ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे पसायदान अस्तिकांच्या सर्वोत्तम प्रार्थनांपैकी एक समजले जाते. (मी अज्ञेय असल्यामुळे ते समजून घेऊ शकतो.) अशा उदात्त ईश्वरनिष्ठेचा स्वतःतील खलत्वापासून दूर ठेऊन घेण्यासाठी अनेकांना फायदा होतो, (ईश्वरनिष्ठांचे मांगल्य, मन शांती ईत्यादी फायदे आहेतच)
पण सामाजिक वास्तव तर्कशास्त्राच्या चिमुटभर मिठासोबत स्विकारावे लागते . सर्वच आस्तीक खल प्रवृत्ती विहीन असतील असे प्रमाणपत्र देता येत नाही तसे सर्व नास्तिक खल प्रवृत्तीचे असतात असा शिक्काही मारता येत नाही (ज्यांचे या बाबत दुमत आहे त्यांनी माझ्या मिपावरील स्वामी विवेकानंदांचे संदर्भ देणारे दुवे आणि प्रतिसाद वाचावेत) .
पसायदानातील काही ओळींचा संदर्भ घेऊन वेगळ्या विषयावर एक लेख लिहावयाचा आहे. पण त्याच वेळी हा ही विषय सूचला की नास्तिकातही सत-प्रवृत्त लोक असू शकतात त्यांची ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे पसायदानाची आळवणी करताना देव आणि ईश्वरनिष्ठा या संकल्पनांनी जरशी पंचाईत होते, पण "खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥" या बद्दल त्यांचा वाद नसतो.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
यातील स्वधर्म शब्दाची व्याख्या धार्मिक न राहता स्वभाव विशेष + कर्तव्य अशी रहाणार असेल तर याही ओळीत त्यांना फारसे काही वावगे दिसू नये असे वाटते.
वर्षत सकळमंगळी ।
'सकळांचे मगंल होवो' या प्रार्थनेतही त्यांना काही चुकीचे वाटणार नाही.
"ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥" या ओळींच्या पुढे नास्तिकांना कदाचित पुर्नलेखन करावे लागेल. नास्तिकांच्या प्रार्थनेत पसायदान शब्द असावा का या बद्दल काही नास्तीक आणि काही आस्तीक साशंक असल्यास पर्यायी चपखल शब्दाचाही विचार करण्यास हरकत नसावी.
धागा लेखाचा उद्देश नास्तीकांना चालेल्शी उदात्त प्रार्थना लेखनास प्रोत्साहन आहे. उद्देश्य ज्ञानेश्वर माऊली लिखीत पसायदानाचे विडंबन अथवा आस्तीकांच्या भावना दुखावण्याचा ठेऊ नये -कारण उद्दीष्टाच्या उदात्ततेला बाधा येईल हे लक्षात घ्यावे. पद्यच पाहीजे असे नाही गद्य स्वरुपात लिहिले तरीही चालेल.
आस्तीकांनी नास्तिकांचे पसायदान लिहू नये अथवा नास्तिकांची प्रार्थना कल्पून दुराग्ररहीत थट्टा काव्य लिहिण्यासही माझी ना नाही पण उद्दीष्ट सकारात्मक ठेवावे.
सुचले तर लिहा नही तर चर्चा करावी पण अनुषंगिकापलिकडे अवांतर टाळण्यास आणि धागा चर्चेत सकारात्मक सहभागासाठी आभार.
प्रतिक्रिया
16 Nov 2017 - 11:15 am | babu b
जो जे वांछील तो ते लाहो.
असे आधीच लिहिले आहे. त्यामुळे नास्तिकांचे पुन्हा वेगळे गीत कशाला ?
16 Nov 2017 - 12:15 pm | कंजूस
जरा विचित्र प्रश्न आहे. देव असणाय्रा ,तसे समजणाय्रा एका मोठ्या चौकटीत आस्तिकांनी स्वत:ला लोटून दिलेले आहे. त्यांच्या अवतीभवती आस्तिकच आहेत. आपल्यातल्या सर्वांना/प्रत्येकाला जगण्यातला एकच अनुभव येत नाही हे त्यांना माहित आहे म्हणून ते प्रार्थना करत सुटतात. नास्तिक त्या चौकटीबाहेरच आहेत. तसल्या प्रार्थना कोणासाठीच करणार नाहीत. आस्तिक नास्तिकांनी एकमेकास " तू बाहेर ये मग बोलू" म्हणणे वेळेचा अपव्यय आहे.
