मश्रुम फ्राय

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in पाककृती
18 Oct 2017 - 12:38 pm

मश्रुम फ्राय
साहित्य:
१ मश्रुमचा चौकोनी पुडा (फूडबझार, स्टार, मोअर मॉल मध्ये मिळतो तो) (धुवून निथळून हलक्या हाताने कापडावर कोरडा करून कापावा )

९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे )
१ टी स्पून काळी मिरी
१/२ टेबल स्पून आलं + १/२ टेबल स्पून लसूण
१ टी स्पून फिश सॉस / ऑयस्टर पेस्ट
१ टी स्पून व्हाईट व्हिनेगर
१ टी स्पून साखर
उगाच थोडं मीठ
१ चक्री फुल (थोडा टवका खाऊन खात्री करा चक्री फुल कडू नसेल याची )

१ टेस्पून तेल (तीळ तेल किंवा कुठलंही प्रकारचं न्यूट्रल तेल वापरू शकता )

तीळ गार्निशसाठी

==============================================================
पूर्वकृती : ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे )

नंतर
शिजवलेल्या मिरच्या + आलं + लसूण + मिरे + साखर + मीठ
एक चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये गंध वाटून घ्या...

==================================================================

कृती:
कढईत तेल मध्यम गरम करून त्यात चक्री फुल घालाव, सुगंध दरवळू लागताच त्यात, मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट टाका, साधारण २ मिनिटे परतावे. (मिरची मिरे आलं लसूण) पेस्टचा सुगंध दरवळू लागताच त्यात, कापलेला मश्रुम टाकावा. उलथणीने मसाल्यात सगळीकडून माखून घ्यावा. व्हिनेगर व फिश सॉस शिंपडून मिनिटाभरच्यापेक्षा थोडं कमी परतत राहावं, गॅस बंद करा, तिळाने गार्निश करा.

गरम पोळी / फुलका/ प्लेन राईस बरोबर सर्व्ह करावी.
.
mf

प्रतिक्रिया

टीकोजीराव's picture

18 Oct 2017 - 10:25 pm | टीकोजीराव

फोटू तर छान दिसतोय, अगदी काजूची भाजी वाटतेय.
पण हे 'उगाच थोडं मीठ, उगा अंगभर पाण्यात' हा काय प्रकार आहे?

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Oct 2017 - 12:39 pm | II श्रीमंत पेशवे II

मस्त रेसिपी आहे , पटकन होणारी ....
ऑयस्टर पेस्ट काय असत ? फिश सॉस वगळता येऊ शकेल का ? कि हवाच ?

बाकी , मिर्ची पेस्ट करायला वेळ लागेल तोच .... मशरूम शिजायला हळवा असतो ( पटकन शिजतो )

मस्त रेसिपी

पगला गजोधर's picture

27 Oct 2017 - 7:53 am | पगला गजोधर

फिश सॉस/ ऑईस्टर पेस्ट ऑप्शनल आहे,
डिश मध्ये उमामी आणण्याकरिता वापरतात....
वगळल्यास काही प्रॉब्लेम नाही. आवडत असल्यास थोडा सोय सॉस किंवा रेड बिन सॉस वापरू शकता...
मश्रुमची स्वतःची उमामी टेस्ट असते...

बाहेर रेस्टॉरंट वाले msg वापरून उमामी आणतात...
MSG वापरू नये .....

एस's picture

26 Oct 2017 - 12:50 pm | एस

भारी!

पद्मावति's picture

26 Oct 2017 - 2:26 pm | पद्मावति

मस्तं रेसेपी.

एरवी मशरुम आवडत नाही, पण पाकृ विभागात तुमचं नाव बघून धागा उघडला. येऊ द्या आणखी पाकृ.

मनिमौ's picture

27 Oct 2017 - 9:15 am | मनिमौ

आवडतात. या पाकृ मधे थोडा टॅबॅस्को साॅस पण छान लागेल

स्वाती दिनेश's picture

28 Oct 2017 - 8:05 pm | स्वाती दिनेश

छान दिसतेय पाकृ..
स्वाती

नूतन सावंत's picture

30 Oct 2017 - 11:50 am | नूतन सावंत

झटपट होणारी चमचमीत पाककृती.