साहित्यः
पारीसाठी:
१ जुडी पालकाची पाने,
गव्हाचे पीठ,
बेसन पीठ,
१/२ चमचा ओवा,
हिरवी मिरची/ लाल तिखट,
मीठ,
तेल,
पाणी
सारणासाठी:
३-४ उकडलेले बटाटे,
आले-लसूण पेस्ट,
४-५ पुदिन्याची पाने बारीक चिरुन (ऐच्छिक),
मीठ,
हळद (ऐच्छिक),
लाल तिखट/ हिरवी मिरची,
जीरे पूड
कृती:
१. पालकाची पाने खुडून, धुवून घ्या. एका भांड्यात थोड्याश्या पाण्यात ती पाने घालून आचेवर ठेवा. पाच-सात मिनिटांनी आच बंद करा. हिरवी मिरची घालून आणि पाण्यासहीत ती पाने मिक्सरमधून प्युरी करुन घ्या.
२. त्यात मावेल तेवढे गव्हाचे पीठ घाला. मी एक मोठा चमचा बेसनपीठही घातले. चवीप्रमाणे मीठ, गरज वाटल्यास आणखी तिखट, ओवा घाला. तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. हे पीठ थोडेसे ओलसरच राहू द्या आणि झाकून ठेवा.
३. सारणासाठी बटाटे सोलून घ्या आणि मॅश करा. उरलेले सर्व साहित्य घालून एकत्र करा.
४. पराठे बनवण्यासाठी पिठाचा लिंबाएवढा गोळा घ्या. पुरीएवढा लाटून त्यात मावेल तेवढे सारण घाला. कडा उचलून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घेत पराठा लाटा.
५. गरम तव्यावर पराठ्याला तूप/ तेल/ बटर लावून खरपूस भाजा. दही/ चिंच-खजूराची चटणी/ केचप याबरोबर गरम गरम खायला द्या.
टीपः
१. सारणासाठी तुम्ही ज्या आवडतील त्या भाज्या घालू शकता. मी एकदा बटाट्याच्या सारणाबरोबरच बारीक चिरलेला कोबीही घातला होता. मुळा कीसून, त्यातले पाणी काढून तोही घालू शकता.
२. याच पराठ्यावर चटणी लावून काकडी, टोमॅटो, कांदा इ. घालून त्याची गुंडाळी करुनही खाता येईल. (हा प्रकार आमच्याकडे एके ठिकाणी 'हरा-भरा व्रॅप' म्हणून मिळतो).
प्रतिक्रिया
22 Sep 2017 - 10:27 am | प्रीत-मोहर
मस्त दिसतय हे प्रकरण
22 Sep 2017 - 3:53 pm | सस्नेह
टेस्टी लागत असणार नक्कीच !
पण खटपट भारी.
22 Sep 2017 - 4:35 pm | आदूबाळ
सॉरी, पांचट जोक मारायला आलो आहे.
एस्पीडीपीच्या चालीवर या पाकृचं नावः ह भ प.
23 Sep 2017 - 1:03 am | एस
हे एसपीडीपी म्हणजे नक्की काय असतं? मला फक्त पाणीपुरी माहीत आहे, जी मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या चाट-फिटच्या गाड्यांपासून मी चार हात लांबच राहतो.
रुपीताई, पराठा चांगला दिसतो आहे.
23 Sep 2017 - 1:07 am | रुपी
धन्यवाद :)
अवांतर : अरे, ये एसपीडीपी नही जानते! तुम्ही पुणेकर आहात ना? ;)
22 Sep 2017 - 4:41 pm | यशोधरा
भन्नाट मस्त दिसते आहे!
22 Sep 2017 - 7:29 pm | मंजूताई
करून बघण्यात येईल...
22 Sep 2017 - 8:03 pm | पैसा
खूपच छान पाकृ!
22 Sep 2017 - 9:00 pm | गम्मत-जम्मत
एक चमचा भाजाणीच पीठ घालून अजून भारी लागेल.
23 Sep 2017 - 1:11 am | रुपी
धन्यवाद.
हो खरंय. भाजणीचे पीठ सध्या घरात नाही, असेल तर मी पराठे, धिरडी यांतही नेहमीच घालते.
23 Sep 2017 - 12:22 am | रेवती
छान दिसतोय पराठा. गरम गरम चविष्ट लागणार.
23 Sep 2017 - 1:33 pm | सिरुसेरि
छान .
23 Sep 2017 - 8:36 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसतो आहे पराठा.
स्वाती
24 Sep 2017 - 7:43 pm | सविता००१
मस्त दिसतोय ह.भ.प. :)
छानच ग
25 Sep 2017 - 6:49 pm | पुंबा
अरे!!
काय झकास दिसतोय प्राठा..
तात्काळ खावासा वाटतोय. पण सारण भरून पराठा लाटणे आणी मग तो न फुटता भाजणे आवाक्याबाहेरचे वाटतेय.
25 Sep 2017 - 11:39 pm | रुपी
धन्यवाद सर्वांना!
@सौरा, पराठा लाटताना जरासा फुटला तर हरकत नाही.. न फुटण्यासाठी ती कणीक जरा मऊ असायला हवी. शिवाय सारण भरल्यावर मी पराठा थोडासा हातांवरच थापते (भाकरीसारखाच), त्यामुळे फार फुटत नाही असा माझा तरी अनुभव आहे. नक्की करुन बघा :)
@स्नेहांकिता ताई, खरंय.. खटपट आहे जरा.. त्यामुळे २ वेळा पराठे खाता येतील एवढे सारण आणि कणिक बनवून ठेवते मी ;)
27 Sep 2017 - 12:15 am | जुइ
उत्तम पाकृ. सवडीने करून बघेन.
27 Sep 2017 - 1:13 am | पद्मावति
वाह, मस्तच.
29 Sep 2017 - 12:43 pm | II श्रीमंत पेशवे II
छान दिसतोय पराठा
30 Sep 2017 - 3:55 am | इडली डोसा
मी पण असच करते फक्त बटाटा एकच घालायचे, आता जास्त घालुन करुन बघते.