ताज्या घडामोडी - भाग २३

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
19 Feb 2018 - 2:59 pm
गाभा: 

'जिओ' मुळे अजून एक दूरभाष कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याआधी टाटा टेलिकॉम व रिलायन्स कम्युनिकेशन्स (अनिल अंबानी) या दोन कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आता एअरसेल ही कंपनी दिवाळखोरीसाठी अर्ज करीत आहे. एअरसेलने संचालक मंडळ बरखास्त करत दिवाळखोर जाहीर करावे यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका कंपनीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत.

https://www.loksatta.com/arthasatta-news/telecom-company-aircel-national...

प्रतिक्रिया

बिटाकाका's picture

23 Feb 2018 - 9:00 pm | बिटाकाका

गल्लत होतेय मालक आपली. आम्ही हे देतो आम्हाला मत द्या आणि आम्ही मत देतो आम्हाला हे द्या या दोन गोष्टी एकच आहेत का?

manguu@mail.com's picture

23 Feb 2018 - 11:09 pm | manguu@mail.com

पगारवाढ द्या , मत देतो.

मंदिर बांधा , मत देतो.

मंदिर बांधा , हे पब्लिक डिमांडही होते ना ?
( आणि भाजपाच्या जाहिरनाम्यातही होते. पण आता ते येउनजाउन असते म्हणे. सध्याच्या २०१४ च्या जाहिरनाम्यात होते का ? )

बिटाकाका's picture

23 Feb 2018 - 11:28 pm | बिटाकाका

असो, ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर!
********************
बाकी काय म्हणता?

खरोखर अंगणवाडी सेविका खुप मनापासून त्यांचे काम करतात. ग्रामिण भागातील कुपोषण कमी करायचे असेल तर त्यांच्या सेवेची अतिशय आवश्यकता आहे. त्यांच्या सर्व मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार केला जावा.

नाखु's picture

23 Feb 2018 - 2:02 pm | नाखु

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः l
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः ll

उंटाच्या घरच्या लग्नात गाढवांनी शांतीपाठ म्हटला. आणी दोघेही एकमेकांची प्रशंसा करू लागले, "वा ! काय रूप आहे, वा ! काय आवाज आहे......

टिप:-नुकताच पार पडलेल्या मुलाखत नाट्य संमेलनाशी याचा संबंध नाही

मिपावरील मोजक्या लोकांच्या लेखांचा पंखा नाखु

एकच वादा ओन्ली दादा's picture

24 Feb 2018 - 4:40 pm | एकच वादा ओन्ली दादा

जे काय बोलायचं ते स्पष्ट बोलायचे. अशा ठुसक्या सोडून कोण पादला कोण पादला करत पळून जायचे नाही.

कपिलमुनी's picture

23 Feb 2018 - 2:08 pm | कपिलमुनी

We rescued nurses from Iraq. They were all Christians: PM Modi in Meghalaya

आता पर्यंत मला वाटत होते , भारतीय सरकारने भारतीयांना सोडवले .

कपिलमुनी's picture

23 Feb 2018 - 2:14 pm | कपिलमुनी

मेघालयाचा ख्रिश्चन बहुल समुदायाला आकर्षित करण्यासाठी सबसिडी, इराकमधील ख्रिश्चन नर्सेसची सुटका असे धर्माचे कार्ड खेळले जात आहे.

मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस आणि सध्या ख्रिश्चन लोकांच लांगूलचालन करणारी भाजपा यात काहीही फरक नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2018 - 2:35 pm | श्रीगुरुजी

या राजवटीत जवळपास रोज चर्चवर हल्ले होतात, या राजवटीत ख्रिश्चन असुरक्शित आहेत असे जातीय आरोप करून यांना मत देऊ नका असे जातीय आवाहन ख्रिश्चनांना आर्चबिशप करतो तेव्हा हे निराधार आरोप खोडणे आवश्यक असते.

मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस

कशावरनं म्हणता असं?
================
भाजप हिंदूंचं लांगूनचालन करते कि ख्रिश्चनांचं?

मनमोहन सिंह जी का रिकार्ड:* -

ए. राजा - जेल
कलमाडी - जेल
कनिमोझी - जेल
रामलिंगा राजू - जेल
सहाराश्री - जेल
संजय चंद्रा - जेल
विनोद गोयनका - जेल ...

