लघुनिबंध स्पर्धा - "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
24 Oct 2008 - 12:45 am
गाभा: 

राम राम मंडळी,

आजपर्यंत मिपावर अतिलघुकथा, पाककृती वगैरेच्या स्पर्धा झाल्या.सर्व मिपाकरांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, अंमळ मजा आली..

ते पाहून मिपाकरांमध्ये अजून एक लघुनिबंध स्पर्धा घ्यायची असे आम्ही ठरवले आहे.

विषय - मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण.

मोजून दहा ओळी..

निबंधाच्या शेवटी,

"...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!"

हे वाक्य येणे आवश्यक आहे...

निबंधात,

"शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य" हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे.

"फाट्यावर मारणे.." या क्रियापदाचा वापर एकदा तरी करणे आवश्यक आहे. जसे, फाट्यावर मारले, फाट्यावर मारतो, फाट्यावर मारीन.. इत्यादी..! :)

कुणाही मिपाकराचा व्यक्तिगत उल्लेख येता कामा नये, जसे तात्या, विसोबा खेचर इत्यादी.. :)
त्याऐवजी "मिपाकर", "मिपा व्यवस्थापनवाले", "काही मिपाकर", "मिपा प्रवर्तक" असे उल्लेख चालतील..

चला तर मंडळी, लागा कामाला.. आता येऊ द्यात भराभर तुमचे निबंध. निबंध येथेच द्या.

पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे ५१, २१, आणि ११ रुपयांचे रोकडा बक्षिस..! बक्षिसाचा खर्च मिपाचे एक हितचिंतक आहेत अमेरीकेत! ते करणार आहेत.. :)

स्पर्धा परिक्षक - मुक्तसुनीत, चतुरंग, प्रा डॉ दिलिप बिरुटे...

कुणाला कितवं बक्षिस द्यायचं हे वरील तीन मंडळी एकमेकात पोस्टकार्ड पाठवून ठरवतील..

बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, भाप्रवेळेनुसार रात्री १२ नंतर येणारे निबंध विचारात घेतले जाणार नाहीत..

ऑल द बेस्ट.. :)

आपला,
(शुद्धलेखनाच्या बाबतीत भयानक काटेकोर असणारा) तात्या.

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

24 Oct 2008 - 1:21 am | देवदत्त

काय तात्या,
तुम्ही एकदम शुद्धलेखनावर लिहायला सांगताय आणि ते ही मिसळपाव वर :? :)

अनामिक's picture

24 Oct 2008 - 1:28 am | अनामिक

शुद्धलेखनावर लिहायचय, शुद्धलेखन करायचा आग्रह नाही :) !

अनामिक

भास्कर केन्डे's picture

24 Oct 2008 - 1:28 am | भास्कर केन्डे

पहिले तीन म्हणजे सर्वप्रथम पटापट आलेले तीन प्रतिसाद नसून पहिल्या पसंतीचे तीन असा अर्थ आम्ही काढत आहोत.

आपला,
(कच्चं मडकं) भास्कर

छोटा डॉन's picture

24 Oct 2008 - 1:44 am | छोटा डॉन

आमच्या लघुकथेत पटकथेच्या मागणीनुसार काही "पुर्व इतिहास वा इतर संकेतस्थळांचा / घटनांचा" उल्लेख केल्यास ती कथा अपात्र ठरेल / प्रतिसाद उडवला जाईल / सदस्याला समज दिली जाईल / त्याचा आयडी व आयपी ब्लॉक केला जाईल असे काही नियम आहेत का ?
असल्यास नेमकी व्याख्या काय ?

आम्ही पातळी सोडणार नाहीच पण विचारलेले बरे ...
कारण आम्ही मुळात लिहताना " शुद्धीचिकीत्सकाचे शाद्ध घालुन व शुद्धलेखन चिकीत्सकांना फाट्यावर मारुनच लिहायला बसतो पण कसे आहे की मिपा प्रशासनाचा डोक्यावर हात असलेला बरा", काय ?
नंतर येणार्‍या निषेध खरडीस / व्यनीस केराची टोपली दाखवुन पाठवणार्‍यास फाट्यावर मारले जाईल फक्त आपण एक डाव नियम स्पष्त करावेत ...

नियम जर वरील प्रमाणे असतील तर आमचा मार्ग मोकळा.
आम्हीच जिंकणार स्पर्धा, न जिंकल्यास आमच्यावर अन्याव झाला असे ओरडायला आम्ही मोकळेच ...
शब्दसम्ख्येची काही मर्यादा आहे का ?
असल्यास काय ?

चला, ह्या निमीत्ताने "मिपाचे शुद्धलेखनाविषयकचे धोरण ठरले एकदाचे " हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे ...

*********************************************

ही कथा नव्हती, चौकशी आहे.
तरीही एकुण ओळी १०, लिहलेल्या सर्व (अती) अटीम्चे पालन बहुतेक झाले आहे ...