16 Nov 2017 - 1:23 pm | माहितगार
नास्तिकांना प्रार्थना कुणाला आणि का असा प्रश्न पडत असेल पण प्रार्थनांचे एक स्वरूप सदिच्छांचे आहे आणि सदिच्छा नास्तीकही देऊ शकतात. उद्देशून कुणाला तर समस्त मानवजातीला आणि बुद्धी असलेल्या प्राणी मात्रांना ते त्यांची प्रार्थना/ सदिच्छा उद्देशू शकतात.
16 Nov 2017 - 2:50 pm | टवाळ कार्टा
आस्तिक = सत-प्रवृत्ती
नास्तिक = खल-प्रवृत्ती
त्या हिशोबाने सगळे शांतताप्रेमी धर्माचे अतिरेकी सत-प्रवृत्तीचे असतात म्हणायचे का?
बाकी चालूदे
16 Nov 2017 - 3:12 pm | माहितगार
या शंकेची ज्ञानेस्वर माऊलींनी आधीच काळजी घेऊन ठेवली असावी, ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पसायदानात म्हणतात
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
16 Nov 2017 - 3:31 pm | माहितगार
धागा लेखाच्या सुरवातीस
सर्वच आस्तीक खल प्रवृत्ती विहीन असतील असे प्रमाणपत्र देता येत नाही तसे सर्व नास्तिक खल प्रवृत्तीचे असतात असा शिक्काही मारता येत नाही
हेहि विशेषत्वाने नोंदविलेले आहे ह्याची दखल घ्यावी
16 Nov 2017 - 3:31 pm | पुंबा
नास्तिकांना पसायदानातील ईश्वर शब्दावर आक्षेप नसावा असे वाटते.
संदर्भः
आता, माझे मतः पसायदानात जे मागितले आहे ते इतके उदात्त, भव्य आणि इन्क्लुजिव्ह आहे की असल्या छिद्रान्वेषणाची गरज पडू नये.
16 Nov 2017 - 3:48 pm | माहितगार
तर ज्ञानेश्वर माउलींच्या ईश्वरापुढे मराठी आंतरजालावरचे नास्तिकही नतमस्तक आहेत म्हणायचे.:) संदर्भासाठी अनेक आभार
16 Nov 2017 - 6:04 pm | माहितगार
शोधयंत्र की जय ! आत्ताच तपासले ज्ञानेश्वरीत पहिला ते अठरावा अध्याय किमान आठ ओव्या तरी आणि शब्दाने चालू होताना दिसतात. बाकी शब्दही तपासतो.
16 Nov 2017 - 6:24 pm | माहितगार
'होआवें ' शब्दही बर्याच म्हणजे दहा एक तरी ओव्यातून सहज शोधात दिसतो आहे. अर्थात जी हा प्रत्यय इतर ठिकाणि होआवें सोबत दिसत नाहीए.
16 Nov 2017 - 7:37 pm | माहितगार
सोळाव्या अध्यायाच्या शेवटी दिजो जी असा शब्दोपयोगात जी हा प्रत्यय येताना दिसतोय तेही पसायदान मागण्याच्या उद्देशाने.
खालील ओव्यांचा कुणी अनुवाद देऊ शकल्यास बरे पडेल.
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥ ४६८ ॥ एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥ ४६९ ॥ इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥ ४७० ॥ संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥ तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥ ४७२ ॥ म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥
16 Nov 2017 - 11:21 pm | अरविंद कोल्हटकर
ह्या ओव्यांचा इंग्लिशमध्ये अर्थ (रामचन्द्र केशव भागवत ह्यांनी दिल्याप्रमाणे) पुढे चिकटवत आहे. (मराठीमध्ये अर्थासाठी साखरेबुवा, बाळकृष्ण अनंत भिडे ह्यांची पुस्तके पहावी.)
