#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - समाप्त

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
3 Nov 2017 - 1:17 am

.

नमस्कार मंडळी..

बरोबर एक वर्षांपूर्वी मी आज केलेला व्यायाम...!! या उपक्रमाची सुरूवात झाली. धागा टाकण्यापूर्वी हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होतीच. पण सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि रोजचा व्यायाम नोंदवायला सुरूवात केली.

नियमीत व्यायामपटूंचे धाग्यावर येणारे प्रतिसाद पाहून अनेकांनी व्यायाम सुरू केल्याचे, फार कांही नांही तर चालणे सुरू केले आणि धाग्याचा फायदा होत आहे हे आवर्जून कळवले. आपल्या मित्रांचे / नातेवाईकांचे ग्रुप तयार करून व्यायाम सुरू केल्याचे वाचताना भारी वाटत होते. या दरम्यान डिसेंबर-जानेवारीमध्ये भटकंतीवर असताना गविंना धागा टाकण्याची विनंती केली आणि गविंनी उपक्रमाला नवीन स्वरूप दिले. चालण्याची सुरूवात कशी झाली हे सांगून त्यांची चालण्याची वाटचाल शेअर करायला सुरूवात केली. मी दर महिन्याला एकाच प्रकारचा धागा टाकणे थोडे कंटाळवाणे झाले असतेच. पुढच्या महिन्यात डॉ श्रीहास यांनी सायकलिंग आणि रनिंग चॅलेंजची कल्पना मांडून एकच धमाल उडवून दिली. एकएकटे किंवा वेगवेगळ्या टीम तयार करून सायकलस्वार मंडळींनी "५० किमी सायकल किंवा १० किमी रनिंग सलग ७ दिवस" ही आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केले. या दरम्यान एकदा अभ्याने अप्रतीम लोगो तयार करून दिला व प्रशांतने #मिपाफिटनेस असे या उपक्रमाचे अधिकृत नामकरण केले.

यथावकाश मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास अशी टीम #मिपाफिटनेस तयार झाली. आंम्हाला सल्ला द्यायला (आणि अनेकदा आमच्या अचाट कल्पनांना जमिनीवर आणायला) पिरा आणि प्रसाद दाते सोबत होतेच. त्यानंतर आमच्यात चर्चांवर चर्चा झडू लागल्या. दर महिन्याला एक वेगळा व्यायामपटू मिपाकर आपली व्यायामगाथा सर्वांसमोर मांडू लागला. मिपाकरांच्या कौशल्याची रेंज आणि चिकाटी बघून थक्क व्हायला होत होते. ज्युदो ते मॅरेथॉन रनिंग, सायकलिंग ते सूर्यनमस्कार, कोणते अ‍ॅप वापरायचे, हार्ट रेट मॉनिटरचा उपयोग काय वगैरे चर्चा झडू लागल्या. वेल्लाश्री आणि आप्पांची जुगलबंदी होत होतीच. यातच एकदा कधीतरी पाध्येंनी "राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे." असे वाक्य टाकून मिपाकरांची चिकित्सक वृत्ती 'हायलाईट' केली. अर्थात या सर्व विचार मंथनातून भरपूर प्रमाणात उपयोगी माहिती मिळत गेली. ती माहिती वैद्यकीय दृष्ट्या सोपी करून सांगण्याचे काम डॉक्टर खरे आणि एक्काकाकांनी उत्साहाने केले.

..या उपक्रमाच्या एक वर्षाच्या प्रवासाबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे, अजुनही बरेच वेगवेगळे विषय हाताळण्यासारखे आहेत, ते खेळ खेळणारे मिपाकरही आहेत मात्र कुठेतरी थांबायला हवे म्हणून "आज केलेला व्यायाम" या उपक्रमाचा शेवट करत आहोत. नवीन उपक्रम सध्या तरी ठरलेला नाही त्यामुळे कांही महिन्यांनी नवीन शिलेदारांसह मिपाफिटनेसचा लोगो पुन्हा बोर्डावर झळकू लागेलच. तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर तुम्हीही जरूर सामील व्हा..!

या उपक्रमात लेखन करणार्‍यांचे, व्यायामपटूंचे, सायकल सायकल ग्रुप मेंबर्सचे आणि प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचे अनेक आभार्स..!!!

टीम #मिपाफिटनेस
मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास, पिलीयन रायडर व प्रसाद दाते.

क्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

6 Nov 2017 - 12:52 pm | वेल्लाभट

हा उपक्रम मिपावरचा अतिशय नाविन्यपूर्ण, उत्कृष्ठपणे नियोजित केलेला आणि प्रेरक उपक्रम होता. किंबहुना आहे. कारण #मिपाफिटनेस च्या निमित्ताने अनेक जण नव्याने व्यायाम करू लागले, अनेक व्यायाम (आणि एकंदरच) सुटलेल्या लोकांना पुन्हा सुरुवात करण्याची उर्मी मिळाली आणि व्यायामातले अनेक पोचलेले लोक सगळ्यांना कळले. शिवाय स्ट्राव्हा सारखी अ‍ॅप वगैरेही माहितीची झाली.