आमच्या शंकाचे निरसन करावे. धन्यवाद ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन's picture

24 Oct 2008 - 4:14 pm | छोटा डॉन

वरचा प्रतिसाद जरी मी कथेच्या अंगाने जाणारा लिहला असला तरी त्या मला खरोखरीच वाटलेल्या शंका आहेत.
कॄपया शंकानिरसन करावे म्हणजे आम्हाला बाकी काही लिहता येईल ...

ही माझी स्पर्धेतली एंट्री नव्हती.
उत्तराला जास्त उशीर होऊ लागल्यास आम्हाला प्रवेशपत्रिका मोष्टाने उशीरा मिळाली अशी बोंबाबोंब करायला आम्ही मोकळे आहोत.

कळावे.

(स्पर्धाइच्छुक )छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2008 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी दुखावले जाऊ नये. इतकी काळजी घ्यावी.
कथेतून मनमोकळा आनंद घेता यावा, इतकेच सध्या सांगतो.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 12:11 am | विसोबा खेचर

आमच्या लघुकथेत पटकथेच्या मागणीनुसार काही "पुर्व इतिहास वा इतर संकेतस्थळांचा / घटनांचा" उल्लेख केल्यास ती कथा अपात्र ठरेल

नाही ठरणार. येऊ द्या..! :)

" शुद्धीचिकीत्सकाचे शाद्ध घालुन व शुद्धलेखन चिकीत्सकांना फाट्यावर मारुनच लिहायला बसतो पण कसे आहे की मिपा प्रशासनाचा डोक्यावर हात असलेला बरा", काय ?

गो अहेड..! :)

नियम जर वरील प्रमाणे असतील तर आमचा मार्ग मोकळा.

निबंधाची वाट पाहतो आहे! :)

निबंध मोजून १० वाक्यांचाच असावा..

भास्कर केन्डे's picture

24 Oct 2008 - 1:55 am | भास्कर केन्डे

येदा येदा च धर्म श्च
लिहिताना ग्लानी येतसे
(मम) मनोगताचे उपक्रम सारे
बासनामध्ये जात असे...

(टीप - बासनात जाने=बंद होणे. माझ्या मनातले लिहिण्याचे बेत बासनांत जात.)

काना मात्रा चुकला जेव्हा
मूढ मजला लेखले
शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य
ह्यातच सार्थक पावले

ताटी उघडा उड्या मारा
जाहलो सरपंच आम्ही
पाहिजे तशा फाट्या मारा
मुक्त आहा इथे तुम्ही

पामर हर्ष पावले
माय मराठी भजू लागले
मुंगेरीलाल ढुढ्ढाचार्य
तिथे सुद्धा कोलमडले

गद्याला पद्य म्हणती
पद्याला गद्य समजती
निबंध म्हणता काव्य भरडती
काव्याचा आनंद असे

म्हणे आना दोरखंडे
आवळू बालकां मुखे
बालके म्हणे कहर झाला
यांना येथोनी हाकला

माऊलीच्या दर्शनासी
नको बंधने कद्यपी
जय हो जहो म्हणती
नियम हाची जाहला

विठलं विठलं ह्हो!!

...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!

रेवती's picture

24 Oct 2008 - 4:18 am | रेवती

मारणे ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही.
कुणी सांगाल का?

रेवती

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 7:15 am | विसोबा खेचर

फाट्यावर मारणे म्हणजे एखाद्या गोष्टीला कवडीमोलाचीही किंमत न देणे, भाव न देणे...!

हा पाहा एक वाक्यात उपयोग...

"र्‍हस्व-दीर्घ च्या गमज्या कुणाला ऐकवतोस रे? मला हवं तसंच मी लिहिणार! आपण साला फाट्यावर मारतो तुझे ते र्‍हस्वदीर्घाचे नियम वगैरे...!"

रेवतीजी, मला वाटतं आता हा अर्थ आपल्याला समजला असावा.

मग? आता लिहा पाहू निबंध पटकन! :)

तात्या.

रेवती's picture

24 Oct 2008 - 8:23 pm | रेवती

समजला. धन्यवाद!

रेवती

धमाल नावाचा बैल's picture

25 Oct 2008 - 5:19 am | धमाल नावाचा बैल

तात्या आज मूड मध्ये आलाच आहत तर मला फाट्यावर मारणे ह्याचा शब्दशः अर्थ पण सांगा ना प्लीज.
जसेकी फाटा म्हणजे काय आणि त्यावर मारतात म्हणजे काय? बाकी स्पर्धा मस्तच आहे :)

आपला
बैलोबा

कपिल काळे's picture

24 Oct 2008 - 6:27 am | कपिल काळे

ह्ये सुद्धलेकन काय भान्गड आसती भौ? गानं गायलं काय आनी "गाणं" गायलं काय? मज्जा तर येनारच का न्हाय? ह्ये नियम आमी का म्हून वापरायचं? आन त्ये बनवलं कुनी?
ज्येनी बनवलं त्येनी त्ये, साजूक तूपातला गोडाचा शीरा खायत खायत, म्होरच्या खिडकीतून जेवडी म्हून, पेट का काय तो तुम्चा जिमखाना त्येंच्या नदरंला पडला ,त्येवड्याच लोकांन्ला समजतील, असं बनवलं . आन आमच्या कस्पटे वस्तीवर कोन आलंत का तवा? तुम्च्या नियमांचं बुक घिउन? मंग आता कशापाय ह्यो उप्द्व्याप म्हनायचा?
ह्येंच्या शीर्यात घातलेली साकर, आम्च्या कस्पटे वस्तीवरच्या उस्सापासून बनली, त्या उस्साला आमी "पानी " घातलं म्हून ती कडू नाय ना झाली? आं?