ज्ञानेश्वरीच्या भाषेसंबंधीच्या तुमच्या पुष्कळशा शंका डॉ. मुरलीधर गजानन पानसे ह्यांच्या Linguistic Peculiarities Of Jnanesvari ह्या प्रबंधामुळे सुटू शकतील असे वाटते. हा ग्रन्थ DLI मध्ये उपलब्ध आहे, तसेच archive.org येथील DLI च्या mirror मध्येहि मिळेल.
16 Nov 2017 - 6:30 pm | माहितगार
विशेषीं हा शब्द मात्र केवळ सतराव्या अध्यायातील ओवीत आणि पसायदानाच्या आठव्या ओवीत दिसतो . लोकीए / लोकीये साठी ज्ञानेश्वरीच्या वेगवेअळ्या आवृत्त्या तपासल्या जावयास हव्यात . मराठी विकिस्रोतावरील आवृत्तीत लोकी शब्द मोजक्या प्रमाणात येताना दिसतोय तर लोकीए लोकीये दिसत नाहीए. पण एखादा लेखन भेद ज्ञानेह्स्वरीच्या इतर आव्वृत्त्यात आहे का हे तपासले जाण्याची गरज असावी.
16 Nov 2017 - 6:32 pm | माहितगार
दृष्टादृष्ट हा शब्द तीन अध्यायात येताना दिसतोय तेथे तो कोणत्या अर्थाने आला आहे हे जाणकारांनी पहावे
16 Nov 2017 - 6:36 pm | माहितगार
विजये , विजय शब्द मात्र अठराव्या शिवाय इतर आध्यायात दिसला नाही . विजय शब्द इतर अध्यायात फारच कमी असणे ही ज्ञानेश्वरीच्या इतर आवृत्त्या तून तपासण्याची गरज दाखवते का ?
16 Nov 2017 - 4:57 pm | स्वधर्म
या निमित्ताने
अाणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इए
दृष्टादृष्ट विजये | होअावे जी ||
या शब्दांचा अर्थ नक्की काय अाहे?
16 Nov 2017 - 5:06 pm | पुंबा
संदर्भः यनावालांचा उपक्रमावरचा उपरोल्लिखित लेख
16 Nov 2017 - 5:06 pm | माहितगार
पुंबांनी दिलेला http://diwali.upakram.org/node/182 दुवा वाचून झाल्यावरचा प्रश्न आहे की आधीचा ? आधीचा असल्यास दुवा वाचून घ्यावा.
16 Nov 2017 - 6:05 pm | गामा पैलवान
माहितगार,
नास्तिकांनी फुकटात सदिच्छा का म्हणून द्यायच्या? जग गेलं खड्ड्यात माझं भलं झालं पाहिजे, बास!
तसंही पाहता सदिच्छा म्हणजे सत् अशी इच्छा. तर नास्तिकांनी सत्च्या भानगडीत पडूंच नये.
-गा.पै.
16 Nov 2017 - 6:39 pm | माहितगार
सत म्हणजे इथे चांगले/चांगली इच्छा या अर्थाने. बाकी आपल्या प्रतिसादाला उत्तर देण्याची जबाबदारी नास्तिकांची . मी त्यांच्या वतीने बोलणे श्रेयस्कर होणार नाही.
16 Nov 2017 - 10:09 pm | babu b
गामदेवा ,
आस्तिकानी जर काही मागितले आणि त्याना ते मिळालेच , तर नास्तिकानाही आपोआपच मिळेल.
१. महामहीम मोदीश्वर बोलले .. सर्वाना प्रत्येकी १५ लाख मिळतील . यदाकदाचित ते आलेच , तर भक्त व अभक्त दोघानाही मिळतील.
भक्त बोलू लागला , अभक्ताना पैसे मिळू नयेत, तर कुणालाच मिळणार नाहीत.
२. गावावर पाउस पडावा म्हणून यज्ञ केला तर तो पूर्ण गावावरच पडेल. जो यज्ञाला हजर नव्हता त्याच्याही शेतावर पाउस पडेलच.
