विलास देशमुखांना खुले पत्र !

मयुरेशवैद्य's picture
मयुरेशवैद्य in काथ्याकूट
22 Oct 2008 - 9:35 pm
गाभा: 

विलास देशमुखांना खुले पत्र.

बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या. ते कधी आणि कसे होणार त्याचा काहीच पत्ता नाही, (मुबईत जागांचे भाव मात्र शांघाय सारखेच !). परंतु, आपण आता मुंबईचे उत्तरप्रदेश अथवा बिहार नक्कीच कराल ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.

नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण नक्की कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहात असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐन दिवाळी व छठ पूजेच्या निमित्ताने आपण उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांना दिलेली हि भेटच! राज ठाकरेंच्या हक्क मागण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप असणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांचे मुद्देही तितकेच योग्य आहेत. आपण त्यांच्या कृतीबद्दल त्यांना तुरुंगात डांबले आणी ज्या मुद्द्यासाठी मनसेने आंदोलन केले त्या मुद्द्याला मात्र जाणीवपूर्वक बगल दिलीत. लालू यादव ह्यांनी मात्र आपल्या लोकांची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या लोकांच्या रेल्वे भरतीच्या आड येणाऱ्या रा़ज ठाकरेंना तुमच्यातर्फे अटक करविली. आपल्या लोकांसाठी रेल्वेची परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा केली व मुंबईत छठपुजेचीही ( मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून ) पुरेपूर सोय करून घेतली.

आपल्याच बरोबरीने, शिवराज पाटीलही राजवर तितक्याच जोमाने लोकसभेत कडाडले ( हाच कणखरपणा त्यांना अतिरेक्यांच्या बाबतीत मात्र दाखवता आला नाही. ). राज ठाकरेचे विचार मराठी माणसाला मान्य नाहीत अश्या आशयाचे (हास्यास्पद)विधानाही त्यांनी केले. आपल्या काँग्रेसचे महाराष्ट्रातले इतर खासदारही रेल्वे नोकर भरती संबंधी काहीही आवा़ज उठविताना दिसले नाहीत. पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांची आणि काँग्रेसची, मराठी माणसांशी नाळ किती जुळतेय ते लक्ष्यात आले. आपणही, राज ठाकरेंच्या नावाने मराठी माणसांच्या भावनांना मिळणारी वाट, त्यांना अटक करून बंद केलीत. राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण रेल्वेभरतीबद्दलही तितकेच आग्रही आणि मराठी हितसंरक्षणासाठी काही घोषणा केली असती, तर आम्हाला तुम्ही आमचे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटला असता. परंतु महाराष्ट्राच्या मागण्यांसाठी आमचे दिल्लीतील प्रतिनिधी काहीही करत नाहीत हे राजचे म्हणणे आपण आणि आपल्या पक्षाच्या खासदारांनी सत्य करून दाखविले.

पटण्यामध्ये आज राजच्या अटकेच्या बातमीने फटाके फुटत होते. वर त्यांना परीक्षा पुन्हा देण्यासंबंधी घोषणाही झाली होती. माघारी परतल्यावर त्यांनी तिथे केलेली स्टेशनची नासधूस ही काही "मिडिआवाल्यांसाठी" बातमी नव्हतीच. इथे, मात्र राजही अटकेत, रेल्वेभरतीबद्दल मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल आपणाकडून एक शब्दही नाही! आपण व आपल्या पक्षाने, राष्ट्रवादी ( महाराष्ट्रवादी नाही ) काँग्रेसबरोबर मिळून आपल्याच मराठी माणसाला दिलेली ही दिवाळी भेट अवघा महाराष्ट्र नेहमीचं लक्षात ठेवेल ह्यात अजिबात शंका नाही. ह्यापुढे मात्र आपणास निवडणूक लढवायची असल्यास आबांबरोबर आपण ती उत्तरप्रदेश किंवा बिहारमधूनच लढवावी कारण आपला खरा चाहता वर्ग आता तिथेच असणार आहे, महाराष्ट्रात नाही.