म्हून शुद्धलेखनाच्या डुढ्ढाचार्यांना फाट्यावर मारण्याचा आमी निच्चय पक्का केल्याला हाय. ( ह्ये तीन सबूद कुलकर्नी गुर्जीनी सांगट्लेले)

आनी म्हनूनच आम्हाला ह्ये मिसळपाव लय आवडतं. शीरा खाउन त्वांड लई ग्वाड होतंय, तसं न्हाय बगा हितं. याकदम येक लंबर बगा.झनझनीत.

आता पोरान्ना धावीपर्यंत काय भ्या नाय बगा. आपल्या शिक्षन मंत्र्यांनी मराटी, हिंदी आन तुम्ची ती विंग्रजी तीन भास्यात मिळून तीनसे पैकी एकसेपाचला पाशिंग ठीवल्यालं हाय, मंग आपनच काय म्हून नियम पाळायचं?म्हनून आमीबी कस्पटेवस्तीवरल्या साळंत मिपासारकचं सुद्दलेकनाचं ठरिवल्यालं हाय.भावना म्हत्वाची. काय बोल्तू,काय ल्हीतू ,त्याचं मार्क न्हाय काटायचं आसं कुलकर्नी गुर्जीस्नी बजावल्याल हाय. हयगय झाली तर आमच्याबरुबर गाट हाय त्येंची. त्येच्यामुळं आमी हिकडं बिनघोरी हाय.

गुर्जी म्हनाले "मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे" म्हून गुर्जीस्नी म्हन्लं किती दिस गुराळ वडायचं? ,साळंचं बी धोरन असंच ,मिपासारकं असूद्या की!!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

हा माझा दहा ओळींचा लघुनिबंध मी स्पर्धेत देत आहे. सगळ्या नियमांचं पाल करण्याचा प्रयत्न केला आहे. भंग झाला असल्या, लक्षात आणून दिल्यास, दुरुस्त करीन.

माझ्या ब्लॉगाला भेट द्या बर का.
http://kalekapil.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2008 - 8:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पर्धेचे परिक्षक म्हणुन निवड केल्याबद्दल आपले आभारी !!!
हौस म्हणुन आम्हीही एक निबंध लिहू :)

धोंडोपंत's picture

24 Oct 2008 - 8:52 am | धोंडोपंत

च्यायला मास्तर,

मजा आहे हो तुमची . स्टार माझा नंतर लगेच दुसरा बहुमान.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

शुद्धलेखनाला विरोध करणार्‍यांना आम्ही "फाट्यावर मारतो". खरं सांगायचं तर आम्ही स्वतः आणि आमची मित्रमंडळी वगळता सर्वांनाच फाट्यावर मारतो.

("फाट्यावर मारणे" हा शब्दप्रयोग तात्याने दिलेल्या नियमानुसार आवश्यक आहे म्हणून हे लिहिले.)

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

विनायक प्रभू's picture

24 Oct 2008 - 12:24 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
तात्याना ओब्जेक्शन नसेल तर मी भारतवासी बक्षिसाच्या रकमेत तेवढीच वाढ करीन म्हणतो.

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 1:47 pm | विसोबा खेचर

चलेगा..! :)

कुणाला ओब्जेक्शन नसेल तर मी भारतवासी बक्षिसाच्या रकमेत तेवढीच वाढ करीन म्हणतो असे म्हणुन एका मिपाकराने अमेरिकन दोलरला फाट्यावर मारले.
निदान मिपावर तरी १ दोलर = १ रुपया असे गणीत झाले.
मिपाच्या प्रवर्तकांनी त्याला तत्काळ मंजुरी दिली.
हा प्रतिसाद वाचुन काही शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्यांनी गहजब केला.
ओब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन, दोलर नाही डॉलर, गणीत नाही गणित, हे अन ते असा मोठा आरडाओरडा सुरु झाला.
त्यातच काहींनी मृत भाषा कशाला म्हणायचे, भाषा कशी तयार झाली, एक भाषा दुस-या भाषेला कशी संपवत आहे असे धागे चालु केले.
मिपाचे प्रवर्तक आधीच कोसळणा-या सेन्सेक्सने खुश होवुन माल लेके बैठ जावो घोष करत होते.
त्यांना या वादामुळे शेअरबाजाराकडे पहाण्यास वेळच मिळेनासा झाला.
शेवटी वैतागुन ते ओरडले 'च्यामायला!! फाट्यावर मारतो मी शुद्धलेखनाला... आजपासुन मिपावर ज्याला जे लिहायचे, जसे लिहायचे ते लिहा, फक्त वैयक्तिक शेरेबाजी करु नका ' आणि अशा रितीने मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!

