी यनावाला यांच्या एका धाग्यावरच्या प्रतिसादात आत्मप्रचिती, गुरूप्रचिती वगैरेचा उल्लेख केला होता. अशी प्रचिती घेतलेल्यांसाठी देव (किंवा अधिदैविक तत्व) ही निव्वळ संकल्पना उरत नाही.

प्रचिती ही व्यक्तिनिष्ठच असते, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही. व्यक्तिनिष्ठ प्रचिती घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले कायमचे परिवर्तन सश्रद्ध व्यक्ती अग्राह्य धरत नाहीत आणि त्यामुळे जे जे वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही ते सारे थोतांड असा अट्टाहास धरणार्‍या इहवादी लोकांशी त्यांचा सुखद संवाद संभवत नाही हे यातले त्रांगडे आहे. असो.

(श्रद्धाच नव्हे तर अश्रद्धा देखील तर्कदुष्ट आणि हास्यास्पद पातळीवर जाउन अभिव्यक्त होउ शकते हे मिपाकरांसाठी वेगळे सांगायची गरज नाही. )

चौकटराजा's picture

1 Mar 2018 - 2:05 pm | चौकटराजा

देव ही एक संकल्पनाच आहे.---- असे तुम्हाला वाटते कारण तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाही आणि तो यावा म्हणून तुम्ही खास असा प्रयत्नही केला नाही.
हे कसे काय म्हणता बुवा ? तुम्ही तरी " देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा ? मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे . डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल ? तुमचा निर्णय हाचा तुम्हाला सांगेल की तुम्हाला खरेच देवा च्या अस्तित्वाचा अनुभव आला आहे का ? लवकर अनेक दिवस मनांत असलेला" नास्तिकांचा देव" हा लेख लिहीन म्हणतो .आपल्याला अनेक उत्तरे त्यात मिळतील .

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 2:08 pm | सतिश गावडे

जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे देव कसा आहे असे म्हटले की गप्प बसतात किंवा सत्पुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात. स्वतः काही सांगत नाहीत. :)

तुम्ही मोघम प्रश्न विचारू नका.
----------------
गावडे सायेब - आंबा कसा आहे?
अजो - गोड
गावडे सायेब - अहो, तो पिवळा आहे.
======================================

देव आहे म्हणणारे देव कसा आहे असे म्हटले की गप्प बसतात किंवा सत्पुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात.

आम्ही इलेक्ट्रॉन कसा आहे वा प्रकाश कसा आहे हे असंच विचारतो तेव्हा तुम्ही आम्हाला अशीच पायपीट करायला लावतात. फटू दाखवायचा ना सरळ!!!

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 7:10 pm | सतिश गावडे

आंबा कसा आहे ते सांगितलंत तसेच आता देव कसा आहे सांगून टाका.

इलेक्ट्रॉन आणि प्रकाशाबद्दल मी कसलाच दावा केलेला नाही. :)

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2018 - 3:03 pm | श्रीगुरुजी

आम्ही सांगून पटत नाही म्हणून सत्पुरुषांकडे जायला सांगतो किंवा स्वत: शोध करायला सांगतो. साखरेची चव कशी आहे हे चिमूटभर साखर तोंडात टाकली की लगेच समजते. देवाचा अनुभव तसाच आहे.

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 11:27 pm | सतिश गावडे

रूढार्थाने मी नास्तिक असलो तरी मला देव संकल्पनेची किंवा देवभोळ्या लोकांची एलर्जी नाही.

मी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षांपर्यंत सश्रद्ध किंवा देवभोळा होतो. अगदी माझ्या कोकणातल्या गावी आजूबाजूला दाट झाडी, स्मशान आणि नदी असलेल्या निर्मनुष्य शिवमंदिराच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात मी समई लावून बसत असे. तेव्हा वाटायचे तो इथे आहे. मी त्याच्याशी बोलायचो कारण तो माझं बोलणं ऐकतोय याची खात्री असायची. कोणत्याही देवभोळ्या माणसाच्या मनात असणारी "परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम" अशी जी देवाची प्रतिमा असते तीच प्रतिमा माझ्या मनात होती. आपण देवाचं काही केलं (म्हणजे भक्ती पूजा अर्चा वगैरे) की देवही संकटात आपल्या पाठीशी उभा राहील ही भावना मनात दृढ होती.

पुढे एका घटनेने मला काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे भाग पडले. हा शोध जवळपास पाच वर्षे सुरु होता. त्या पाच वर्षांच्या प्रवासात मनातील अनेक धारणा गळून गेल्या. त्यातली एक होती देव. माझ्या मनातील "सज्जनांना तारणारा आणि दुर्जनांना मारणारा" , "भक्तीने प्रसन्न होणारा, संकटकाळी धावून येणारा" देव अस्तित्वात नाही ही जाणीव नाझ्यासाठी धक्कादायक होती. जेव्हा त्रयस्थाच्या नजरेने माझ्या भोवताली पाहू लागलो तेव्हा माझ्या मनातील देवाच्या अस्तित्वाचा कसलाच पुरावा दिसत नव्हता. लोकं मरत होती, आजारी पडत होती, अपघातात जात होती, कुणी त्यांचा खून करत होता तर कुणावर बलात्कार होत होता, कुणाच्या घरी जबरी चोरी होत होती तर कुणी दारिद्रयात खितपत पडला होता. मग देव काय करत होता? काहीच नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्याकडून कृती कशी होईल?

देवभोळ्या घरात जन्म आणि संगोपन झाल्याने मी वर उल्लेख केलेल्या कल्पनेतील देवाच्या अस्तित्वाविषयी पुसटशी शंकाही कधी मनाला शिवली नव्हती. आपल्या देशात देवभोळ्या घरात जन्माला आलेल्या, वाढलेल्या बहुतेक लोकांचे हेच होते.

आता पुढचा प्रश्न होता (माझ्या मनातील) देव जर अस्तित्वात नसेल तर ही सृष्टी घडवली कुणी? (प्रत्येक गोष्टीचा निर्माता अस्तित्वात असायला हवा हे आपले लाडके गृहीतक. या गृहितकाने दहावीच्या मराठी भाषेच्या बोर्डाच्या पेपरालाही सोडले नाही. तो जगप्रसिद्ध परिच्छेद "उताऱ्यावरुन प्रश्नोत्तरे" साठी. सृष्टी देवाची निर्मिती पण देव मात्र स्वयंभू. असो.)