नरेन्द्र मोदी जी का रिकार्ड:* -

विजय माल्या - फुर्र
ललित मोदी - फुर्र
संजय भंडारी - फुर्र
जतीन मेहता - फुर्र
छोटा मोदी - फुर्र
मेहुल भाई - फुर्र
चौकसी - फुर्र... !!

हुररर....

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2018 - 3:07 pm | श्रीगुरुजी

किती ते फुर्र! लागली असेल तर जाऊन या ना.

बिटाकाका's picture

23 Feb 2018 - 3:33 pm | बिटाकाका
यश राज's picture

23 Feb 2018 - 3:56 pm | यश राज

एकदम खतरा लेख ....

विशुमित's picture

23 Feb 2018 - 6:31 pm | विशुमित

अनिल गोटे-- बनावट स्टॅम्प प्रकरणात चार वर्ष जेलची हवा खाणारा.
विनोदी लेखन...
बीटाकाका तुमचे निपेक्षतेचे बुरखे फाटत आहेत बरका. जरा जपून.

बिटाकाका's picture

23 Feb 2018 - 9:17 pm | बिटाकाका

देअर यु आर...मी विचार करत होतो की पवारांवर टीका केल्यावर राष्ट्रवादीचं मला का सांगता म्हणणारे येतात की नाही. आले.
********************************
ते गोटे जेल मध्ये होते का कुठे होते याने त्यांनी त्या लेखात लिहिलेल्या गोष्टी खोट्या ठरतात का? ठरतील तर त्या तुम्ही मुद्देसूद पणाने खोडल्या तर!
********************************
हाहाहा, माझ्या निरपेक्षतेची चिंता करू नका. मी निरपेक्ष आहे हे सिद्ध करण्याची कुठलीही घाई किंवा गरज मला अजिबात नाही. फॉर दॅट मॅटर, तुम्ही मला एका पक्षाच्या विचारसरणीच्या दावणीला बांधलेला, भक्त, खांग्रेसी, आपटार्ड यापैकी काहीही म्हणायला मोकळे आहात.

manguu@mail.com's picture

23 Feb 2018 - 11:39 pm | manguu@mail.com

१. ललित मोदींचा पासपोर्ट काँग्रेसनेच जप्त केला होता ना ? त्या कोर्टकेसमध्ये सुषमा स्वराजांची मुलगी मोदीची एक वकिल होती.

http://indianexpress.com/article/india/india-others/sushmas-daughter-par...

२. विजय मल्ल्या राज्यसभेत कुणाच्या पाठिंब्यावर खासदार झाला ? भाजपा की काँग्रेस ? भक्ताडाना आठवते का ?

http://www.thehindu.com/news/national/karnataka/Mallya-set-to-enter-Rajy...

बिटाकाका's picture

24 Feb 2018 - 9:19 am | बिटाकाका

मग काय झालं पुढे त्या पासपोर्टच्या केसचं? पवार खोटे बोलले की नाही यावरच तर ते गोटेंनी यात्रा
पत्र लिहिले आहे. गोटे खोटे बोलत आहेत का यावरही थोडे लिहा.
************************
ते विजय मल्ल्या साहेब - २००२ मध्ये काँग्रेस आणि २०१० मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाले होते.
************************
अंधविरोधकांच्या फ्रस्ट्रेशन लेव्हलची लक्षणे -
सरकारी समर्थक/आयटीसेल - ३०%
भाजप्ये - लेवल ५०%
भक्त - ७०%
भक्ताडे - बॅटरी फुल्ल!!

एकच वादा ओन्ली दादा's picture

24 Feb 2018 - 3:49 pm | एकच वादा ओन्ली दादा

ओ काका राजाच्या पहिल्या प्रश्नच उत्तर ऐकले नाही का ?
राजकारणात सगळंच खरं सांगत बसल्यावर बाजार उठल ना.
तुमचा प्रधानसेवक बघा, खोटं बोला पण रेटून बोला मेरिट मधी आलाय.
त्या गोट्याची लायकी आहे का? पवार साहेबाना बोलायची.