एकुण वाक्ये - १०

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 3:40 pm | विसोबा खेचर

मिपाचे प्रवर्तक आधीच कोसळणा-या सेन्सेक्सने खुश होवुन माल लेके बैठ जावो घोष करत होते.

हा हा हा! :)

आपला,
(दोन दोन, पाच पाच समभाग का होईना, परंतु प्रत्येक मोठ्या मंदीत पडत्या बाजारात उभं राहून खरेदी करणारा!) तात्या.

--

माझं ऐका मंडळी, हजारपाचशेचा का होईना, शेदोनशेचा का होईना, परंतु या लोळलेल्या बाजारात काही ना काही माल घेऊन ठेवा. साला, हाच बाजार पुन्हा ३०००० पर्यंत जाईल...!

अवलिया's picture

24 Oct 2008 - 6:38 pm | अवलिया

अवांतर -

तात्या, जर का चुकुन माकुन माझ्या कथेला बक्षिस मिळालेच तर बक्षिसाची संपुर्ण रक्कम कृपया 'पंतप्रधान सहायता निधी, भारत सरकार' यांना प्रदान करण्यात यावी. मी माझ्या बाजुने तितक्याच रकमेच्या १० पट रकमेचा भरणा करेल.

आपला

नाना चेंगट,
भोकरवाडी.

लिखाळ's picture

24 Oct 2008 - 6:31 pm | लिखाळ

नमस्कार, स्पर्धेसाठी खाली दहा ओळी लिहित आहे. कथा विनोद निर्माण करते की विनोदी वाटते यावर जरूर मत नोंदवावे :)
------------------------------------------------------------------------------------------------
मिपावरती कधी काय होईल याची कुणालाच काही कल्पना नसे. स्वतः प्रमाणभाषेतील शुद्धलेखनाचे नियम पाळणारे लोक इतरांना त्या नियमांकडे दुर्लक्ष करायला उद्युक्त करत. फाट्यावर मारणे म्हणजे माणसाचे दोन पाय जेथे एकत्र येतात अश्या विवक्षित जागी लाथ मारणे आणि किंमत दाखवून देणे, या चार लोकांसमोर वापरल्या न जाणार्‍या वाक्प्रचाराला हळुहळू भलतीच किंमत आली. खरेतर शुद्धलेखन आणि निराळ्या बोली वापरून लिखाण करणे यातील फरक कुणाच्याच लक्षात आला नाही. आणि जे आपल्याला कळले नाही त्याला फाट्यावर मारायची पद्धत रूढ झाली. त्यामुळे वरकरणी गंभीर अशी पद्धत मोठीच विनोदी वाटायला लागली. शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य 'असे वाटते, तसे वाटते' करत राहिले तर इकडे लोक फाट्यावर मारण्यात दंग राहिले आणि अशातर्‍हेने मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे, असे मात्र कुणालाच ठामपणे वाटले नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------
वाक्ये ७
--------------------------------------------------------------------------------------------------
--(स्पर्धक) लिखाळ.
!! सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा !!

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 12:07 am | विसोबा खेचर

अहो लिखाळ गुरुजी, सातच वाक्य झाली. स्पर्धा १० वाक्यांच्या निबंधाची आहे! :)

लिखाळ's picture

25 Oct 2008 - 1:37 am | लिखाळ

असे आहे होय.. मला वाटले जास्तीतजास्त दहा वाक्ये. ह्म्म्म... !!!
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

असे आहे होय.. मला वाटले जास्तीतजास्त दहा वाक्ये. ह्म्म्म... !!!

काही हरकत नाही, पुन्हा एकवार एन्ट्री द्या! :)

विनायक प्रभू's picture

24 Oct 2008 - 5:41 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
रो़ज प्रॅक्टीस केल्याने लेखनातील चुका सुधारतात. अर्थात विजेच्या लपंडावाने प्रॅक्टीसमध्ये
व्यत्यय येण्याची शक्य॑ता नाकारता येत नाही. अशा छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन लेखनाची
हेळ्सांड करु नये. मार्क जास्त हवे असतील तर मेहनत तर घ्यावीच लागेल.

रामदास's picture

24 Oct 2008 - 7:44 pm | रामदास

नो बिड.

मीनल's picture

25 Oct 2008 - 7:50 am | मीनल

माझा १० ओळींचा(वाक्यांचाही) निबंध पाठवत आहे.

********************************************************

धोरण (नियमांकडे दूर्लक्ष करण्याचे!)

मि एकदा एक लेख लीहीला होता.
एवढ्या कूचक्या प्रतीक्रीया आल्या कि काहिहि वीचारु नका.

