चिकन ब्रेड स्टु

केडी's picture
केडी in पाककृती
16 Oct 2017 - 4:17 pm

CBS1

साहित्य
१ किलो चिकन, साफ करून
इतर साहित्य ह्या पाककृती प्रमाणे

कृती

मागे काही लोकांनी व्हेज आणि नॉन व्हेज पाककृती वेगळ्या टाका म्हणून लिहिलेलं, त्यामुळे हि पाककृती वेगळी देत आहे. ह्याची कृती व्हेजिटेरियन ब्रेड स्टु सारखीच आहे, फक्त भाज्यांसोबत चिकन टाकून ते शिजवून घायचं आहे.

चिकन ला मीठ आणि काळीमिरी लावून ३० मिनिटे ते १ तास मॅरीनेट करावे. व्हेजिटेरियन ब्रेड स्टु च्या पाककृती प्रमाणे भाज्या परतून झाल्या कि त्यात चिकन चे तुकडे टाकावेत. साधारण ५ ते ८ मिनिटे भाज्या आणि चिकन परतून घ्या. आता त्यात हळद, गरम पाणी (चिकन बुडेल इतपत) टाकून, झाकण ठेऊन चिकन मंद आचेवर शिजवून घ्या (साधारण २५ ते ३० मिनिटे).

Step1  Step2

भाज्या आणि चिकन शिजत आले कि पातेल्यात ब्रेड ची पेस्ट टाकून, त्यात काळीमिरी पावडर टाकून मिश्रण ढवळून घ्या. अजून २ ते ५ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.

चवीनुसार मीठ टाकून, वरून चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम स्टु, खायला घ्या! सोबत हवं तर फ्रेंच ब्रेड चे थोडे बटर मध्ये भाजलेले तुकडे घ्या!

CBS-2

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

16 Oct 2017 - 4:43 pm | कपिलमुनी

मस्त आहे !
बाणेरच्या स्ट्यू आर्ट मधे खाल्ल्या पासून हा पदार्थ फेव्हरीट झाला आहे. दिवाळी नंतर करण्यात येइल.

कपिलमुनी's picture

16 Oct 2017 - 4:47 pm | कपिलमुनी

stew

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 5:07 pm | पगला गजोधर

छान रेसिपी ...
करून पाहूया हिवाळ्यात ... फराळ खाऊन वैताग येईल तेव्हा ...

माझा काय विचार होता ... तुमच्या रेसिपी प्रमाणे जवळ जवळ सगळं करावं ... फक्त चिकन आणून,
घरी बोन वेगळे करावे ... व ते बोनलेस चिकन स्टु रेसिपी मध्ये वापरावं ... मंद आचेवर उकळत ठेवलं असता ...

दुसरी कडे वेगळे केलेले बोन्स, जाड पातेल्यात बत्त्याखाली चेचून , पाणी टाकून आचेवर शिजत ठेवावं ...
व हे बोन्स च सूप चांगलं शिजून झालं की कापडातून गाळून घेऊन मूळच्या चिकन स्टु मध्ये टाकावं ...
स्टु मंद आचेवर आणखी थोडं तबीयतसे राहू दे ...
म्हणजे माझा अंदाज आहे की बोन मॅरोची पण थोडी चव उतरेल ...
काय म्हणता ?

पाण्या ऐवजी स्टॉक वापरला तर चव निश्चित अजून छान येईल। खाटकाकडून बोनलेस चिकन आणा, हाडं वेगळी मागून घ्या (स्वस्तात देतात नुसती हाडं)

स्टॉक, ब्रॉथ आणि बुलीयबेस बद्दल एकदा सविस्तर लिहीन.

हाडं ठेचून म्हणाल तर बोन म्यारो मूळे स्टॉक गढूळ होईल. आणि हो, मी पूर्वी म्यारो आवडीने खायचो, पण ऐकीव माहिती प्रमाणे, हल्ली कोंबड्याना दिल्या जाणाऱ्या अवास्तव steroids आणि इतर supplements मुळे म्यारो खाणे आरोग्यास हानिकारक आहे. ( हे सगळे त्यांच्या हाडात, म्यारो मध्ये जाऊन बसते). अर्थात जाणकार प्रकाश टाकतील ह्यावर आणखी.