मार्मिक गोडसे's picture

24 Feb 2018 - 4:11 pm | मार्मिक गोडसे

बाद नोटा मोजून झाल्या का? 'भक्ताडे' ब्रँड बॅटरी फुल्ल डिस्चार्ज.

एकच वादा ओन्ली दादा's picture

24 Feb 2018 - 4:14 pm | एकच वादा ओन्ली दादा

फेकाडे म्हणा. लाजा वाटल्या पाहिजेत अशा सरकारला.

बिटाकाका's picture

24 Feb 2018 - 5:28 pm | बिटाकाका

चान चान!

पुंबा's picture

23 Feb 2018 - 3:09 pm | पुंबा

http://www.livemint.com/Industry/1iuLUAhTgt0FgVnouESRBI/Currency-in-circ...

ह्याचा अन्वयार्थ कसा लावायचा?

नोव्हेंबर १६ पासून आज किती महिने झाले? त्याकाळात जिडीपी ची नॉमिनल व्हेल्यू किती वाढली? तर हा व्हॅल्यू नोव्हे. २०१६ च्या आकारांना लक्षात घेऊन पाहायला लागेल.
असं सहज म्हणता येईल कि (१+ (७%+५%) *१.१) जास्त चलन असायला हवं होतं ते ०.९९ आहे.

अमितदादा's picture

23 Feb 2018 - 3:58 pm | अमितदादा

कॅनडा चे पंतप्रधान Justin Trudeau भारत दौऱ्यावर असताना खलिस्तान चा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला आहे. Justin Trudeau च्या पत्नीचा माजी खलिस्तानी अतिरेक्याबर चा मुंबई मधील फोटो कॅनडा साठी, तर त्याला भारताने विसा देणे हे भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरलेली आहे. पंजाब चे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे खलिस्तानी विरोधी ओळखले जातात, त्यांनी याच्यागोदर सुधा कॅनडा मधील खलिस्तानी चळवळ वरती प्रश्नचिन्ह उभे केले होते. आता सुधा भारत सरकार ने त्यांच्या तोंडून अमरिंदर सिंग -Justin Trudeau यांच्यामधील मिटिंग मध्ये हा मुद्दा परत एकदा उपस्थित केला हि नक्कीच चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करतील हि आशा आहे. मनमोहन सिंघ यांनी सुधा त्यांच्या काळात हा मुद्दा उपस्थित केला होता.
अश्या संवेदनशील मुद्य्वर भारत सरकार आणि पंजाब सरकार यात एकमत असणे हि अत्यंत चांगली गोष्ट आहे. कॅनडा मधील खलिस्तान चळवळ वरील हा एक संक्षिप्त लेख.....
As Justin Trudeau visits India, a look back at how Khalistan movement spread in Canada

विशुमित's picture

23 Feb 2018 - 5:00 pm | विशुमित

मोदींनी देखील कॅनडियन पंतप्रधानांना कानपिचक्या दिल्या.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/canada-pm-justin-trudeau-india...

रविकिरण फडके's picture

24 Feb 2018 - 11:52 am | रविकिरण फडके

"हिंदू धर्माला अधिकाधिक सुरक्षित करायचे असेल तर हिंदूंची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रहिताच्या भावनेने अधिकाधिक मुलांना जन्म द्या. त्यांच्या पालनपोषणाची चिंता आमच्यावर सोडा. पाच वर्षे तुम्ही सांभाळा. नंतर त्यांचा सांभाळ आम्ही करू व राष्ट्रहितासाठी त्याला तयार करू."

वरील वक्तव्य आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे, काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एका सभेत बोलताना केलेले. ह्यावर काही बोलावे अशी खरे तर त्याची लायकी नाही. पण माझ्याच (हिंदू) धर्मातील कुणीतरी काहीही बरळावे, आणि ते unchallenged जावे असे मला वाटत नाही म्हणून ही टिप्पणी. (याच अर्थाचे कुणी मुसलमान मौलवी जेव्हा बोलतो, तेव्हा त्यावर किती गदारोळ होतो हे सर्व जाणतात).

