मौसुत उंडा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
2 Oct 2017 - 6:31 pm

पोळ्या मौसुत व पदर सुटलेल्या हव्या असल्यास कणीक चांगली मळावी लागते..व ते काम नाहि तरी कष्टाचेच असते
किलो भर कणीक ५/७ मीनीटात उत्तम पणे मऊ कशी मळावी याचे एक टेकनिक नेट वर टंगळमंगळ करताना सापडले..
एक किलो वा हव्या वजनाचे कणकीचे पीठ घ्या
तेल मीठ पाणी टाकून मळा
उंड्याला बोटाने चित्रात दाखवल्या प्रमाणे भोके पाडा
व कणीक किती घट्ट भिजवली आहे याचा अंदाज घेत भोकावर पाणी शिंपडा
मी चमच्या ने २-३ थेंब पाणी प्रत्येक भोकात टाकतो
उंडा पलटा व दुस-या बाजुला बोटा नी भोके पाडुन थेंब २-३ थेंब पाणी टाका..
उंडा ५-६ मिनिटे झाकून ठेवा
नंतर बाहेर काढा व २-३ मिनिटे मळा..
मौसुत उंडा तयार...

..

..........

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

2 Oct 2017 - 7:50 pm | पगला गजोधर

कुठलीही गोष्ट चांगली मळली,
की पदर हे आपोआप सुटतातच....

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2017 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा

=))

पगला गजोधर's picture

4 Oct 2017 - 8:25 am | पगला गजोधर

फुड पॉर्न ??
.
.
मौसुत उंडे
.
.
केळं
..
??

जेम्स वांड's picture

3 Oct 2017 - 5:01 pm | जेम्स वांड

इतक्या निगुतीने बोटाने भोके वगैरे पाडून, भोकात मोजून तीन थेंब पाणी सोडून माणसाने पोळ्या लाटाव्या कधी अन खाव्या कधी.....

रिटायरमेंट नंतर सुद्धा असले चोचले जमतील का नाही शंकाच आहे, सबब आपला पास....

II श्रीमंत पेशवे II's picture

4 Oct 2017 - 2:06 pm | II श्रीमंत पेशवे II

पण हा प्रयोग जर कणिक राठ आणि घट्ट असेल तर जास्त फायद्याचा आहे

मनिमौ's picture

5 Oct 2017 - 1:05 pm | मनिमौ

झाले तरी पोळ्या मऊ होतील याची काय गॅरंटी

पगला गजोधर's picture

5 Oct 2017 - 1:33 pm | पगला गजोधर

तो पुढचा विषय आहे,
त्यासाठी अकु पुढचा धागा काढतीलच...
आधी मऊसूत उंडा च्या बेसकॅम्प पर्यंत या...
मग पुढची चढाई ...