गोविंदराव पटवर्धन

व्यंकु's picture
व्यंकु in काथ्याकूट
21 Oct 2008 - 9:46 am
गाभा: 

गोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग:
1) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
2)पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत.
असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊदे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.