पुतीन हे रशियाचे बर्याच वर्षांपासूनचे अध्यक्ष, अजून एकदा अध्यक्षीय निवडणूक रिंगणात आहेत. आमेरीकेत मागच्या वर्षी ओबामा जाऊन ट्रंप सरकार आल्यामुळे आमेरीकन टिका कमी झाली असली तरी युरोमेरीकन माध्यमे अजूनही पुतीन बद्दल टिकात्मक मजकुर छापत असतात.
पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूकीस उत्सूक ६५ वर्षीय व्लादिमीर पुतीन यांनी फूल मिडीया ग्लेअर मध्ये सलमान खान स्टाईल शर्ट काढून ठेवला आणि त्यांच्या रशीयन ऑर्थोडॉक्स श्रद्धेनुसार पवित्र स्नानासाठी -६ डिग्री सेल्सीअस तापमानातील खुल्या तलावात डुबकी मारली. श्रद्धाच्या श्रद्धा झाली आणि स्वतःच्या रशियन आणि युरोमेरीकन जनतेला पुतीन हा माणूस एवढा वाईट नाही सश्रद्ध आहे असा राजकीय संदेशही दिला. श्रद्धेने पावित्र्यही साधले आणि राजकारणही.
आपल्याकडील पवित्र स्नानांमध्ये आणि या पवित्र स्नानात धर्माचे संदर्भ सोडले तर पावित्र्य विषयक श्रद्धेत फारसा फरक नसावा. केवळ पावित्र्य विषयक श्रद्धांना केवळ श्रद्धा म्हणणार की अंध श्रद्धा ?
या एपिफनी च्या (अंध?)श्रद्धेने जगभर कसे वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धेचे रुप घेतले आहे ते रोचक आहे. वेळे अभावी त्याबद्दल केवळ दुवे देतो.
* Epiphany (holiday)
इंरजी विकिपीडिया लेख
* एपिफनी श्रद्धे बद्द्ल जरा वेगळी आणखी माहिती देणारा लेख
* पुतिन स्नानाची वॉशींग्टन पोस्टने घेतलेली दज्खल
* पुतिन स्नानाची मास्को टाईम्सने घेतलेली दखल
या निमीत्ताने मिथक, नरेटीव्ह आणि श्रद्धा कशा विकसीत होतात -राजकारण आणि माध्यमांतून मिथक विकासात कशी जोड मिळते- हे तटस्थपणे अभ्यासता यावे. केवळ पावित्र्य विषयक श्रद्धांना केवळ श्रद्धा म्हणणार की अंध श्रद्धा तुम्हाला काय वाटते ?
प्रतिक्रिया
20 Jan 2018 - 7:51 pm | पगला गजोधर
श्रद्धा ही नाही, अंधश्रद्धा ही नाही...
आहे तो फक्त निव्वळ व्यवहार...
गेम ऑफ थ्रोन....
20 Jan 2018 - 9:06 pm | मारवा
गेम ऑफ थ्रोने मध्ये हाय स्पॅरो चा धर्मसत्तेचा राजसत्तेवर अधिकार नंतर राजसत्ते सोबतची युती धर्माचा लौकिक जीवनात हस्तक्षेप फार प्रभावी चित्रण आहे खरेच.
पण हा डायलॉग आठवत नाही हो कुणाच्या तोंडी होता म्हणे ?