या प्रश्नाचे काहींनी दिलेले उत्तर: तुमचा तो पावणारा वगैरे देव सामान्य लोकांसाठी. खरा देव त्या पलीकडे आहे. निर्गुण निराकार. साऱ्यापासून अलिप्त.

तो जर साऱ्यापासून अलिप्त आहे तर त्याला हिशोबात धराच कशाला?

प्रवास चालूच होता. या प्रवासात पुढे भेटला डार्विन. आणि त्याचा तो वर्ल्डफेमस उत्क्रांतीचा सिद्धांत. अजून थोडा पुढे चालत राहीलो तर भेटला रिचर्ड डॉकिन्स. त्यानेही खुप काही सांगितले. तरी पुढे प्रश्न होताच. हे भाऊ जे सांगत आहेत तेच चिरंतन सत्य आहे कशावरुन. उद्या अजून काही नवीन शोध लागून हे जे काही म्हणत आहेत ते खोटं ठरणार नाही कशावरून.

प्रश्न कायम असल्याने तसाच पुढे चालत राहीलो. पुढे एक आश्रम दिसला . काहीसा नाखुषीनेच आश्रमात शिरलो. एक वयोवृद्ध साधू बोवा बसले होते. म्हटलं यांना आपले प्रश्न विचारुन पाहू. विचारला प्रश्न.

साधू बोवा म्हणाले, "ते देव आणि सृष्टी वगैरे सोड. तू तुझं बघ"

त्या साधू बोवांचे नांव होते रमण महर्षी.

तेव्हापासून मला देवाच्या अस्तित्वाविषयी आणि सृष्टीच्या निर्मितीविषयी प्रश्न पडत नाहीत. मात्र कुणी तावातावाने देव आहे किंवा नाही यावर काही बोलत असेल किंवा लिहीत तर मला त्याची मौज वाटते. आणि मग मी त्या व्यक्तीला प्रश्न विचारतो, "तुमचा देव कसा आहे?"

मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे .

भाजपचे सरकार असताना देखील एक उन्मत सेक्यूलर असलो तरी रोज भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतो नि तरीही आरामात जगतो हेच भाजपचे सरकार भारतात नसल्याचा पुरावा आहे! ......एतत्सम काहीतरी ऐकत असल्याचा भास झाला.
=======================
देवाला जर एवढी हौसच असती स्वतःला मानायला लावायची तर त्यानं मानण्या न मानण्याची स्वायत्तता जीवांना दिलीच नसती ना. बाय डिफॉल्ट सगळे अस्तिकच ठेवले असते.
================================
आता चौकटराजा मिसळपाववर असेपर्यंत मिसळपाववर अस्तिकांना, त्यांच्या अनुभवांना वा त्यांच्या तर्कांना प्रमाणत्वाची प्रतिष्ठाच नसेल असे तुमचे मत असेल तर तत्सम मत अन्य सर्व विश्वाचे असावे हे आवश्यक नसावे.
==============================
देव हा दयाळू असतो. त्याच्याकडे कम्यूनिस्ट नजरेने पाहू नये. दुनिया नि लोक बनवण्यात देवाचा काहीतरी "अर्थिक" वा तत्सम स्वार्थ होता, नि असला कोणता स्वार्थ असल्याशिवाय कोणी काही करतच नाही ही कम्यूनिस्ट विचारसरणी नास्तिकांची डिफॉल्ट विचारसरणी असते. ईश्वराचे नि जगाचे नाते, दोहोंचे प्रयोजन यांत हिरण्यकश्यपूपणा करत सुटणे हे एकच उत्तर कसे असेल?

असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल ?

काय विचित्र प्रश्न आहे.
तुमची धडक ही देवाची लीला आणि त्यावर ज्याला धडक दिली त्याची प्रतिक्रिया ही देवाचीच लिला असं तो धडक खाणारा अस्तिक मानेल.
==============
एका प्रतिसादात म्हणता नाही मानलं तर देव सुखानं जगू देणार नाही, दुसर्‍यात म्हणता धडक दिली तरी देव माफ करा म्हणेल.

क्रिप्ट's picture

2 Mar 2018 - 6:41 am | क्रिप्ट

"" देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा "" ---चौकटराजा, शोध हा देव आहे की नाही याचा घ्यायचा आहे....आधीच नाही असे समजून शोध घेण्याला फारसा अर्थ नाही. लेखाचा उद्देश्य ही तोच आहे.

" मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे" --- नास्तिक असूनही मस्त आयुष्य जगायचा आणि देव नसल्याचा काय संबंध? तुम्हाला असे म्हणायचे आहे की जर देव असलाच तर तुम्ही त्याला मानत नाही म्हणून त्याने तुम्हाला शिक्षा केली पाहिजे आणि तुम्ही मस्त आयुष्य जगले नाही पाहिजे? हा संबंध हास्यास्पद आहे. असे असेल तर तुम्ही यनावाला यांचा 'निरीश्वरवाद्यांना देव शिक्षा का करीत नाही" हा धागा पुन्हा वाचा. उत्तर मिळेल.
"डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? "-- पडते ना. मी नाही म्हणलेलंच नाहीये. फक्त फरक एवढाच आहे की डबक्यातून बाहेर पडायचा प्रयत्न स्वसामर्थ्याने आस्तिक करतात आणि नास्तिक तेही करीत नाहीत.

"देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल?" याचा या लेखाशी/विषयाशी काही संबंध नाही. कृपया मुद्याला धरून प्रश्न विचारा.

क्रिप्ट's picture

2 Mar 2018 - 6:41 am | क्रिप्ट

"" देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा "" ---चौकटराजा, शोध हा देव आहे की नाही याचा घ्यायचा आहे....आधीच नाही असे समजून शोध घेण्याला फारसा अर्थ नाही. लेखाचा उद्देश्य ही तोच आहे.

" मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे" --- नास्तिक असूनही मस्त आयुष्य जगायचा आणि देव नसल्याचा काय संबंध? तुम्हाला असे म्हणायचे आहे की जर देव असलाच तर तुम्ही त्याला मानत नाही म्हणून त्याने तुम्हाला शिक्षा केली पाहिजे आणि तुम्ही मस्त आयुष्य जगले नाही पाहिजे? हा संबंध हास्यास्पद आहे. असे असेल तर तुम्ही यनावाला यांचा 'निरीश्वरवाद्यांना देव शिक्षा का करीत नाही" हा धागा पुन्हा वाचा. उत्तर मिळेल.
"डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? "-- पडते ना. मी नाही म्हणलेलंच नाहीये. फक्त फरक एवढाच आहे की डबक्यातून बाहेर पडायचा प्रयत्न स्वसामर्थ्याने आस्तिक करतात आणि नास्तिक तेही करीत नाहीत.

"देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल?" याचा या लेखाशी/विषयाशी काही संबंध नाही. कृपया मुद्याला धरून प्रश्न विचारा.

सस्नेह's picture

1 Mar 2018 - 11:55 am | सस्नेह

अतिशय मुद्देसूद व उत्तम लेख !
योग ज्यांनी ज्यांनी आचरणात आणला त्या स्वामी विवेकानंद, रमणमहर्षी इ. प्रभृतींना कधी ईश्वर, आस्तिक नास्तिक इ. प्रश्न पडले नाहीत. त्यांनी कधी पूजा अर्चा कर्मकांडे यावर भर दिला नाही पण ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा अट्टाहासही धरला नाही. त्यांच्या सहज सरल वर्तनातून ईश्वर स्वाभाविकरित्याच प्रकट होई.
तस्मात मिपावर लेख पाडत बसण्यापेक्षा जिज्ञासूंनी योग, उपनिषदे धुंडाळावीत हे पटले.

क्रिप्ट's picture

2 Mar 2018 - 6:48 am | क्रिप्ट

"तस्मात मिपावर लेख पाडत बसण्यापेक्षा जिज्ञासूंनी योग, उपनिषदे धुंडाळावीत हे पटले" ---- धन्यवाद स्नेहांकिता. लेखाचा मूळ उद्देश खरंतर तोच होता परंतु इतर लेखातील प्रतिक्रियेप्रमाणे याही धाग्यावरच्या प्रतिक्रिया आस्तिक आणि नास्तिक यांच्या वादात अडकल्या. असो.

मूकवाचक's picture

2 Mar 2018 - 9:09 pm | मूकवाचक

+१

मस्त.. फुल्ल टाईमपास आहेत पब्लिक.
च्यायला... इतकं रेगुलरली त्याच त्याच विषयावर लिहून वादविवाद घालायची खुमखुमी असणारे शिलेदार आहेत आपल्याकडे. अभिमान वाटला.

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 7:14 pm | सतिश गावडे

वेळ असेल तर बाहेरुन मजा न बघता आखाड्यात उतरा. अजून जास्त मजा येईल.

गामा पैलवान's picture

1 Mar 2018 - 8:12 pm | गामा पैलवान

राही,

उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या?

मूर्ती पाण्यात विरघळून तिची विल्हेवाट लावली जावी असं शास्त्र आहे. ज्यांना पाळायचं नसेल त्यांनी पाळू नये. ज्याण्य्ते पाळायची शक्ती आहे त्यांनी ते पाळलं तर काय बिघडलं?

आ.न.,
-गा.पै.

राही's picture

1 Mar 2018 - 9:15 pm | राही

सर्जन म्हणजे निर्मिती. विसर्जन म्हणजे विघटन. विघटित किंवा भग्न मूर्तीची पूजा करू नये, त्यातील प्राणतत्त्व निघून गेलेले असते. फक्त पार्थिव उरते ते पृथ्वीमध्येच मिसळून जाणे हेच योग्य आणि शास्त्रशुद्ध आहे. पूजाअर्चा करून गाजावाजाने ते पुन्हा विसर्जित करणे हे शास्त्रसंमत नाही.

गामा पैलवान's picture

1 Mar 2018 - 9:53 pm | गामा पैलवान

राही,

एकदा विसर्जित केलेली मूर्ती काही कारणाने पूर्णपणे विघटीत झाली नसेल तर तिचं पुनरपि विसर्जन करायला हरकत काय आहे?

===============================================================

श्रीदेवीच्या प्रेताचं विधिवत दहन करायची काय गरज होती. टाकून द्यायचं कुठेतरी उकिरड्यावर. काय फरक पडतो. नाहीतरी जीव गेलेलाच आहे. उरलं ते केवळ मढं! ते श्रीदेवी थोडंच आहे!

आ.न.,
-गा.पै.

राही's picture

1 Mar 2018 - 10:50 pm | राही

तुम्ही शास्त्राचा मुद्दा काढला, मी शास्त्र सांगितले. एकदा दहन केल्यावर पुन्हा दहनसंस्कार होत नाहीत. एकदा विसर्जन केल्यावर पुन्हा संस्कारपूर्वक विसर्जन होत नाही. तुम्हालाच शास्त्र हवे होते, तर आता "काय हरकत" असे विचारून स्वतःलाच खोडून काढत आहात.
पार्थिव मूर्ती ही विसर्जनानंतर 'मूर्ती' उरत नाही. तिच्यावर मूर्तीचे सोपस्कार केले जात नाहीत. ती केवळ मृत्तिका असते.
शिवाय, मूर्तीचे विसर्जन केल्यावर तिथलीच चिमूटभर माती घरी आणण्याची प्रथा आहे. ती त्या मूर्तीचाच अंश असे समजायचे असते कारण विसर्जनानंतर माती मातीशी एकरूप होते. सिंधुबिंदु न्यायाने. मूर्तीच्या मातीचे वेगळे अस्तित्व उरत नाही. असो.

बिटाकाका's picture

1 Mar 2018 - 11:10 pm | बिटाकाका

शास्त्राचं म्हणाल तर, एकदा विसर्जित केलेली मूर्ती अशा भग्न स्वरूपात पाण्याच्या स्रोताबाहेर येणे शास्त्राला अपेक्षित आहे काय? सध्य परिस्थितीतील उपलब्ध स्रोतांमध्ये हे घडताना दिसत आहे म्हणून अशा भग्न मूर्तींचे परत विसर्जन करणे चुकीचे कसे काय?
---------------------------------------
सद्य परिस्थितीत शास्त्रानुसार विसर्जन करणे शक्य नसल्याने घरच्या घरी विसर्जन करणे मी प्रशस्त मानतो, हे अवांतर!