माज्या लीखनातल्या चूका काढणारे हे महाभाग कोन ?
या शूदधलेखनाच्या डूढ्ढाचार्यांना काई कळत नाही म्हनुन त्यांच्या फाट्यावर मारल पाहिजे चांग्ल!

म्हट्ल कि सपश्ट निट पहा, काय सांगायच आहे ति गोषट आधि समजुन घ्या आणी मुददा लक्शात घ्या.
लेखन शूदध असायलाच हव काय?
अशूदध लेखन काय वाचता येत नाहि कि समजायला जडं जात?

मि सांगित्ल कि अशूध्द लीहुनहि तूमहाला वाचता आल कि नाहि?
आता बंद करा ति चरचा आणी लेखकांना दया जराशि सूट.

पटल माझ म्हणणे आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!

*******************************************************

मीनल.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Oct 2008 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते

मीनल ताई, क्या बोलेली है तू...

या शूदधलेखनाच्या डूढ्ढाचार्यांना काई कळत नाही म्हनुन त्यांच्या फाट्यावर मारल पाहिजे चांग्ल!

त्यांना फाट्यावर मरण्यापेक्षा त्यांच्याच फाट्यावर मारले पाहिजे चांगले. =))

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

25 Oct 2008 - 4:47 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मि.पा. चे शुद्धलेखनाचे धोरण सर्व बोर्डानी स्विकारले. जो पर्यंत शब्दाचा साधारण अर्थ लागुन वाक्याचा अनर्थ होत नाही तोपर्यंत अशुद्ध लेखनासाठी विद्यार्थ्याचे मार्क कापले जाणार नाहीत. सर्व बोर्डावर मि.पा. मंडळी असावीत असा दाट संशय येत आहे. विसोबानी क्षमता वाढवताना वरील गोष्टीचा विचार करावा.

सखाराम_गटणे™'s picture

25 Oct 2008 - 9:06 pm | सखाराम_गटणे™

विसोबानी क्षमता वाढवताना वरील गोष्टीचा विचार करावा.
कसली क्षमता वाढवणे चालु आहे?
मिपाची

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

पिवळा डांबिस's picture

26 Oct 2008 - 10:21 am | पिवळा डांबिस

आज अतिपवित्र अश्विन कृष्ण द्वादशीच्या भल्या प्रातकाळी अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन मिसळपाव हे आमचे अत्यंत प्रियतम संकेतस्थळ उघडले. त्यात शुद्धलेखनविषयक लघुनिबंधाच्या आवाहनाचा अनर्थ पाहून आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या अशुद्धलेखनाच्या ढुढ्ढाचार्यानी (खरेतर लेखनाच्या अशुद्धढुढ्ढाचार्यांनी असेच लिहिणार होतो!!!) शुद्धलेखनाला इतके म्हणजे इतके फाट्यावर मारावे? त्या तेजस्वी आर्य विष्णुगुप्ताप्रमाणे आम्ही आमची भरघोस आणि लांबसडक शेंडी आपटून आमच्या लेखनस्थळी विराजमान झालो. मिपाव्यवस्थापनाचे "डोके ठिकाणावर आहे काय?" असा अत्यंत जळजळीत अग्रलेख लिहिण्याचीच अनिवार इच्छा झाली पण या आठवड्याचा "पाहुणा संपादक" होण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही आमच्या शेंडीची नीटस आणि आटोपशीर गाठ मारली...

आमचा "मी" च्याऐवजी "मि" लिहिण्यास आक्षेप नाही. पण जेंव्हा शुद्धलेखनास फाट्यावर (कोणाच्या आणि नक्की कुठे ते कळले नाही!!!) मारल्याने जर अर्थ बदलून त्याचा अनर्थ होत असेल तर आम्हाला शुद्धलेखनाचा आग्रह धरणे आवश्यक वाटते. उदाहरणार्थ, जेंव्हा एक फाटक्या कपड्यातली असहाय्य तरूण सुंदरी बघितल्यावर जर "शोक" अनावर व्हायच्या ऐवजी "षोक" अनावर होत असेल (म्हणजे नक्की काय ते सुज्ञ मिपाकरांस सांगण्याची गरज नाहीच!!!) तर त्याचा निषेध करणे हे आम्हांस क्रमप्राप्तच आहे....

पण मिपावर सुद्दलेखनविषयक धोरन शेवटी ठरले म्हनायचे....:)

(शुद्धलेखनाभिमानी महासंतप्त) पीतपंडित महाडांबिसाचार्य

(घ्या आमची १० वाक्ये आणि अनेकांच्या हाती कोलीत!!!!:))

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 10:24 am | विसोबा खेचर

मिपाव्यवस्थापनाचे "डोके ठिकाणावर आहे काय?" असा अत्यंत जळजळीत अग्रलेख लिहिण्याचीच अनिवार इच्छा झाली पण या आठवड्याचा "पाहुणा संपादक" होण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही आमच्या शेंडीची नीटस आणि आटोपशीर गाठ मारली...