बाईंचे असे समाज प्रबोधन सुरु होते तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे चार पाच नेतेही व्यासपीठावर हजर होते. विश्व हिंदू परिषदेचे काम करणारा माझा एक जवळचा मित्र आहे त्याला यासंबंधी विचारणा केली असता त्याने (अपेक्षेप्रमाणे, सोयीस्कररीत्या) मौन धारण केले.

हिने सांगितले म्हणून कुणी हरीचा लाल मुले जन्माला घालून, त्यांना वयाची पाच वर्षे झाली म्हणजे हिच्या हवाली करणार नाही हे उघडच; परंतु असल्या 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' मूठभर लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होतो, याचे दु:ख. आणि नेते मंडळी यांना आवर का घालत नाहीत, याचे आश्चर्यही.

का 'असेल बुवा काहीतरी, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचे', असे म्हणून सोडून द्यावे?

हिंदू धर्माला अधिकाधिक सुरक्षित करायचे असेल तर

हिंदू धर्माला अधिकाधिक सुरक्षित करायचे आवश्यक आहे का नाही यावर मत टाळू. मात्र असेल तर बाई म्हणताहेत ते योग्य आहे. The projections of current demographic changes indicate that India would be a Muslim majority nation less than 500 years hence. हे संभव आहे की भविष्यातला भारत एक सहिष्णू मुस्लिम देश असू शकतो वा धार्मिक वावटळींनी त्याचा पाकिस्तान होऊ शकतो. यावर उपाय म्हणून हिंदूंनी जास्त पोरे पैदा करावीत हा बाईंचा पर्याय हा एकमात्र रस्ता नसावा. मात्र हा रस्ता नाहीच असं नाही.

जेम्स वांड's picture

24 Feb 2018 - 12:31 pm | जेम्स वांड

नंतर त्यांचा सांभाळ आम्ही करू व राष्ट्रहितासाठी त्याला तयार करू

हे विधान आमच्या सरसंघचालकांनी दिले तर विचारही करू, पुंडावा न करता पोरे किमान आपदा व्यवस्थापन, सेवाभावी शिक्षण, समाजकार्य करून देशसेवा करतील तरी, बाकी ह्या साधव्या अन बाबा लोकांकडे पोरे सोपवता काय शिकवणारेत ते? सिनेमांना विरोध करून गाड्या पेटविणे की बागेत बसलेल्या निशस्त्र जोडप्यांस धरून चोपणे!?

संघाचे जितके नाव बदनाम होते आहे ते असल्या कवडीची बुज अन आब नसलेल्या फ्रीन्ज हिंदूंमुळेच, मला तरी वाटते की हिंदू हिताचे असे एकमात्र संगठन असावे ते म्हणजे संघ, बाकी पंचायतींसोबत आमचा संबंध नाही हे संघाने जाहीर करतील तो एक कार्यकर्ता म्हणून आमच्यासाठी सुदीन.

बिटाकाका's picture

24 Feb 2018 - 1:29 pm | बिटाकाका

पटत आहे तुमची मते!
=====================
हे असले प्रकार डोईजड होत असल्यानेच संघ, भाजपने आजकाल वि.हिं.प. पासून अंग काढून घ्यायला सुरवात केली असेल का?
=====================
पण, जोपर्यंत समान नागरी कायदा (किंवा फॉर दॅट मॅटर, हा हम दो हमारे दो/एक) लागू होत नाही तोपर्यंत अशी मते सामान्य जनतेला पटण्याचा धोका जास्ती नाहीये का?

अमितदादा's picture

24 Feb 2018 - 1:40 pm | अमितदादा

1. सरसंघचालक असे विधान करतील असे आपणास वाटते का?
2. असे आवाहन दुसऱ्याला करणाऱ्याला किती मुले असावीत आपणाला वाटते?

माझं मत अशी विधाने चुकीची आहेत ते मग कोणीही करो, उलट दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांच्या सगळ्या शासकीय सोयी सुविधा बंद करण्यात याव्या आणि त्याचा आग्रह धरावा.

गामा पैलवान's picture

24 Feb 2018 - 3:02 pm | गामा पैलवान

रविकिरण फडके,

यावर काही बोलावे अशी खरे तर त्याची लायकी नाही.

असं का बरं? शिवाय साध्वीने केलेल्या वक्तव्यात चुकीचं काय आहे?

