होट्टल : आतापर्यंत मला पुरातत्व खाते म्हणजे प्राचीन स्थळांच्या बाहेर निळी माहितीपट लावणारी संस्था वाटायची कारण सगळ्या प्राचीन स्थळांच्या देखरेखी साठी काही विशेष प्रयत्न हि संस्था करतच नाही हा माझा समज सहयाद्री मधील किल्ले आणि बरीच प्राचीन मंदिरे बघून झाला होता. माझ्या ह्या विचारला छेद बसला तो होट्टल येथील प्राचीन मंदिराचा पुरातत्व विभागाने केलेला कायाकल्प पाहून.
होट्टल हे नांदेड जिल्ह्यातील, देगलूर तालुक्या मधील एक लहानसे खेडेगाव आहे, पण गावामध्ये असलेल्या मंदिरामुळे हे गाव प्राचीन काळी महत्व राखून असणार यात शंका नाही.
होट्टल येथे जाण्या साठी देगलूरहुन जात येते, मुंबई- देगलूर एस. टी. महामंडळाची डायरेक्ट बस आहे कुर्ला नेहरू नगर येथून, तसेच बऱ्याच खाजगी बसेस पण जातात मुंबई वरून. मुंबई - देगलूर हे अंतर साधारण पाने ६५० कि. मी. आहे. संध्याकाळी बसेस असतात व त्या सकाळी ७ ला सोडतात, देगलूर वरून होट्टल १० कि. मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी तुम्ही रिक्षा ठरवून जाऊ शकता.
दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई - बिदर ह्या रेल्वे गाडीने आरामात जाणे, हि गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री ९:००. ला सुटते. ह्या गाडीने जाऊन उदगीर येथे उताराने आणि मग उदगीर वरून होट्टल ला जाणे. उदगीर वरून होट्टल ५५ कि. मी. आहे. उदगीरवरून जाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे उदगीर चा किल्ला, तोही या भेटीत बघता येईल. राहण्याची आणि खाण्याची सोय पण उदगीर मध्ये चांगली होऊ शकते, बरेच ए.सी / नॉन ए.सी लॉजेस तसेच चांगले हॉटेल्स आहेत उदगीर मध्ये. उदगीर वरून तुम्ही गाडी ठरवून जाऊ शकता किंवा मग एसटी ने जाऊ शकता.
आता मंदिर विषयी इतक्या आडगावात एवढी सुंदर मंदिरे असतील हे प्रथम खरेच वाटत नव्हते, कल्याणी-चालुक्य राजवटीने बांधलेली हि मंदिरे मूर्तिभंजकांनी विध्वंस केल्या नंतर तशीच पडून होती पण पुरातत्व खात्याने केलेल्या अप्रतिम कामामुळे आज पुन्हा दिमाखात उभी आहेत.
४ ते ५ फुटांच्या गणेश, विष्णू आणि लावण्यकन्या (प्रचेतस यांनी त्याच्यातील भेद विस्तृत करून सांगितले तर आमच्या पण ज्ञानात भर पडेल) यांच्या सुंदर शिल्पांची मंदिराचा बाह्य भाग अलंकृत केला आहे.
गर्भगृहाच्या चौपाटीवरील नक्षीकाम
होट्टल मधील आणखी एक भग्न मंदिर
प्रतिक्रिया
9 Dec 2017 - 12:19 pm | कंजूस
छान ओळख.
पुरातत्व खाते नवीन बांधकाम करत नाही. आहे तसेच ठेवते.