हा हा हा! डांबिसा, मस्त रे! :)

तात्या.

छोटा डॉन's picture

27 Oct 2008 - 6:42 pm | छोटा डॉन

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आठवड्याच्या बुधवारच्या दिवशी "मिपाच्या कार्यकारणीची ( ह्यालाच काहीजण अष्टप्रधान मंडळ म्हणतात) " गेल्या काही दिवसात झालेल्या घटानांची चौकशी व त्यावर चर्चा" करण्यासाठी सभा भरली आहे व त्याला साग्रसंगीत खाण्यापिण्याचीही जोड आहे.

आणिबाणीचा व्यवस्थापक : काय प्रधानजी, आम्ही मिपाकरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लिखाणातल्या अनावश्यक व नवजात लेखकाच्या मूलीवर उठणार्‍या रुढी-परंपरांपासुन जनतेची सुटका केल्याने प्रजा खुष असुन भरभरुन लिहते आहे की नाही ?

प्रधान १ : होय म्हाराजा, समदं काही व्यवस्थीत असुन प्रजा भरभरुन लिहीत असुन अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत व त्यांना मिळणारे भरभरुन मनमोकळे प्रतिसाद त्यांचा उत्साह वाढवत आहेत आणि मुद्दम उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे काही प्रसिद्धीमाध्यमेसुद्धा या मुद्द्याची दखल घेऊन आपल्या ह्या चांगल्या राज्यकारभाराबाबत आपले कौतुक करत आहेत व मिपाला भरभरुन धन्यवाद देत आहेत.

आणिबाणीचा व्यवस्थापक ( खुषीने खदखदुन हसत ) : वा वा, एकदम चांगले चालले आहे पण माझ्या मनाला हे अजुन परिपुर्ण वाटत नसल्याने अजुन काही सुधारणा करावीशी वाटत आहे की जेणेकरुन मिपाची क्वालीटी अजुन सुधारावी असे मनात आहे व त्याला आपली सर्वांची मदत आवश्यक आहे.

प्रधान २ ( चाचरत ) : म्हाराज, ह्याच चांगल्या हेतुने आपल्या राज्यातील काही व इतर राज्यामधली काही जेष्ठ, हुशार, बुद्धीवादी व "मराठी भाषा शुद्धलेखनावर " हुकुमत असलेले शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य ह्या कामात स्वेच्छेने जातीने लक्ष घालुन नविन येत असलेल्या लिखाणातील "शुद्धलेखन" तपासत आहेत व त्यावर आपले मौलीक मत व्यक्त करत आहेत पण त्यामुळे थोडासा गदारोळ वाढुन वातावरण काही वेळा तंग होते आहे व खास ह्या मुद्द्यावर आपल्या जाणाकार मार्गदर्शनाची गरज आहे ....

आणिबाणीचा व्यवस्थापक ( त्वेषाने खुर्चीवरुन उठुन रागाने ) :
अहो जे तुकोबांनी व ज्ञानोबा माऊलींनी सर्वसामान्याना कळावे म्हणुन जे बोलीभाषेत लिहले ते आमच्यासाठी "शुद्धलेखनाचे प्रमाण व आदर्श" असतना ही नसती थेरं काढुन प्रजेचे कसले कल्याण होणार आहे ते लागबागचा राजा जाणो ....
एकजात , हलकट, नालायक, अंमळ **** आहेत हे डुढ्ढाचार्य जमात व त्यांना चांगले बघवत नसल्याने अशी खुसपट काढतात साले पण प्रधानजी तुम्हाला आम्ही ह्या शुद्धलेखनाच्या डुढ्ढाचार्यांना फाट्यावर मारुनच नव्या राज्याची मुहुर्तमेढ रोवली ह्याची कल्पना नसावी अगर विस्मरण झाले आहे ह्याचेच आश्चर्य आहे ....

प्रधान १ ( घाबरुन, दबक्या आवाजात ) : पण म्हाराज, हे जे काही आहे ते सामान्य प्रजेच्या व मराठी भाषेच्या कल्याणासाठी तर ......

आणिबाणीचा व्यवस्थापक ( प्रधानजींचे वाक्य सुद्धा पुर्ण न होऊ देता निर्णयी स्वरात ) : आम्हाला माहित आहे सामान्य प्रजेचे व मराठी भाषेचे कल्याण कशात आहे ते व आता तुम्ही एक काम करा व ते असे की त्या शुद्धलेखनाच्या डुढ्ढाचार्यांची गाढवावरुन धिंड काढा व त्यांची मिपावरुन हाकालपट्टी करुन त्यांचा " आय डी व आयपी ब्लॉक" करुन त्याचा रिपोर्ट मला द्या व ह्या निर्णयाची प्रजेत दवंडी पण द्या ...
.
.
.