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

24 Feb 2018 - 3:25 pm | जेम्स वांड

तुम्हांस संतती किती? हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला आता =))

मला तरी साध्वी बोललेलं चूक वाटत नाही पण साध्वीची क्रेडेबलिटी संघापेक्षा खालीच असेल माझ्यासाठी, प्रॅक्टिकल उत्तम कालानुरूप अन तरीही परंपरा जोपासणारे हिंदुत्व फक्त रा स्व संघच देऊ शकतो असे मला वाटते.

अमितदादा's picture

24 Feb 2018 - 4:51 pm | अमितदादा

प्रश्न बोचणारा आहे ना? मुळात त्या वात्रट प्रश्नामगिल तो एक हेतूच आहे.
जसा माझा प्रश्न काही लोकांना अनावश्यक, अनाहूत वाटत असेल तसेच माझ्यासारख्या हिंदू ला वरील साध्वीचे आवाहन अनाहूत, अनव्यश्यक वाटते. मुळात ते आवाहन चुकीचे आहे ते साध्वीने करो नाहीतर इतर कोणीही करो.
ज्यांना ते आवाहन योग्य वाटते त्यांना माझा प्रश्न ही योग्य वाटायला हवा आणि त्याच आनंदाने उत्तर द्यायला हवं. ज्यांना ते आवाहन अयोग्य वाटते त्यांना माझा प्रश्न ही अयोग्य वाटेल(ज्याशी मी पूर्ण सहमत असेंन). परंतु आवाहन योग्य पण प्रश्न चुकीचा असे वाटता कामा नये.
हिंदू चे अनेक प्रश्न आहेत किंवा त्यांचे कल्याण होणारी अनेक क्षेत्रे आहेत त्यात ह्या लोकांनी काम करावे, जर अगोदर पासून करत असतील तर चालू ठेवावे. उगाच अनाहूत सल्ले देऊ नयेत.

गामा पैलवान's picture

25 Feb 2018 - 3:04 am | गामा पैलवान

अमितदादा,

साध्वींच्या आवाहनामागे एक कारण आहे. भारतात जिथनं हू कमी झाले ते भाग भारतापासून तुटले. तर त्यासबंधी विचार करायला नको का? यावर उपाय म्हणून हिंदूंनी भारंभार पोरं जन्माला घातली तरी अडचण होणार. मग अशा वेळेस मुलांवर संस्कार करायची जबाबदारी साध्वींनी घेतली तर त्यात चुकीचं ते काय?

आ.न.,
-गा.पै.

श्रीदेवी हृदयविकाराच्या झटक्याने गेली.....
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sridevi-dead-50...

पुंबा's picture

25 Feb 2018 - 8:31 pm | पुंबा

फार दुःखद बातमी.
माझ्या मते, श्रीदेवी भारतात आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. इंग्लिश विंग्लिशसारख्या चित्रपटात मेलोड्रामा टाळून इतका सुंदर अभिनय केलाय तिने!
दिग्दर्शकाची अभिनेत्री होती ती.

Ajit Gunjal's picture

31 Jul 2020 - 8:27 am | Ajit Gunjal

Marathi News Live

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरु झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 नुसार दोन योजना सुरु होत्या.

ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 कलम 12(ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना.

सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते.

Ahmednagar News

Ajit Gunjal's picture

22 Sep 2020 - 6:13 pm | Ajit Gunjal

welfare

Jiyo changes telecom life
Ahmednagar News

Ajit Gunjal's picture

22 Sep 2020 - 6:39 pm | Ajit Gunjal

Rules
Reliance Jio Infocomm (Jio) has rolled out post paid tariff plans to woo the high revenue customers who till now were on Bharti Airtel and Vodafone Idea (VIL)'s postpaid plan.
Ahmednagar news in Marathi

मराठी_माणूस's picture

23 Sep 2020 - 12:04 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/ulata-chashma-news/loksatta-ulta-chashma-articl...

छान उपरोधिक लेख.

लेखात, ह्या घटनेशी साधर्म्य असलेल्या एका राजाच्या गोष्टीचा उल्लेख आहे. फरक इतकाच आहे की, गोष्टीतील जनता चिडुन गुन्हा करणार्‍या उपसेनापतीला ताब्यात द्या म्हणते. इथे जनता निमुटपणे पहात असते.