जर यज्ञ करणारा असे बोलू लागला की शेजारच्या शेतावर पाउस पडू नये , तर दोघांच्याही शेतावर पाउस पडणार नाही.
नास्तिकांचे भले होउ नये , आस्तिकांचेच व्हावे , असे म्हणून पसायदान म्हणणे हास्यास्पद होइल. कारण ही कृती पसायदानाच्या मूळ अर्थालाच काँट्राडिक्टरी होईल !
16 Nov 2017 - 10:13 pm | babu b
म्हणूनच मी लिहिले .. नास्तिकाना वेगळे पसायदान लिहिण्याची गरज नाही. आस्तिकानी मागितले की झाले ! त्यात सगळेच येतात.
16 Nov 2017 - 10:57 pm | गामा पैलवान
babu b,
तुमचा प्रस्ताव शंभर टक्के मान्य. नास्तिकांनी काही मागायचं झालं तर ते केवळ स्वत:साठीच मागावं. इतर जगाच्या भानगडीत पडू नये.
आ.न.,
-गा.पै.
17 Nov 2017 - 11:09 am | सुबोध खरे
महामहीम मोदीश्वर बोलले .. सर्वाना प्रत्येकी १५ लाख मिळतील . यदाकदाचित ते आलेच , तर भक्त व अभक्त दोघानाही मिळतील.
बरेच दिवस झाले होते. चंपाबाई (उर्फ मोगा/ जामोप्या/ हितेश) पचकल्या कशा नाहीत म्हणून विचारच करत होतो.
वैचारिक बद्धकोष्ठ काही जाता जात नाही. कुठलाही धागा असो मोदींवर आग पाखडल्याशिवाय सकाळी साफ होत नाही.
16 Nov 2017 - 6:06 pm | गामा पैलवान
माहितगार,
नास्तिकांनी फुकटात सदिच्छा का म्हणून द्यायच्या? जग गेलं खड्ड्यात माझं भलं झालं पाहिजे, बास!
तसंही पाहता सदिच्छा म्हणजे सत् अशी इच्छा. तर नास्तिकांनी सत्च्या भानगडीत पडूंच नये.
आ.न.,
-गा.पै.
16 Nov 2017 - 6:36 pm | सुबोध खरे
माउलींच्या ताजमहालाला वीट लावायची गरजच काय?
काय सदिच्छा वगैरे आहेत त्या गद्यातही देता येतात कि
मग हे नास्तिकांचे "पसायदान" वगैरे कशाला?
म्हणजे या विश्वात सर्वांचे भले होवो आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होवो वगैरे वगैरे
मुळात पसायदान म्हणजे प्रार्थना.
हे नास्तिक मुळात प्रार्थना कुणाची करतात? हा प्रश्न सोडवला कि मग पुढे जाता येईल.
16 Nov 2017 - 6:41 pm | माहितगार
नास्तिकहो तुमच्या पुढे मोठ मोठी आव्हाने आली आहेत. प्रतिसाद देण्यास अवतरीत व्हावे कॉलींग ऑल पट्टीचे नास्तीक :)
16 Nov 2017 - 6:43 pm | माहितगार
ताजमहालाला वीट नव्हे स्वतंत्र बीबी का मकबरा बनवण्याचे सुचवतोय
16 Nov 2017 - 11:17 pm | तिमा
नास्तिकांना एवढा आग्रह का ? त्यांना जगाचे भले होऊ नये असे वाटते?, असे तर नाही. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अनेक वेळा संपूर्ण विनाश झाला आणि पुन्हा पुन्हा जीवसृष्टी उभी राहिली. त्या प्रत्येक वेळेस देवाने वा अन्य कोणी शक्तीने,आस्तिकांच्या प्रार्थना ऐकल्या का ? सर्वांनाच एका फटक्यांत नष्ट केलेच ना ?
जगाचे रहाटगाडगे असेच चालू रहाणार, कोणी पूजा,प्रार्थना करो वा न करो!
