गेली १९ वर्षे सातत्याने क्रिकेटचे नवनवे विक्रम करणारा , क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर घमेंडी आणि खोटारडा आहे , असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? मुळात कोणी असं बोलेल तरी का त्याच्याबद्दल ? तर हो , सचिन घमेंडी आणि खोटारडा असल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि हा आरोप करणाराही कोणी भलता सलता नाहीये. हा महानुभव आहे सचिन विरुद्ध अनेक सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर अॅडम ग्रिलक्रिस्ट.
गिलख्रिस्टच्या आत्मचरित्रात त्याने सचिनविषय़ी लिहिताना तो खोटारडा असल्याचे म्हटले आहे. या सांगण्याला संदर्भ आहे तो मागच्या दौ-यात झालेल्या हरभजन आणि सायमंडसच्या वादाचा. गिलक्रिस्टच्या मते , अँड्र्यू सायमंडस आणि भज्जी यांच्यात झालेल्या भांडणात भज्जी दोषी होता. मात्र , सचिनने खोटी साक्ष दिली. तो पहिल्यांदा खरे बोलत होता , मात्र नंतर त्याने विधाने बदलली आणि तो खोटं बोलला. इतकेच लिहून गिलक्रिस्ट थांबला नाही. त्याच्या मते , सचिन फक्त खोटारडा नाही तर घमेंडीही आहे. याबाबत आपल्या आत्मचरित्रात गिलक्रिस्ट म्हणतो की , टीम हरल्यानंतर सचिन कधी विरोधी टीमशी हातमिळवणीही करत नाही.
गिलक्रिस्टच्या या मुक्ताफळांबाबत सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. त्याच्या या लिखाणाबाबात बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ल यांनीही तीव्र नाराजी दर्शवली आहे. सचिनसारख्या मोठ्या खेळाडूवर असे आरोप करण्यापूर्वी त्याने विचार करायला हवा होता , असा आक्षेप त्यांनी घेतला आहे.
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 10:41 am | धोंडोपंत
जाहीर निषेध.
गिलक्रिस्ट असा मनोरूग्ण असेल असे वाटले नव्हते.
धोंडोपंत
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
24 Oct 2008 - 11:07 am | सुक्या
कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे हत्ती आपली चाल बदलत नाही .. आनी कुत्र्यांकडे लक्षही देत नाही अशी एक म्हण आहे. . . . भुंकु द्या. . .
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
24 Oct 2008 - 11:54 am | अनामिका
धोंडोपंत आणि सुक्या यांच्याशी पुर्णपणे सहमत
आपल्या पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी हा सगळा घाट दुसरे काही नाही.
सचिनवर निस्सिम प्रेम असणार्या प्रत्येक भारतियानी हे पुस्तक विकत घेता कामा नये.मला तर फुकट दिले तरी नको.
गिली आयपीएल साठी येइलच भारतात तेंव्हा त्याचे स्वागत खेटरांची माळ गळ्यात घालुन करायचे..प्रश्न मिटला.उगिच हिंसक होण्यात काही अर्थ नाही .
गिली इतक्या हलक्या मनोवृत्तिचा असेल अस वाटल नव्हत बुवा.........................चमकत ते सगळच सोन नसत म्हणतात त्यात काही चुक नाही.
निस्सिम सचिन प्रेमी"
"अनामिका"
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
24 Oct 2008 - 12:02 pm | अनिल हटेला
गीली चा हा पब्लीसीटी स्टंट आहे, ह्यात वाद नाय !!
सचिन वर टीका करणे ,म्हणजे आत्मचरीत्राचा खप वाढणार हा ढोबळ अंदाज...
असो ....
काल ची टेस्ट जिंकली तेव्हाच एक बातमी आली की
ईनो चा खप ऑस्ट्रेलीयात सुद्धा वाढलाये म्हणे...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Oct 2008 - 1:10 pm | नितिन नवले
या गाढवाला काय माहित सचिन कोण आहे ते.स्वतः धुवायची अक्कल नाही आणि चालला पुस्तक लिहायला.तु चुकुन किपर झालास ,गोल॑दाज असता ना मग कळाले असते सचिन काय आहे ते.काळतोन्ड्या ईकडे भारतात ये मग तुला दाखवतो .
24 Oct 2008 - 3:08 pm | जैनाचं कार्ट (not verified)
गिल्ली ने सचीन ची माफी मागीतली आहे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
24 Oct 2008 - 3:59 pm | घाशीराम कोतवाल १.२
पण आता गिलि ला माफि नाहि मी तर स्टेडिअम वर बनर लावनार गिलि हाय हाय म्हनुन
येउ दे त्याला आय पि एल खेळायला
मी आता तसा कोतवाल नाही बरं?