राही's picture

2 Mar 2018 - 8:18 am | राही

उत्तम कृति. खरे तर मातीच्या मूर्तीवर उत्तरपूजेच्या मंत्राक्षता पडल्या की पुढे विधी असे काही नसतातच. मूर्तीला जरासे हलवून स्थानभ्रष्ट किंवा विस्थापित केल्यावर ती केवळ माती उरते. मग त्याचे काहीही झाले तरी दोष किंवा अपशकुन नसतो. त्यामुळे मूर्तीची विटंबना, भावना दुखवणे हे मुद्दे उद्भवूच नयेत आणि कोणी त्यास खतपाणीही घालू नये. प्रतिष्ठापनेच्या आधी काही झाले तरी घाबरून जाण्यासारखे काही नाही. छोटीशी नवी मूर्ती बनवावी किंवा आणावी आणि प्राणप्रतिष्ठापना करावी.
हे सर्व अर्थात शास्त्र वगैरे मानणाऱ्यासाठी. जो मानतच नाही त्याला काहीच दोष लागू नये.

राही's picture

2 Mar 2018 - 10:28 am | राही

अपेक्षितच नव्हे तर नैसर्गिकही आहे. समुद्रात फेकलेल्या वस्तूंपैकी अनेक वस्तू , पोकळ आणि हलक्या तर सर्वच वस्तू किनाऱ्यावर येत असतात. प्लास्टिकच्या पिशवीतून फेकलेले निर्माल्य हमखास किनाऱ्यावर येते आणि कचऱ्याने किनारे भरून जातात. आम्ही जुहू चौपाटीवर कधीकधी चालायला जातो तेव्हा गणपतिउत्सवाच्या तिसऱ्या दिवसापासून अशा मूर्ती किनाऱ्यावर दिसतात. पूर्वी लोक त्या टाळून पुढे जात असत. आता काही लोक पावलोपावली नमस्कार करत जातात आणि ' किती ही विटंबना!' असा भाव चेहेऱ्यावर आणून भावना दुखवून घेतात.
शाडू माती चिकट असते आणि विहिरी, तलावांमध्ये तळाला चिकटून बसून तळाच्या नैसर्गिक झऱ्यांचे स्रोतमुख बंद करते. त्यामुळे तीही बंदिस्त जलस्रोतांना हानिकारकच आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत अनेक नद्या खळखळून वाहत्या राहात नाहीत आणि मूर्ती वाहून जाव्यात म्हणून वरच्या बाजूच्या धरणातून नदीपात्रात थोडे थोडे पाणी सोडत राहावे लागते.

बिटाकाका's picture

2 Mar 2018 - 10:48 am | बिटाकाका

तुम्ही लिहिले आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत.
*************************
शास्त्र वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे सांगते, इथे नदी अभिप्रेत असावी. शिवाय शाडूची माती म्हणजे नदी, तलावाकाठी सापडणारी माती, त्यामुळे या मातीने पाण्याच्या स्रोताला अडचण आहे हे पटत नाही. पीओपी वगैरे पर्याय घातक आहेत हे खरे.
************************
शास्त्रानुसार, गणपती हा साध्या मातीचा असावा आणि विसर्जन वाहत्या पाण्यात करावे असे आहे (यात काही चूक असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा). हे सध्य परिस्थितीत सहज शक्य नाही म्हणून माती आणून घरी जसा जमेल तसा गणपती बनवणे आणि घरच्या घरी विसर्जन करणे हा पर्याय उत्तम.
************************
संत एकनाथ म्हणाले तसे भाव तोचि देव, ये अर्थी संदेह धरू नका हे आचरणात आणणे काळाची गरज आहे.

अभिजीत अवलिया's picture

2 Mar 2018 - 11:49 am | अभिजीत अवलिया

शास्त्र वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे सांगते, इथे नदी अभिप्रेत असावी.

हाच तर फरक आहे शास्र आणि विज्ञानात.
विज्ञान आपले जुने निष्कर्ष बदलण्यास तयार असते.पण शास्र?

ज्या काळी शास्रे लिहीली गेली तेव्हा इथली लोकसंख्या कितीशी असेल? त्यामुळे तेव्हा ते ठीक होते. पण आज १३० कोटी लोकसंख्या झाल्यावर हजारो वर्षापूर्वी लिहीलेल्या शास्राप्रमाणे सगळ्यांनी नदीत / तलावात विसर्जन केले तर ते नुकसानकारक होणार नाही का? मग शास्र सुध्दा काळानुरुप बदलले पाहीजे का नको?

बिटाकाका's picture

2 Mar 2018 - 12:59 pm | बिटाकाका

दोन मुद्दे -
************************
शास्त्र बदलण्यास तयार नसते हे कशाच्या आधारावर? शास्त्राने बदलायचे म्हणजे काय करायचं? विज्ञान बदलतं म्हणजे काय करतं?
************************
नुकसान होणारच, यात कोणाचं काही म्हणणं आहे का? पण काय आहे ना, हे जे नुकसान आहे ना ते रोज नदी नाले समुद्राचे नुकसान जे इतर कारणांनी होते होते ना त्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. म्हणून मग असली पर्यावरणाची कारणे लोकांना पटत नाहीत. उलट हे सगळे त्यांना त्यांच्या धर्मापासून, संस्कृतीपासून दूर करण्यासाठी आहे ही त्यांची समजूत पक्की होते. त्यापेक्षा, शास्त्राने सांगितलेले करणे सध्य परिस्थितीत कसे शक्य नाही, त्यामुळे शास्त्राने संगीतलेले अर्धे नुर्धे करण्यापेक्षा भाव तोचि देव मानून नवीन मार्गाने करणे कसे योग्य आहे हे पटवणे गरजेचे आहे.
***********************
याशिवाय, माझा शास्त्रांचा दांडगा वगैरे अभ्यास नाही, पण शस्त्राने प्रत्येक गोष्टींना पर्याय सांगितलेला आहे. त्याने शास्त्र कसे बदलत नाही आणि विज्ञान कसे बदलते वगैरे म्हणणे अजिबात योग्य नाही.