इथे दहिसरला लिंकरोडवर अलीकडेच ( दहिसर सध्यातरी आपल्याच राज्यात आहे ), अनधिकृतरीत्या खारफुटीवर भराव टाकून काही हजार झोपड्या ( अर्थातच भैय्यांच्या ) जन्माला आल्या आहेत. ज्याप्रकारे आपण कायद्यावर बोट ठेवून, मराठी हिताच्या विरोधात, राजवर कडक कारवाई केली, तशीच कारवाई ह्या "गरीब बिचाऱ्या भैय्यांच्या अनधिकृत" वस्तीवरही करणार का? की येत्या निवडणुकांसाठीचा आपला हाच मतदार संघ असेल? की लालूंनी मागणी करताच आपण ह्या झोपड्याही अधिकृत करून त्यांना मोफत घरे देणार? कारण आपण तिथे जाऊन निवडणुका लढविण्यापेक्षा त्यांनाच इथे वसविणे हा उत्तम पर्याय आपणासाठी खुला आहेच. मग मराठीची कितीही गळचेपी का होऊ नये आपणास चिंतेचे कारण नाही. मीडिआ, राष्ट्रवादी, भैय्ये आणि पक्षश्रेष्ठी खूश म्हणजे अवघा महाराष्ट्र खूश नाही का? असो ह्यापुढे आपणास, आपल्या पक्षास आणि आपल्या "सहकारी" पक्षास माझे तरी मत नाही. तुम्ही जर महाराष्ट्रात मराठी माणसाचे राजकारण करणार नसाल, मुंबईतून मराठी हद्दपार करणार असाल, रेल्वेत फक्त लालूंचे भैय्येच भरणार असाल, तर महाराष्ट्राही तुम्हाला येत्या निवडणुकीत कायम लक्षात राहील असा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.

मयुरेश वैद्य.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

22 Oct 2008 - 9:40 pm | सखाराम_गटणे™

सकाळीच हे पत्र मिपावर होते.
ते ढकलपत्रात मिळते आहे.

मिपाच्या नवीन नियमांनुसार हे पत्र नियमांत बसत नाही.

शैलेन्द्र's picture

22 Oct 2008 - 9:48 pm | शैलेन्द्र

तरिहि पत्र छान आहे, याचा दुवा येथे ठेवता येइल का?

मयुरेशवैद्य's picture

22 Oct 2008 - 10:19 pm | मयुरेशवैद्य

हे पत्र मी बर्‍याच ठिकाणी मेल केले आहे. कोणी आधी इथे ते टाकले असल्यास हरकत नाही. लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे आणी त्यावर चर्चा झाली पाहीजे हे महत्वाचे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 9:42 pm | प्रभाकर पेठकर

अभिनंदन मयुरेश. मुद्देसूद लिहिले आहेस.

हेच पत्र लोकसत्तेस, महाराष्ट्र टाइम्स (कि 'महाराष्ट्रकाळ?'), सकाळ इत्यादी वर्तमान पत्रांना पाठवावे. समस्त मराठी माणसांनी वाचले पाहिजे.

मयुरेशवैद्य's picture

22 Oct 2008 - 10:16 pm | मयुरेशवैद्य

पाठविले आहे ! मेल केलाय. बघु त्याना मिळत का !

पांथस्थ's picture

22 Oct 2008 - 9:58 pm | पांथस्थ

काल हेच पत्र घाशीराम कोतवालाने टाकले होते. तात्यांनी ते काढुन टाकले होते. परत कसे आले?
मयुरेशवैद्य : सदस्य कालावधी 29 मिनीटे 5 सेकंद???

---
आहे हे अस आहे.

विसोबा खेचर's picture

23 Oct 2008 - 7:33 am | विसोबा खेचर

तात्यांनी ते काढुन टाकले होते. परत कसे आले?

एकदा काढून टाकल्यावरही पुन्हा हे पत्र इथे का दिले गेले हे कळले नाही.. असो..

तात्या.

कलंत्री's picture

22 Oct 2008 - 10:09 pm | कलंत्री

मयुरेश आपले म्हणणे मला तंतोतंत पटते. विलासरावांसारखा मुख्यमंत्री मी कमीत कमी ऐकला नाही.

राज्य, कायदा आणि सुयवस्था असा काही प्रकार असतो बहुधा हेच त्यांना माहित नसावे. मुख्यमंत्र्यांचे पद हे पक्षीय राजकारणापेक्षा मोठे असते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काही वारसा आहे हेही सध्या त्यांना माहित नसावे.

कोणी एक राजकारण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरतो, साध्या न्यायालयात नेण्यावर इतका हिंसाचार होतो, यात कोणाची थट्टा आहे हेच समजत नाही.