20 Jan 2018 - 9:47 pm | पगला गजोधर
20 Jan 2018 - 9:52 pm | पगला गजोधर
पादत्राणे न घालता, साधेपणाने राहणारे प्रातःस्मरणीय गुरुजी (गेऑथ्रो मधले)

20 Jan 2018 - 9:54 pm | अमितदादा
एपिफनी म्हणजे काय कळलं नाही परंतु पुतीन साहेबांचे स्टंट मधी आधी वाचायला मिळतात. मग ते शिकारीला जाणे असो, मासेमारी असो, घोडेसवारी किंवा ice hockey असो । आता रशिया च्या निवडणुका जवळ येतंययात तेंव्हा यांचे स्टंट अजून वाढतील. रशिया च्या येणाऱ्या निवडणुका आणि पुतीन यांची राजकीय कारकीर्द यावर आपला स्वतंत्र लेख किंवा दीर्घ प्रतिसाद वाचायला आवडतील।
20 Jan 2018 - 11:12 pm | माहितगार
याची विस्तृत माहिती देण्यासाठी ख्रिश्चन धर्माची माझ्या पेक्षा अधिक माहिती असलेली व्यक्ती हवी. इंग्रजी विकिपीडिया दुवा लेखात दिला आहे . मला जे समजले ते थोडक्यात शब्दशः येशू ख्रिस्ताचा (जन्मा नंतरचा) इतरांना (इतर तीन/काही शहाण्यांना -चांगल्या अर्थाने - प्रेषमाहित होण्याचा ) प्रकटीकरण दिवस कदाचित येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचाही संबंध असावा चुभूदेघे.
एखादी व्यक्ती प्रेषितच कशी आहे या संबंधाचे मनावर ख्रिस्चन मनावर बिंबवणारे मिथक (कथा सूत्र) कंसा सारखा ज्यूंचा एक राजा (हेरॉड) ज्याला आपली जागा घेणारा प्रेषित येणार या भविष्य वाणी ने घाबरे सुटते तो आकाशातल्य तार्यांवरून माग काढणार्या (मागी माग काढणे मागी या शब्दातील साम्य पहा) तीन हुशार माणसांना प्रेषित बालकांचा शोध घेण्यास सांगतो , ते येशू पर्यंत पोहोचतात खरे पण त्याचा माग हेरॉडला सांगत नाहीत - पळून जातात - हेरॉड कंस स्टाईल असंख्य नवजात बालकांची हत्या करवतो वगैरे. हा माग काढलेला दिवस, याच तारखेस संत जॉन ने ख्रिस्तास बाप्तीस्मा दिल्याचे मानले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ख्रिश्च्नन पंथ आणि प्रदेशानुसर वेगवेगवळ्या प्रथा श्रद्धा अंधश्रद्धांसोबत दिवास साजरा केला जातो. तारखाही पंथ आणि प्रदेशानुसार मागे पुढे असू शकतात त्या बाबत अधिक माहितीचे दुवे लेख तळटीपेत आहेत. चुभूदेघे
20 Jan 2018 - 11:32 pm | माहितगार
रशीयाचे सोव्हीएत साम्राज्य घरंगळल्या नंतर रशियन लोकांना कॉन्फीडन्स देऊ शकणारे नेतृत्वाच्या स्वरुपात पुतीन पुढे आला. त्याचे केजीबीचे बॅकग्रऊंड आणि मुक्त अर्थव्यवस्थे सोबत जमवून घेणे रशियन लोकांना समतोल साधणारा स्ट्राँग मॅन आर्कर्षक वाटले असेल तर नवल नाही.
आधीचे स्टंट रशीयातील या मतदारांना खूश करण्यासाठी. मतदारांची मर्जी राखण्यासाठी शेजारच्या युक्रेनचा रशियन भाषा बोलणारा प्रांत जबरदस्तीने तोडून रशियाला जोडून घेतला. या कृतीने रशियन मतदार खूश झाला पण उर्वरीत युरोमेरीका नाराज होऊन आर्थिक -व्यापारी निर्बंध लादले गेले. प्रत्युत्तारात पुतिन ने आमेरीक आणि युरोपीय निवडणूकात अप्रत्यक्ष हस्तक्षेप केल्याचे संशय बळावले
पुतिन च्या क्रिमीआ तोडणे आणि निवडणूकातील कथित हस्तक्षेपाने युरोमेरीकन जनते ची नाराजी आर्थिक आणि व्यापारी बहिष्काराच्या स्वरूपात चालू आहे . या पवित्र स्नानाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे . १) पाश्चात्य माध्यमे भासवतात तेवढा पुतीन वाईट माणूस नाही उलट एका सश्रद्ध माणूस आहे. २) निवडणुकीस रशियन लोकांना संदेश पुतीन सश्रद्ध आहेच पण या वयातही -६ डिग्री गार पाण्यात बिनदिक्कत स्नान करण्या एवढा स्ट्रॉमग पण आहे .