अभिजीत अवलिया's picture

2 Mar 2018 - 10:21 pm | अभिजीत अवलिया

शास्त्र बदलण्यास तयार नसते हे कशाच्या आधारावर? शास्त्राने बदलायचे म्हणजे काय करायचं? विज्ञान बदलतं म्हणजे काय करतं?

उदाहरण द्यायचे झाल्यास - प्लूटो चा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याला सूर्याचा नववा ग्रह अशी मान्यता मिळाली. पण नंतर जे वेगवेगळे संशोधन केले गेले त्याद्वारे निष्कर्ष काढून त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला.
aethar मधून प्रकाश पास होतो असे पूर्वी समजले जात होते. पण १८८७ साली मिचेलसन आणि मोर्ले ह्या शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे aether ही केवळ एक कल्पना असल्याचे सिद्ध केले आणि aether थेअरी मागे पडून थेअरी ऑफ relativity सिद्ध झाली.

शास्त्रात ते लिहिल्यापासून आतापर्यंत जी हजारो वर्ष गेलीत त्यात कोणते सद्य परिस्थितीला अनुरूप बदल केले गेलेत ?

नुकसान होणारच, यात कोणाचं काही म्हणणं आहे का? पण काय आहे ना, हे जे नुकसान आहे ना ते रोज नदी नाले समुद्राचे नुकसान जे इतर कारणांनी होते होते ना त्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. म्हणून मग असली पर्यावरणाची कारणे लोकांना पटत नाहीत. उलट हे सगळे त्यांना त्यांच्या धर्मापासून, संस्कृतीपासून दूर करण्यासाठी आहे ही त्यांची समजूत पक्की होते. त्यापेक्षा, शास्त्राने सांगितलेले करणे सध्य परिस्थितीत कसे शक्य नाही, त्यामुळे शास्त्राने संगीतलेले अर्धे नुर्धे करण्यापेक्षा भाव तोचि देव मानून नवीन मार्गाने करणे कसे योग्य आहे हे पटवणे गरजेचे आहे.

मान्य. पण हा नवीन मार्ग लोक कसे स्वीकारतील ? ते ज्या शास्त्रांना रेफरन्स मानतात त्यात वर्षानुवर्षे काही बदल झाला आहे का? म्हणजे शास्त्र जेव्हा लिहिले गेले असेल तेव्हा गणपती मूर्ती वाहत्या पाण्यात उदा. नदीत विसर्जित करावी असे लिहिले असेल. पण आजच्या काळात हे असे करणे योग्य नाही. मग शास्त्रात ह्याबाबत बदल कधी केला जाईल?

शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा करावयाच्या मूर्तीची उंची ६ इंचापेक्षा जास्त नसावी. हा नियम पाळला तर अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

राही's picture

2 Mar 2018 - 4:35 pm | राही

अगदी हेच.

राही's picture

2 Mar 2018 - 4:34 pm | राही

प्रत्येक गावाला नदीकिनारा असतो का? विहिरींतल्या, तलावातल्या पाण्यात विसर्जन होते. अगदी मुंबईला इतके किनारे असतानासुद्धा पूर्वापार अनेक तलाव गणेशविसर्जन तलाव म्हणून प्रसिद्ध होते.
विहिरींचे-तलावांचे झरे चिकट शाडूने बुजू शकतात. या विषयी आपण अधिक माहिती मिळवावी.
एकदा यथाविधी स्थानावरून हलवलेली (पाण्यात शिळवलेली(शांत केलेली)/बोळवलेली/पोचवलेली ही नंतरची गोष्ट) मूर्ती ही मृत्तिका म्हणूनच उरते. तिला मातीप्रमाणेच वागवावे. पुन्हा साग्रसंगीत बोळवण करू नये. तसे शास्त्रही नाही आणि परंपराही नाही. आणि ते निसर्गाला धरूनच आहे. आता, आपण शास्त्र जपतो आहोत, परंपरा जपतो आहोत, की शास्त्र-परंपरा तोडतो आहोत आणि शास्त्राला बाजूला ठेवून नव्या चांगल्या, समाजहिताच्या परंपरा निर्माण करतो आहोत हे एकदा लोकांनी मनाशी निश्चित करावे. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन दिसणार नाही.

बिटाकाका's picture

2 Mar 2018 - 6:52 pm | बिटाकाका

तुम्ही दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत आहात.
१. शास्त्र हे वाहत्या पाण्यातच सांगते. पूर्वापार म्हणजे कधी? माझ्या महितीतनुसार, आधी गावे ही फक्त नदीच्या काठीच असत. आणि आधी मूर्ती ह्या साध्या मातीच्या असत त्यामुळे त्या बाहेर येऊन भग्न अवस्थेत पडण्याचे कारण नव्हते. आता त्या बाहेर येऊन पडतात (कोणत्याही कारणामुळे) आणि तशा भग्न मूर्तींना परत सन्मानाने पाण्यात सोडले तर अडचण काय? याला तुम्ही परत विसर्जन/बोळवण का म्हणत आहात कळत नाहीये.
२.आजकालच्या गणेश विसर्जनाने पाण्याचे नुकसान होते हे मान्यच पण शाडूची पण नुकसान होते हा दावा आपण का करत आहात ते कळले नाही. शाडूने पाण्याचे नुकसान होते याबद्दल आपल्याला जास्त माहिती असेल तर आपण ती इथे द्यावी.

अभिजीत अवलिया's picture

1 Mar 2018 - 11:10 pm | अभिजीत अवलिया

कोणे एके काळी मी प्रचंड धार्मिक वृत्तीचा होतो. पण तुमच्या लेखाचे शीर्षक आहे त्याप्रमाणे स्वतःच पडताळून बघितले आणि नास्तिकतेकडे वळलो. आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की आपण एके काळी आस्तिक होतो ते स्वतःला काही देवाचा अनुभव आला म्हणून नाही. तर ह्याचे मुख्य कारण होते आई वडील (जे थोडेफार देव देव करत असत/करतात) आणि वारकरी मामा व आजी. म्हणजे आस्तिकता मी बाय डिफॉल्ट स्वीकारली होती. कारण आपण स्वतः कधी विचारच केला नाही. जोडीला टी.व्ही. वर धार्मिक मालिकांचा रतीब असे २०-२५ वर्षांपूर्वी तरी.