कोणताही पक्ष, शासन आणि जाणकार देशहित आणि देशाच्या समस्यावर बोलतांना दिसत नाही.

शिवाजीच्या वेळेस लोकशाही नव्हती हे खरे. पण चार / पाच मावळे एकत्र आले आणि कोणा मुसलमानाला मारत होते असेही ऐकले नाही. आजच्या राजकारणाने त्याही पेक्षा खालची पातळी गाठलेली आहे. परराज्याच्या नौकरीसाठी येणार्‍यांना मारहाण होते, शासन त्यात बघ्याची भूमिका घेते यात महाराष्ट्राचीच लाज जाते असे मला वाटते.

असो. आपले पत्र विलासरावजी वाचणार नाही आणि वाचले तरी त्यांना आपले मुद्दे पटणार नाहीच.

मयुरेशवैद्य's picture

22 Oct 2008 - 10:24 pm | मयुरेशवैद्य

अजिबात लाज जात नाही. मुळात आता हे "लाजाणंच" आता आपण सोडलं पाहीजे. हिंन्दी मिडिआ इतक्या उन्मत्तपणे खोडारडेपणा करतो, त्याना नाही लाज वाटत ! लालु यादव ह्यापूढे महारष्ट्रात परी़क्षा घेणार नाही म्हणून सांगतो, त्यांना नाही लाज वाटतं ? आपण इतके वर्ष लाजतोच आहोत.

( शिवशाही कधीच संपली आहे ! सध्या यादवी आहे ! )

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 11:11 pm | प्रभाकर पेठकर

कलंत्री साहेब,

परराज्याच्या नौकरीसाठी येणार्‍यांना मारहाण होते, शासन त्यात बघ्याची भूमिका घेते यात महाराष्ट्राचीच लाज जाते असे मला वाटते.
मुळात परराज्यातील तरूण महाराष्ट्रात येऊन नोकर्‍या पकडतात आणि आपल्या मराठी मुलांना डावललं जातं ह्याबाबत शासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राची लाज तिथे जाते.
मुंबईतल्या बहुतेक स्टेशनवरील स्टॉल्स हे 'गुप्ता', 'अग्रवाल' ह्यांचे आहेत तिथे 'कुळकर्णी' ,'पाटील', 'देशमु़ख' अशी नांवे दिसावीत असा प्रयत्न शासन करत नाही, तिथे महाराष्ट्राची लाज जाते.
महाराष्ट्रातील रोजगार निर्मितीत १०० टक्के वाटा महाराष्ट्रातील 'आपल्या मुलांना' मिळावा असे मुख्यमंत्र्यांना वाटत नाही, तिथे महाराष्ट्राची लाज जाते.
पक्षीय राजकारणासाठी, स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी, पक्ष श्रेष्ठींचे लांगुलचालन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहारच्या लालूप्रसादांची छटपुजेची व्यवस्था आम्ही करू असे म्हणतात तेंव्हा कलंत्री साहेब......
महाराष्ट्राची लाज जाते हो, लाज जाते.

भास्कर केन्डे's picture

23 Oct 2008 - 1:14 am | भास्कर केन्डे

महाराष्ट्राची लाज घालवली तर आहेच पण ती देशमुख-पाटलांच्या निर्लज्ज पायचाट्या सरकाराने.

कलंत्री साहेब, आपण टाईम्स, बीबीसी यांच्या स्टायलीत लिहिलेत. तेही असेच करतात. भारतात काहीही घडले की त्यांना भारताल्या तथाकथित सेक्युलरांच्या प्रेमाचा उबाळा येतो. व जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याचे खापर उजव्यांवर फोडून ते मोकळे होतात. कमालीचे साम्य वाटले तुमच्या आणि त्यांच्या लेखनात.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व.

बाकी पंतंनी मुद्दे व्यवस्थित मांडलेत. त्यांच्यांशी १००% सहमत.

आपला,
(मर्‍हाटी) भास्कर

संदीप चित्रे's picture

23 Oct 2008 - 2:27 am | संदीप चित्रे

पेठकरकाकांशी सहमत...
दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखतो म्हणण्यातच आपल्याला कौतुक !

