सुगरणी च्या पाक गृहातुन.. एक रेसिपी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
17 Sep 2017 - 7:54 pm

सुगरणी च्या पाक गृहातुन..
एक रेसिपी
...............
केळीचे शिकरण
साहित्य..
केळी..(जळगावची..पिकलेली..पिवळ्या सालिवर ठिबके असलेली)
तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे)
साखर
कृति
स्टील चे पातेले घ्यावे..
केळी सोलुन कुस्करुन त्यात ठेवावी..
स्टील च्या चमच्याने मॅश करावी..
योग्य प्रमाणात साय व दुध घालावे..
चवि प्रमाणे साखर घालावी..
चमच्याने मिश्रण ढवळुन एक जीव करावे..
केळीचे शिकरण तयार..
तुम्ही जर चंगळवादी असाल तर मटार उसळ सोबतिला हवी..
शिकरण..मटार ऊसळ व मऊसुत पोळ्या...
म्हणजे चंगळवादा ची परिसिमा...
...
निवेदन..समुहावरील सुगरण कदाचित म्हणतील.."केळीचे शिकरण ही काय सुगरण रेसिपी आहे का? मुळात ही रेसिपी नाहिच..
पण ही रेसिपी सुगरण च करु शकतात कारण
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
हे गीत आमचे म्हणणे सिद्ध करते..
तेंव्हा मस्त खा स्वस्थ रहा....
यंजोय

प्रतिक्रिया

एस's picture

17 Sep 2017 - 11:46 pm | एस

रोचक पाककृती. विकांताला करून पाहिल्या जाईल.

अंडे घालून ही पाकृ करता येईल का? तसंच, माझ्याकडे एक जुनी स्कुटर गंजत पडली आहे. त्याचाही काही उपयोग होत असल्यास...

कंजूस's picture

18 Sep 2017 - 6:32 am | कंजूस

एक चमचा दही घालावे.
पुलंची " तुम्हाला कोण व्हायचय? " ही कॅसेट पाहुण्यांना शिकरणपोळीउसळ खाताना ऐकवावी आणि पुण्य गोळा करावे.

पगला गजोधर's picture

18 Sep 2017 - 12:37 pm | पगला गजोधर

मी माझा ९५ साली १ लाखात घेतलेला १ बीएचके, ६० लाखाला विकल्यावर, आलेल्या मोबदल्यातून
भूगाव येथे २ बीएचके घेतल्यावरही, माझ्या कडे चिक्कार पैसे बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर शिल्लकीत आहे,
त्यामुळे, मला आता राजसी चंगळवादाचा माज जाज्वल्य परिसीमाउल्लंघन योजिल्यामुळे,
मी शिकारणात एक संपूर्ण अक्खा वेलदोडा कुटून टाकणार आहे.

पगला गजोधर's picture

18 Sep 2017 - 12:38 pm | पगला गजोधर

मी माझा ९५ साली १ लाखात घेतलेला कोथरुडातील १ बीएचके, ६० लाखाला विकल्यावर, आलेल्या मोबदल्यातून
भूगाव येथे २ बीएचके घेतल्यावरही, माझ्या कडे चिक्कार पैसे बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर शिल्लकीत आहे,
त्यामुळे, मला आता राजसी चंगळवादाचा माज जाज्वल्य परिसीमाउल्लंघन योजिल्यामुळे,
मी शिकारणात एक संपूर्ण अक्खा वेलदोडा कुटून टाकणार आहे.

वेल्दोडा सोलून कुटणार का..
मग ती साले टाकून चहा करा. पाकृ टाकायला विसरू नका.

पगला गजोधर's picture

18 Sep 2017 - 5:48 pm | पगला गजोधर

आमचे येथे पुढील एक-दीड वर्षे तरी कोणास कर्तव्य नसल्यामुळे, वेलदोड्याची साल जपून ठेवण्यात येईल .
पाहण्याचा कार्यक्रमाचे नियोजन झाल्यास चहापानात साल वापरू. ....

आणि चहा गाळून उरलेली चहाची पावडर अशी फेकून देऊ नका बरं? त्यात आणखी दोन माणसांचा चहा सहज होतो. आणि त्यानंतर मग ती झाडांना खत म्हणून घाला.

