फुलवर (कॉलीफ्लॉवर)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in पाककृती
16 Oct 2017 - 10:28 am

साहित्य:
१ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला (गुच्छ साधारण जायफळाच्या आकाराएवढी)

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल (अर्ध नेहमीचं व अर्ध मोहोरीचं (ऐच्छिक), किंवा एकाच प्रकारचं तेल वापरू शकता ),
१ टी स्पून चिमटी मोहोरी, १ कढीपत्त्याची डहाळी

वाटण :
४ हिरव्या मिरच्या (**जास्त तिखट नको असेल तर डिसीड करून घ्याव्या)
८ लसूण पाकळ्या, १ इंच आले साल काढून
कोथम्बीर छोटा बचकाभर, नखभर हळद

लिंबाची फोड
एक्स फॅक्टर (ऐच्छिक) : एक टीस्पून फिश सॉस , तीळ गार्निशसाठी
==============================================================
पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्लॉवरचे बारीक गुच्छ बुडतील व वर साधारण एक इंच पाणी येईल, एवढे )
पाणी घेऊन त्यात एक टीस्पून मीठ टाकावे व उकळत ठेवावे, पाणी खळखळा उकळू लागले कि त्यात
फ्लॉवर टाकावा, साधारण २-३ मिनटे ठेवावा, **झाकण मारू नका....
साधारण तुम्ही खाता त्याच्या ८०% शिजले असे वाटते तेव्हा, गॅस बंद करा.... दोन तीन मिनिटे त्यात फ्लॉवर राहू देत .. **पातेल्यावर झाकण लावू नका....
मोठ्या जाळीतून सर्व पाणी काढून फ्लॉवर निथळत राहू द्या ....

पाणी तिकडे उकळत असता मिनव्हाईल तुम्ही कोथम्बीर आलं लसूण, चिमूटभर हळद एक चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या...

==================================================================

कृती:
कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी घालावी, मोहरी तडतडली कि लगेच कढीपत्ता टाकावा, कढीपत्ता टाकल्यावर लगेच २ सेकंदाच्या अंतराने
वाटण घालावे (नाही तर कढीपत्ता जळू शकतो) साधारण २ मिनिटे परतावे. आलं लसूण फोडणीचा सुगंध दरवळू लागताच त्यात, आच मंद करावी, निथळलेला फ्लॉवर टाकावा. फ्लॉवर उलथणीने मसाल्यात माखून घ्यावा. छोटी लिंबाची फोड पिळावी.

ऐच्छिकएक्स फॅक्टर वाले आता फिश सॉस फिरवून शिंपडतील. हलक्या हाताने परतत राहा, ३०-४० सेकंदाने गॅस बंद करा.
तिळाने गार्निश करा.
**फिश सॉस टाकणारे मीठ जरा जपून वापरा (कारण फिश सॉस स्वतः खारट असतो)

गरम पोळी / फुलका बरोबर सर्व्ह करावी.

Fl

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Oct 2017 - 2:56 pm | रेवती

फोटू व कृती दोन्ही छान.

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 3:12 pm | पगला गजोधर

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

तुम्ही वरील पाकृ मध्ये फेरफार करून, हिरव्या मिर्ची ऐवजी थोडं (लाल तिखट + लोणच्याचा मसाला ) टाकून ,
"अचारी (हिंदी: अचार ) फ्लॉवर" म्हणूनही सर्व करू शकता.

जेम्स वांड's picture

16 Oct 2017 - 4:23 pm | जेम्स वांड

कोबीच्या भाजीत फिश सॉस वाचुन आमचं देशस्थ इमान थोडं जळले. एरवी कोंबडं ते बोकुड सगळं चालतं पण कोबीच्या भाजीत फिश सॉस म्हणजे शुगर फ्री घालून पुरण वाटल्यागत झालं. असो.

फिश सॉस जास्त वापरून खरपूस भाजता ही कोबी चकण्यात चालावी काय?

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 4:48 pm | पगला गजोधर

एक्स्क्यूजमी ... ? कोबी ?? फ्लॉवरची भाजी ...

अहो ट्राय तर करून पहा ... जरा वेगळं काहीतरी ....
माझ्या कन्येने आज ताटातील सर्व सर्व-केलीली भाजी शहाण्या बाळासारखी खाल्ली ...
तिला तर चायनीज ची आठवण आली (फॉर लॅक ऑफ प्रॉपर वर्ड ... )

सूड's picture

16 Oct 2017 - 8:09 pm | सूड

नागपूरकर असतील ते, त्यांच्याकडे फुलगोभी आणि पत्ता गोभी असतो ना.

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 10:24 am | जेम्स वांड

फुल'कोबी' म्हणतो बुआ आम्ही, अन आम्ही नागपूरकर नाही, सातारकर आहोत, किंवा होतो म्हणा एकेकाळी :(

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 12:48 pm | पगला गजोधर

अहो फुल'कोबी' नव्या प्रकारे ट्राय तर करून पहा ... जरास वेगळं काहीतरी ....आवडली तर, मी 'सुकट + कांद्याची पात' याची रेसिपी टाकेन ...

पद्मावति's picture

16 Oct 2017 - 4:56 pm | पद्मावति

मस्तं झटपट पाकक्रूती. फुलवर नाव पण आवडलं.

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 5:12 pm | पगला गजोधर

लहानपणीचं आठवतंय की, आमची भाजीवाली फुलवर म्हणायची कॉलीफ्लॉवरला ...
मला तर पत्त्यातल किल्वर चे चित्र फुलवरच्या भाजीत दिसायचे ...
किती तरी दिवस फुलवर व किल्वर हे एकच समजायचो ...

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2017 - 11:14 pm | स्वाती दिनेश

भाजी आवडली,
स्वाती