गाभा:
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military...
प्रतिक्रिया
25 Jan 2018 - 7:38 am | अर्धवटराव
होयबा कॅटॅगरीचे अनेक महंत काँग्रेसमधे पं.प्र. पदाला 'न्याय' द्यायला तयार आहेत. मुद्दा असा कि काँग्रेससमर्थीत पंप्र कोण बनु शकतं. कुठलाच एस्टॅब्लीश्ड सी.एम. औटघटकेच्या पं.प्र. खुर्चीत बसायला केंद्रात यायला बघणार नाहि (ममतांबद्दल काहिही अशक्य नाहि म्हणा... पण मग डावे आडवे येतील). पवार साहेबांकडे राष्ट्रवादीचे खासदार (कितीही का असेना), सेनेचे खासदार (बाहेरुन पाठिंबा, संसदेत मतदानाच्यावेळी अनुपस्थीत राहाणे वगैरे उपचार करुन), भाजपेतर (आणि काँग्रेसेतर) महाराष्ट्रीय खासदार, आणि महाराष्ट्रात राज्यसरकार फॉर्मेशन असं पॅकेज उपलब्ध आहे. एव्हढ्या सामुग्रीवर पवारसाहेब आपली खिचडी रांधायला नक्की घेतील. असो. पवारांची उमेदवारी हास्यास्पद म्हटल्यावर तसंही पुढे बोलण्यात काहि पॉईण्ट नाहि.