फक्त कलंत्री साहेब असे कोणते घृणास्पद कृत्य तुम्ही केले आहे ज्यामुळे तुम्हाला लाज वाटते? हक्कासाठी मराठी माणुस लढत आहे त्यात त्याला लाज वाटण्याचे काही कारण नाही. निदान तुम्हाला तरी लाज वाटु नये अशी अपेक्षा आहे.
वेताळ

चन्द्रशेखर गोखले's picture

23 Oct 2008 - 8:20 pm | चन्द्रशेखर गोखले

श्री मयुरेश यांनी अतिशय बोलक पत्र लिहिल आहे. महाराष्ट्राच्या लोक भावना त्यातून अतिशय समर्पकपणे व्यक्त झालेल्या आहेत.
श्री शिवराज पाटील यांनी राज यांच्या भुमिके बद्दल जो खणखरपणे आवाज उठवला तसा त्यांनी अतिरेक्याबाबतीत ऊठवला पाहिजे होता हे तुमच म्हणण मला आजिबात पटलेल नाही.अतिरेक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायचा असतो, त्यांच्या वर कारवाई करुन नव्हे. ही तुम्हाला कस समजत नाही! महाराष्ट्राच्या अस्मिते साठी राजिनामा देणारे चिंतामणराव देशमूख कूठे आणि हे देशमूख कुठे!
बाकी राज यांची बदनामी कोणिही कीतिही करो त्या सर्वाना मी एवढेच सांगु इत्छितो..
तुमची तुम्ही करा आरास
तुमचे तुम्ही ओवाळा दिवे
तुमच्यात मी येवू कसा
बदनाम झंजावात मी.....!
(सुरेश भटांच्या ओळी)

भास्कर केन्डे's picture

23 Oct 2008 - 8:59 pm | भास्कर केन्डे

मयुरेशच्या अनुमती नंतर मी हे पत्र त्यांच्या नावासहीत तीनशे लोकांना पाठवले.

उचललीस मूठ तू... धन्यवाद मयुरेश!

आपला,
(देशद्रोही सोनिया साम्राज्या विरुद्ध मुठ उचललेला) भास्कर

श्री भास्कर यांस,
आपण आपल्या नावा मागे लावलेले विशेषण हे मिपा धोरणा विरुद्ध आहे असे माला वाटते.
कोणालाही पुराव्याशिवाय देशद्रोही म्हणण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.
क्षमस्व.

आपला आरंभशूर........... (|:

भास्कर केन्डे's picture

24 Oct 2008 - 1:25 am | भास्कर केन्डे

आपल्या प्रतिसादाला आम्ही प्रतिवाद करु शकतो. पण तुर्तास वेळ नाही. त्यामुळे संपादक मंडळाला वाटल्यास त्यांनी ते विषेशन उडवून लावावे.

जाता जाता... प्रतिवादाचे कच्चे मुद्दे...
१. महाराष्ट्र देशासाठी बलिदाने करत आला आहे. पण दिल्लीश्वरांनी नेहमी महाराष्ट्र विरोधी धोरण स्विकारलेले आहे. सध्या त्याचे नेतृत्व कोणाकडे आहे? महाराष्ट्र जर देशाचा कणा आहे तर महाराष्ट्राचा द्रोह करणार्‍यास काय म्हणावे?
२. संसदेवर हल्ला करणारा सरकारी दयेने जिवंत आहे मात्र "भारत माता की जय" म्हणनार्‍या नि:शस्त्र निदर्शकांवर गोळीबार करुन त्यांना मारले जाते (जम्मू, नागलँड, वगैरे). गोळीबाराचा हा आदेश सुद्धा दिला तो सरकारनेच ना? आणी ते सरकार चालवणारे रिमोट कोण? मग तो देशद्रोह नव्हे का?
३. देशाच्या आंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणार्‍या कोणा तिनपाट देशाच्या (व्हॅटिकन) कानपटात वाजवाचे सोडून त्यांना रेड कार्पेट देण्याच्या वल्गना करणारी देश विरोधक नव्हे का?
४. दूरदृष्टीच्या कटाचा भाग म्हणून परकीय मदतीने पद्धतशीरपणे देशाची डेमोग्राफी बदलवणार्‍या तसेच विरोधक देशभक्तांना ठार मारणार्‍या इव्हँजिलिस्टांच्या पाठीशी उभी राहून व पर्यायाने देशविभाजनाला चालना देणारी देशद्रोही नव्हे काय?

असो. तुर्तास तरी येवढेच. यातही जर काही अक्षेपार्ह वाटत असेल तर संपादकीय मंडळाने ते उडवावे ही नम्र विनंती.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

आपला,
(निर्भिड) भास्कर