16 Nov 2017 - 11:57 pm | पगला गजोधर
लानत है जी उसपर, दुनिया में ही रहकर
दुनिया में जो जीने के अंदाज़ को ना जाने
माथे या हाथों पे, चाँद या तारों में
किस्मत को ढूँढें पर खुद में क्या है ये ना जाने
खुद पे ही हमको यकीन हो...
मुश्किलें राह की आसान हो....
दोनों हाथों में ये जहां हो...
याई रे याई रे जोर लगाके नाचे रे
याई रे याई रे मिलके धूम मचाई रे
चल मेरे संग संग लेले दुनिया के रंग
होजा रंगीला रे, रंग रंग रंगीला रे
रंगीला रे
17 Nov 2017 - 9:02 am | अनन्त्_यात्री
(अथवा लिहिणारीस) काय म्हणावे - प्रज्ञानेश्वर, विज्ञानेश्वर की सर्वज्ञानेश्वर ?
17 Nov 2017 - 10:12 am | पगला गजोधर
मानव
17 Nov 2017 - 11:12 am | सुबोध खरे
प्रज्ञानेश्वर, विज्ञानेश्वर की सर्वज्ञानेश्वर ?
या तिन्हीत ईश्वर आहेच कि. मग तो नास्तिकांना कसा रुचेल?
17 Nov 2017 - 2:17 pm | माहितगार
ह्यापेक्षा धागा काढण्यापुर्वी मला पडलेला प्रश्न खरेतर निष्ठा संबंधाने होता. ईश्वरात विश्वास ठेवणारी पण सकारात्मक रचनात्मक उदात्तता ठेवणारी नास्तीक व्यकीने चांगल्या ईच्छा व्यक्त करताना आपल्या निष्ठा कुठे व्यक्त कराव्यात? विज्ञाननिष्ठ म्हणवावे ज्ञाननिष्ठ म्हणवावे की विवेकनिष्ठ म्हणवावे, की अजून काही ?
17 Nov 2017 - 9:23 am | सतिश गावडे
निसटत्या बाजूंच्या प्रतिक्षेत...
17 Nov 2017 - 2:19 pm | माहितगार
आपली ईच्छा पुर्ण करण्याचा योग आला. :)
17 Nov 2017 - 11:04 pm | सतिश गावडे
पण प्रतिसादाच्या शिर्षकातील निसटत्या शब्दातील शेवटचा कानाही निसटला. ;)
17 Nov 2017 - 12:43 pm | पगला गजोधर
मी ऑब्सर्व्ह करतोय, जाणोनबुजुन धार्मिक व आध्यात्मिक कन्सेप्ट यांची सरमिसळ करून
उगा आपलं नास्तिकांचा विचहंटिंगचा "पोग्राम", काही नॉन-नास्तिक करत आहेत ....
त्यांच्यामते मग... नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥ असे परखडपणे ऐकवणारे सुद्धा नास्तिकच असतील ...
असोच ....
त्यामुळे जाणूनबुजून मीही यनावाला यांच्या समर्थनार्थ, इथे दाखला देईल ...
सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ।
तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥
17 Nov 2017 - 12:49 pm | सुबोध खरे
अहो
नास्तिक लोकच जास्त करून खाजवून खरूज काढत असतात. आस्तिक लोकांचे धागे दिसत आहेत का? कि ते आम्हीच हुशार म्हणून काही तरी मुद्दाम काढताना दिसतात का?
आता नास्तिकांना "पसायदाना"चा गरज आहे का? उगाच स्पर्धा करायची म्हणून केल्यासारखे दिसत आहे.
17 Nov 2017 - 1:53 pm | माहितगार
वर कुणीतरी निसटत्या बाजू अजून कश्या आल्या नाहीत याची आठवण केली होती. :)
१) आस्तिक लोकांचे धागे दिसत आहेत का? कि ते आम्हीच हुशार म्हणून काही तरी मुद्दाम काढताना दिसतात का?
माझ्या मते उडदामाजी... हुस्सार सगळीकडेच असतात. बाकी हि गोष्ट हिशेब टेवण्या एवढी मला महत्वाची वाटलेली नाही. पट्टीचे हिशेब ठेवणारे नास्तीक असतील तर ते उत्तर देतील आणि आता खाजवले कुणी असा प्रश्न विचारतील तर उत्तार आपणास ठाऊक असावेच असो.