पगला गजोधर's picture

18 Sep 2017 - 6:43 pm | पगला गजोधर

ठीक आहे, चहा शेजाऱ्यांकडून मागून आणल्यामुळे फक्की त्यांच्याच कुंड्यात टाकण्या जाईल .....

इरसाल's picture

19 Sep 2017 - 10:49 am | इरसाल

चहा झाला की ती चहा पावडर तव्यावर टाकुन गरम करुन थोडा धुर काढा त्याने घरातील डास-चिलटे किंवा तत्सम कीटक पळुन जातील.
मग तिला टाका कुंडीत. (शेजार्‍यांच्या)

पगला गजोधर's picture

19 Sep 2017 - 11:54 am | पगला गजोधर

बरे झाले हो कल्पना दिलीत ती....
शेजार्यांना आधीच सांगून ठेवायला हवे, तवा तापवून ठेवा.

रमेश आठवले's picture

18 Sep 2017 - 8:33 pm | रमेश आठवले

मला एकदा पुण्यात एका ब्राह्मण प्राध्यपकांच्या घरी जेवायला आमंत्रण होते. आमच्या क्षेत्रातील इतर काही मंडळी ही आंमत्रित होती. जेवायला मुख्य बेत कोंबडी होती. मी शाकाहारी आहे असे सांगितल्यावर यजमानीण बाईंची जरा तारांबळ उडाली. त्यांनी मला विचारलं सुद्धा की अहो तुम्ही इतके वर्ष परदेशात राहून शाकाहारी कसे ? त्यानन्तर त्यांनी पटकन माझ्या साठी शिकरण बनवली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2017 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्याची कृती इथे टाका... शिकरणाची, नाहीतर कोंबडीची टाकाल ;) :)

अच्चा तुम्ही इतकी वर्ष परदेशात होतात तर!

खेडूत's picture

18 Sep 2017 - 10:23 pm | खेडूत

मुद्दा तो नैच्चे!
कोंबडी न टाकताही शिक्रण करता येते हा या ठिकाणी विषय आहे..

पगला गजोधर's picture

18 Sep 2017 - 11:53 pm | पगला गजोधर

समजा: फक्त आणि फक्त, शीक्रण खाऊन पोसलेल्या कोम्बडीची सागुति, ही चालू शकते का ? शाकाहारी म्हणून

यावर उपमुद्दा असा, की अंडे तर काहीच खात नाही. मग ते शाकाहारी की मांसाहारी?

चष्मेबद्दूर's picture

19 Sep 2017 - 12:25 pm | चष्मेबद्दूर

तितक्याच भन्नाट प्रतिक्रिया वाचून धमाल आली.
हसून लोटपोट. ;० :०

किसन शिंदे's picture

19 Sep 2017 - 12:34 pm | किसन शिंदे

नेहमीचा अकु टच नाही जाणवला या धाग्याला.

अभ्या..'s picture

19 Sep 2017 - 12:51 pm | अभ्या..

सुगरण, पुणे, केळे, साय, शिकरण, जळगाव, चितळे, समुहावरच्या सुगरणी, चंगळवाद इतक्या सार्‍या पदार्थांना हाताळल्यावर अजुन कुठे टच पाहिजे भावा तुला?

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2017 - 1:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

Banana

हे दुध
Miilk

आणि ही साय

आणि हा या पाकृवरचा कायच्या काय उतारा

चित्रे अंजा वरुन साभार,

पैजारबुवा,

किसन शिंदे's picture

19 Sep 2017 - 2:02 pm | किसन शिंदे

बुवा, कार्बाईडने पिकवलेली केळी आहेत ही, याचे शिकरण खाल्ले तर पोटात दुखेल अकुंच्या.

१. दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.

२. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.

३. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.

४. अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते.

५. बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो.

६. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते

७. चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.

८. एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.

९. सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.

१० वातामुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते. ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण १ चमचा कोमात पाण्या सोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.

पैजारबुवा,

पैसा's picture

19 Sep 2017 - 8:16 pm | पैसा

पादरे मीठ?!!

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2017 - 1:46 pm | प्रभाकर पेठकर

तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे)

अजून हसतोय.

नूतन सावंत's picture

11 Oct 2017 - 11:27 pm | नूतन सावंत

हहपुवा.बऱ्याच दिवसांनी जुने मिपा वाचत असल्यासारळे वाटले,जुना लेख आहे का तेही तारखेची शहानिशा करून पाहिले.