गामा पैलवान's picture

24 Sep 2020 - 2:10 am | गामा पैलवान

वाधवान पितापुत्र प्रकरण वगैरे थोडंथोडं कळलं पण बरचसं कळलं नाही. जरा विस्कटून सांगावं ही विनंती!
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

24 Sep 2020 - 11:09 am | मराठी_माणूस

तुम्हाला आलेला अंदाज बरोबर आहे, मुद्दा असा आहे की , अशा गोष्टीवर समाजा कडुन काहीच प्रतिक्रिया होत नाही (काही अपवाद), जाब विचारला जात नाही. आणि काही ठीकाणी गरज नसताना चर्चा होत रहाते (उदा: नुकतेच झालेले सिनेसृष्टीतील आत्महत्या प्रकरण आणि त्याला फुटलेले असंख्य फाटे).
समाजाच्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर पाठपुरावा केला जात नाही. दरवर्षी पावसाळ्यात उदभवणार्‍या समस्या. कालच्या पावसामुळे परत तेच सर्व घडले. ज्या लोकांना
बाहेर पडणे अत्यावश्यक होते , त्यांचे खुप हाल झालेले दिसले.
पीएनबी मुळे ज्या लोकांचे पैसे अडकले त्यांचे कीती हाल झाले. अशा प्रश्नावर समाज चवताळुन उठत नाही. गुन्हेगार मात्र पाठीशी घातले जातात.

मराठी_माणूस's picture

28 Sep 2020 - 10:05 am | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/mumbaikars-toll-rates-a...

बातमीत म्हट्ल्या प्रमाणे १०पट जास्त भरुन झाला आहे. मग ही टोल वाढ का ? बर ह्या एंट्री पॉइंट वर फास्ट टॅग का चालत नाही?
खड्ड्यातुन वाट काढत, मोठ्मोठ्या रांगेतुन यायचे आणि टोल भरायचा (खड्ड्यांसाठी का ?),

ह्या विषयावर सगळीकडे शांतता.

मराठी_माणूस's picture

2 Oct 2020 - 4:19 pm | मराठी_माणूस

पहीला दिवस , नरकयातना

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/day-1-of-toll-hike-traff...

मराठी_माणूस's picture

3 Oct 2020 - 3:41 pm | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/states-biggest-toll...

केव्हढी ती तत्परता.

बातमीत शेवटी दिलेले आर टी आय कार्यकर्त्याचे म्हणणे अतिशय महत्वाचे.

Ajit Gunjal's picture

29 Sep 2020 - 4:36 pm | Ajit Gunjal

Telecom

Jio is not just a telecom network, it is an entire ecosystem that allows Indians to live the digital life to the fullest

Latest Rahata News in Marathi

गोंधळी's picture

29 Sep 2020 - 9:12 pm | गोंधळी

https://indianexpress.com/article/india/govts-new-defence-acquisition-po...

सरकारने -defence offsets policy काढुन टाकण्याचे ठरवले आहे. या आधी CAG ने राफेल संदर्भात offsets झाले नसल्याने टिका केली होती.

चीनला जे जमल ते भारत का करु शकत नाही.

असो सब चंगासी.

शा वि कु's picture

29 Sep 2020 - 9:37 pm | शा वि कु

राफेलच्या ऑफसेट सोबत DRDO ला होणाऱ्या TECHNOLOGY TRANSFER ची सुद्धा पूर्तता झाली नाहीये, ना दसॉ ने त्यासाठी काही पाऊलं उचलली आहेत.

ऑफसेट मधले बदल रेट्रोस्पेक्टिव्ह नाहीयेत हा एक दिलासा आहे.
त्यामुळे ऑफसेटचे नियम हटवले तरी आपली भूमिकेस सरकार योग्य पाठबळ देऊ शकेल.
(ऑफसेट च्या आडकाठीमुळे सरकारचीच बार्गेनिंग शक्ती कमी होत असण्याची शक्यता आहे. अर्थात यातलं मला फारस कळत नाही.)

मराठी_माणूस's picture

10 Oct 2020 - 10:25 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-writer-shobha-deshpande-pro...

अतिशय चीड आणणारी घटना.