"मेहरबान, कदरदान, खानदान, ऐका हो ऐका, यापुढे मिपावर कसल्याही शुद्धलेखनाच्या आग्रहाला व त्यावरील चर्चेला बंदी घालण्यात आली असुन त्याचा आग्रह धरणार्‍या सदस्याला फाट्यावर मारण्याची शिक्षा देऊन त्यावर कडक कारवाई करण्यात येऊन त्याचा " आयडी व आयपी ब्लॉक" केला जाईल व यापुढे मनापासुन लिहलेले प्रामाणीक लेखन हेच शुद्धलेखन समजण्यात येईल आणि ह्या घटनेच्या निमीत्ताने आम्ही मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले आहे हो SSSSSSSSSS असे जाहीर करतो."

एकुण वाक्ये : १०
शब्द संख्या : मोजली नाही .
सुदलेखण : फाट्यावर मारले आहे व शुद्धीचिकीत्सकाचे श्राद्ध घालुन मगच लिहले आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विनायक प्रभू's picture

27 Oct 2008 - 7:31 pm | विनायक प्रभू

पींड वळायला मला बोलवायचे होते. जानवे वाला ब्राम्हण आहे मी.
असे सारखे सारखे फाट्यावर मारले तर फाट्याची काय अवस्था होईल.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2008 - 8:09 pm | बिपिन कार्यकर्ते

ठ्ठोऽऽऽऽऽ =))

बिपिन कार्यकर्ते

मनीषा's picture

28 Oct 2008 - 1:49 pm | मनीषा

एकदा काय झालं (एकदा कशानं? नेहमीच होत असतं पण लिहायची पद्धत म्हणून लिहिलं) ..शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य (यांनीच म्हणे मराठी व्याकरणाचे माणिकमोती, शुद्धलेखनाचे र्‍ह्स्व आणि दिर्घ , तसेच अनुस्वार एक देणे ...इ. जागतिक किर्तीचे ग्रंथ (लेखक पुण्याचे असणार हे तुम्ही ओळखलेच असणार) लिहिले (आणि त्यांनीच वाचले) आहेत) जालभ्रमंतीवर निघाले. पाहतात तर काय ... लेखनाच्या नावाने जणु गोंधळच मांडलेला ... नवीन विचार, कल्पना, मते सगळे काही होते .. पण शुद्धलेखन कुठे दिसेना (या सर्वानी ते जागतिक किर्तीचे ग्रंथ वाचले नव्हते ना). त्यानी एक वटहुकूम जारी केला ... लिहायचे असेल तर शुद्ध लिहा, नाहीतर लिहू नका . मग काय सर्व जालावर एकच हा:हाकार माजला , सर्व संस्थळे एकदम शुद्ध झाली ... कारण कोणी लेखनच करेना ना . सर्वत्र आणिबाणि सदृष्य स्थिति होउन अघोषित संचार बंदी लागू झाली. मिपावर सुद्धा गंभीर स्थिती होती . संचालक मंडळाची मिटींग (समर्थ भोजनालय, मुंबईयेथे) घेण्यात आली . प्रथम कोणी बोले ना ... मग लक्षात आले, सुरमईतील (किंवा त्यांच्या ताटात जो काही मत्स्य प्रकार होता त्यातील) काटे चुकवण्यात सदस्य व्यस्त होते. शेवटी संचालकांनी त्यांचे मनोगत .....सॉरी सॉरी ...त्यांच्या मनातील विचार सांगीतले --, ते म्हणाले आम्हाला शुद्धलेखन करणार्‍या न-लेखकांपेक्षा, लेखनाद्वारे आपल्या समविचारी मराठी माणसांपर्यंत पोहोचणारे सभासद महत्वाचे .म्हणून शुद्धलेखनाचा वटहुकूम फाट्यावर मारुन (म्हणजे नक्की काय करुन ते माहीती नाही ) सर्व लेखकाना लिहिते करण्याचे ठरवले ...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!"

मोजुन १० ओळी ... (खरं म्हणजे शुद्धलेखनाच्या नियमासारखाच हा सुद्धा नियम का पाळायचा? ..पण असो..)

हे लेखन वाचताना आपल्या लक्षात आलेच असेल कि लेखिकेने "ते" जागतिक किर्तीचे ग्रंथ वाचलेलेनाहीत . तसेच १० पुर्णविराम येण्यासाठी आम्ही सर्व नियम फा*** *** आहेत.
(वरील लेखन कृपया कोणीही व्यक्तीगत टीका समजु नये .)

अवांतर : मी अशुद्धलेखनाची पुरस्कर्ती नाही... तुम्ही लिहीत असाल तर जास्तीत जास्त शुद्ध लिहायचा प्रयत्न करायलाच हवा .. पण केवळ लेखन शुद्ध नाही म्हणुन लेखनातील विचार, कल्पना दृष्टीआड करुन फक्त शुद्धलेखनाचे सल्ले देणे पटत नाही. लहानमूल पडत पडत चालायला शिकते .. ते पडते म्हणून त्याला चालूच दिले नाही तर ते चालायला शिकणारच नाही. तसेच शुद्धलिहिणे हे लिखाणाच्या सरावाने येउ शकेल असे मला वाटते. (चू.भु. द्या.घ्या.)