उपक्रम जरी इथे समाप्त झाला असला तरी या निमित्ताने जे जे सुरू झालंय ते थांबायला नको असं वाटतं. फिटनेस वाल्यांचे व्हॉट्सॅप ग्रूप असतील किंवा सायकलिंग, रनिंग ग्रूप असतील, ते थंड पडता कामा नयेत. एकमेकांना प्रेरणा देत राहणं, व्यायाम, फिटनेस, सकस आहार या उद्दिष्टांसाठी एकमेकांच्या मागे लागत राहणं हे आवश्यक आहे.

फिटनेस हा उपक्रम नसून जीवनक्रम आहे!

मोदक, पिरा, प्रशांत, डॉ श्रीहास आणि प्रसाद दाते, अर्थात टीम #मिपाफिटनेस चं भरभरून कौतुक !
Vamos #मिपाफिटनेस !

Losing hurts more than training.

Being unfit is Hard. Being fit is Hard. Make a choice.

वेल्लाभट's picture

6 Nov 2017 - 12:49 pm | वेल्लाभट

प्रतिक्रिया उडवण्यात यावी

चालू ठेवा हो. बंद नका करू.

साधा मुलगा's picture

6 Nov 2017 - 9:39 pm | साधा मुलगा

मी या महिन्यात पुन्हा चालू करणार होतो व्यायाम , तर तुम्ही उपक्रम बंद करताय, किमान प्रेरणा तरी द्या काहीतरी.

समाप्त वगैरे काही नाही. संपादकीय अधिकारांचा व्यक्तिगत उपयोग करुन तो "समाप्त" शब्द काढून टाकण्याची इच्छा होते आहे. तसाही व्यायाम, चालणं आणि त्यातलं सातत्य याची सर्वांचीच बोंब असते. त्यात उपक्रम समाप्त करता तुम्ही. नॉट फेयर मोदकभाऊ..

मोदक's picture

7 Nov 2017 - 12:22 pm | मोदक

सहमत आहे गवि.. पण नवीन कांहीतरी पुढे आले पाहिजे असे मला वाटते त्यामुळे "आज केलेला व्यायाम" हा उपक्रम / धागा बंद करून नवीन कांहीतरी करायला सुरूवात करूया इतकेच.

नवीन काय करायचे ते सुचवा मंडळी..!!

सुबोध खरे's picture

7 Nov 2017 - 12:32 pm | सुबोध खरे

आज करणार होतो तो व्यायाम हा धागा काढा.
पहा ५०० तरी प्रतिसाद मिळतील कि नाही?
)))---(((

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2017 - 11:22 pm | पिलीयन रायडर

=))

मी हे सदर वर्षभर चालवू शकेन!

बाकी हा उपक्रम मस्तच झाला. एक सव्वा महिना मी पण व्यायाम केला म्हणजे बघा!! काही तरी नवीन करूया आता.

वेल्लाभट's picture

8 Nov 2017 - 7:33 am | वेल्लाभट

काही तरी नवीन करूया आता.

व्यायामा'सोबत' करा, व्यायाम'सोडून' नको

जेम्स वांड's picture

11 Nov 2017 - 1:10 pm | जेम्स वांड

गवि, मोदकभाऊ ह्यांच्यासारखी बाप माणसे असल्यावर काय बिशाद उपक्रम फेल व्हायची!!. सगळ्या संबंधितांचे खूप खूप अभिनंदन, मी खूप प्रेरणा घेतली आहे ह्या उपक्रमातून, आत्ता ८९ किलो चा ८७ किलो वर आलोय, ७८ वर आलो की धागा काढू म्हणतो :) , मिपा फिटनेस फॉलो करून एक कळले, पेन इज टेम्पररी ग्लोरी इज फॉरेवर, काहीतरी करू आधी मग मिपावर माफक चमकोगिरी करू असा मानस आहे..

डॉ श्रीहास's picture

14 Nov 2017 - 11:19 pm | डॉ श्रीहास

नुकतीच DC (Deccan Cliffhanger) ही मानाची रेस (पूणे - गोवा ६४३ किमी रिले फाॅर्मॅट) पूर्ण केली आहे .... त्यावर सविस्तर धागा येणारच आहे .
शिवाय माझी स्वत:ची अशी अचिव्हमेन्ट म्हणजे १२/११/१७ ला २०० किमी ची ब्रेव्हे (नगर-औ’बाद-नगर) ही १०:१० तासात (riding time ८:३०तास) यशस्वी झाली आहे !! त्यामुळे हा धागा जरी समाप्त झाला तरी परिणाम दूरगामी होणार हे निश्चित .... ज्या सर्वांनी इथे लिहीलं - वाचलं आणि शिकवलं त्या सर्वांचे मनापासून आभार _/\_ ... Let’s keep going, let’s keep inspiring..