नान

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
20 Oct 2008 - 1:41 pm


साहित्य- २ वाट्या मैदा, १ चहाचा चमचा ड्राय यिस्ट, १ चहाचा चमचा साखर, कोमट पाणी १/२ वाटी, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर, १/४ च.चमचा मीठ, १ टेबलस्पून तेल, २ टेबल स्पून दही, २ टेबलस्पून दूध,थोडे बटर वरून घालण्यासाठी.
कृती-
एका वाडग्यात यिस्ट+साखर कोमट पाण्यात घालणे व उबदार जागी ५/७ मिनिटे ठेवणे.
एका तसराळ्यात मैदा+बेकिंगपावडर+मीठ एकत्र करणे.त्यात तेल,दही,दूध घालणे, नंतर यिस्ट+साखरेचे मिश्रण घालणे व एकत्र करणे. चांगले मळणे.मळायला अजून पाणी हवे असले तर पाण्याऐवजी दह्याचे पाणी किवा ताक घेणे.
एक सुती फडके ओले करुन पिळणे व त्याने ह्या मळलेल्या गोळ्याच्या वाडगा झाकून उबदार जागी २५ ते ३० मिनिटे ठेवणे.
अवन १५० अंश से. ला प्रिहिट करणे.
एका बेकिंग ट्रेला तेलाचा हात लावून घेणे किवा त्यावर बेकिंग पेपर पसरून घेणे.
साधारण अर्ध्या तासानंतर फडक्याखालील गोळा थोडा फुलून येईल आणि नरमही होईल. ह्या गोळ्याचे ४ ते ५ गोळे करणे. पोळपाटावर मैदा भुरभुरून घेणे व एकेक गोळा घेऊन लांबट आकाराचे नान जाडसर लाटणे. एका वेळी २ ते ३ नान बेकिंग ट्रेमध्ये लावून घेणे.
१५० अंश से. वर १० ते १५ मिनिटे बेक करणे. हलका गोल्डन ब्राउन रंग आला पाहिजे. नंतर अवन मधून काढून ब्रशने किवा चमच्याने बटर लावणे. गरम गरम नान बटरचिकन किवा मटरपनीर किवा व्हेज कोल्हापुरी इ. कशाही बरोबर 'हादडणे'.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

20 Oct 2008 - 1:55 pm | ऋषिकेश

वा! स्वातीताई, त्वरीत दखल घेऊन पाकृ दिल्याबद्दल अतिशय आभार!.. :)

बाकी नानला २-३ पापुद्रे असतात ते आपोआप सुटतात का त्यासाठी काहि वेगळी पद्धत आहे (लाटताना घडी वगैरे ?)
कुलचा आणि नानच्या कृतीत (आकार आणि वरून तीळ लावणे सोडून) कितीसा फरक आहे?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

20 Oct 2008 - 5:10 pm | स्वाती दिनेश

कुलचा आणि नानची कणिक भिजवण्याची पध्दत वेगळी आहे आणि लाटण्यातही फरक आहे.कुलचा करायला नानपेक्षा किचकट आहे.
नान लाटताना घडी घालायची गरज नाही. पापुद्रे सुटतात आणि नरमही राहते. स्पंजीनेस बेकिंग पावडर व यिस्टमुळे येतो.
स्वाती

वल्लरी's picture

20 Oct 2008 - 5:04 pm | वल्लरी

स्वातीताई,
अवन ला alternative आहे,,,,,,,
आपण कुकर वापरु शकतो....त्यात एका वेळेला ३ ते ४ नान होऊ शकतात.....Electricity सुद्धा कमी खर्च होते

Smear a pressure cooker with a little amount of oil. Remove its lid and heat upside down.
Apply a little quantity of water on one side of naan and attach the wet side around the inner wall of the pressure cooker. Keep it until the brownish spots appear. You can put 3 to 4 naans at a time.Take them out and apply butter
Khana khazana tips

-जया

शाल्मली's picture

20 Oct 2008 - 3:18 pm | शाल्मली

वा वा स्वातीताई,
एकावर एक मस्त मस्त पाकृ. टाकत्येस..
छान आहे पाकृ.
--शाल्मली.

लिखाळ's picture

20 Oct 2008 - 4:58 pm | लिखाळ

नान करुन पाहायला पाहिजेत (असे घरी जाऊन म्हणेनः:))
परवाच बेकिंगपेपर आणला आहे..
पाकृ मस्तच आहे...
--लिखाळ.

रेवती's picture

20 Oct 2008 - 8:35 pm | रेवती

काय छान रंग दिसतोय नानचा. आता मात्रं मटर पनीरचा विचार करायलाच हवा. खूप दिवस झाले मटर पनीर करून.
छे, जाऊ दे उद्या कशाला, आत्ताच करते मटर पनीर. नान जमतायत का ते ही पाहते.

रेवती