21 Jan 2018 - 1:11 am | अमितदादा
धन्यवाद... अधिक ची माहिती जालावर वाचून पाहतो.
21 Jan 2018 - 11:47 pm | वामन देशमुख
शून्य डिग्रीला पाण्याचा बर्फ होतो असं मी शाळेच्या जगात शिकलो आहे.
जगाच्या शाळेत असं होत नाही का?
22 Jan 2018 - 1:10 pm | गामा पैलवान
वामन देशमुख,
हवेचा दाब जास्त असेल तर तापमान शून्याखाली जाऊनही पाणी द्रवच राहतं.
आ.न.,
-गा.पै.
22 Jan 2018 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
ते त्यावेळेचे तिथल्या हवेचे तापमान होते पाण्याचे नाही.
-६ सेल्सियसला पाणी द्रवरूप असू शकेल पण ते सामान्य वातावरणात शक्य नाही. त्यासाठी पाण्यावरचा दाब इतका असावा लागेल की त्या दाबाखाली उघडे मानवी शरीर चुरगळून जाईल.
30 Jan 2018 - 1:31 pm | वामन देशमुख
गापै व डॉ सुम्हा यांना धन्स् !
30 Jan 2018 - 7:03 pm | गामा पैलवान
हे बरोबर आहे. चूक दाखवून दिल्याबद्दल डॉक्टर साहेबांना धन्यवाद!
-गा.पै.
20 Jan 2018 - 10:27 pm | गॅरी ट्रुमन
रशियात इतकी वर्षे कम्युनिस्ट राजवट असूनही रशियन लोकांना अश्रध्द करता आलेच नाही का? :)
21 Jan 2018 - 10:15 am | माहितगार
या पुतीन स्नाना बद्दल्ल एक पाश्चात्य वृत्त संस्थेची बातमी वाचली त्यात त्याची पापे धुण्यासाठी पुतीनने पवित्र स्नान केल्याचा उल्लेख आहे. आता तसे स्नान केल्याने पापे धुतली जातात ही रशीयन/ ख्रिश्चन श्रद्धा आहे की वृत्त संपादकाने केलेली मल्लीनाथी आहे माहित नाही. पण टिकाकारांची अही मल्लिनाथी सुद्धा काही वेळा श्रद्धा बनू शकत असावी अशी वाजवी शक्यता वाटते. शैव वैष्णव मिथके आणि इतरही वैदीक मिथके कदाचित टिकांना वस्तुस्थित मिथके म्हणून स्विकारल्यामुळे आली असू शकतात का अशी शंका वाटते.
बाकी वैष्णवांच्या अद्वैताने प्रत्येकाला वीष्णूचा अवतार बनवून एप्रोप्रीएट केले तसे न्यूजवीक ने दिलेले हे पुतिनचे वैचारीक शोध तुम्हाला रोचक वाटावेत
बघा पुतिन काय म्हणतात :
* Russian President Vladimir Putin has compared Vladimir Lenin to a saint and declared that Soviet communist ideas come from the Bible.
* he does not believe the ideals of communism and Christianity are incompatible.
* “Firstly, faith has always accompanied us. It strengthened when things were hard for our people’s country. There have been harsh, godfighting years when clerics were destroyed and churches were ruined. But at the same time (Soviets) created a new religion. Indeed, communist ideology is very similar to Christianity.”
* Putin argues that like Christianity, communism preaches “freedom, brotherhood, equality.” He called the Moral Code of the Builder of Communism, a pamphlet of guiding principles for all party members, a “primitive excerpt from the Bible.”
* In ritual too, Putin argued, Lenin and his cohorts borrowed from church practices,
* "So it seems (कम्यूनीस्ट ) authorities at the time did not invent anything new, but merely adopted under its own ideology something that humankind invented (रिलीजन) a long time ago.”