जस जसे वय वाढत गेले तसे स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती निर्माण झाली. देवस्थानी जाताना किंवा तिथून परत येताना अपघात होऊन होणारे मृत्यू, देवस्थानी चेंगराचेंगरी होऊन जीव जाणारी माणसे, प्रसादातून होणारी विषबाधा हे पाहून, ऐकून, वाचून माझे मत बनले की देव असा काही अस्तित्वात नसावा. नाहीतर आपल्याच भेटीला येणाऱ्या भक्तांच्या जीवाचे त्याने रक्षण केलेच असते. (जर अपघात टाळायचा असेल तर आपण गाडी योग्य कंडिशन मध्ये ठेवणे, सर्व नियम पाळून चालवणे गरजेचे आहे. गाडीत देवाची मूर्ती ठेऊन कशीही गाडी दामटली तर अपघात हा होणारच ही वस्तुस्थिती आहे.)
गावोगावच्या वार्षिक यात्रेला बळी दिले जाणारी कोंबडी, बोकड बघून मग प्रश्न पडू लागला जर सर्व प्राणी मात्र देवाची लेकरे आहेत असे मानले तर ह्या आपल्या लेकरांचे आपल्याच नैवेद्यासाठी केले जाणारे शिरकाण देव का थांबवत नाही?
मंदिरातल्या दान पेट्या लांबवल्या जातात, कधी कधी तर प्रत्यक्ष देव मूर्तीच लांबवली जाते. मग जो देव स्वतःचेच रक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याचे काय करणार?

ह्या सर्व घटनांनी मला देव ही संकल्पना फोल वाटू लागली. आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. जर कुणाला देव मानायचा असेल तर त्यांनी तो मानावा. माझ्यावर देव मानण्याची जबरदस्ती करू नये आणि रस्त्यावर उत्सव साजरे करून त्रास देऊ नये ही अपेक्षा आहे.

अवांतर -
कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे हे जनतेला समजले पाहिजे असे मनापासून वाटते.
जवळपास १० वर्षांपूर्वी मी गडहिंग्लज तालुक्यातल्या एका खेडेगावात यात्रेला गेलो होतो. तिथल्या मंदिराचा गावकर्यांनी काढलेली वर्गणी आणि गडहिंग्लजचे तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर ह्यांनी दिलेली देणगी असे जवळपास एक कोटी रु. खर्चून जीर्णोद्धार करण्यात आला होता. गावात जायला धड रस्ता नाही, तुंबलेले सांडपाणी, प्रचंड धूळ, घाण आणि त्याच घाणीतून झोपत लोळण घेत मंदिरापर्यंत जाणारे भाविक हे पाहून फारच वाईट वाटले.
मंदिरापेक्षा रस्त्यावर, गटारावर हा खर्च झाला असता तर जास्त योग्य झाले असते. लोकांचे जीवनमान सुधारले असते. पण .... असोच.

झेन's picture

3 Mar 2018 - 4:07 pm | झेन

देवाबद्दल - निष्कर्षापर्यंत पोचलो नाही.

विज्ञान - आजही मोठ्या शहरात सुध्दा अनेक लोकांचे आजारी असताना नेमके नीदान होत नाही, सुपारीचे खांडसुध्दा न खाणा-या व्यक्तीला घशाचा/जिभेच्या मागील बाजूचा कँन्सर झालेला बघितला आहे, अनेक डॉक्टर शारिरीक व्याधीनी कमी वयात जीव गमावतात, म्हणून विज्ञान नाही असे मानू शकत नाही तसेच देव आपल्या कल्पनेप्रमाणे नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असे म्हणणे चूकीचे असू शकते.

राही's picture

2 Mar 2018 - 8:05 am | राही

सुमारे आठ दहा वर्षांपासून ग्रामीण भागात भजनकीर्तनपारायण करण्याची लाट उसळली होती. लाखोकरोडो रुपये वर्गणी गोळा केली जाऊन धूमधडाक्याने घडवण्यात राजकीय पक्षही अहम् अहमिकेने सामील होत होते. अजूनही तेच चालू आहे. महादुष्काळाची तीन वर्षेसुद्धा अपवाद नव्हती. बाकी उकिरडे,धूळ,रस्ते पाणी, वीज, आरोग्यसेवा हे सर्व तसेच.
देवळांच्या जीर्णोद्धाराविषयी लिहायचे तर जुने सुंदर घडीव पाषाणाचे मंदिर, कमानी पाडून त्या ऐवजी बटबटीत बाथरूम टाइल्स आणि सीमेंटचा भरमसाट वापर यामुळे विद्रूपीकरण होत आहे. सुशोभितीकरणाच्या नावाखाली.

बिटाकाका's picture

2 Mar 2018 - 7:09 pm | बिटाकाका

याबद्दलही आपल्याकडे काय आकडेवारी असेल ती द्यावी.
***************************
सार्वजनिक वर्गणी/पैशाचा मुद्दा गैरलागू आहे असे मला वाटतं. शहरातही अनेक अडचणी तशाच पडून असताना बरीच सुशोभिकरणे होतात, लोक बऱ्याच वायफळ गोष्टींसाठी वर्गण्या जमा करतात, त्यामुळे त्याचा भजन/कीर्तन, मंदिर वगैरेशी संबंध अतार्किक आहे असे मला वाटते.