२) धागाकर्ता "....सर्व नास्तिक खल प्रवृत्तीचे असतात असा शिक्काही मारता येत नाही " असे म्हणतो आणि धागा काढतो म्हणजे तो नास्तीक आहे असे सिद्ध होत नाही. प्रतिसादकर्त्याचे मन शुद्ध नाही आणि अगदी पसायदानाची बाजू घेतानाही मन शुद्ध रहात नसेल तर इतर लोक नव्हे आपण स्वतःच पसायदानाचा स्वतःवरील प्रभाव कमी करत नाही होत ना याचा प्रतिसाद कर्त्यांनी विचार करावा असे वाटते.
२) आता नास्तिकांना "पसायदाना"चा गरज आहे का? उगाच स्पर्धा करायची म्हणून केल्यासारखे दिसत आहे.
धागा कर्ता नास्तीक आहे हे आपण गृहीत धरता आहात ही आपल्या प्रतिसादातील निस्टती बाजू आहे. धाग्याकर्त्याची मते नास्तीकांबद्दलची धागाकर्त्याने विवेकानंदांच्या सबंधीत विचारांवर नीट पारखून घेतलेली आहेत तशी ती प्रतिसादकर्त्याने पारखून घेतली आहेत का या बद्दलची प्रतिसादावरून साशंकता वाटते आहे. नास्तीकांचाही स्वतःचा म्हणून काही एक स्वधर्म असेल आणि त्याने त्यास्वधर्माच्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करावा असे खर्या खुर्या पसायदान भक्तास वाटणे सहाजीक आहे. ज्यांना नकारात्मकता दिसते त्यांनी स्वतःच्या डोळ्यावरील संकुचीततेचा चष्मा काढल्यास पसायदानातील उदात्ततेचा प्रकाश त्यांचे मार्गदर्शन करू शकेल असे वाटते. असो.
17 Nov 2017 - 3:47 pm | टवाळ कार्टा
missing sir
;)
17 Nov 2017 - 5:35 pm | सुखीमाणूस
कुठल्याही विचारांचा अतिरेक करू नका.
मी टोकाची नास्तिक आणि टोकाची अस्तिक लोक ही अब्नोर्मल
आयुष्य जगताना पाहिली आहेत.
दोन्ही टोक ही एकप्रकारचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे.
कित्येक प्रश्न विज्ञान सोडवू शकत नाही. आणि टोकाची आस्तिकता माणसाला भरकटवते.
अति देव देव करून घरातल्यांचे जगणे असह्य केलेली माणसे असतात. आणि नास्तिक आहोत असे म्हणत जबाबदारी टाळणारी माणसे पण असतातच.
17 Nov 2017 - 5:47 pm | माहितगार
आपले विचार वाचून माझ्यासारखे कुणी आहे हे पाहून बरे वाटले. खरे तर मी कोणत्या आस्तीक नास्तीकतेच्या कोणत्याही विशीष्ट टोकाच्या गटात मला स्वतःला सामावून घेता येत नाही. इकडचा हा चांगला विचार तिकडचा तो चांगाला विचार इकडची हि मर्यादा तिकडची ती मर्यादा सर्व तर्कसुसंगत अभ्यासून आपापला समतोल बरा वाटतो.
20 Nov 2017 - 12:04 pm | पुंबा
अगदी अगदी..
17 Nov 2017 - 6:08 pm | सुबोध खरे
सुखी माणूस साहेब
मिपावर बहुसंख्य लोक असेच आहेत जे टोकाचे आस्तिक नाहीत कि टोकाचे नास्तिक नाहीत. बहुसंख्य लोकांना जसे बुवाबाजीकिंवा कर्मकांडाचा तिटकारा आहे तसाच टोकाचा किंवा अतिरेकी नास्तिकपणाचाही तिटकारा आहे. फक्त कुणी मध्यभागाच्या थोडे डावीकडे किंवा थोडे उजवीकडे आहेत एवढेच.