विजुभाऊ's picture

29 Oct 2008 - 12:49 pm | विजुभाऊ

आम्चा पास.
झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

बख्रर....

दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली |
मिपा प्रांताचे सकल मनसबदार खांसे राज्मान्य राजष्री सकलखासकेन प्रवर्तकराजे यांनी हुकुम काढोनी शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य यांचे विरुध समशेर उपसली|
चोहो बाजुनी हा:हाकार जाहला|
नुसतीच समशेर उपसली नाही तर शुद्धलेखनाचा वटहुकूम फाट्यावर मारुनी लेखन करनेचे योजुन तैसा खलिता दोलतीत धाडला |
बहु गह्जब जाहला | कोणास काही एक कळेणासे जाहले | सबंध गोटात खळबळ माजली |
इकडे सरदार राज्मान्य राजष्री सकलखासकेन प्रवर्तक यांनी आण्खी कुरघोडि करत शुद्धलेखनाचा वटहुकूम फाट्यावर मारुनी लेखन करनेस प्रोत्साहन देणे कामी तथा मिपाचे प्रांतीचे शुद्धलेखनविषयक धोरण नेमणेस जंगी दंग्लीं आयोजिल्या | खांसे बक्शीस ठेवले | या कामी प्रमुख म्हनोनी गोटातील बीनीचे शिलेदार प्रा डॉ दिलिप बिरुटे सरदार मुक्तसुनीत सरदार चतुरंग यांची खांसी पत्रे व अधीकारची वस्त्रे देवोनी नेमनुक केली | झाडुन सारे सरदार कामास लागले |
देशो देशो चे सरदार उमराव येवोनी समशेर पाजळुन गेले | बहु खलबते जाली |
खलीते फिरले आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे.. मोहोर उमटली | हत्ती वरोनी साखर वाटली |

.....बन्ड्या

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 9:17 am | विसोबा खेचर

हा हा हा बन्ड्या, मस्तच रे...

या कामी प्रमुख म्हनोनी गोटातील बीनीचे शिलेदार प्रा डॉ दिलिप बिरुटे सरदार मुक्तसुनीत सरदार चतुरंग यांची खांसी पत्रे व अधीकारची वस्त्रे देवोनी नेमनुक केली

हे तर क्लासच.....

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2008 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली |
बन्ड्या,
बखरनामा वाचून हहपुवा झाली :) एकदम मस्त !!!

प्रा डॉ दिलिप बिरुटे
(बीनीचा शिलेदार)

खरा डॉन's picture

1 Nov 2008 - 11:25 am | खरा डॉन

तुमची कथा २९ तारखे नंतर आल्याने बाद!!!

विनायक प्रभू's picture

1 Nov 2008 - 9:15 am | विनायक प्रभू

वाचुनी संतोष जाहला

खरा डॉन's picture

1 Nov 2008 - 11:23 am | खरा डॉन

स्पर्धेचा निकाल कधी? का त्या हस्ताक्षरावरुन स्वभाव ओळखणे वगैरे तसलाच प्रकार म्हणायचा हा?

सखाराम बाइंडर's picture

11 Jan 2009 - 4:17 pm | सखाराम बाइंडर

स्पर्धेचा निकाल कधी? का त्या हस्ताक्षरावरुन स्वभाव ओळखणे वगैरे तसलाच प्रकार म्हणायचा हा?

कपिल काळे's picture

11 Jan 2009 - 5:03 pm | कपिल काळे

असेच म्हणतो. तात्या आता निकाल लावा की एकदा

लो कर लो बात! मी "फाट्या"ला शरीराचा एक अवयव समजत होतो जो अशा कामांसाठी "अक्सर" वापरला जातो!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सखाराम_गटणे™'s picture

13 Oct 2009 - 11:52 am | सखाराम_गटणे™

शरीराच्या एका विशिष्ट भागाला फाटा म्हणतात.
कुठल्या तरी हिंदी चित्रपटात त्याचा उल्लेख आहे.

----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

सुधीर काळे's picture

13 Oct 2009 - 11:54 am | सुधीर काळे

तेच हो, पण नेमका कुठला?
असो, जाऊ द्या! आलं लक्षात!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सखाराम_गटणे™'s picture

13 Oct 2009 - 12:02 pm | सखाराम_गटणे™

नोहेंबरमध्ये खेचरकाका, रामदासकाका, मास्तरकाका, जमलेतर नानाकाका, सुनीलकाका ह्यांच्याबरोबर बसा, सांगतील ते सगळे.

आम्ही काय सांगणार??

----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

Nile's picture

13 Oct 2009 - 12:07 pm | Nile

च्यायला ह्या लोकांच्या!! गवर्‍या गेल्या म्हसनात तरी काय थंड होत नाहीत लेकाचे! &(*&$$&())_(%#*#(#)#_#_