21 Jan 2018 - 10:21 pm | गॅरी ट्रुमन
अत्यंत रोचक दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी कम्युनिझम आणि क्रिश्चिअॅनिटी या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे वाचून लेनिनचा आत्मा कपाळाला हात लावून 'हेच का फळ मम तपाला' असे म्हणाला असेल हे नक्की :) :)
कारण मला वाटते लेनिनच पुढे दिलेले वाक्य म्हणाला होता:
(स्त्रोतः http://www.azquotes.com/picture-quotes/quote-there-can-be-nothing-more-a...)
30 Jan 2018 - 6:23 pm | सुबोध खरे
There’s an old saying:
If you’re not a communist at the age of 20, you haven’t got a heart.
If you’re still a communist at the age of 30, you haven’t got a brain.
साम्यवाद २०० वर्षे सुद्धा टिकला नाही( तर साम्यवादी राजवटी १०० वर्षे सुद्धा टिकल्या नाहीत) तर धर्म काळाच्या ओघात हजारो वर्षे टिकून आहेत. याचा अर्थ साम्यवादाचा पाया धर्मापेक्षाही ढिसाळ होता/आहे.
सामान्य माणसाला साम्यवाद आपलासा वाटत नाही हि वस्तुस्थिती. जगाच्या बहुसंख्य देशात केवळ क्रांतीने उलथापालथ झाल्यावर साम्यवाद जबरदस्तीने गळी उतरवला गेला होता. संधी मिळाल्यावर सामान्य जनतेने तो टाकून दिला. सर्व माणसे हि यंत्रे समजणारा साम्यवाद माणसाच्या वैयक्तिक आशा आकांक्षा स्वातंत्र्य याची पायमल्लीच करत आला आहे. त्यामुळे तो टिकला नाही यात आश्चर्य नाही.
रशियात सुद्धा साम्यवादाच्या आडून लोकशाही आणि हुकूमशाही याची सरमिसळ चालू आहे याचे हे उदाहरण आहे.
20 Jan 2018 - 10:46 pm | गॅरी ट्रुमन
भारतातही अशा प्रकारच्या समजुती (बघणार्याच्या दृष्टीकोनातून श्रध्दा किंवा अंधश्रध्दा) आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पेणला भेट दिली की त्याची खुर्ची जाते. आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी नॉयडाला भेट दिली की त्याची खुर्ची जाते.
अशाप्रकारचा समज अमेरिकेतही आहे/होता. या समजाप्रमाणे २० ने भाग जाणार्या वर्षात निवडून गेलेल्या अध्यक्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावर असताना मृत्यू होतो. १८४० मध्ये निवडून गेलेले विलिअम हेनरी हॅरीसन, १८६० मध्ये निवडून गेलेले अॅब्रॅहॅम लिंकन, १८८० मध्ये निवडून गेलेले जेम्स गारफील्ड, १९०० मध्ये निवडून गेलेले विलिअम मॅकिन्ली, १९२० मध्ये निवडून गेलेले वॉरन हार्डिंग, १९४० मध्ये निवडून गेलेले फ्रॅन्कलीन रूझवेल्ट आणि १९६० मध्ये निवडून गेलेले जॉन केनेडी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पदावर असताना मृत्यू झाला होता. १९८० मध्ये निवडून गेलेल्या रॉनाल्ड रेगन यांच्यावर पदावर आल्यानंतर दोन-तीन महिन्यातच गोळीबार झाला होता आणि त्यात ते जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्यांचे ब्लड प्रेशर ६० पर्यंत खाली आले होते. पण मुळातली तब्येत चांगली असल्यामुळे ते त्यातून निभावून गेले.अन्यथा वयाच्या ७० व्या वर्षी असा प्रकार झाल्यानंतर दुसरा कोणी माणूस गेलाच असता. २००० मध्ये निवडून गेलेल्या जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यावर जॉर्जिया देशात २००५ मध्ये ग्रेनेड फेकून त्यांची हत्या करायचा प्रयत्न झाला होता खरा पण आयत्या वेळी ग्रेनेड न फुटल्यामुळे बुश त्यातून बचावले.
आता २०२० मध्ये निवडून आलेल्या अध्यक्षांना कार्यकाळ पूर्ण करता येतो का हे बघायचे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जानेवारी २०२९ पर्यंत थांबावे लागेल.