राही's picture

2 Mar 2018 - 8:13 pm | राही

कीर्तन भजनसप्त्यांसाठी खूप मोठ्या वर्गण्या गोळा होतात आणि मोठमोठे खर्च केले जातात यात अतार्किक काय?असे होते हे तर्क करण्यापलीकडचे आहे काय? इतर कामांसाठी लोकांकडून तेव्हढा उत्साह दाखवला जात नाही हे विधान तर्क करण्यापलीकडचे किंवा तर्कशून्य किवा तर्करहित किंवा तर्क नसलेले कसे?
महानगरांतून धार्मिक कारणासाठी अथवा सुशोभितीकरणासाठी अथवा पेव्हर ब्लॉक्स बदलण्यासाठी सरकारकडून अवाढव्य खर्च होत असेल तर जागरुक जनता जाब मागू शकते, मागते. धनाढ्यांचे लग्नादि जंगी खाजगी कार्यक्रम, संस्थांचे महायज्नादि खर्चिक सोहोळे चर्चेचा आणि टीकेचा विषय होतात. क्वचित कर आयुक्तांची वक्रदृष्टीही वळते. या सर्वांना उत्तरदायित्व असते.
पाणीसाठ्यानजिकची वसती ते तीर्थ ( जिथे पाण्यावरून तरून जावे लागते) आणि दूर सपाटीवर वसलेले ते क्षेत्र (अर्थात शेतीची जागा) अशी देवस्थानांचीसुद्धा विभागणी आहे. जर महाराष्ट्रात गणपति उत्सव (पूजन नव्हे) कोंकणातून देशावर आला असेल, (आणि असे अनेकांचे मत आहे,) तर तिथे विपुल समुद्रकिनारे आहेत आणि समुद्रात सोडलेल्या वस्तू पुन्हा पुन्हा मागे येऊन शेवटी विलीन होण्याची प्रक्रियाही अनादि काळापासून आहे. (उत्सव अनादि काळापासून नाही) हे सर्व अगदी नैसर्गिक आहे. एकदा उत्सवाने पाण्यात सोडल्यावर पुन्हापुन्हा उत्सवप्रियतेने पाण्यात सोडण्याचे काय प्रयोजन? इथे शास्त्र नाही, परंपरा नाही. केवळ मनमानी आणि त्रासदायक उत्सवप्रियता.

बिटाकाका's picture

2 Mar 2018 - 8:36 pm | बिटाकाका

शहरातल्या उत्तरदायित्व असलेल्या (म्हणजे सरकारी पैशातून झालेल्या) सुशोभीकरणांचा मुद्दा नाहीये, वर्गणी करून केल्या जाणाऱ्या गोष्टींचा मुद्दा आहे. तुम्ही प्रधान्याचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्याचा मंदिर, भजन, कीर्तन वगैरेशी काही संबंध नाही. गाव असो वा शहर, वर्गणी कशासाठी जमवायची आणि त्याचे काय करायचे हा त्या वर्गणी जमवणाऱ्यांचा प्रश्न आहे. सरकारी जबाबदाऱ्या असणाऱ्या गोष्टी ह्या वैयक्तिक वर्गाण्या जमवून कराव्यात असे आपले म्हणणे आहे काय?
*********************************
भग्न मूर्ती बाहेर आल्यानंतर त्या परत पाण्यात सोडण्यात कसली आलीय उत्सवप्रियता? तुमचा नेमका मुद्दा काय आहे? त्या बाहेर आलेल्या भग्न मूर्तींचे नेमके काय करावे असे आपले म्हणणे आहे? ती गणपतीची मूर्ती आहे हे विसरून तो फक्त मातीचा गोळा आहे म्हणून त्याला कचरा समजावं? त्याने काय होणार? आणि त्याला गणपतीची मूर्तीच समजल्याने नेमका त्रास काय?

राही's picture

2 Mar 2018 - 10:31 pm | राही

अंतिम संस्कार झाल्यावर, पुनरागमनायच असे म्हटल्यावर मूर्ती ही मातीचा गोळाच उरते. एकदा ढोल ताशे, डीजे गुलाल पुष्पवृष्टीसकट मिरवणुकीने पाण्यात सोडल्यानंतर लाटांबरोबर किनाऱ्यावर आलेले अवयव गोळा करून रीसाय्क्लिंगसाठी वापरावे अथवा साधेपणाने पाण्यात सोडावे. (तरीही काही दिवस ते मागे येतच राहातात हे वेगळे). पुन्हा पूजा आरत्या, मिरवणुका ढोल ताशे नकोतच.
कोणताही उपक्रम फार मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड आर्थिक उलाढालीनिशी घडत असेल तर त्याची योग्य ती दखल त्या त्या पातळीवरील अर्थतज्ज्न, नियोजनतज्ज्न, माध्यमे यांनी घेतली पाहिजे. समाजाच्या व्यापक हितासाठी प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. पैशाचा आयव्यय तपासला गेला पाहिजे. बॅंकेच्या कर्जाचा हप्ता चुकवून किंवा असे काही आवश्यक आणि उपयोगी व्यय टाळून पैसा इतर कामासाठी खर्च होत असेल तर प्राधान्यक्रमाच्या प्रबोधनाची गरज आहे असे म्हणावे लागेल.
यावर पुरेसे स्पष्टीकरण देऊन झाले आहे. तेच तेच पुन्हा लिहिण्यात स्वारस्य नाही. तेव्हा या विषयावरचे लेखन इथे थांबवीत आहे. शुभेच्छा. सुप्राक्तन.

बिटाकाका's picture

3 Mar 2018 - 6:30 pm | बिटाकाका

तुम्ही पुनर्विसर्जनाचा आणि त्याच्या उत्सवाचा (अगदी ढोल वगैरे बडवून) मुद्दा पुन्हा पुन्हा मांडताय. हे पचनी पडत नाहीये. कृपया हा उत्सव कुठे आणि कसा साजरा केला जातो याचे काही संदर्भ द्याल का अभ्यास वाढवण्यासाठी?
*****************************
प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यावर मीही धन्यवाद, करण मुद्दाच काही समजला नाही.

संदीप-लेले's picture

2 Mar 2018 - 9:47 pm | संदीप-लेले

" देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा ..." ........... अगदी योग्य !

"अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा." .... देव असेल अथवा नसेल ... जे काय सत्य आहे ते कोणत्याही मार्गाने शोधले तरी मिळेलच. त्यामुळे पडताळा घेण्यासाठी तुम्ही सांगता ती एकमेव पद्धत वापरायचा हट्ट योग्य नाही. ज्याला जी पद्धत योग्य वाटेल ती वापरण्याची मुभा असायला हवी.

विज्ञानातून याचे उत्तर मिळण्याची शक्यता [सध्या तरी मला दिसत] नाही. पण विज्ञानाची प्रगती अफाट आहे आणि त्यातून नवीन निरीक्षणे मिळून कदाचित उत्तर मिळेलही.
विज्ञान आधी पडताळा देते आणि मग तो सिद्धांत मानला जातो. एखाद्या सिधान्तामागील विज्ञान कितीही क्लिष्ट असले तरी विज्ञान हा पडताळा सामन्यातील सामन्याला सुद्धा देते. मग तो माणूस बुद्धिवादी असो की सश्रद्ध किंवा अतिअंधश्रद्ध.
मानवाच्या आकलनशक्तीतील मर्यादांमुळे सिद्धांत ठरवताना [घोड] चुका होतातही. पण चूक झाली हे विज्ञान मान्य करते.

अध्यात्मात ह्या प्रांजळपणाला वावच नाही. जे सांगितले आहे ते बरोबरच आहे, त्याशिवाय दुसरे काही सत्यच नाही, हा पवित्रा त्यात आहे.
अध्यात्माने उत्तरे दिली आहेत. पण पुनः त्याचा पडताळा घेण्याचा प्रश्न उरतोच. आणि तो मिळालाच, तरी त्याची अनुभूती प्रत्येकाला नाही आणि सारखीही नाही. समस्या अशी आहे की माणूस सश्रद्ध असेल, तर पडताळा मिळतोच मिळतो ! पण अध्यात्माची तर्कसंगती लावायला गेल्यास श्रद्धा बाजूला ठेवायला लागते. [वर म्हणल्याप्रमाणे कोणता मार्ग निवडायचा याची मुभा असायलाच हवी.] आणि श्रद्धा बाजूला ठेवली तर पडताळा नाही हे ही ठरलेले ! याचा अर्थ अध्यात्मात पडताळा मिळणार की नाही हे तो पडताळा घेण्याच्या पद्धतीवर पुर्णपणे अवलंबून आहे. म्हणजेच तो पडताळा आणि म्हणुन त्यातले सत्य [सध्यातरी] सापेक्ष आहे. विज्ञानातील पडताळ्याप्रमाणे निरपेक्ष नाही.

मला वाटते प्रत्येक माणसाचा या बाबतीत काही एक कल असतो. हा कल अध्यात्मिक किंवा बुद्धिवादी अशा एकाच टोकाला झुकलेला असेल तर त्याला दुसरी बाजू पटणे अशक्यप्राय. एखादा मध्याजवळ असेल तर agnostic किंवा आधी सश्रद्ध नंतर नास्तिक [किंवा त्या उलट] असे होण्याची शक्यता. पण कोणत्याही एका वेळी, प्रत्येकाची एक भूमिका असते आणि ती प्रचंड ठाम असते.

तस्मात ... यावर वाद घालू नये हेच उत्तम !

[लोकसत्ता मध्ये सध्या एक लेखमाला सुरु आहे. परंपरा आणि नवता. ज्यांनी वाचली नसेल त्यांनी जरूर वाचावी. https://www.loksatta.com/chaturang-category/parampara-ani-navata/]

गामा पैलवान's picture

2 Mar 2018 - 11:14 pm | गामा पैलवान

फुत्कार,

अध्यात्मात ह्या प्रांजळपणाला वावच नाही. जे सांगितले आहे ते बरोबरच आहे, त्याशिवाय दुसरे काही सत्यच नाही, हा पवित्रा त्यात आहे.

हे साफ चूक आहे. उलट अध्यात्मात स्वत:शी प्रामाणिक राहावंच लागतं. जे काही सांगितलंय (महावाक्य वगैरे) त्याची अनुभूती घ्यायची असते. एका महावाक्याची अनुभूती आली तरी ती पुरेशी आहे. ज्ञानेश्वरीतली एकतरी ओवी अनुभवावी. सगळ्यांच्या मागे धावायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

arunjoshi123's picture

3 Mar 2018 - 9:02 pm | arunjoshi123

Anubhuti

या व्हिडिओत भारतीय शिक्षणसंस्थेच्या संदर्भात लेखातील अनुभूती या शब्दाचा उल्लेख आहे.

arunjoshi123's picture

3 Mar 2018 - 9:03 pm | arunjoshi123
rain6100's picture

30 Sep 2018 - 7:09 pm | rain6100

देव आहेत ..नक्किच . श्रधा असेल तर नक्कि अनुभव येइल

मना सज्जना भक्ति पन्थेचि जावे|
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे|
जनी निन्ध्य ते सर्व सोडूनी ध्यावे |
जनी वंध्य ते सर्व भावे वदावे ||
या मनाच्या श्लोकातील दुसऱ्याच श्लोकात समर्थांनी सर्व (देव आहे की नाही इत्यादी) प्रश्नांचे उत्तर दिले आहे. देव मूर्तीत अथवा पोथ्यात नसतो. जेंव्हा मनुष्य एखाद्या देवाच्या भक्तीत रममाण होतो, म्हणजेच त्याच्या मनात व विचारात - पर्यायाने कृतीत तो दिसतो. (तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे).
मनुष्याच्या मनी श्रीहरी वसतो म्हणजे - तो त्याच्या कृतीतून (भौतिक) ते सिद्ध करतो व जनी निन्ध्य ते सर्व सोडून देतो (अहंकार, क्रोध,लोभ,काम, असत्य ) व तो कृतीतून प्रेम,सेवा,निर्लोभ,निरहंकार, सत्य यांचा अंगीकार करतो.

महात्मा गांधींनी नेहमी (अगदी मरतानाही) रामनामाचा अंगीकार केला व रामाप्रमाणेच त्यांनी सत्य, अहिंसा,निर्लोभ प्रेम,स्वच्छता,हे कृतीतून दाखविले. म्हणून आज आपण दररोज त्यांना पाहतोय (किमान नोटेवरती) याला खरी भक्ती म्हणावे.
"देह त्यागील्या"वरही त्यांची कीर्ती मागे उरली आहे. हीच त्यांनी आयुष्यभर "क्रिया"केली आहे.
श्रद्धा मनात असून चालत नाही. ती कृतीत आणावी. देव आपणाला दिसणार नाही, तर आपणच देवमय होऊत.

या उताऱ्यावर "नीच बोलणे" जरी मिळाले तरी ते "सोशीत" जाण्याएवढे "श्रेष्ठ धारीष्ट्य" जीवी ठेऊ या.